फाळणीनंतरचे सगळ्यात मोठे स्थलांतर देशाने पाहिले आणि बर्यापैकी अनुभवले ते कोरोनाच्या काळात. लॉकडाऊनमुळे शहरात जगणे कठीण झाल्यानंतर लाखो गोरगरीब मजुरांनी गावाचा रस्ता धरला. कुणी चालत, कुणी सायकलवर तर कुणी मिळेल त्या वाहनाने. पण, या स्थलांतराचा चेहरा बनली ती ज्योतिकुमारी पासवान. आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून तिने तब्बल १२00 किलोमीटरचा प्रवास पार केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्पन यांनी ही ज्योतीची पाठ थोपटली आहे.
ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी तिच्या साहसाचे कौतुक केले होते. ज्योतीची हिंमत पाहून सायकलिंग फेडरेशनने तिला पुढील महिन्यात चाचणीसाठी बोलावलं होतं. सायकलिंग फेडरेशनचे कार्याध्यक्ष ओंकार सिंग म्हणाले होते की, जर ज्योती कुमारी चाचणीत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली तर दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राष्ट्रीय सायकलिंग अकादमीत तिची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड केली जाईल, असे सांगितले होते. गुरुग्राम ते दरभंगा या प्रवासात तिला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. पण, आता याच ज्योतिकुमारीच्या आयुष्यावर चित्रपट येणार असल्याने सर्वत्र तिच्या नावाची चर्चा व्हायला लागली आहे. वुईमेक फिल्म्स या बॅनरने ज्योतिकुमारीचा प्रवास पडद्यावर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्टमध्ये या चित्रपटाचे काम सुरू होईल. ज्योतिकुमारी स्वत:च तिचे पात्र चित्रपटात वठवणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे नाव आत्मनिर्भर असे असणार आहे. ज्योतीने भोगलेले दु:ख, तिचा प्रवास आणि काही कल्पनात्मक प्रसंगही या चित्रपटात असणार आहेत असे दिग्दर्शक कृष्णा यांनी सांगितले. दिल्ली ते दरभंगा या ज्योतिच्या प्रवासाच्या मार्गावर विविध ठिकाणी या चित्रपटाचं चित्रिकरण होणार आहे. लॉकडाऊन काळात गुरुग्रामवरून वडिलांना सायकलवर बसवून १२00 किलोमीटर प्रवास करीत पोहोचलेल्या ज्योतीचे खूप कौतुक झाले होते. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इवांका ट्रंपने देखील ट्वीट करीत ज्योतीचे कौतुक केले होते. १५ वर्षीय ज्योतीकुमारीने आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत तब्बल गुरुग्रामवरून दरभंगा, असा १२00 किमी अंतर प्रवास केला होता. याबाबत ट्वीट करताना इवांकाने म्हटले होते की, १५ वर्षांची ज्योती कुमारी आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून सात दिवसांत १२00 किमीचे अंतर पार करीत गावी घेऊन गेली.
No comments:
Post a Comment