भारताला जगात मंदिरांचा देश म्हणून ओळखले जाते. मात्र जगातील सर्वात मोठ्या पहिल्या 10 पैकी चार मंदिरे विदेशी भूमीवर आहेत. यातील एक कंबोडियात तर दुसरे एक मंदिर अमेरिकेतआहेत.बाकीची दोन इंडोनेशियात आहेत. क्षेत्रफळाच्या तुलनेत जगातील पहिल्या सात मोठ्या मंदिरांची माहिती जाणून घेऊ या.
• अंगकोर वाट मंदिर,कंबोडिया: 402 एकर क्षेत्रफळाच्या दृष्टीने कंबोडियातील अंगकोर येथील 'अंगकोर वाट' नामक मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर ठरते. हे तब्बल 402 एकर परिसरात पसरलेले आहे. याची निर्मिती 12 व्या शतकात राजा सूर्यवर्मन द्वितीय यांनी केली असल्याचे म्हटले जाते.
•श्री स्वामीनारायण अक्षरधाम, न्यू जर्सी, अमेरिका : 163 एकर उत्तर अमेरिकेतील न्यू जर्सी शहरामध्ये 'श्री स्वामीनारायण अबारधाम' हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे मंदिर आहे. हे मंदिर स्वामीनारायण संस्थेच्या वतीने उभारण्यात आले आहे. ते 2014 मध्ये भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. हे मंदिर तब्बल 163 एकर परिसरात बांधण्यात आले आहे.
• श्री रंगनाथ स्वामी मंदिर, तामिळनाडू, 156 एकर भारतातील तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यात तिरुचिरापल्ली शहरात श्री रंगनाथस्वामी मंदिर' आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास हे मंदिर भारतातील सर्वात मोठे आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे मंदिर आहे. तसे पाहिल्यास भगवान विष्णूवे हे मंदिर तब्बल 156 एकर परिसरात पसरले असून त्याची निर्मिती 8 ते 9 व्या शतकात झाल्याचे मानले जाते.
• छतरपूर मंदिर: नवी दिल्ली : 69 एकर भारताची राजधानी गयी दिल्लीमध्ये 1974 मध्ये संत नागपाल यांनी 'छतरपूर' मंदिराची निर्मिती केली. उल्लेखनीय म्हणजे हे मंदिर पूर्णपणे संगमरवराचे असून ते 68 एकर परिसरात पसरले आहे. या मंदिरात दुर्गामातेच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते.
• अक्षरधाम मंदिर ,नवी दिल्ली : 59 एकर भारताची राजधानी नयी दिल्लीमध्ये 'स्वामी नारायण अक्षरधाम मंदिर हे स्वामीनारायण संस्थेच्या वतीने सुमारे 59 एकर परिसरात उभारण्यात आले आहे. 2005 मध्ये हे मंदिर भाविकांसाठी खोलण्यात आले होते. मंदिराची निर्मिती सुमारे 3 हजार स्वयंसेवक आणि सात हजार कलाकारांनी मिळून केली आहे.
• बेसाकी मंदिर, इंडोनेशिया : 49 इंडोनेशियातील बाली येथे 'बेसाकी' मंदिर आहे. ही एक मंदिरांची साखळीच आहे. ही मंदिरे सहा स्तरांत बांधण्यात आली आहेत. या मंदिरांचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. असे म्हटले जाते, की या मंदिराची निर्मिती 13 व्या शतकात करण्यात आली आहे. हे मंदिर सुमारे 49 एकर परिसरात पसरले आहे.
• बेलूर मठ, रामकृष्ण मंदिर, हावडा :40 एकर भारताचे एक महत्त्वाचे राज्य असलेल्या पश्चिम बंगालमधील हावडा येथे बेलूर मठ रामकृष्ण मंदिर आहे. सुमारे 40 एकर परिसरात पसरलेले हे मंदिर रामकृष्ण मिशनवे मुख्यालयसुद्धा आहे. याची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली आहे. हे मंदिर हुगली नदीच्या तीरावर असून याची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली आहे.
पाचशे वर्षांपूर्वी अवतरात झालेल्या चैतन्य महाप्रभूंना श्रीकृष्णाचा व नित्यानंद प्रभूंना श्रीबलरामाचा अवतार मानले जाते. आज याच मायापुरात जगातील सर्वात मोठे मंदिर उभे राहिलेले आहे. तब्बल ७०० एकर जागेतील या मंदिराच्या उभारणीसाठी एक हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
ReplyDeleteप.बंगालच्या नादिया जिल्ह्यातील मायापूर येथील या मंदिराचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता हे बांधकाम अंतिम टप्प्यात असून त्याचे २०२४ मध्ये उद्घाटन होऊ शकेल. या मंदिरातील सर्व काही भव्य दिव्यच असुन मंदिरासाठी जगभरातील भक्तांनी उदार देणग्या दिलेल्या आहेत. 'फार्ड' कंपनीचे मालक आल्फ्रेड फोर्ड (अंबरीष दास) यांनी यासाठी पुढाकार घेतला व त्यांनी स्वत: ३०० कोटी रुपयांची देणगी दिली. इस्कॉन मायापूरचे टीओव्हीपी सदस्य इष्ट देव यांनी सांगितले की पाचशे वर्षांपूर्वी नित्यानंद प्रभूंनी येथील अदभुत मंदिराची भविष्यवाणी केली होती. इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी १९७१ मध्ये येथे तीन एकर जमीन खरेदी करून मंदिरासाठी १९७२ मध्ये भूमिपूजन केले. भव्य मंदिराचे बांधकाम २००९ पासून सुरू झाले. सुरुवातीच्या बजेटनुसार मंदिर ६०० कोटी रुपयांमध्ये बांधले जाणार होते. मात्र, कोरोना काळ व त्यानंतर वाढलेल्या खर्चामुळे ते एक हजार कोटींवर पोहोचले. या मंदिराचा पाया शंभर फूट म्हणजे जमिनीत दहा मजली इमारतीच्या बरोबरीने असून यावरूनच मंदिराच्या आकाराचा अंदाज लावता येऊ शकेल. येथे वापरण्यात येणार्या टाईल्स राजस्थानमधून तसेच व्हिएतनाम, फ्रान्स, दक्षिण अमेरिकेतून आणलेल्या आहेत. मंदिराची उंची ३८० फूट असून तिथे वैदिक तारांगण, प्रसादालय, गोशाळा, पुस्तकालय, वस्तुसंग्रहालय आदी अनेक उपक्रम पाहायला मिळतील. बांधकाम पूर्ण झाल्यावर याठिकाणी एकाच वेळी दहा हजार भक्तांना भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेता येणार आहे. याठिकाणी जगभरातून कृष्णभक्त येत असल्याने व भविष्यात येथील पर्यटनही वाढणार असल्याने राज्य सरकारने मायापूर येथील बिमानतळाचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे दिला आहे. एखाद्या मंदिरासाठी विमानतळ बांधण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी.