पूर्वीचा उंट कसा भारदार होता, आता वाळवंटात आल्यावर तो कसा रोडवला,याची गंमतीदार माहिती म्युझियममध्ये मिळते. 'अनिमल सेंटर'मध्ये पक्ष्यांना 'नैसर्गिक' वातावरण करून देण्यात आले आहे. प्लेमिंगो, ऑस्ट्रीच, बिबट्या मनमुक्त फिरताना दिसतात. आपण फक्त काचेच्या अलिकडून त्यांना बघायचे.
दुबईतील बागांचे सौंदर्य तर अवर्णनीयच!अशीच अप्रतिम बाग म्हणजे 'क्रीक पार्क'. जवळजवळ पाच हेक्टरच्या परिसरात ही बाग फुलवली आहे. हिरवीगार लॉन, ताजीतवानी फुलझाडं आणि अतिशय योजनापूर्वक केलेली बागेची रचना ही इथल्या बागांची वैशिष्ट्ये. या बागांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते. या एकाच बागेत फुलझाडं आहेत, असं नाही तर दुबईमध्ये कोणत्याही रस्त्याने जा,रस्त्याच्या आजूबाजूला हिरवळ आणि फुलं, बोगनवेलींसारख्या वेळी,अनेक प्रकारची झुडपं रंगसंगतीचा विचार करून कलात्मक रीतीने लावलेली दिसतात. यामुळे रस्त्याने जाताना डोळ्यांना सुखद अनुभव मिळतो. ही सौंदर्यसृष्टी खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. मुख्य म्हणजे रस्त्याच्या कडेने कडुलिंबाची झाडे लावलेली आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने केलेला हा विचार स्तुत्य आहे.
दुबईतील रस्त्यांची स्वच्छता तर पाहातच राहावी, अशी आहे. रस्त्यावर एकही कागदाचा तुकडा दिसणार नाही. रेती-मातीचाही कण रस्त्यावर शोधूनही सापडणार नाही. एवढे रस्ते स्वच्छ आणि चकचकीत. वाहतूकही सुरळीत आणि शिस्तबद्ध. इथल्या रस्त्यावर कुणीही रमतगमत चालताना, गप्पा मारताना, टवाळक्या करताना दिसणार नाही. आपले शहर स्वच्छ ठेवले पाहिजे, ही इथल्या प्रत्येकाची भावना आहे. बीच, बाग,रस्ते कसे स्वच्छ, चकचकीत. दुबईत बिगेस्ट, टॉलेस्ट असे सर्व काही आहे. जगातल्या टॉवर क्रेन्सपैकी चाळीस टक्के दुबईमध्ये आहेत. समुद्रातले 'बुर्ज अल अरब' हे सेव्हन स्टार हॉटेल जगातले एकमेव हॉटेल दुबईमध्येच आहे. 'बुर्ज खलिफा' ही जगातील सर्वात उंच गगनचुंबी इमारत (830 मीटर उंच) दुबईत आहे. 'सिटी ऑफ अरेबिया' हा जगातील मोठ्यात मोठा मॉलदेखील इथेच आहे. 'मॉल ऑफ एमिरेट्स' ला जाताना शेख जायद दुतर्फा उंचच उंच टॉवर्स दिसतात. या संपूर्ण परिसराला 'मॅनहॅटन ऑफ दुबई' असे म्हटले जाते. दुबई मरिनाच्या जवळ 'पाम बीच आयलंड' म्हणजे समुद्राच्या आत पामच्या आकारात हे बेट आहे. झोपलेले नारळाचे झाड जणू काही! असे म्हटले जाते की, चंद्रावरून पृथ्वीवरच्या दोनच गोष्टी ओळखण्याजोग्या दिसतात-एक-ग्रेट वॉल ऑफ चायना आणि हे पाम बीच आयलंड.'दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' जगातील आघाडीच्या व वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
विशेष म्हणजे राजे शेख मोहंमद बिन राशिद अल मकतूम यांना वाळवंटातील देश असलेल्या दुबईला आता अर्ध्यापेक्षा जास्त भाग हिरवागार करायचा आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दुबई अर्बन मास्टर प्लॅन २०४० नुसार दुबईच्या ६०% भागांत हिरवळ करायची सरकारची योजना आहे. दुबईला राहण्यासाठी व कामासाठी जगातील सर्वात सुंदर शहर करायचा मास्टर प्लॅनचा आहे. २००८ पर्यंत दुबईच्या एकूण क्षेत्रफळाच्या ८% भागांतही हिरवळ नव्हती. मात्र, २०२० पर्यंत शहरी भागाच्या ३५% भागांवर हिरवळ दिसू लागली. हा भाग दुबईच्या २०% एवढाच आहे. योजनेत मुख्यत्वे पाच शहरी केंद्रांवर (तीन सध्याचे आणि दोन नवे) लक्ष केंद्रित करण्यासह दुबईतील शहरी भाग वाढवण्याचा विचार करण्यात आला आहे. यासाठी संसाधनांचा योग्य वापर, जिवंत, निराेगी व सर्वसमावेशक समुदाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच हिरवळ आणि आराम करण्यासाठीचे भाग व सार्वजनिक बगिचे दुप्पट केले जातील. दुबईची लोकसंख्या २०४० पर्यंत ५८ लाख होण्याचा अंदाज आहे.
ReplyDeleteनिसर्ग व ग्रामीण नैसर्गिक भाग अमिरातच्या क्षेत्राच्या ६० टक्के असेल.निवासी भाग व कार्यस्थळांना जोडण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर केले जातील. यामुळे पायी चालणारे व सायकल चालवणाऱ्यांची सोय होईल.