Tuesday, 21 April 2020

जगातील नैसर्गिक आश्चर्ये

या पृथ्वीतलावर नैसर्गिकरीत्याच तयार झालेल्या
काही आश्चर्यकारक रचना पाहायला मिळतात.
अशाच काही आश्चर्याची ही माहिती...
• आव ऑफ सहारा : जगातील सर्वात मोठे वाळवंट
असलेल्या सहारामध्ये मॉरिटानियाच्या पश्चिमेला आय ऑफ सारा' नावाची अनोखी रचना आहे. काही वैज्ञानिकांचे म्हणणे होते की ही रचना एखाद्या लघुग्रहाच्या घडकेने बनली असावी. मात्र, आता संशोधकर म्हणत आहेत की ही नैसर्गिकरीत्याच तयार झालेली रचना आहे. ती तव्याल ४० किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेली आहे.

•पंचरंगी नदी : कोलंबियात पाच रंगांची एक अनोखी नदी आहे. या नदीला लिक्विड रेनबो' असेही म्हणतात. ही इंद्रधनुष्यी नदी पर्यटकांचेही मोठे आकर्षण आहे. नदीला हे पाच रंग मकेरनिवा क्लेविना नावाच्या वनस्पतींमुळे मिळतात. या वनस्पतीमुळेच ही नदी
हिरवी, पिवळी, निळी, लाल, गुलाची दिसून येते.
• परिक्युटिन ज्वालामुखी : मेक्सिकोमध्ये हा अनोखा
ज्वालामुखी आहे. त्याची गणना जगातील सात नैसर्गिक आश्चर्यामध्ये होते. विशेष म्हणजे हा ज्वालामुखी उदयास येत असताना अनेकांनी पाहिलेला आहे. हा अमेरिका खंडातील सर्वात छोटा ज्वालामुखी असून त्याला बंगार गोल्फनो' असेही म्हटले
• स्टोन फारेस्ट : यीनच्या शिलीन येथे दगडांचे जणू काही एक जंगलच आहे. तिथे दूरदूरपर्यंत जिथे नजर जाईल तिथे मोठया शिळा दिसून येतात. या ठिकानाचा इसवी सन १३१८-१९४४ दरम्यान शोध लागला असे मानले जाते. याठिकाणी असलेल्या गुहा व मोठ्या
शिट्या सुमारे ९६ हजार एकर जागेत पसरलेल्या आहेत.
• स्पॉटेड लेक : कॅनडात ब्रिटिश कोलंबियामध्ये हे अनोखे सरोवर आहे. या सरोवरामध्ये ठिपक्यांसारख्या अनेक छोट्या खळगी असल्यासारख्या रचना असल्याने त्याला 'स्पटिड लेक' म्हटले जाते. या सरोवरात मोठया प्रमाणात क्षार आहेत.

No comments:

Post a Comment