इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. त्या १९६६मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली. इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वांतंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्रसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३0 साली वानर सेना नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या कॉंग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या.
फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्या माहिती व नभोवाणी मंत्री होत्या. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी पंतप्रधान म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या. २५ जून १९७५ साली त्यांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८0पयर्ंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८0च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते.
जवाहरलाल आणि कमला या नेहरू दांपत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. मुळात नेहरू हे काश्मिरी पण्डित होते. इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरू व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संस्कारांतच झाले.
१९३६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षण सोमरविले महाविद्यालय, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले. याच दरम्यान त्या लण्डनमधील इण्डिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४0 च्या दशकात इंदिरा गांधींनी फुफ्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झलर्ंडमध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला. इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरू यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरारा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधीसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधी हे भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघांत दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर १९६0 मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच कॉंग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात कॉंग्रेसचे ६0 जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्रिपद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी कॉंग्रेसची दोन शकले झाली.

No comments:
Post a Comment