आज लंच किंवा डिनरच्या अगोदर सूप पिण्याची पद्धत सुरू झालीय. जुन्या इंग्रजीत SOP या शब्दाचा अर्थ होता- एक प्रकारचं पातळ स्वरूपातील खाणं, ब्रेडच्या
स्लाइसला हा पातळ पदार्थ लावून खाल्ला जायचा. तसंच फ्रान्सच्या ग्रामीण भागात रात्रीच्या जेवणाचा पर्यायही म्हणूनही हा पदार्थ खाला जायचा. या शब्दावरूनच इंग्रजीत रात्रीच्या भोजनासाठी सपर हा शब्द आला. लॅटिन भाषेत SUPPARE या शब्दाचा अर्थ होतो- पातळ पदार्थ, आज कोणताही खाद्यपदार्थ
उकडून बनवलेल्या पातळसर पदार्थाला सूप म्हटलं जातं. हे सूप म्हणजे संपूर्ण भोजन नाही; तर स्टार्टर म्हणून त्याचा वापर केला जातो. या शब्दावर बेतलेला इंग्रजी भाषेतील एक शब्दप्रयोग आहेइन द सूप! हा शब्दप्रयोग अडचणीच्या स्थितीसाठी केला जातो.
पायलट (PILOT)
आज पायलट हा शब्द विमानाच्या चालकासाठी वापरला जातो. पण सोळाव्या शतकापासून इंग्रजीत हा शब्द मूळ ग्रीक भाषेतील PEDUH शब्दावरून स्वीकारण्यात आला होता. ग्रीक भाषेत या शब्दाचा अर्थ होता-सुकाणू या शब्दावरून लॅटिन भाषेत
सुकाणूसाठी PILOTUS हा शब्द आला. जो आजच्या इंग्रजी शब्दाशी मिळताजुळता आहे. एकोणिसाव्या शतकात बलून, संचालन करणाऱ्याला पायलट हे नाव देण्यात आलं आणि विसाव्या शतकात विमानचालक या नावाने ओळखला जाऊ लागला. आज या शब्दावरून इतर अनेक शब्द इंग्रजी भाषेत आलेत. बंदरात जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी जो चार्ज घेतला जातो, त्यालाही पायलेटजम्हटलं जातं. कोणतीही मोठी योजना सुरू करण्याआधी छोटा आराखडा आखला जातो, त्याला पायलट प्रोजेक्ट म्हटलं जातं. महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाडीच्या पुढे राहून मार्गदर्शन करणाऱ्या वाहनाला पायलट कार म्हटलं जातं.
थंडर (THUNDER)
मे घगर्जना अथवा ढगांच्या गडगडाटासाठीचा वापरला जाणारा थंडर हा शब्द जुन्या इंग्रजीत फक्त आवाजापुरताच मर्यादित होता. आज हा शब्द कोणत्याही प्रकारच्या मोठ्या आवाजासाठी वापरता येतो. वीज आणि ढगांचा कडकडाट एकाच वेळी झाला; तर त्याला थंडर बोल्ट म्हटलं जातं. वावटळीसाठी थंडर स्टॉर्म हा शब्दही प्रचलित आहे. गुरुवारसाठी असलेल्या इंग्रजीतील THURSDAY नावाचाही या शब्दाशी संबंध आहे. आठवड्यातील या दिवसाचं मूळ रोमन नाव हे आकाशातील देव
ज्युपिटरवरून ठेवण्यात आलं होतं. जेव्हा जर्मन लोकांनी सप्ताहातील सात दिवसांची नावं स्वीकारली,
तेव्हा या दिवसाला मेघगर्जनाची त्यांची देवता THORवरून थोर्सडाग म्हटलं जाऊ लागलं. तेच गुढे
इंग्रजीत थर्सडे झालं आणि गुरुवारसाठी वापरलं जाऊ लागलं, थंडर शब्दाचा मेघगर्जनेसाठी अधिक
वापर केला जातो. पण गुरुवारशीही त्याचा संबंध आहे.
No comments:
Post a Comment