कर्नाटकातील ऐतिहासिक विजापूर शहराचं नामकरण इथल्या सरकारनं आता विजयपूर असं केलं आहे. हे शहर एक पर्यटन स्थळ आहे. या शहराला घुमटांचं शहरदेखील म्हणतात. विजापुरातील गोलघुमट म्हणजे आदिलशाही घराण्याचे सातवे शासक महंमद आदिलशहा यांची कबर असलेलं स्थळ. ही जगप्रसिद्ध वास्तू विजापूरचं मुख्य आकर्षण आहे. तिथं शेजारीच वस्तुसंग्रहालय आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या या घुमटाचा व्यास 44 मीटर आणि उंची 51 मीटर आहे. याच्या चारही बाजूच्या कोपऱ्यात अष्टकोनी आकाराचे सातमजली मनोरे आहेत. या घुमटाच्या वरच्या भागात गोलाकार आकारात कमान बनवलेली आहे. तिथं उभं राहून बोलल्यावर 10 ते 12 वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो, म्हणून त्याला 'बोल घुमट'ही म्हटलं जातं. 33 वर्षांनंतर ही वास्तू साकार झाली. गोलघुमटावरून संपूर्ण विजापूर पाहायला मिळतं. गोलघुमट पाहिल्यानंतर विजापूर किल्ल्याच्या शाह बुरुजावर ठेवण्यात आलेली मुलुख मैदान तोफ पाहण्यासारखी आहे. तिच्या शेजारीच लांडाकसाब ही तिच्याहून आकाराने थोडी लहान तोफ आहे. मुलुख मैदान तोफला 'मलिक-ए-मैदान' तोफ असेही म्हणतात. ही तोफ निजामशाही काळात अहमदनगर इथं इ. स. 1549 मध्ये तयार केली गेली. या तोफेचं वजन 55 टन असून, निजामशाहीतील राजा बुम्हाणशहा यांच्याकडे काम करत असलेला तुर्की सरदार रुमीखान दख्खनीनं याने तांबे, लोखंड आणि जस्ताच्या मिश्रणातून अहमदनगर इथं ही तोफ गाळली होती. मुलूख मैदान तोफेची लांबी 14 फूट 4 इंच असून, तिचा व्यास 4 फूट 11 इंच आहे. या व्यतिरिक्त विजापुरात इब्राहिम रोझा कबर, मोती घुमट, जोड घुमट, ताजबावडी, चांदबावडी, अली रोझा, चिंदडी मशीद, करीमुद्दीन मशीद, जामी मशीद, अंडू मशीद, अमिन दर्गा, मेहतर महल अशा अनेक वास्तू विजापुरात पाहायला मिळतात. यातून इस्लामी वास्तुकलेचं दर्शन घडतं. कर्नाटकातील इस्लामी वास्तुशैलीच्या नमुन्यांसाठी विजापूर शहर प्रसिद्ध आहे. हिंदू वास्तुशिल्पाचे नमुनेही इथं आहेत. या वास्तूंमध्ये स्तंभांचं प्रमाण फार कमी आहे. संपूर्ण वक्राकार कमानींची निर्मिती आहे. हे विजापूरचं खास वैशिष्ट्य. आदिलशाही काळात विजापूरमध्ये अशा अनेक वास्तुकलांची निर्मिती करण्यात आली. अशा प्रकारची ऐतिहासिक ठिकाणं पाहून मन क्षणभर त्या काळाचा शोध घ्यायला लागतं. हेच दृश्य नेमकं त्या काळी कसं असेल? इथं कोण कोण वास्तव्य करत असेल? त्या काळी हाच परिसर किती सुजलाम्-सुफलाम् दिसत असेल? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Wednesday, 26 May 2021
इस्लामी वास्तुशैलीचं शहर विजापूर

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment