प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी आणि वकील असफ अली यांचा जन्म 11 मे 1888 रोजी झाला. असफ अली यांनी दिल्लीतील स्टीफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर 1909 मध्ये ते कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले. असफ अली लंडनमध्ये असताना सय्यद अमीर अली यांनी लंडन मुस्लिम लीगची स्थापना केली. 1914 मध्ये उस्मानी साम्राज्यावर झालेल्या ब्रिटिश हल्ल्याचा भारतीय मुस्लिमांवर मोठा परिणाम झाला. असफ अली यांनी तुर्कीच्या बाजूचे समर्थन केले आणि प्रीव्ही कौन्सिलचा राजीनामा दिला. डिसेंबर 1914 मध्ये ते भारतात परतले आणि राष्ट्रीय चळवळींमध्ये पूर्णपणे भाग घेतला.
वैयक्तिक जीवन
आसफ अलीचे 1928 मध्ये अरुणा गांगुलीशी लग्न झाले होते. लग्न करणे सोपे नव्हते कारण असफ मुस्लिम आणि अरुणा हिंदू होते. इतकेच नाही तर अरुणा आसफपेक्षा 21 वर्षांनी लहान होती. परंतु दोघांनीही समाज आणि रूढीवादी गोष्टींची पर्वा केली नाही आणि एकमेकांसोबत राहण्याचे ठरविले. अरुणा गांगुली असफ अलीशी लग्नानंतर असफ अली बनली आणि नंतर त्याच नावाने प्रसिद्ध झाली. उल्लेखनीय म्हणजे, 1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान अरुणा असफ अली मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा झेंडा फडकावण्यासाठी ओळखल्या जातात.
नामांकित वकील
आसफ अली देशातील नामांकित वकील म्हणून ओळखले जायचे. 8 एप्रिल 1929 रोजी स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधानसभेत बॉम्ब फेकला आणि त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर खटला चालविला गेला. या प्रकरणात भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांचा बचाव आसफ अली यांनी केला. 1945 मध्ये आसफ अली यांना कॉंग्रेस पक्षाने स्थापन केलेल्या आयएनए संरक्षण संघाचे संयोजक बनविले, ज्याचे काम देशद्रोहाच्या आरोपाखाली भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या अधिकाऱयांच्या बचाव करणे होते. 1942 मध्ये महात्मा गांधींच्या आवाहनावरून ते भारत छोडो आंदोलनात सामील झाले.
राजकारणात प्रवेश
1935 मध्ये आसफ अली केंद्रीय विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि त्यांनी मुस्लिम राष्ट्रवादी पक्षाचे प्रतिनिधीत्व केले. दुसऱ्यांदा ते पुन्हा मुस्लिम लीगच्या उमेदवाराच्या विरोधात कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले. विधानसभेत त्यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.
राजदूत आणि राज्यपाल
2 सप्टेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्त्वात असलेल्या अंतरिम सरकारमध्ये असफ अली यांनी रेल्वे आणि परिवहन विभागाचा कार्यभार स्वीकारला.1947 मध्ये त्यांची अमेरिकेतील पहिले राजदूत म्हणून नियुक्ती झाली. 1948 ते 1952 पर्यंत ते ओडिशाचे राज्यपाल होते. ते स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि व्हॅटिकन येथे भारताचे राजदूत देखील होते.
भारतीय टपाल तिकीट
स्वित्झर्लंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम करीत असताना वयाच्या 64 व्या वर्षी म्हणजे 2 एप्रिल 1953 मध्ये त्यांचे बर्न दूतावासात निधन झाले.1989मध्ये भारत सरकारने असफ अलीच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट जारी केले.

No comments:
Post a Comment