बुध या ग्रहाविषयी आपल्याला आकर्षण असतं. हा आकाराने चंद्रापेक्षा थोडा मोठा ग्रह असून उभयतांच्या पृष्ठांवरील स्वरूपांमध्ये बरंच साम्य असल्याचं आढळलं आहे. वरवर पाहता बुधांचं कवच पृथ्वी, मंगळ आणि चंद्र यांच्या कवचाप्रमाणे असल्याचं समजतं. मरिनर-१0 यानाने अविरक्त प्रारणाच्या साहाय्याने केलेल्या तापमापनाद्वारे हे कवच उष्णतानिरोधक असल्याचं आढळलं. यावरून ते सच्छिद्र मृदेचं अथवा चंद्रावरील आवरणशिलेसारख्या खडकांच्या चुर्याचं बनवलेलं असावं असं वाटतं.
बुधाचा प्रतिक्षेप 0.0६ आहे म्हणजे त्याच्या पृष्ठावर पडलेल्या सूर्यप्रकाशापैकी ६ टक्के प्रकाशाचं परावर्तन होतं तर चंद्राचा प्रतिक्षेप ७ आहे. यावरून बुधाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे खडबडीत आणि गडद रंगाच्या खडकांचा बनला असावा, असा अंदाज होता.
मरिनर-१0 ने केलेल्या निरीक्षणांमुळे हा अंदाज खरा ठरला आणि बुधाचा पृष्ठभाग सिलकेटी खडकांनी बनला असून त्यावर सिलकेटी खनिजांची धूळ पसरली असल्याचं समजलं. बुधाच्या पृष्ठावर ४ अब्ज वर्षांहून जास्त काळ अशनींचे आघात होऊन खाचखळगेही निर्माण झाले आहेत.बुध या ग्रहाविषयी आपल्याला आकर्षण असतं. हा आकाराने चंद्रापेक्षा थोडा मोठा ग्रह असून उभयतांच्या पृष्ठांवरील स्वरूपांमध्ये बरंच साम्य असल्याचं आढळलं आहे. वरवर पाहता बुधांचं कवच पृथ्वी, मंगळ आणि चंद्र यांच्या कवचाप्रमाणे असल्याचं समजतं. मरिनर-१0 यानाने अविरक्त प्रारणाच्या साहाय्याने केलेल्या तापमापनाद्वारे हे कवच उष्णतानिरोधक असल्याचं आढळलं. यावरून ते सच्छिद्र मृदेचं अथवा चंद्रावरील आवरणशिलेसारख्या खडकांच्या चुर्याचं बनवलेलं असावं असं वाटतं.
बुधाचा प्रतिक्षेप 0.0६ आहे म्हणजे त्याच्या पृष्ठावर पडलेल्या सूर्यप्रकाशापैकी ६ टक्के प्रकाशाचं परावर्तन होतं तर चंद्राचा प्रतिक्षेप ७ आहे. यावरून बुधाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे खडबडीत आणि गडद रंगाच्या खडकांचा बनला असावा, असा अंदाज होता.
मरिनर-१0 ने केलेल्या निरीक्षणांमुळे हा अंदाज खरा ठरला आणि बुधाचा पृष्ठभाग सिलकेटी खडकांनी बनला असून त्यावर सिलकेटी खनिजांची धूळ पसरली असल्याचं समजलं. बुधाच्या पृष्ठावर ४ अब्ज वर्षांहून जास्त काळ अशनींचे आघात होऊन खाचखळगेही निर्माण झाले आहेत.
No comments:
Post a Comment