मुलांनो, तुम्ही कासव पाहिलेच असेल, पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा कासवाबद्दल जो बाहेरून बिबट्यासारखा दिसतो. या कासवाला बिबट्या कासव ( लेपर्ड टॉर्टोइज) म्हणतात. ही जगातील कासवाची चौथी सर्वात मोठी प्रजाती आहे. बिबट्या कासव आफ्रिका महाद्विपाच्या दक्षिण आणि पूर्वेकडील किनारपट्टी, अर्ध-रखरखीत गवताळ प्रदेश आणि झुडुपीय मैदानात आढळतात.
बिबट्या कासव आफ्रिकन खंडातील 5 सर्वात लोकप्रिय अशा लहान प्राण्यांपैकी एक आहे. बिबट्या कासवाच्या शरीर संरचनेबद्दल सांगायचे झाल्यास त्याची लांबी 16 ते 28 इंच असू शकते आणि वजन 40 ते 120 पौंड असू शकते. त्याच्या पाठीवरचा भाग पिवळा, पिवळा-तपकिरी किंवा लाल रंगाचा असतो. यात काळ्या डागांचे पॅटर्न बनलेले असतात, जे बिबट्याचे पॅटर्नसारखे (नमुने) असतात. म्हणूनच याला बिबट्या कासव असे नाव देण्यात आले. तरूण वयाच्या बिबट्या कासवांमध्ये काळा पॅटर्न अधिक स्पष्ट दिसतात.
पाठीवरील काळा रंग त्याच्या वाढत्या वयानुसार कमी कमी होत जातो. बिबट्या कासवची पाठ पिरॅमिडच्या आकारासारखी असते. मादी कासवाचे कवच तळापासून सपाट असते, तर नरात ते किंचित दुमडलेले असते. बिबट्या कासवांचे पुढचे पाय पॅडलसारखे असतात, तर मागचे पाय सरळ उभे असतात, यामुळे खडकाळ क्षेत्रात ते सहजपणे चालण्यास सक्षमपणे चालू शकतात. जर त्यांना कुणी उचलले किंवा त्याला त्याच्या शत्रूची चाहूल लागली तर तो स्वत: चा बचाव करण्यासाठी पाणी सोडतो. बिबट्या कासवांचे आयुष्य 80 ते 100 वर्षे असू शकते.
No comments:
Post a Comment