Thursday, 11 June 2020

राजा अलेक्झांडर

मॅसिडोनियाचा राजा फिलिप आणि त्याची पहिली राणी ऑलिंपियस यांचा अलेक्झांडर हा पुत्र. पेला येथे जन्म. लहानपणी फिलिपने त्यास युवराजास योग्य असे सर्व लष्करी व राजकीय शिक्षण दिले होते. याशिवाय त्याचा गुरू रिस्टॉटल याने त्याच्यामध्ये काव्य, कला, राज्यशाख, तत्त्वज्ञान आदी शास्त्रांविषयी गोडी उत्पन्न केली होती. पण रिस्टॉटलचा 'नगर-राज्ये हीच संस्कृतीची उत्कृष्ट केंद्रे होऊ शकतात', हा विचार अलेक्झांडरला पटत नव्हता. होमरचा आकिलीझ हा त्याच्यापुढे आदर्श होता. म्हणून त्याने जगज्जेता होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली आणि त्यानुसार नेहमी चढाईचे घोरण स्वीकारले.

इ.स.पू. २०६ मध्ये फिलिपचा खून झाला आणि अलेक्झांडर वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी मंसिडॉनच्या गादीवर आला. तत्पूर्वी इ.स.पू. ३४० मध्ये फिलिपने ज्या वेळी बायझंटियमवर स्वारी केली होती, त्या वेळी अलेक्झांडरने मॅसिडोनिया सांभाळला आणि मीडी लोकांचा पराभव केला आणि पुढे दोन वर्षांनी फिलिपला ग्रीक नगरराज्यसंघाचा पराभव करण्यास मदत केली. इ.स.पू. ३२८ मध्ये त्याने बॅक्ट्रिया व त्याच्या उत्तरेचा साँडिआना हे प्रदेश जिंकले. त्याने तेथील राजकन्येशी विवाह केला आणि नंतर हिंदुकुश ओलांडून इ.स.पू. ३२७ च्या मे महिन्यात भारतावर स्वारी केली. भारतातील थोड्या राजांनी अलेक्झांडरला साहाय्य केले. पंजाबात त्या काळी काही छोटी राजसत्ताक राज्ये आणि काही गणराज्ये होती. त्या सर्वांनी आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ मोठ्या शौयनि लढा दिला आणि मगच अलेक्झांडरला पुढे जाऊ दिले. त्यांच्या शौर्याची गुणगाथा तत्कालीन ग्रीक लेखकांनी गाइली आहे.
अलेक्झांडरने अटकच्या उत्तरेस सु. २५ कि.मी. वर ओहिंद येथे नावांचा पूल करून सिंधू नदी पार केली आणि तो तक्षशिलेस पोहोचला. तेथे तक्षशिलेचा राजा आंभी शरण आला, पण झेलम व चिनाब यांच्यामधील प्रदेशावर राज्य करणाच्या पोरस राजाने त्यास प्रतिकार केला. दोघांत झेलमच्या काठी घनघोर युद्ध झाले. पोरसचा पराभव झाला. अलेक्झांडरच्या सैन्याला भारतीयांच्या शौर्याची कल्पना आली. पोरससारखा शूर योद्धा आपला साहाय्यक असावा या हेतूने अलेक्झांडरने त्याचे राज्य त्यास परत केले आणि शिवाय आणखी पंधरा गणराज्यांचा मुलूख त्याच्या स्वाधीन केला. नंतर त्याने पुढे बिआस नदीपर्यंत चाल केली. मध्ये त्याला ग्लौकनिकॉय आणि कथईऑय (कठ) या गणराज्यांशी युद्ध करावे लागले.
कठांबरोबरच्या युद्धात अलेक्झांडरच्या सैन्याची बरीच
प्राणहानी झाली. अलेक्झांडर हा जगातील अद्वितीय योद्धा आणि सेनानायक होता. त्याचे साहस अचाट होते आणि कल्पनाशक्ती विलक्षण होती. स्वदेशापासून हजारो मैल अंतरावरच्या अज्ञात प्रदेशांत त्याने अचाट पराक्रम करून विजय मिळविले. सर्व ज्ञात जगाचे ग्रीसच्या सांस्कृतिक आधिपत्याखाली एक राष्ट्र बनवावे, ही त्याची महत्वाकांक्षा होती, पण ती त्याच्या अकाली मृत्यूमुळे पूर्ण झाली नाही, ११ जून विस्त पर्व १२३ या दिवशी त्याचे निधन झाले. एवढेच नव्हे, तर जिंकलेल्या प्रदेशांत त्याला कार्यक्षम प्रशासनपद्धती अमलात आणता आली नाही. त्याने नेमलेल्या क्षत्रपांनी आणि सेनापतींनी त्याच्या निधनानंतर साम्राज्याचे तुकडे करून ते बळकाविले तर काही क्षत्रपांना तेथील लोकांनी हाकून लावून आपले स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित केले. खासगी जीवनात अलेक्झांडर प्रथमपासूनच फारसा सुखी नव्हता. त्याची आई ऑलिंपियस हिला त्याच्या पित्याने घटस्फोट दिल्यामुळे ऐन तारुण्यात तो नाराज झाला होता. त्याला तत्कालीन इराणी सुंदरी रॉकसनास व डरायसची कन्या बाझिन अशा दोन राण्या होत्या. त्यापैकी रॉकसनास त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी झालेल्या त्याच्या मुलाचे नाव अलेक्झांडरच ठेवण्यात आले. अलेक्झांडरच्या स्वारीने भारताचा पश्चिमेकडील देशांशी निकटचा संबंध येऊन व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू झाली.

No comments:

Post a Comment