Thursday, 27 August 2020
जपानी घरे
जपान हा भूकंपप्रवण क्षेत्रात वसलेला देश आहे. इथे रोज सरासरी चार भूकंप होतात. त्यामुळे परंपरेने इथली घरे एकमजली व शक्यतो वजनाला हलकी अशी आहेत. आता शहरांमध्ये बहुमजली इमारती मोठ्या प्रमाणात आहेत मात्र तरीही घरे बांधताना लाकडाचा अधिकाधिक वापर केलेला असतो. थंड हवेचा मुकाबला करण्यासाठी किंवा सुरक्षिततेसाठी इथली घरे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडली गेली आहेत. इमारतीच्या भिंतीच नव्हे तर कुंपण भिंतीही लाकडाच्या असतात. बहुमजली घरे, इमारती असल्या तरी त्याची रचना भूकंप झाला तरी फारसं मनुष्यहानी व अन्य नुकसान कमी होईल, अशा पद्धतीचं असतं. भिंती लाकडाच्या असल्या तरी पिलर (खांब) मात्र मोठ्या आकाराचे असतात. घराच्या भिंतीवर वजनदार असं काही टांगलेलं आढळून येत नाही. घरातील जमीन लाकडी व वर चटई किंवा गालिचा ऐपतीप्रमाणे असतो. विशेष म्हणजे जपानी घरात सर्वत्र आधुनिक सुखसोयी येऊन चाळीस-पन्नास वर्षे झाली आहेत. इथे चौरंगासारख्या डायनिंग टेबलाभोवती जमिनीवर बसून जेवण केले जाते. आपल्यासारखे हे लोक भिंतीला टेकून किंवा आळसावल्या अवस्थेत बसत नाहीत. इथे भाड्याने मिळणारी घरे सर्व सोयीनियुक्त असतात. फर्निचरसह अनेक गोष्टी अगोदरच उपलब्ध असतात.मात्र मासिके भाडे जास्त असते. 14-15 मजल्याच्या इमारती 7 रिश्टर स्केल तिव्रतेपर्यंतच्या भूकंपात टिकून राहतील अशा बनवाव्या लागतात. हा नियम न बाळणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कंपनीला जबर दंड ठोठावला जातो. बहुमजली इमारतीमध्ये फर्निचर मात्र जमिनीवरच ठेवलेले असते. जपानमधील नवी बहुमजली घरे सर्व सुखसोयींनी युक्त असतात. अपंगांसाठी लिफ़्ट, पार्किंग सुविधा, तळमजल्यात सायकली पार्क ,गाडी पार्क करण्याची सुविधा इ.सोयी असाव्याच लागतात. त्याचप्रमाणे कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानंतर तो ठेवण्यासाठी सगळ्या संकुलाला मिळून एक भलीमोठी खोली असते. कोणत्या दिवशी कचरा उचलला जातो,याचे नियोजन आणि कार्यवाही केली जाते. जपानमध्ये आगीसह सर्वचबाबतीत अधिक सुरक्षितता बाळगली जाते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment