१. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
उत्तरः पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते.
२. भारताने किती क्रिकेट विश्वचषक जिंकले आहेत?
उत्तरः भारताने दोन क्रिकेट विश्वचषक जिंकले आहेत.
3. भाजीपाला म्हणून आपण कोणत्या भाज्यांचे मूळ खातो?
उत्तरः बीट, गाजर आणि मुळा या भाज्यांचे मूळ खातो.
४ कोणता रंग शांततेचे प्रतीक आहे?
उत्तरः पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे.
५. रोमियो आणि ज्युलिएट कोणी लिहिले?
उत्तरः रोमियो आणि ज्युलियट हे विल्यम शेक्सपियर यांनी लिहिले होते.
६.दार्जिलिंग क्षेत्रात कोणते पीक प्रसिद्ध आहे?
उत्तरः दार्जिलिंगचे क्षेत्रात चहाच्या मळे (पीक) प्रसिद्ध आहे.
७. कोणती बेटे भारताचा भाग आहेत?
उत्तरः अंदमान, निकोबार बेटे आणि लक्षद्वीप हे भारताचा भाग आहेत.
८.जॉर्ज वॉशिंग्टन कोण होते?
उत्तरः जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते.
९. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षांनी गुलाम प्रथा संपवली?
उत्तरः अब्राहम लिंकनने गुलाम प्रथा संपविली.
१०. चॉकलेटसाठी कोणता आफ्रिकन देश प्रसिद्ध आहे?
उत्तरः घाना राष्ट्र चॉकलेटसाठी जगप्रसिद्ध आहे.
११. राजा आर्थरच्या तलवारीला काय म्हणतात?
उत्तरः राजा आर्थरच्या तलवारीला एक्झालिबूर असे म्हणतात.
१२. मायक्रोसॉफ्टचा संस्थापक कोण आहे?
उत्तरः बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आहेत.
१३. सोनी कंपनी कोणत्या देशातील आहे?
उत्तरः सोनी ही जपान राष्ट्राची एक कंपनी आहे.
१४. सूर्य कोणत्या दिशेने उगवतो?
उत्तर: सूर्य पूर्वेला उगवतो.
१५. मार्गारेट थॅचर कोण होते?
उत्तर: मार्गारेट थॅचर हे युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान होते.
No comments:
Post a Comment