नेल्सन मंडेला २७ वर्षांच्या प्रदीर्घ कारावासातून फेब्रुवारी 1990 मध्ये बाहेर आले. जून १९६४ मध्ये ते बंदिवासात गेले होते.एवढा भयानक तुरुंगवास भोगल्यानंतर एखादा सामान्य माणूस पार खचून गेला असता; परंतु मंडेला हे एक अजब रसायन होते. ताठ मानेने, दमदार पावले टाकीत, हसतमुखाने आणि खंबीर मनाने त्यांनी कारागृहाला निरोप दिला. त्यांच्या प्रत्येक पावलाबरोबर जणू काही बंदिवासात असलेली स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही त्रयीही चालत होती. मंडेलांचे प्रत्येक पाऊल हे दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्याकडे, स्वयंशासनाकडे, लोकशाहीकडे नेणारे होते.
लौकिकार्थाने मंडेला तुरुंगाच्या चार भिंतींतून मुक्त झाले असले तरी ते दक्षिण आफ्रिका या विशाल कारागृहातच परतले होते. फेब्रु. १९९0 मध्ये मंडेलांची सुटका झाली तेव्हा दक्षिण आफ्रिका म्हणजे एक विशाल तुरुंगच बनलेला होता. पी.डब्ल्यू. बोथांच्या वर्णद्वेषी सरकारने अन्याय, जुलूम यांचे सर्वोच्च शिखर गाठलेले होते. गोरे विरुद्ध काळे असे राजकीय ध्रुवीकरण झालेले होते आणि आर्थिक, सामाजिक स्तरावर विषमतेची भयानक दरी निर्माण झालेली होती. द.आ.चे मूळ भूमिपुत्र निग्रो हे दारिद्रय, अज्ञान, रोगराई यांनी ग्रस्त होते अन् वर्णद्वेषी सरकारच्या अन्याय्य धोरणांमुळे ही निरपराधी, साधीभोळी जनता साध्या माणुसकीलाही पारखी झाली होती. आंतरराष्ट्रीय दबावामुळे बोथांचे सरकार व आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते यांच्यात वाटाघाटी चालू होत्या. द.आ.ला लोकशाहीचे, स्वयंशासनाचे अधिकार देण्यासाठीची ही बोलणी कूर्मगतीने चालू होती. मंडेलांसारखा शांत डोक्याचा, समन्वयवादी नेता या वाटाघाटी करत होता. त्यामुळे अनेक वेळा बोलणी फिसकटल्यानंतरही चर्चेत खंड पडला नाही. सुदैवाने जाने. १९८९ मध्ये आजारपणामुळे दुराग्रही बोथांना पदत्याग करावा लागला व त्यांच्या जागी डी. क्लार्क हे मवाळ गृहस्थ द.आ.चे अध्यक्ष झाले. सरकार व आफ्रिकन नॅशनल काँग्रेस यांच्यामधील सामंजस्य वाढले. राजबंद्यांची सुटका करण्यात आली. मंडेलांचा कारावासही संपला. या वेळेची द.आ.ची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती अराजकाला निमंत्रण देणारी होती. खवळलेला जनसमुदाय छोटयाशा चिथावणीनेही हिंसक बनत होता; परंतु मंडेलांचे आपल्या गोरगरीब जनतेवर संपूर्ण प्रभुत्व होते. द.आ.मधील धगधगती परिस्थिती त्यांनी कौशल्याने हाताळली. अखेरीस वाटाघाटी यशस्वी होऊन द.आ.च्या स्वयंशासनाचा दिवस उजाडला. २७ एप्रिल १९९४ रोजी द.आ.च्या कोटयवधी लोकांनी मतदान केले. अध्यक्ष म्हणून प्रचंड बहुमताने मंडेलांची निवड झाली.
एका मृतप्राय झालेल्या राष्ट्राला संजीवनी देण्याची, राष्ट्राच्या नवनिमार्णाचे स्वप्न साकारण्याची, लोकांच्या आशाआकांक्षांना मूर्तरूप देण्याची खडतर जबाबदारी मोठया विश्वासाने जनतेने आपल्या प्रिय मडिबांकडे सोपवली. पुढील पाच वर्षांच्या आपल्या लोकाभिमुख, सर्वसमावेशक कारभारामुळे मडिबांनी हा विश्वास सार्थ ठरवला. (एकमेकांवर दोषारोप न करता समेट घडवून मैत्रीचा हात पुढे करणे, कटुता निर्माण होण्याआधीच त्यावर उपाययोजना करणे व संघर्षांआधीच शांतता प्रस्थापित करणे.) या त्रिसूत्रीनुसार मंडेलांनी कारभार केला. जुना इतिहास उगाळत न बसता मार्गक्रमण करण्याचे भान त्यांच्याजवळ होते. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचा विजय झाल्यानंतर विजयाने बेहोश झालेल्या जनतेला काबूत ठेवण्यात मंडेला यशस्वी झाले.
मडिबांच्या लोकप्रियतेमुळे, जनसामान्यांवरील त्यांच्या प्रभावामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. वर्णद्वेषी गोर्यांना अभय मिळाले. इतकेच नव्हे, तर नवीन सरकारमध्ये डी. क्लार्क उपाध्यक्ष झाले व नॅशनल पार्टीच्या इतर काही लोकांनाही मंत्रिपद मिळाले. द.आ.चा राज्यशकट हाकताना त्यांनी अगदी बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष पुरवले. शिक्षणाची दुरवस्था दूर करून शिक्षण पद्धती सदृढ करणे हे सर्वात महत्त्वाचे काम होते. वर्णद्वेषी सरकारने निग्रोंना निकृष्ट प्रतीचे शिक्षण मिळेल अशीच व्यवस्था केलेली होती. द.आ.चे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचे महत्त्वाचे कार्य मंडेलांना करावे लागले. त्यांनी सर्वांना उत्तम दर्जेदार शिक्षणाचे द्वार खुले करून दिले. द.आ.ची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी उच्चविद्याविभूषित तरुणांची गरज आहे हे ओळखूनच त्यांनी शिक्षण सुधारणेला सर्वाधिक प्राधान्य दिले. शैक्षणिक धोरण आखत असतानाही मंडेलांच्या समंजस वृत्तीचा प्रत्यय आला. त्यांच्या मंत्रिमंडळातील जहाल विचारसरणीचे लोक, गोर्या लोकांनी चालू केलेल्या शैक्षणिक संस्थांना सरकारी अनुदान देण्याच्या विरुद्ध होते; परंतु मंडेलांनी हे अविचारी पाऊल उचलले नाही. त्यांनी संबंधितांच्या लक्षात आणून दिले की, गोर्यांच्या शिक्षण संस्थांतही निग्रोंना मोठया प्रमाणात प्रवेश मिळत आहे.

No comments:
Post a Comment