वेगवेगळ्या कारणांमुळे जगातील पशुपक्ष्यांच्या अनेक प्रजाती आता लुप्त झालेल्या आहेत. काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक देशांनी अशा पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठी कडक कायदेही केले आहेत. या जीवांचे संरक्षण आणि संवर्धन हे आवश्यकच आहे. अशाच काही धोक्याच्या स्थितीतील आणि अस्तित्वासाठी झगडत असलेल्या पशुपक्ष्यांची ही माहिती...
• आशियाई हत्ती: आशियामध्ये हत्तींची जी प्रजाती आढळते, ती आता नामशेष होत चालली आहे. कुरणे आणि जंगलांचा हास, हस्तिदंतासाठी होत असणारी शिकार, आटत चाललेले जलस्रोत, अशी अनेक कारणे यामागे आहेत.
• ग्रेट व्हाईट शार्क: समुद्राचे वाढते तापमान आणि पाण्यातील वाढत्या आम्लतेचा ग्रेट व्हाईट शार्क या एरव्ही आक्रमक वाटणाऱ्या माशांवरही विपरीत परिणाम होत आहे. समुद्रातील बदलांमुळे त्यांचे खाद्य असणारे मासे व अन्य जलचर यांची संख्या कमी होत असल्याने या शार्कवर हे संकट गुदरले आहे. बदलत्या तापमानाचा परिणाम त्यांचे स्थलांतर आणि प्रजनन यावरही होत आहे.
• आयव्हरी गल : ध्रुवीय वर्तुळातील हा सुंदर पक्षी आहे. ग्रीनलैंड व कॅनडाच्या किनाऱ्यावर हे पक्षी आढळतात. तापमानवाढीमुळे ध्रुवीय प्रदेशांमधील बर्फ वितळत चालले आहे. अशा बामध्ये लपलेले सी शेल्स आणि फिन मासे हे त्यांचे खाद्य असतात. ते कमी होत असल्याने या पक्ष्यांची संख्याही रोडावत आहे. त्यांच्या प्रजोत्पादनासाठीही बर्फाचा जाड स्तर हवा असतो, जो आता दुर्मीळ होत आहे.
• पाणघोडा : हिप्पोपोटॅमस म्हणजेच पाणघोडा हा प्राणीही त्यांच्या नैसर्गिक अधिवासावरील संकटांमुळे नामशेष होत चालला आहे. तापमानवाढीमुळे त्यांचा अधिवास असणारे जलस्रोत आटत चालले आहेत. त्यांचे खाद्य असलेल्या वनस्पतीही कमी होत असल्याने या प्राण्यांचा भास होत आहे.
•ओरांगऊटान : इंडोनेशियातील 'ओरांगउटान' या शब्दाचा अर्थ 'वनमाणूस.' एप' वर्गातील हे प्राणी जावा, सुमात्रा या बेटांवर आढळतात. मात्र, तापमानवाढ, वणवे, अधिवासांच्या क्षेत्रात घट आदी अनेक कारणांमुळे त्यांची संख्या रोडावत आहे. त्यांचा जननदरही कमी झालेला आहे.
• गालापागोज पेंग्विन : दक्षिण ध्रुव म्हणजेच अंटार्क्टिकाचर पेंग्विनच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी गालापागोज पेंग्विन आता नामशेष होत चालले आहेत. चक्रीवादळे, वाढते तापमान, वितळत चाललेला बर्फ, नैसर्गिक अधिवासावरील संकट, खाद्य व प्रजननाच्या जागांवरील संकट तसेच समुद्रातील वाढते आम्ल यामुळे ही प्रजाती संकटात सापडली आहे.
•निळा देवमासा : पृथ्वीवरील सर्वात मोठ्या आकाराचा प्राणी म्हणजे निळा देवमासा. त्याच्या आवाजाची क्षमताही १८८ डेसिबल इतकी मोठी असते. मात्र, हा भला मोठा जीवही जागतिक तापमानवाढीपासून स्वतःचा बचाव करु शकलेला नाही. वितळत चाललेल्या ध्रुवीय बर्फामुळे त्यांच्या अधिवासावर तसेच अन्नसाखळीवर विपरीत परिणाम झाला आहे.
• धुवीय अस्वल : उत्तर ध्रुव म्हणजेच आर्टिक प्रदेशातील ही पांबरी अस्वले अस्तित्वासाठी झगडत आहेत. आर्क्टिक समुद्रातील हिमनग हे त्यांचे नैसर्गिक अधिवास आहेत. तापमानवाढीमुळे हे हिमनगच वितळत चालले असल्याने या अस्वलांवरही संकट आले आहे. तसेच समुद्रात कच्च्या तेलाचा व नैसर्गिक वायूंचा शोध अनेक ठिकाणी घेतला जात आहे. त्याचाही या अस्वलांच्या अस्तित्वावर विपरीत परिणाम होत आहे.
No comments:
Post a Comment