Monday, 24 May 2021
जगातील सर्वात उंच 'निर्जन' इमारत
अलिकडे शहरांमध्ये माणसांची गर्दी वाढली आहे. साहजिकच क्षेत्रफळाने मर्यादित असलेल्या शहरांमध्ये मग इमारतींच्या उंची वाढवल्या जातात. त्यामुळे बहुमजली इमारतींची संख्याही वाढली. यातूनच मग जगात सर्वात उंच इमारतींची नोंद घेतली जाऊ लागली. अर्थात जगातील सर्वात उंच इमारत म्हणून दुबईतील 'बुर्ज खलिफा' या इमारतीची जगप्रसिद्धी आहे. मात्र, जगातील सर्वात उंच 'निर्जन' इमारत कुठे आहे हे कदाचित आपल्याला माहिती नसेल. ही इमारत उत्तर कोरियात आहे. आता निर्जन म्हणजे काय, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. या इमारतीमध्ये अजूनही कुणी राहत नाही. उत्तर कोरियातील पिरमिडच्या आकाराच्या या इमारतीला 'शापित' किंवा 'भुताटकी असलेली' असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे 33 वर्षांनंतरही या इमारतीचे बांधकाम अजूनही अपूर्ण आहे. ही इमारत एका हॉटेलची आहे. त्याचे नाव आहे 'रयुगयोंग'. त्याला 'यू-क्यूंग' या नावानेही ओळखले जाते. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये असलेल्या या इमारतीची उंची 330 मीटर असून त्यामध्ये 105 खोल्या आहेत. अतिशय भव्य आणि आलिशान वाटणारे हे हॉटेल रखडलेल्या बांधकामामुळे आता भयावह बनलेले आहे. उत्तर कोरियाच्या सरकारनेदेखील या हॉटेलच्या निर्मितीसाठी बराच पैसा खर्च केला आहे. सरकारने सुमारे 55 खर्व रुपये या इमारतीसाठी खर्च केल्याचे सांगितले जाते. मात्र, अजूनही हे हॉटेल पूर्ण झालेले नाही. सध्या या इमारतीला 'जगातील सर्वात उंच सुनसान इमारत' म्हणूनच ओळखले जाते. याच कारणामुळे हॉटेलच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्येही झालेली आहे. जर या हॉटेलचे बांधकाम पूर्ण झाले तर ही इमारत जगातील सातव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत बनेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment