होते. त्यांचा जन्म फ्रान्समधील पॉलिमियालिऑन येथे झाला. विद्युतगतिकीशास्त्र (इलेक्ट्रोडायनॅमिक्स) या भौतिकी शाखेचा पाया घालणारे संशोधक म्हणून ते ओळखले जातात, अॅम्पिअर अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. लहानपणीच त्यांनी प्रगत गणिताचा अभ्यास करून त्या वेळेपर्यंत सिद्ध झालेले सर्व गणित आणि विज्ञान आत्मसात केले होते. लॅटिन भाषा व निसर्ग शास्त्रही ते शिकले होते. त्यांच्या वाचनात अनेक विषयांचा समावेश असे.
इसवी सन १७९९ मध्ये अॅम्पिअर यांनी गणिताचे शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १८०९ साली ते न्यू एकोल पॉलिटेक्निकमध्ये गणिताच्या प्राध्यापकपदी रुजू झाले. ते विलक्षण प्रतिभावान होते. अगदी झपाटल्यासारखे एखाद्या कल्पनेच्या मागे लागून प्रयोग करीत. हन्स ओरस्टेड या डनिश शास्त्रज्ञाने तारेतून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहामुळे तारेभोवती चुंबकक्षेत्र निर्माण होते असा निष्कर्ष प्रयोग करून काबला होता. अॅम्पिअरना हे समजताच त्यांनीही विद्युतप्रवाह आणि चुंबकत्व यांच्यातील संबंध ग्यासाठी प्रयोग केले, भौतिकीय सिद्धांत मांडले, गणितीय स्पष्टीकरण दिले.
विद्युतप्रवाह वाहून नेणाऱ्या दोन सरळ, लांब, समांतर
तारांमध्ये प्रवाहामुळे निर्माण होणाऱ्या बलासंबंधी नियम मांडला. जर दोन्ही समांतर तारांतील विद्युतप्रवाह एकाच दिशेने वाहत असेल तर त्यात आकर्षण निर्माण होते व विरुद्ध दिशेने वाहिल्यास प्रतिसारण निर्माण होते, असे अॅम्पिअरना आढळले. सर्व आविष्कारासंबंधी यथार्थ सिद्धांत व निष्कर्ष मोठ्या प्रबंधाद्वारे फ्रान्सच्या अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये सादर केले. अॅम्पिअर यांनी विद्युतप्रवाह मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आंद्रे मारी अॅम्पिअर उपकरणाला गॅल्व्हानोमीटर असे कॉलेज डी फ्रान्समध्ये १८२४ साली अॅम्पिअर प्रायोगिक भौतिकशास्त्राच्या प्रतिष्ठेच्या अध्यक्षपदावर निवडून आले.
तसेच १८२७ मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे विदेशी सदस्यत्व प्राप्त झाले. १८२८ मध्ये त्यांची रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सभासद म्हणून निवड झाली. आंशिक अवकल समीकरणासंबंधीही (पार्शल डिफरन्शिअल इक्वेशन्स) त्यांनी संशोधन केले आहे. विद्युतशास्त्रातील महत्त्वाच्या संशोधनाच्या सन्मानार्थ विद्युतप्रवाहाच्या एककाला अॅम्पिअर हे त्यांचे नाव देण्यात आले आहे. अॅम्पिअर विद्युत प्रवाह मोजण्याचे एस.आय. एकक आहे.
अॅम्पिअरचे एस.आय एकक चिन्ह A असे लिहतात. तसेच ते ampere असेही लिहले जाते. अॅम्पिअर एककाचे नाव विद्युतगतिकीचे जनक मानल्या जाणाऱ्या आंद्रे मारी अॅम्पिअर या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले आहे. अॅम्पिअर एककाचा वापर विद्युत प्रवाहाचा दर
मोजण्यासाठी केला जातो. कुलोंवशी अम्पिअर (सी / एस) चा संबंध जूलशीट (जे/एस)च्यासारखाच आहे. अॅम्पिअर मूळतः सेंटीमीटर - म - युनिट्सच्या दुसऱ्या प्रणालीमध्ये विद्युत प्रवाहाच्या युनिटचा दहावा भाग म्हणून परिभाषित केला होता. अॅम्पिअर मूळत: 'सेंटीमीटर - गॅम-सेकंद' युनिट प्रणालीमध्ये विद्युत प्रवाहाच्या युनिटचा दहावा भाग म्हणून परिभाषित केला होता. ते युनिट आता आंबेपियर म्हणून ओळखले जाते. जे असे परिभाषित केले होते की, एक सेंटीमीटर अंतरावरच्या दोन तारांमध्ये दोन डायन्स प्रति सेंटीमीटर लांबीवर बल निर्माण करणाऱ्या विद्युत प्रवाहाचे नाव दिले. प्रमाण होय.
No comments:
Post a Comment