थॅलेसेमिया हा एक रक्तविकार आहे. दुर्मीळ समजला जाणारा हा आनुवंशिक आजार आहे. आठ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो. या आजाराबाबत दक्षता आणि उपचार महत्त्वाचे आहेत. थॅलेसा म्हणजे समुद्र आणि एमिया म्हणजे रक्त. भूमध्य समुद्र लगतच्या राष्ट्रांमध्ये पहिल्यांदा हा आजार आढळून आला. त्यामुळे याला थॅलेसेमिया असे संबोधले जाऊ लागले. हा विकार दोन प्रकारचा असतो. पहिला थॅलेसेमिया मायनर आणि दुसरा थॅलेसेमिया मेजर. थॅलेसेमियामायनर हा आनुवंशिक आजार आहे.
भारतामध्ये साधारणतः 3 ते 6 टक्के लोकांमध्ये तो आढळतो. वैद्यकीय चाचण्यांशिवाय त्याचे निदान होऊ शकत नाही. दुसरा प्रकार थॅलेसेमिया मेजर हा मात्र फारच गंभीर त्रासदायक विकार आहे. या रुग्णाला वयाच्या 6 व्या महिन्यापासून वारंवार रक्त द्यावे लागते. वारंवार रक्त दिल्याने यांची वाढ खुंटते. व शरीरामधील रक्तातील लोह साचल्यामुळे शरीरातील हृदय , लिव्हर, स्वादुपिंड यासारख्या महत्त्वाच्या अवयवाचे विकार जडतात. त्यांचे आयुष्यमान नॉर्मल नसते.
थॅलेसेमिया मायनर व्यक्तींचे दुसऱ्या थॅलेसेमिया मायनर व्यक्तीशी लग्न झाले तर त्यामुळे होणाऱ्या अपत्यामध्ये हा आजार संक्रमित होण्याची शक्यता असते. त्यामुळे लग्नाआधी रक्त तपासणी महत्त्वाची ठरते.
हा आजार पूर्ण बरा होण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावे लागते. यासाठीचा खर्च मोठा असतो. थॅलेसेमिया संपूर्णतः उच्चाटनासाठी व्यापक जनजागृती- प्रबोधन गरजेचे आहे. आजदेखील भारतात दरवर्षी दहा हजारांवर बालके जन्माला येतात.
वंशपरंपरेने किंवा आनुवंशिकतेने जनुकांद्वारे मातापित्याकडून आपल्याला अनेक शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होत असतात. यांचे एका पिढीतून पुढच्या पिढीत वहन होते. ते टाळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. बिटा थॅलेसेमिया मेजर या व्याधिग्रस्ताना नियमित दर 4 ते 6 आठवड्यांनी रक्ताची गरज असते.
No comments:
Post a Comment