किरण बेदी यांचा जन्म पंजाब राज्यातील अमृतसर येथे ९ जून १९४९ रोजी ला झाला. या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. मसूरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये ८0 पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या.
किरण बेदी यांची पोलीस अधिकारी म्हणून पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली. पुढे त्या उत्तर आणि पश्चिम दिल्लीच्या पोलीस आयुक्त झाल्या. १९९३ मध्ये दिल्लीतील तिहार कारागृहाच्या त्या मुख्य अधीक्षक (इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन्स) झाल्या. तेथे असताना त्यांनी कारागृहामध्ये अनेक सुधारणा केल्या. त्याची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली आणि या सुधारणेसाठी १९९४ मध्ये त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.त्यांनी महिलांवरील गुन्हे कमी करून दाखवले. त्यानंतर एक ट्रॅफिक पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी १९८२ आशियाई गेम्ससाठी दिल्लीत आणि १९८३ मध्ये गोव्यात भरलेल्या सीएचओजीएम बैठकीसाठी रहदारी व्यवस्था पाहिली.किरण बेदी यांनी उत्तर दिल्लीच्या डीसीपी असताना ड्रग्जचा दुरूपयोग करण्यार्यां विरुद्धच्या मोहिमेची सुरुवात केली. ही मोहीम पुढे नवज्योती दिल्ली पोलीस फाऊंडेशन (२00७मध्ये हिचे नाव नवज्योती इंडिया फाऊंडेशन म्हणून बदलले)मध्ये विकसित झाली. २00३मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव म्हणून पोलीस सल्लागार म्हणून बेदींनी काम केले. शांतता ऑपरेशनचा या सामाजिक कार्यक्रम आणि लेखन यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी २00७मध्ये पोलीस खात्याचा राजीनामा दिला. किरण बेदी यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्या इंडिया व्हिजन फाऊंडेशन नावाची संस्थेच्या संचालक आहेत. २00८-२00९ दरम्यान त्यांनी दूरचित्रवाणीवर ह्यआप की कचेरी ह्य हा एक कोर्ट शो आयोजित केला. २0११ च्या भारतीय भ्रष्टाचारविरोधी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी त्या एक होत्या आणि जानेवारी २0१५ मध्ये त्या भारतीय जनता पार्टीत सामील झाल्या. २0१५च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून असफल निवडणूक लढवली. २२मे २0१६ रोजी बेदी यांना पॉंडिचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले.
नवृत्तीनंतर अण्णा हजारे यांच्या लोकपालासाठीच्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव प्रकाशलाल असे होते. त्यांच्या आईचे नाव लग्नाआधी जनक व लग्नानंतर प्रेमलता असे होते. किरण यांना तीन बहिणी आहेत : शशी, रीता आणि अनु. त्यांचे आजोबा लाला हरगोबिंद हे पेशावर ते अमृतसर येथे स्थायिक झाले होते, तिथे त्यांनी व्यवसाय सुरू केला. बेदींचा स्वभाव अतिशय धार्मिक नव्हता, परंतु हिंदू आणि शीख परंपरेत (त्यांच्या वडलांची आई शीख होती) त्या वाढल्या. प्रकाशलाल हे कुटुंबातील कापड व्यवसायात मदत करत. ते टेनिसही खेळत. . किरण बेदीचे शिक्षण अमृतसरमधील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमधून झाले. ही शाळा घरापासून १५ किलोमीटर दूर असल्यामुळे त्यांना कष्ट करावे लागत होते. शिक्षणाबरोबरच किरण बेदी या खेळातही चपळ होत्या.
शाळेत असताना त्या एन.सी.सी.त होत्या. किरण बेदी या शाळेच्या ग्रंथालयाचा खूप उपयोग करायच्या. त्यानंतर त्यांनी ह्यगव्हर्नमेंट कॉलेज फॉर वीमेन यामध्ये प्रवेश घेतला.पोलीस सेवेतील कारकीर्द सुरू करण्यापूर्वी किरण बेदी या अमृतसर येथील खालसा महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापक होत्या.किरण बेदी पोलीस अधिकारी होण्याआधी या उत्कृष्ट टेनिसपटू होत्या. ऑल इंडिया हार्ड कोर्ट टेनिस चॅम्पियन, १९७४च्या चंदीगडमधील राष्ट्रीय क्रीडा स्पधेर्तील महिला चॅम्पियन, श्रीलंका विरुद्ध दोन वेळा भारताचे प्रतिनिधित्व अशी त्यांची टेनिसमधील उल्लेखनीय कामगिरी आहे. टेनिस कोर्टवर किरण बेदी यांची ब्रिज बेदी यांच्याशी भेट झाली. त्यांचा विवाह १९७२ साली झाला. त्याच वर्षी त्या आय.पी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
No comments:
Post a Comment