Thursday, 23 April 2020

सचिन तेंडुलकर

सचिन रमेश तेंडुलकर हा क्रिकेटविश्‍वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. २00२ मध्ये विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सार्वकालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्डस याच्यानंतरचा दुसरा सार्वकालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरची निवड केली होती. २0११ च्या विश्‍वचषकविजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता.
२00३ मधील क्रिकेट विश्‍वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. २0 नोव्हेंबर २00९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३0,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी तो सन्मानित केला गेला आहे. सचिनला भारतर% हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. हा सन्मान त्याला त्याच्या क्रिकेट मधील नवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. भारतीय विमानदलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेला तो पहिला खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्‍वभूमी नसलेला पहिला माणूस आहे. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिनला मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २0१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला. सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदारही होता.

No comments:

Post a Comment