Wednesday, 5 August 2020

ताज्या महत्त्वाच्या घडामोडी

1) मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली?- आनंदीबेन पटेल
2) राजस्थानच्या राज्यपालपदी कोण आहेत?- कलराज मिश्र
3) भारताचे पहिले 'कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म' कोणते?- Belyo
4) जागतिक व्यान दिन कधी साजरा केला जातो? - 29 जुलै
5) कोणत्या राज्याने 'क्रीडा क्षेत्राला 'औद्योगिक' दर्जा दिला?-मिझोरम
6) मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवीन नाव कोणते आहे?- शिक्षण मंत्रालय
7) नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार शाळेची रचना कशी आहे ? -5+3+3+4
8) शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत कोणत्या वयोगटाचे विद्यार्थी आले आहेत?- तीन ते अठरा वर्षे वयोगट
9) देशाच्या शिक्षणातील गुंतवणूक जीडीपीच्या किती टक्के आहे ? -4.43%
10) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2020 कोणाला जाहीर झाला?-सोनम वांगचूक
11) राष्ट्रीय शैक्षणिक मसुद्यासाठी स्थापित समितीचे अध्यक्ष कोण होते?- के. कस्तुरीरंगन
12) राष्ट्रकूल (कॉमनवेल्थ) क्रीडा स्पर्धा 2020 कोठे नियोजित आहे?- बर्मिंगहॅम (इंग्लंड)
13) संरक्षण संशोधन व विकास संघटनेने भारतीय भूदलाकडे सोपविलेल्या ड्रोनचे नाव काय आहे ?- भारत 
14) पद्मश्री पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय खेळाडू कोण?-हॉकीपटू बलबीरसिंग
15)भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी कितव्या क्रमांकावर आहे?-तृतीय स्थानी
16) भारतातील किती टक्के लोकसंख्या हिंदी भाषा बोलते?- 43.63 टक्के
17) केंद्राकडून महाराष्ट्राला यंदा किती टन युरिया पुरविण्यात आला?-15 लाख मेट्रिक टन
18) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कितवी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली?- शंभरावी
19) राफेल लढाऊ विमानात किती इंजिन आहेत?- दोन
20) फ्रान्सच्या डसॉल्ट कंपनीद्वारे निर्मित राफेल क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे?- हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र
21) जगातील सर्वाधिक कमाई करणारी महिला क्रीडापटू कोण ?- नाओमी ओसाका

No comments:

Post a Comment