अभिनेता सुशांत सिंह राजपुत हा जन्माला आला बिहारमध्ये २१ जानेवारी १९८६ साली. आणि १४ जून २0२0 रोजी वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने मुंबईतील बांद्रा येथे गळफास लावून आत्महत्या केली. टीव्ही कलावंत म्हणून तो नावारूपास आला. डान्सरही होता आणि अभिनेताही. सुशांतने टीव्ही सीरिअल्सपासून आपल्या करीअरची सुरुवात केली. स्टार प्लसवरील किस देश मे हैं मेरा दिल या २00८ च्या सीरिअल्समधून त्याने कलावंत म्हणून प्रवेश केला. झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता (२00९-११) मध्ये त्याने अवॉर्ड विनिंग परफार्मन्स केला. त्याच्या कई पो चे (२0१३) नाटकाला मेल डेबूटचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. त्यानंतर त्याची शुद्ध देसी रोमान्समधील (२0१३) भूमिका भाव खाऊन गेली.
डिटक्टिव्हचे काम केल्यानंतर पीके (२0१४) मध्ये त्याने सपोर्टिव्ह रोलही केला. क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी (२0१६) या चित्रपटासाठी बेस्ट अँक्टरचा पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले. केदारनाथमधील सारा खानसोबतची भूमिका त्याने खुबीने वठविली. नीती आयोगाने त्याला महिला उद्योजकांच्या प्लाटफार्मसाठी थिंक टँक म्हणून साईन केले होते. अँक्टिंग व्यतिरिक्त त्याने सुशांत फॉर एज्युकेशनसारख्या कार्यक्रमातही सहभागी व्हायचा. यातून त्याने युवकांना प्रोत्साहितही केले होते. सुशांतचा जन्म पाटण्यातील. त्यांचे पूर्वज पुर्निया जिल्ह्यातील. त्याची एक बहीण मितू सिंह ही राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे. २00२ मध्ये त्याची आई देवाघरी गेली आणि त्यांचे कुटुंब दिल्लीला शिफ्ट झाले. सुशांतचे शिक्षण पाटण्यातील सेंट कॅरेन्स हायस्कूल आणि दिल्लीतील कुलाची हंसराज मॉडेल स्कूलमध्ये झाले. भौतिकशास्त्रात नॅशनल ऑलिम्पियाड विनरही तो होता. दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये त्याला प्रवेश मिळाला. त्यानंतर त्याने डान्स आणि थिएटरमध्ये भाग घेणे सुरू केले. त्यामुळे अभ्यासासाठी त्याला वेळ मिळत नव्हता. त्यामुळेच इंजिनीअरिंगचे चौथ्या वर्षाची परीक्षा तो देऊ शकला नाही. इंजिनीअरिंग ड्रापआउट असला, तरी जीवनाच्या परीक्षेत कित्तेक उंच शिखरे त्याने गाठली. दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी असताना सीयामार्क देवार्स डान्स क्लासेस लावली. त्यानंतर त्याला अँक्टिंगमध्ये करीअर करावेसे वाटू लागले. म्हणून त्याने बॅरी जॉन्स ड्रामा क्लासेस अटेंड केले. अभिनयाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत व्यक्त होता येत असल्याने तो या क्षेत्रात स्थिरावला. दरम्यान, २00५ मध्ये ५१ व्या फिल्मफेअर अवॉर्डच्या डान्स गृपमध्ये त्याची निवड झाली. २00६ मध्ये २00६ च्या कॉमनवेल्थ गेम्समधील ओपनिंग सीरोमनीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्याला संधी मिळाली. चित्रपटात काम मिळावे, यासाठी त्याने मुंबई गाठली. नदिरा बाबर एकजुते थिएटर गृप जॉईन केला. तिथे सुमारे अडीच वर्षे काम केले. नेस्सले मंचच्या जाहिरातीच्या माध्यमातून तो देशभर पोहचला. त्यानंतर सुशांतने मागे वळून पाहिलेच नाही. पण, ऐन उमेदीच्या काळात त्याने घेतलेली एग्झीट सर्वांनाच चटका लावून गेली.
No comments:
Post a Comment