Monday, 3 May 2021

रोबोमॅन


तंत्रज्ञानात जगाने फारच वेगाने प्रगती केली आहे पण आजही वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्ण माणूस बनवू शकलेले नाहीत. मात्र अर्धा माणूस बनविणे त्यांना शक्य झाले आहे. याचे उत्तम उदाहरण आहे ब्रिटन मधील वैज्ञानिक डॉक्टर पिटर स्कॉर्ट मॉर्गन. त्यांनी स्वतः मध्येच अनेक बदल घडवून स्वतःला रोबोमॅन बनवून घेतले आहे आणि असा जिताजागता रोबो बनून जगापुढे नवे उदाहरण पेश केले आहे.

वैज्ञानिक डॉक्टर पिटर स्कॉर्ट मॉर्गन यांना मोटर न्यूरॉन घातक आजार असल्याचे निष्पन्न झाले. या आजारामुळे त्याचे स्नायू कमजोर होत होते आणि चालणे-फिरणे किंवा कोणत्याही प्रकारची हालचाल करणे कठीण बनले होते. मात्र, आता विविध यंत्रे व उपकरणांच्या सहाय्याने ते दैनंदिन कामे सुरळीतपणे करीत आहेत. हे अर्धे माणूस व अर्धे रोबो असलेले ६२ वर्षांचे डॉक्टर पीटर स्कॉट-मॉर्गन लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ते इंग्लंडच्या डेव्हन शहरात राहतात. २०१७ मध्ये त्यांना स्नायूंचा नाश करणाऱ्या मोटर न्यूरॉन या घातक आजाराचे निदान झाले. अशावेळी त्यांनी रोबोटिक्सचा आधार घेऊन स्वतःचे जीवन सुकर बनवले. ते ६५ वर्षांच्या फ्रान्सिस या आपल्या जोडीदारीणीसमवेत राहतात. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांनी स्वतःचे रूपांतर अर्धा माणूस आणि अर्धा रोबो अशा पद्धतीत करण्यास सुरुवात केली. 'सायबोर्ग' या विज्ञानकथेतील व्यक्तिरेखेसारखे त्यांचे जीवन बनले आहे. मी अर्धा यंत्र बनलो असलो तरी माझ्याकडे प्रेम, मौजमस्ती आणि जीवन जगण्याचा उद्देश आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ते केवळ आपल्या डोळ्यांचा वापर करून कॉम्प्युटर हाताळतात त्यासाठी त्यांनी आय-ट्रेकिंग तंत्र विकसित केले आहे. ते व्हेंटिलेटरच्या सहाय्यानेच श्वासोच्छ्वास करतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ते आपल्याला काय सांगायचे आहे ते स्पष्ट करू शकतात. जगप्रसिद्ध दिवंगत संशोधक स्टीफन हॉकिंग यांनीही अशाच आजारामुळे विकलांग बनल्यानंतर अनेक उपकरणांच्या सहाय्यानेच अनेक वर्षे सक्रिय होते. त्यांना रोबोमॅन बनण्याची प्रेरणा सायन्स फिक्शन कॉमिक कॅरेक्टर सायबोर्ग वरून मिळाली. सायबोर्ग हे अर्धा माणूस आणि अर्धा रोबो असे कॅरेक्टर आहे.डॉक्टर पिटर स्कॉर्ट मॉर्गन यांना रोबोमॅन बनण्याची प्रेरणा सायन्स फिक्शन कॉमिक कॅरेक्टर सायबोर्ग वरून मिळाली. सायबोर्ग हे अर्धा माणूस आणि अर्धा रोबो असे कॅरेक्टर आहे. (अनिकेत फिचर्स)


No comments:

Post a Comment