अत्यंत सुंदर आणि रहस्यमयी असे ॲमेझॉन जंगल आहे. दक्षिण अमेरिकेत असलेल्या ॲमेझॉन जंगलाला पृथ्वीचे फुप्फुस समजले जाते. कारण हे एकटे जंगल जगाला २० टक्के ऑक्सिजन पुरवले.पृथ्वीवर अॅमेझॉन जंगल जवळपास 550 लाख वर्षांपासून आहे. अॅमेझॉनच्या सीमा तब्बल ९ देशांना लागून आहेत. यात ब्राझील, बोलिविया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, वेनुझुएला, गुयाना, सुरिनाम आणि फ्रेंच गुयानाचा समावेश आहे.
या जंगलाचा ६० टक्के भाग ब्राझीलमध्ये आहे. हे जंगल प्रचंड मोठ्या भूभागावर पसरलेले आहे. या जंगलात २५ लाख किड्यांच्या प्रजाती आहेत. याशिवाय हजारो प्रकारची झाडेझुडपे आणि
जवळपास २००० पशुपक्षी या जंगलात राहतात. अॅमेझॉनचे जंगल म्हणजे गुपितांचा खजाना आहे. अॅमेझॉन जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय जंगल आहे. ते ५५ लाख चौरस किलोमीटरपेक्षा अधिक भागात पसरलेले आहे. या जंगलाचा आकार ब्रिटन आणि आयर्लंडसारख्या देशांच्या १७ पट आहे. इतका मोठा आकार असल्यानेच हे जंगल जगातील २० टक्के ऑक्सिजनची पूर्तता करते. या जंगलाच्या उत्तरेला
ॲमेझॉन नदी वाहते. ही नदी म्हणजे शेकडो पाण्याच्या
प्रवाहांचे विस्तीर्ण जाळं आहे. या नदीचे जाळे तब्बल ६,८४० किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. असे असले तरी यावरून काही वादही आहेत. अनेक संशोधकांच्या
मते, सर्वात मोठी नदी नाईल नदी आहे आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची नदी अॅमेझॉन आहे. २००७ मध्ये
मार्टिन स्ट्रेल नावाच्या एका व्यक्तीने संपूर्ण अॅमेझॉन नदी पोहून पूर्ण केली. यासाठी त्याला जवळपास ६६ दिवसांपर्यंतचा वेळ लागला. दरदिवशी तो १० तास पोहत होता. अॅमेझॉनचे जंगल जवळपास ४००-५००
स्वदेशी अमेरिंडियन आदिवासी जमातींचे घर आहे. यातील ५०० जमातींचा तर बाहेरच्या जगाशी कधीच संबंध आलेला नाही. अॅमेझॉनची स्वतःची एक विशाल आणि समृद्ध इकोसिस्टीम आहे. येथे जवळपास ४० हजार वनस्पतींच्या प्रजाती, १३००
पक्ष्यांच्या प्रजाती, ३००० प्रकारचे मासे, ४३० प्रकारचे स्तनधारी आणि २५ लाख प्रकारचे कीटक आहेत.
No comments:
Post a Comment