चंद्राचे वय त्याच्या आजपर्यंतच्या अनुमानापेक्षा ८ कोटी ५० लाख वर्षांनी लहान असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. याबाबत जर्मन एरोस्पेस सेंटरच्या संशोधकांनी नवे संशोधन केले आहे. एकेकाळी चंद्रावर मोठा व भयावह असा मॅग्माचा समुद्र होता, असेही त्यांनी म्हटले आहे.
अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळाच्या आकाराच्या एका खगोलाची धडक पृथ्वीला झाली होती. या धडकेतून अवकाशात पृथ्वीचे जे अवशेष विखुरले त्यापासून चंद्राची निर्मिती झाली. ही घटना कधी घडली असावी, याबाबतही नव्याने संशोधन करण्यात आले आहे. यापूर्वी खगोल शास्त्रज्ञांना वाटत होते, की चंद्राची निर्मिती करणारी ही धडक ४.५१ अब्ज वर्षांपूर्वी झाली असावी; मात्र आता नव्या संशोधनात असे दिसून आले, की चंद्राची निर्मिती ४.४२५ अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे. चंद्राच्या वयातील ८ कोटी ५० लाख वर्षांची चूक शोधण्यासाठी संशोधकांनी काही गणितीय मॉडेल्सचा वापर केला. चंद्रावर एके काळी तप्त व द्रवरूपातील मॅग्मा होता. तो थंड होण्यासाठी किती कालावधी लागला असावा, याचे ठोकताळे मांडून हे संशोधन करण्यात आले.
जगभरातील खगोल शास्त्रज्ञ अवकाशातील तारे, ग्रह आणि अन्य खगोलीय पिंडांबाबतचे रहस्य उलगडण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. याबाबत त्यांना एक मोठे यश मिळाले आहे. या खगोल शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीचा उपग्रह असलेला चंद्र हा सुरुवातीला एक आगीचा गोळाच होता. तो सुमारे २० कोटी वर्षांनंतर थंड झाला आहे. शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष चंद्रावरून आणण्यात आलेल्या नमुन्यांचा अभ्यास करून काढला आहे. चंद्रासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनात खगोल शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या उत्पत्तीबाबत अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. चंद्राच्या आयुष्याचा शोध लावण्यात जर्मन एअरोस्पेस सेंटरच्या शास्त्रज्ञांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. या संशोधकांच्या मते, चंद्र हा आजपर्यंतच्या अंदाजापेक्षा ८५ दशलक्ष वर्षांनी युवा आहे. म्हणजेच चंद्राचे वय सुमारे ८.५ कोटी वर्षे इतके आहे. चंद्राचा अभ्यास करणारे थ्रॉस्टेन क्लिन यांनी सांगितले की, जर चंद्राच्या नेमक्या वयाचा शोध लावण्यात यश मिळाले तर आपल्या पृथ्वीची उत्पत्ती कधी झाली असेल,याचा अंदाज बांधणे शक्य होऊ शकते. असेही म्हटले जाते की, पृथ्वीचा उपग्रह असलेल्या या चंद्राचे वय सुमारे ४.५१ अब्ज वर्षे असावे. मात्र, वास्तविक चंद्राचे वय यापेक्षाही कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. थिया नामक ग्रहाने पृथ्वीला दिलेल्या धडकेने चंद्राची निर्मिती झाली. यावेळी चंद्र हा एक तप्त आगीचा गोळा होता आणि २० कोटी वर्षांनंतर तो थंड झाला.
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने आपल्या
ReplyDelete'आर्टेमिस मिशन'अंतर्गत चंद्रावर पहिल्या महिला अंतराळयात्रीला पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.
ही 'आर्टेमिस' मोहीम 'नासा'च्या मंगळ मोहिमेसाठी अत्यंत उपयोगी ठरेल. आर्टेमिस मोहिमेसंदर्भात माहिती देताना 'नासा'ने म्हटले आहे की, आपले अंतराळयात्री हे चंद्राच्या चारी बाजूंचा शोध लावतील. जेथे आजपर्यंत मानव पोहोचलेला नाही. या मोहिमेच्या
माध्यमातून ब्रह्मांडाचेही रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला जाईल. या मोहिमेने अंतराळातील मानवी मोहिमेची व्याप्ती निश्चितपणे वाढणार आहे. तसेच चंद्राच्या भूमीवर असण्याची शक्यता असलेल्या पाणी, बर्फ आणि अन्य प्राकृतिक संसाधनांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे भविष्यात मानव हा चंद्रावरून मंगळापर्यंत प्रवास करेल. आर्टेमिस मिशनबाबत नासा व ईएसए (युरोपीय स्पेस
एजन्सी) यांच्यात करार करण्यात आला आहे. या कराराअन्वये अमेरिकेला चंद्रावरील व्यापक शोधासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांना सहभागी करवून घ्यावयाचे होते. याशिवाय तो भविष्यातील मंगळ मोहिमेसाठीही उपयोगी ठरणार आहे. आर्टेमिस मोहिमेंतर्गत 'नासा'कडून २०२४ पर्यंत चंद्रावर पहिला महिला आणि
पुढील अंतराळयात्री पाठवण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. या मिशनच्या मदतीने 'नासा' चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबरोबरच अन्य ठिकाणीही अंतराळयात्रींना पाठवण्याच्या योजना आखत आहे.