Tuesday, 2 June 2020

सामान्य ज्ञान (इतिहास)

● हल्दी घाटीचे युद्ध सम्राट अकबरांचा सेनापती मानसिंह व मेवाडचा कोणता सेनापती यांच्यात झाले? - महाराणा प्रताप
● सिंधू संस्कृतीचा शोध 1922 मध्ये डॉ. राखालदास बॅनर्जी यांनी कोठे लावला?- मोहेंजोदडो
● चिनी प्रवासी हघु-एन-त्संग कोणाच्या काळात भारतात आला होता?- हर्षवर्धन
● मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण होते?-चंद्रगुप्त मौर्य
● छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? - रायगड

● वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले?-कृष्ण पहिला
●  भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कोठे आहे? - म्हैसूर
● प्लासीची लढाई 23 जून 1757 मध्ये इंग्रजविरुद्ध कोणी लढली?- सिराज उहौला
● पोर्तुगीजांनी ब्रिटिश राजपुत्र दुसरा चार्ल्स यास मुंबई हे बेट लग्नानिमित्त आंदण म्हणून केव्हा दिले?-1661 मध्ये
● दुहेरी राज्यव्यवस्था ही बंगालमध्ये 1765 मध्ये कोणी सुरू केली?- रॉबर्ट क्लाईव्ह
● पहिला फॅक्ट्री अॅक्ट कधी सुरू करण्यात आला? - 1981 मध्ये
● 1763 ते 1800 या कालावधीत संन्याशांचा उठाव कोणत्या प्रदेशात झाला?- बंगाल, बिहार
● मंगल पांडेने मेजर घुसनवर 1857 मध्ये कोणत्या छावणीत गोळी झाडली?-बराकपूर
● दी कॉमनव्हिल' या साप्ताहिकाचे संपादक कोण होते?- अॅनी बेझंट
● महात्मा गांधीजी राष्ट्रीय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष- बेळगाव (1924)
● 'करेंगे या मरेंगे' ही घोषणा गांधीजींनी कधी दिली होती?- चले जाव आंदोलनाच्या वेळी
● चाफेकर बंधू यांनी 22 जून 1897 मध्ये कोणाची हत्या केली?- कमिश्नर रँड
● 'बंगाल गॅझेट' या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली? -जेम्स हिकी
● नौजवान भारत सभा या संघटनेची स्थापना कोणी केली? - भगतसिंग
●  माऊंट बॅटन योजना कशाशी संबंधित आहे? - भारत- पाकिस्तान फाळणी
● तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? - लॉर्ड वेलस्ली
● मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा कोणी दिली? - नारायण गुरू
● विवेकानंद स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? कन्याकुमारी
● 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला?- नानासाहेब पेशवे
●  'गीतारहस्य' हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात कोणी लिहिला?- लोकमान्य टिळक
● स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोठे झाला?-कलकत्ता
● हिंदू व मुसलमान यांना 'सुंदर वधूचे दोन डोळे', अशी उपमा कोणी दिली? - सर सय्यद अहमद खान
● महाराष्ट्र केसरी म्हणून कोणाला ओळखले जात होते? - डॉ. पंजाबराव देशमुख

No comments:

Post a Comment