Sunday, 12 April 2020

प्रसिद्ध नट आणि चित्रपट दिग्दर्शक बलराज सहानी

ज्येष्ठ कलाकार बलराज सहानी हे एक श्रेष्ठ चित्रपट अभिनेते म्हणून लोकांना माहित आहेत. पण ते एक थोर तत्त्वचिंतक, समाजसेवक होते ही गोष्ट थोड्यांना ज्ञात आहे. बलराज साहनी डाव्या विचारसरणीचे व्यक्ती होते. ते इंडियन पीपुल्स थिएटरशी जोडलेले होते. बलराज साहनी यांचा जन्म १ मे १९१३ रोजी झाला. बलराज साहनी यांनी लाहोरच्या सरकारी कॉलेजमध्ये प्रोफेसर सोढी आणि प्रोफेसर बुखारी यांच्या मार्गदर्शनात शेक्सपिअर लिखित नाटकात अभिनय केला.
शांती निकेतनमध्ये बर्नाड शॉ यांच्या आर्म्स अँड मॅन मध्ये काम केले. बलराज साहनी हे एम. ए. झाल्यानंतर ते काही काळ शांतिनिकेतनमध्ये प्राध्यापक होते. नंतर मात्र, लंडनमध्ये बीबीसीमध्ये नोकरी करून भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय नाटकातच काम केले.
बलराज साहनी यांनी चित्रपट उद्योगात वयाच्या ३४ व्या वर्षी प्रवेश केला. बलराज साहनी हे चित्रपटसृष्टीतील मातब्बर कलावंत होते. हिंदी चित्रपटांत त्यांनी तब्बल २५ वर्षे काम केले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचा ठसा उमटवला. रंगभूमी आणि एकूणच सांस्कृतिक विकासात त्यांनी मोलाची भर घातली.
देव आनंद अभिनीत बाजी चित्रपटाची पटकथा बलराज साहनी यांनी लिहिली. काही वर्षांनंतर चेतन आनंदच्या हकीकत मध्ये त्यांनी अभिनयाबरोबरच लेखन आणि निर्मितीतसुद्धा सहकार्य केले. सारांश एवढाच की, हे सगळे शिक्षित लोक होते आणि कोणताही वाद ताणत नव्हते. मा.बलराज साहनी यांचा चेहरा पारंपरिक नायकाचा नव्हता. ते मध्य अवस्थेत अभिनयाशी जोडले गेले होते. जिया सरहदी यांच्या हम लोग च्या शूटिंग वेळी त्यांना रोज तुरुंगातून आणावे लागत होते. कारण एका आंदोलनामुळे त्यांना राजकीय बंदी बनवण्यात आले होते. ख्वाजा अहमद अब्बास यांच्या धरती के लाल मध्ये त्यांनी अभिनय केला होता. मात्र, १९४६ मध्ये जागोजागी दंगे झाल्यामुळे चित्रपटाचे सामान्य प्रदर्शन होऊ शकले नाही. बिमल रॉय यांनी दो बीघा जमीन मध्ये त्यांना मुख्य भूमिकेत घेतले. चित्रपटाच्या यशासोबत बलराज यांनासुद्धा खूप प्रशंसा मिळाली. अमिय चक्रवर्ती यांच्या सीमा मध्ये त्यांनी गांधीवादी संस्थेच्या प्रमुखाची भूमिका केली होती. या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती. हा चित्रपट शंकर-जयकिशन-शैलेंद्र यांच्या यांच्या गीत व संगी%ाने आठवणीत राहीला. काबुलीवाला मध्येही बलराज यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या कहाणीवर आधारित होता. शांती निकेतनशी जोडलेले असल्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांनी कधी काळी हा चित्रपट पंजाबीमध्ये लिहिण्याची प्रेरणा बलराज यांना दिली होती. मा.बलराज साहनी यांचे अजूनही वक्त मधील गाणे ओ मेरी जोहरा जबी, तुझे मालूम नहीं, तू अब तक हैं हंसी और मैं जवां. लक्षात आहे. ते पठाण कुटुंबाच्या उत्सवात गाणे म्हणत आहेत. मा.बलराज साहनी यांचे गरम कोट, सट्टा बाजार, सीमा, लाजवंती, आणि गर्म हवा अविस्मरणीय चित्रपट होते. एमएस सथ्यु यांचा गर्म हवा फाळणीवर बनलेला महान चित्रपट होता.
बलराज साहनी अतिशय संवेदनशील व्यक्ती होते. त्यांची कलात्मक आवड त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक कार्यात दिसून आली. ते स्टार असूनही खूपच सामान्य जीवन जगत होते. राज खोसला यांच्या दो रास्ते मध्ये त्यांनी सावत्र भावाची भूमिका केली होती. तो त्या कुटुंबाचा प्रमुख असतो. राज खोसला एक स्वछंदी व्यक्ती होते. त्यांना लवकर आणि कमी खर्चात काम करणे आवडत नव्हते. त्यांच्यासारखे विविध चित्रपट इतर दिग्दर्शकांनी केले नाहीत.
पंचवीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत बलराज साहनी यांनी १२५ चित्रपटांत अभिनय केला. बिमल रॉय यांचा दो बिघा जमीन, अमिया चक्रवर्ती यांचा सीमा, राजेंद्रसिंह बेदी यांच्या गरम कोट या कथेवरील चित्रपट, हेमंत गुप्ता याचा काबुलीवाला, यश चोप्रा यांचा वक्त यांतील त्यांचा अभिनय अविस्मरणीय आहे. एम. एस. सथ्यू यांचा गरम हवा या त्यांनी अभिनय केलेल्या शेवटच्या चित्रपटात फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार देणार्‍या मुस्लिमाचे त्यांचे पात्र अनेक पिढय़ांच्या स्मरणात राहील. जीवनाचे शेवटचे क्षण त्यांनी अमृतसरच्या पंजाबी कला केंद्रात घालवले. या संस्थेसाठी त्यांनी एक नाटक क्या यह सच है बापू लिहिले. मात्र हे अर्श-फर्श च्या नावाने सादर करण्यात आले. बलराज साहनी यांचे १३ एप्रिल १९७३ रोजी निधन झाले

No comments:

Post a Comment