मूनलाईट सोनाटा(MOONLIGHT SONATA):-
पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतात बेधोवनची एक प्रसिद्ध धून आहे. ती पियानोवर वाजवली जाते. या रचनेच्या निर्मितीच्या वेळी बेथोवनने श्रवणशक्ती गमावली होती. त्याने या रचनेचं नाव ऑपेरा-२७, नंबर-२ ठेवलं होतं. जे संगीत फक्त वाद्यांसाठीच असतं, त्याला सोनाटा म्हटलं जातं आणि त्यातही पियानो हे मुख्य वाद्य वाजवलेलं असतं, बेथोवनची ही कर्णप्रिय रचना ऐकून एक संगीत समीक्षक रेलस्टाने लिहिलं की, 'या संगीतामुळे मला चांदण्या रात्री लेक ल्युसनच्या सौंदर्याचा अनुभव आला.' त्याने या रचनेला नवीन नाव दिलं- मूनलाईट सोनाटा, आज पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या रचनांमध्ये बेथोवनच्या या रचनेलाही उच्च स्थान आहे.
ऑक्शन (AUCTION):-
मूळ लॅटिन शब्द AUCTS वरून हा शब्द इंग्रजीत सोळाव्या शतकापासून वापरला जातो. AUCT या लॅटिन शब्दाचा अर्थ सर्वात जास्त असा होता. प्रत्येक लिलावाचं हेच उद्दिष्ट असतं. लिलावात जास्तीत जास्त किमतीला माल विकला जातो. जाहीर लिलावासाठी आज हा शब्द वापरला जातो आणि सर्वात जास्त बोली बोलणाऱ्याला माल खरीदण्याचा हक्क मिळतो. डच ऑक्शन शब्दाचा अर्थ थोडा वेगळा होतो. इथे सर्वात जास्त भावाने सुरुवात करून, ग्राहक मिळत नाही तोपर्यंत किंमत कमी केली जाते. प्रत्येक जाहीर लिलावात कमीत कमी किंमतही ठरवलेली असते. त्या किमतीच्या खाली माल विकला जात नाही. त्या किमतीला रिझर्व्ह प्राइस म्हटलं जातं. एक प्रकारच्या खेळातही एक ऑक्शन ब्रिज असतो. तिथे खेळाच्या सुरुवातीलाच बोली लावल्यानंतर खेळाला सुरुवात करण्यात येते.
टोस्ट (TOAST):- फ्रेंच शब्द TOSTERचा अर्थ जळलेला अथवा शिकवलेला असा असतो. मध्ययुगात वाईन आणि इतर पेयात शिकवलेल्या ब्रेडचे मसालेदार तुकडे ठेवण्यात यायचे. त्यामुळे पेयाला एक प्रकारचा सुवास यायचा. अशा तुकड्यांना टोस्ट म्हटलं जायचं, हा शब्द आजही शेकलेल्या ब्रेडसाठी यापरला जातो. सतराव्या शतकापासून असं ड्रिंक्स पिण्याआधी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीला स्वास्थ्याच्या शुभेच्छासह ट्रिक्स अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. आणि तिला टोस्ट म्हटलं जाऊ लागलं, औपचारिक भोजन समारंभात पाहुण्यांना टोस्ट अर्पण करून शुभेच्छा देण्यात येतात. आता पेयात टोस्टचा तुकडा नसतो; तरीही क्रिया ग्लास उचलून शुभेच्छा देण्याच्या प्रथेला टोस्टच म्हटलं जातं.
No comments:
Post a Comment