Sunday, 17 May 2020

सिक्कीम सर्वार्थानं समृद्ध राज्य

सिक्कीम हा पूर्व उत्तराज्यातला अतिशय सुंदर आणि विलोभनीय असे एक छोटे राज्य आहे. सिक्कीमचा अर्थ 'तांदळा समान शुभ्र' असा अर्थ होतो. तिथे लेपचा,नेपाळी आणि हिंदी भाषा बोलली जाते. देशाच्या मुख्य धारेत येण्यासाठी सिक्कीम सज्ज झाला आहे. २00८मध्ये केंद्रीय विश्‍व विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पुढे शिक्षणाची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढतच गेली आहे. सध्या तिथे १५विद्यालये आणि १२ महाविद्यालय अस्तित्वात असून साप्ताहिक आणि हिंदी वृत्त प्रकाशित केली जात आहेत. सिक्कीमची लोकसंख्या ६,00,000( सहा लाख) असून नेपाळ,चीन आणि भुटानला जोडणार्‍या सीमा रेखा संलग्नित आहेत.
याठिकाणी प्रामुख्याने टॅक्सी चालक,श्रमिक ,मजूरवर्ग,शेतकरी आणि कर्मचारी सेवक वास्तव्य करतात. राज्य सरकार सिक्कीमला वेळोवेळी दिशानिर्देश लागु करीत पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. सुशिक्षत वर्ग रोजगाराच्या शोधात बाहेर पडू नये यासाठी स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तरीही तरुण पिढी विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी किंवा तत्सम परीक्षेसाठी दिल्लीत होणार्‍या प्रशिक्षण केंद्रावर जात असतात.
सिक्कीम राज्य देशातील प्रमुख धारेशी हळुहळू जुळत आहे. २00८ मध्ये केंद्रीय विश्‍वविद्यालयची निर्मिती करण्यात आली. सिक्कीमची कला,संस्कृती आणि विरासत आदी टिकून राहावी आणि आपले भविष्य सुरक्षित राहुन ती अजून मजबूत स्थितीत सुधारणा घडवी अशी उत्सुकता व अपेक्षा येथील स्थानिक जनता व्यक्त करते. हळुहळू काळाच्या ओघात सिक्कीम पूर्णपणे भारताच्या समरंगात मिसळून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. इंग्रजी,संस्कृत,हिंदी भाषा विकसित करण्यासाठी सरकारी स्तरावरून ठोस प्रयत्नं देखील केली जात आहेत.  सिक्कीमचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता सांस्कृतिक अनुभूती देणारी एक अविस्मरणीय प्रवास आणि श्रेष्ठ पर्यटन स्थळ म्हणून विकसित केली जात आहे. याकारणास्तव दरवर्षीच सरकाला यातून राजस्व देखील प्राप्त होते आहे.
प्राकृतिक रूपाने ओतप्रोत भरलेल्या सिक्किममध्ये जंगले, धबधबे, नद्या असा निसर्गरम्य पर्यावरण प्राप्त आहे. निसर्गाने हा भाग ओतप्रोत भरला आहे. हा भाग प्रदूषण मुक्त आहे. हे राज्य समुद्री तटापासून साधारणत: ७४२0 मीटर उंचीवर आहे. राज्यात जागोजागी पर्यटन स्थळे निर्माण करण्यात येत आहेत. स्कायवॉक करणार्‍या हितैशी शौकिनांसाठी हे ठिकाण म्हणजे पंचपक्वान्नाची मेजवानीच जणू अशा पर्यटकांसाठी हे एक अप्रतिम आल्हाददायक वातावरण देणारे उत्तम स्थान आहे. आकर्षक साहसी खेळ खेळण्यासाठी पर्वतारोहनाची मजा लुटण्यासाठी जगभरातील हजारो गिर्यारोहक या ठिकाणी येतात. तेव्हा सिक्कीमला स्वच्छ प्राकृतिक सौंदर्य खुलवण्यासाठी खचाखच भरलेले पर्यावरण लाभले आहे. विशेषत: प्रेक्षकांची उत्कंठा डिसेंबर महिन्यात शिगेला असते.मनमोहक पर्यावरण व पांढरेशुभ्र बर्फाचे थंडगार वारे,आपल्या अंगावर शहारे आणतात. रंगबिरंगी फुलांचा सुगंध मोहित करतो. सिक्कीमचे पर्यटन करताना जास्त सामान (लगेज) सोबत घेऊन जाऊ नये या वजनामुळे मनसोक्त आस्वाद घेता येणार नाही. येथील सांस्कृतिक, ऐतिहासिक,नैसर्गिक असा भरगच्च वैविध्यता पर्यटकांना आकर्षित करते. गंगटोक आणि गुरू रींपोजे मठही पर्यटकांना आकर्षित करतो. पर्यटणाचा खर्‍या अर्थाने आनंद साजरा करायचा असेल तर ऑक्टोंबर,नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये गंगटोक पहायला नक्की जावे. हे राज्य पूर्ण ईको फ्रेन्डली टुरिझम साठी प्रसिध्द आहे. जागोजागी हजारो पक्षांच्या प्रजातींची आवागमन होत असल्याने पक्षीप्रेमी याठिकाणी आवर्जून भेटी देताना दिसतात.
सिक्कमचे लोकनृत्य प्रसिध्द आहे. पर्यटकांना ते आकर्षित करते. गंगटोक हे प्रचीन कला आविष्कारासाठी प्रसिद्ध शहर आहे. याठिकाणी बौद्ध मठ मोठय़ा प्रमाणात असून जागोजागी भगवान गौतम बुद्ध यांच्या मोठय़ा प्रमाणात मूर्त्या स्थापित करण्यात आल्या आहेत. या मूर्ती पर्यटकांना आकर्षित करतात. येथील सांस्कृतिक समृद्धी सुंदर आहे.

No comments:

Post a Comment