Tuesday, 16 June 2020

राजकीय वारसदार:ठाकरे,पवार, तटकरे, खडसे

शिवसेनेचे २९ वर्षांचा युवा आणि शहरी वर्गात हवा असलेला चेहरा, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि आश्चर्याचा धक्का दिला. निवडणुकीच्या राजकारणात उतरलेला ठाकरे घराण्यातील हा पहिलाच तरुण चेहरा. ते निवडून आले आणि मंत्री झालेसुद्धा! आदित्य यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढून, समाजातील अनेक घटकांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि एक प्रकारे स्वतःला मुख्यमंत्री किंवा उद्धव ठाकरे यांच्यानंतरचा शिवसेनेचा भविष्यातील मोठा नेता म्हणून प्रोजेक्ट केले.
याचाच पुढचा टप्पा म्हणून त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे घोषित केले. आदित्य ठाकरे यांचे शिक्षण मुळात इंग्रजी माध्यमातील शाळेतून झाले आहे, तसेच मुंबईतील नामांकित सेंट झेविअर्स या महाविदयालयात त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांना त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आंदोलनाचे, विचारांचे किंवा कुठल्याही विषयावर सक्षम बाजू मांडण्याचे बाळकडू मिळाले आहे. याची चुणूक विद्यार्थिदशेतच त्यांनी, रोहिंटन मिस्त्री यांच्या 'सच अ लाँग जर्नी' या पुस्तकातील मजकुरावर आक्षेप घेऊन दाखवली व या वादग्रस्त पुस्तकावर मुंबई विद्यापीठात बंदी आणण्यास भाग पाडले. त्यामुळे या विषयाबद्दल अनेक वाद-वादंग निर्माण झाले. अनेकांनी पुस्तकाच्या बाजूने लिखाण केले तर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला स्वतःच्या नातवाची नुसती पाठराखणच नव्हे, तर प्रशंसाही केली. जेव्हा एखादा तरुण नेता राजकारणात प्रवेश करतो त्यावेळेला तो आपल्याबरोबर नवीन विचार घेऊन येत असतो आणि त्याला त्याच्यातील तारुण्याप्रमाणे समाजात, राजकारणात किंवा प्रशासनातही झटपट बदल घडवायचे असतात.  महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्याप्रमाणेच पवार घराण्याचाही मोठा दबदबा आहे. शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत किंवा सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून अनेक वर्षे हे आदिती तटकरे घराणे महाराष्ट्राच्या राजकीय पटावर विराजमान आहे. पवारांची तिसरी पिढी आता रोहित पवार यांच्या रूपाने राजकारणात येत आहे. ३५ वर्षीय रोहित पवार यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात आपले आजोबा शरद पवार यांच्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणापासून केली. ते पहिल्यांदा पुणे जिल्हापरिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले आणि त्यांनी आपल्या भावी राजकीय आयुष्याची पायाभरणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर कोण, या प्रश्नाचे उत्तर, रोहित पवार हे असू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसला जर खऱ्या अर्थाने भाजपला किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान द्यायचे असेल तर त्यांच्यापुढे एक नवीन आव्हानात्मक चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावा लागेल. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्यातूनही चांगले नेतृत्व तयार झाले असते,
पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या पाच वर्षांत पाहिजे त्या प्रमाणात त्यांना वाव देण्यात आला नाही. त्यामुळे हे नेतृत्व तरुण हुशार असूनसुद्धा जनमानसात रुजले नाही. ते एका ठरावीक उंचीवर येऊन थांबलेले दिसते.शरद पवार हे वयाच्या ऐंशीव्या वर्षी एखाद्या तरुणाप्रमाणे पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्रभर फिरत असतात.  परंतु भविष्यात त्यांना अशा प्रकारे पुन्हा पुन्हा फिरणे शक्य होणार नाही त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी असे सांगितले की यातून आम्हाला नवीन आणि तरुण नेतृत्व पुढे आणायचे आहे.यात रोहित पवार यांना मोठी संधी आहे. या निवडणुकीत ठाकरे आणि पवार यांची तिसरी पिढी राजकारणात आले आहेत. त्याबरोबरच राजकीय घराण्यातील अनेक तरुण-तरुणीही पुढे आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांची कन्या ३० वर्षीय आदिती तटकरे वडिलांच्या परंपरागत मतदारसंघात निवडणूक लढवलं आहे.आज राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कु.आदिती तटकरे यांच्याकडे विधी व न्याय या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सांभाळत आहेत.  आदिती यांनीही आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून केली. सुरुवातीला त्या रायगड जिल्हा परिषद येथून निवडून आल्या आणि अनेक वर्षे रायगड जिल्हापरिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. भाजपने त्यांचे वरिष्ठनेते एकनाथ खडसे यांना निवडणुकीच्या राजकारणातून बाद केल्यानंतर त्यांची कनिष्ठ कन्या रोहिणी खडसे यांना एकनाथ खडसे यांच्या परंपरागत मुक्ताईनगर मतदारसंघात उतरविले. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षही आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत या बँकेला सुगीचे दिवस आणले. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. आता त्या वडिलांचा राजकीय वारसा कसा चालवतात व बँकेप्रमाणे पुढे राजकीय वाटचाल कशी राहणार हे पाहावे लागणार आहे. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात आता जनरेशन चेंज होताना दिसत आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधील लोकसभा निवडणुकीत मतदारांनी घरचा रस्ता दाखवला होता.

No comments:

Post a Comment