Tuesday, 26 May 2020

विलासराव देशमुख

विलासराव दगडोजीराव देशमुख हे मराठी, भारतीय राजकारणी होते. इ.स. १९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २00३ व १ नोव्हेंबर, इ.स. २00४ ते ४ डिसेंबर, इ.स. २00८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म २६ मे, १९४५ ला बाभळगांव, जिल्हा लातूर येथे झाला.

विलासराव देशमुख यांनी १९७४ मध्ये बागूळगांवचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीस सुरूवात केली. १९७४ ते १९८0 दरम्यान त्यांनी लातूर पंचायत समितीच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. उस्मानाबाद जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी पंचसूत्री कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील तरूणांना कॉंग्रेसच्या झेंड्याखाली संघटीत करून ते कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले.
यानंतर त्यांनी राज्याच्या राजकारणात पाय रोवण्यास सुरूवात केली. १९८0 ते १९९५ पयर्ंत ते सलग तीनदा आमदार म्हणून राज्य विधानसभेवर निवडून गेले. या कालावधीत त्यांनी गृह, सार्वजनिक प्रशासन, सहकार, उद्योग, ग्रामीण विकास, शिक्षण, तंत्रशिक्षण आणि क्रिडा व युवक-कल्याण मंत्रालयांचा कार्यभार सांभाळला.
१९९५ मध्ये ते त्यांच्याच मतदारसंघात पराभूत झाल्याने त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रश्‍चचिन्ह निर्माण झाले. त्यांच्यासमोरील राजकीय अस्तित्वाचे हे मोठे आव्हान होते. मात्र १९९९ ते परत विधानसभेवर निवडून आले आणि त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. १८ ऑक्टोबरला ते मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाले. दरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींमुळे १७ जानेवारी २00३ मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आणि सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री बनले.
ऑक्टोबर २00४ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूकीनंतर नोव्हेंबर महिन्यात देशमुख दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनले. मात्र २00८ मधील मुंबई हल्ल्यानंतर वादात सापडलेल्या विलासरावांना नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्रीपद सोडावे लागले.
पक्षश्रेष्ठींना त्यांना राज्याच्या राजकारणातून केंद्रात कार्यरत करण्याचा निर्णय घेतला. ते राज्यसभेवर निवडून आले आणि २00९ मध्ये त्यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले. यानंतर ग्रामीण विकास मंत्रालयाचा कार्यभार त्यांना सोपवण्यात आला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. .त्यांचा मृत्यू १४ ऑगस्ट, २0१२ रोजी चेन्नई येथे झाला.

No comments:

Post a Comment