Tuesday, 14 April 2020

कोरोना व्हायरसचे प्रकार किती आणि कोणते?

सध्या संपूर्ण जगाला हतबल करून लोकांना घरातच कैद होण्यास भाग पाडलेल्या कोरोना व्हायरससंबंधी एक नवी माहिती उघड झाली आहे . अत्यंत धोकादायक ठरत असलेल्या या व्हायरसचे एकूण तीन प्रकार आहेत . यामध्ये टाईप - ए , टाईप - बी आणि टाईप - सी यांचा समावेश आहे .
अमेरिकेतील माऊंट सिनाई हॉस्पिटलच्या जिनोमवर आधारित या संशोधनात अशी माहिती उघड झाली आहे की , अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये हाहाकार माजवत असलेला कोरोना व्हायरस हा युरोपमधून अमेरिकेला आला .
याबरोबरच या देशात पश्चिम चीनमधूनही आलेला व्हायरस प्रचंड हाहाकार माजवत आहे . केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या मते , कोरोनाचे वरील तीन प्रकार संपूर्ण जगात सध्या प्रकोप माजवत आहेत . डेली मेल ' ने दिलेल्या माहितीनुसारण केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील संशोधकांचे असे मत आहे की , हा धोकादायक व्हायरस सर्वप्रथम वटवाघळापासून पैंगोलियनसारख्या जनावरात पसरला . त्यानंतर तो मटण , मार्केटमार्गे चीनमधील वुहान शहरात पसरला . तेथे त्याने हजारो लोकांना संक्रमित केले . कोरोना व्हायरसच्या या प्रजातीला केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी टाईप - ए असे नाव दिले आहे . हा व्हायरस चीनमध्ये जास्त दिवस राहिला नाही , तो जपान , ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत वेगाने दाखल झाला . या देशांमध्ये याची सुरुवात ख्रिसमसदरम्यान झाली .
केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील संशोधकांचे असेही म्हणणे आहे की , टाईप - एचे बदललेले रूप म्हणजेच टाईप - बी होय . याच व्हायरसमुळे चीनमध्ये हजारो लोकांना प्राणास मुकावे लागले . चीनमध्ये हाहाकार माजवून टाईप - बी हा कोरोना व्हायरस युरोप , दक्षिण अमेरिका , कॅनडापर्यंत पोहोचला असून , तो सध्या लाखो लोकांना संक्रमित करतानाच हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहे .
कोरोना व्हायरसच्या टाईप - ए , टाईप - बीनंतर टाईप - सीची चर्चा करावयाची झाल्यास या व्हायरसने सिंगापूर , इटली , हाँगकाँग या देशांमध्ये हाहाकार माजवत हजारो लोकांचा बळी घेतला . हा व्हायरस म्हणजे टाईप - बीचा सुधारित प्रकारच आहे . असे असले तरी अमेरिकेत सर्वाधिक राण हे टाईप - ए नामक कोरोना व्हायरसने संक्रमित आहेत . जो दुसन्या देशांमधून अमेरिकेत पोहोचला आहे .
कोरोना व्हायरसने जगभरात आजपर्यंत सुमारे १७ लाख ८० हजार लोक संक्रमित आहेत . तर एक लाख नऊ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे . एकट्या अमेरिकेचा विचार करावयाचा झाल्यास महासत्ता असलेल्या या देशात गेल्या २४ तासांत सुमारे २ हजार लोकांचा बळी गेला आहे . याबरोबरच देशातील आजपर्यंतचा मृत्यूचा आकडा २१ हजारांच्या घरात पोहोचला आहे . हा आकडा इटलीपेक्षा ( २० हजार ४६८ ) मोठा आहे . कोरोनामुळे या देशातील सर्वाधिक बळी न्यूयॉर्कमध्ये पडले आहेत . याशिवाय न्यूयॉर्कनंतर टॉप - टेन राज्यांमध्ये न्यूजसी , मिशिगन , कॅलिफोर्निया , मैसेचुटस , पेनसिलव्हेनिया , लुसिमाना , फ्लोरिडा , इलिनोएज, जॉर्जियाचा समावेश आहे .

No comments:

Post a Comment