विंडो (WINDOW) :-इंग्रजीत खिडकीला विंडो म्हटलं जातं. हा शब्द मूळ स्कँडिनेव्हियन भाषेत वापरल्या जाणाऱ्या VINDAUGE या शब्दावर आधारित आहे. यात VIND म्हणजे दारा आणि AUGE म्हणजे डोळा. घरातून बाहेरच्या जगाकडे पाहाणारा विंडो हा डोळा आहे. जिच्यातून प्रकाश आणि वारा घरात प्रवेशतो. पहिल्यांदा हा शब्द वाईकिंग्ज जातीकडून इंग्लंडमध्ये आला आणि स्थानिक भाषेत स्वीकारला गेला. इंग्रजी शब्दातही विंड (बारा)ला महत्त्व देण्यात आलंय. बाहेरच्या जगाकडून नवा विचार मिळवण्याचंही हे एक माध्यम आहे. आज या शब्दाची व्यापकता वाढलीय आणि फक्त प्रकाश किंवा हवेसाठी भिंतीत असलेल्या खिडकीपुरता सीमित राहिलेला नाही. व्यावसायिक दुनियेत शोकेससाठी ठेवलेल्या वस्तूंसाठीही विंडो- ड्रेसिंगसारखा शब्दप्रयोग केला जातो.
साइडबर्न (SIDEBURN):- गायक ऍलविस प्रेसली चेहऱ्यावर केसांची जी लांब झुल्फ ठेवतो त्याला इंग्रजीत साइडबर्न म्हणतात. अमेरिकेतील अंतर्गत वादाच्या (सिव्हिक वॉर) वेळी जनरल अॅम्ब्रोज बर्नसाइड नावाचा एक सेनापती होता. तो चेहऱ्यावर अशी झुल्फ ठेवायचा.सिव्हिल वॉर संपल्यानंतर अमेरिकेत जनरल बर्नसाइडसारखी झुल्फ ठेवायला इतरांनी सुरुवात केली. सुरुवातीला अशा केसांना बर्नसाइड म्हटलं जायचं, १८८० च्या जवळपास अशा केसांसाठीबर्नसाइडच्या उलट साइडबर्न हा शब्द वापरला जाऊ लागला. हे नाव कशामुळे बदललं ते नक्की सांगता येत नाही. त्यासाठी एक असं कारण दिलं जातं की, केस साइडला असल्यामुळे असा शब्द वापरला जाऊ लागला.
पँट (PANT):-मध्य युगात इटालियन कॉमेडीत पैंतोलोने नावाचं एक विनोदी खूप लोकप्रिय झालं होतं. हे पात्र विजार घालून अभिनय करायचं. सेंट पैंतोलोने व्हेनिसचे संत असल्याने तिथल्या लोकांना पंतोलोने म्हटलं जायचं, नाटकाचं हे पात्रही व्हेनिसचंच होतं. त्यावरून इंग्लंडमध्ये ब्रिचीजसारख्या पोशाखासाठी PANTALOON हे नाव पडलं. इंग्लंडमध्ये वापरल्या जाणाऱ्या या शब्दावरूनच मराठीत पाटलून हा शब्द वापरला जाऊ लागला. एकोणिसाव्या शतकापासून अमेरिकेत या पेंटालूनचं संक्षिप्त रूप प्रत्येक ट्राऊझरसाठी वापरलं जाऊ लागलं. आज जुना पेंटालून हा शब्द विसरला गेलाय आणि अमेरिकेत या शब्दाचं संक्षिप्त रूप पटहे स्वीकारलं गेलंय, आपण त्यात वाढ करून हाफ आणि फूलपट अशा शब्दांची भर घातली.
No comments:
Post a Comment