Thursday, 18 June 2020

डॉ. धनंजय दातार

अकोला या जिल्ह्यामध्ये जन्मलेल्या धनंजय दातार यांना लहानपणापासून दुबईवरून येणाऱ्या लोकांबद्दल अॅट्रॅक्शन वाटत होत. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ठरवलं की आपण पण दुबईमध्ये जाऊन भरपूर पैसा कमवायचा, त्याच वेळेत त्यांच्या वडिलांनी एअर इंडिया मधून रिटायर होऊन दुबईला किराणा मालाचे दुकान चालू केल, वडिलांच्या सोबतींना धनंजयने काम चालू केलं. अपार कष्ट व त्याला प्रामाणिकपणाची जोड देत जगात  'मसाला किंग' म्हणून  जगात नाव कमावले.
दहावीत पाचवेळा नापास झालेला हा मुलगा नंतर गडगंज संपत्तीचा मालक होतो, आखाती देशात ३९ सुपरमार्केट्स उघडतो आणि अमेरिका, कॅनडा, इटली, स्वित्झर्लंड, टांझानिया आदी देशांमध्ये कंपनीचा विस्तार करतो हे सारेच अचंबा वाटावे असेच. काहीसे स्वप्नवतच. परंतु, ही सत्यकथा साकारली आहे, ती धनंजय दातार या मराठमोळ्या माणसाने. दुबईत वडिलांच्या दुकानात हमालाची कामे करण्यासही न लाजणारे धनंजय आज 'अल अदील ट्रेडिंग कार्पोरेशनच्या माध्यमातून नऊ हजार भारतीय उत्पादने आखाती देशांमध्ये आणि इतरत्र वितरीत करीत आहेत. दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अरेबियन बिझनेस या जागतिक ख्यातीच्या माध्यमगृहाने वर्ष २0२0 साठीची ही यादी दि इंडियन बिलीयनर्स क्लब या शिर्षकाखाली नुकतीच प्रसिद्ध केली. केवळ वर्षभरात त्यांनी व्यवसायाची प्रगती व विस्तार पर्शिमपूर्वक घडवत आखाती प्रदेशातील (जीसीसी रिजन) आघाडीच्या दहा अब्जाधीश भारतीयांमध्ये स्थान मिळविले आहे. दुबईच्या शासकांनी धनंजय दातार यांना मसालाकिंग बहुमानाने संबोधून त्यांच्या पर्शिम आणि कर्तृत्वाचा यथोचित गौरव केला आहे. दातार यांना भारताबरोबरच जागतिक स्तरावरही अनेक प्रतिष्ठित पुरस्कार लाभले आहेत. फोर्ब्स मिडल ईस्टतर्फे टॉप इंडियन लीडर्स इन दि अरब वर्ल्ड यादीत मानांकन देऊन त्यांचा गौरव होत आहे. फोर्ब्स मिडल ईस्टच्या मानांकन यादीत आखातातील आघाडीच्या १00 भारतीयांमध्ये सातत्याने झळकणारे ते बहुधा एकमेव महाराष्ट्रीय आहेत. भारतीय संस्कृतीचे आखाती देशांमध्ये संवर्धन करण्यास तसेच दुबईमध्ये मराठी उपक्रम राबविण्यास ते सातत्याने मदत करतात.

No comments:

Post a Comment