पार्किन्सन डिसीज हा एक मेंदूचा रोग आहे जो मन, शरीराच्या हालचाली आणि मेंदूच्या कार्याच्या जवळजवळ सर्व बाबींवर परिणाम करतो. पार्किन्सनच्या आजाराचा परिणाम सर्व वयोगटातील लोकांना होतो, ज्यामध्ये ६0 वर्षांवरील १00 लोकांपैकी एकाचा समावेश आहे. या आजाराचे प्रमाण वाढत आहे. भारतात या रोगाचे ६ ते ७ लाख रुग्ण आहेत आणि दहा वर्षानंतर हे प्रमाण दुप्पट होईल. पुरुषामध्ये याचे प्रमाण दीडपटीने जास्त आहे. तसेच गावातील लोकांमध्ये हा रोग जास्त प्रमाणात दिसून येत आहे. पार्किन्सन आजाराचे विशिष्ट लक्षण म्हणजे कंपन आणि शरीराच्या हालचालीतील संथपणा. याशिवाय झोप आणि संज्ञानात्मक क्षमतेमध्ये व्यत्यय येतो. वेदना आणि पोटाचे विकार, बद्धकोष्ट्पणा. चिंता आणि नैराश्य आणि जीवनाची गुणवत्ता कमी होते. लवकर निदान आणि प्रभावी उपचारांपर्यंत पोहोचणे, रुग्णांना आराम मिळवून देण्यात आणि त्यांचे जीवनमान चांगले करण्यासाठी आवश्यक आहे.
२२ जुलै हा दिवस वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी वार्षिक जागतिक मेंदू दिन साजरा करीत आहे. यावर्षी, हा दिवस पार्किन्सन आजाराच्या आणि त्यांच्या काळजीवाहू लोकांचे जीवन सुधारण्यासंबंधी जागरूकता वाढवण्यासाठी सर्मपित आहे. या कार्यात १२६ हून अधिक जागतिक संघटना सामील होत आहेत. पार्किन्सन रोग एक जागतिक समस्या आहे. 'पार्किन्सन रोगाने जगभरातील ७0 लाखाहून अधिक लोकांना प्रभावित केले. ते न्यूयॉर्क शहरातील लोकसंख्येइतकेच आहे. दज्रेदार न्यूरोलॉजिकल केअर आणि उपचारामुळे जीवन सुधारण्याच्या प्रयत्न सुरू आहे. पार्किन्सनच्या आजाराबद्दल आणि त्याच्या समाजावर होणार्या परिणामांबद्दल जागरूकता वाढविणे हे लक्ष्य आहे. पार्किन्सन आजाराची सुरुवातीला लक्षणे ओळखली जात नाहीत. त्यामुळे २५ टक्के रुग्णांचे निदान चुकीचे होते. मेंदूचे आरोग्य यापूर्वी कधीही इतके महत्त्वाचे नव्हते जेवढे आज आहे. जागतिक मेंदू दिनाच्या दिवशी या विकाराविरुद्ध जेव्हा जागतिक एकजूट होईल, तेव्हा आम्ही जागरुकतेचे सार्मथ्य प्रदर्शित करू. पार्किन्सन रोगाचा अंत करण्याच्या उद्देशाने जगाला एकत्रित करून संशोधन करणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment