शमशाद बेगम या भारतीय गायिका होत्या. त्या हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिल्या पार्श्वगायिकांपैकी एक होत्या ज्यांनी आपल्या करिअरमध्ये विविध भाषांमध्ये सहा हजारांहून अधिक गाणी गायली. त्यांनी ५७७पेक्षा जास्त चित्रपटांत गाणी गायली आहेत. शमशाद बेगम यांचा जन्म अमृतसर, पंजाब येथे झाला. २00९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. त्याच वर्षी त्यांना पुण्यातील ओ.पी. नय्यर फाउंडेशनचा ओ.पी. नय्यर पुरस्कार प्रदान झाला. शमशाद बेगम दिसायला अतिशय देखण्या होत्या.
त्यामुळे त्यांना गायनासोबतच अभिनयाच्याही ऑफर्स येत होत्या. पण, त्यांचे कुटुंब अतिशय रूढीवादी असल्याने त्यांनी अभिनयाची कोणतीही ऑफर स्वीकारली नाही. मात्र, रूढीवादी घरातील असूनही त्यांचे प्रेम एका हिंदू व्यक्तीशी झाले. तेव्हा त्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी लग्न केले. शमशाद बेगम यांनी गायनाची सुरुवात रेडियोपासून केली. इ.स. १९३७ मध्ये लाहौर येथे रेडियोवर त्यांनी पाहिले गाणे गायले आणि त्यांनतर त्यांना पेशावर, लाहोर आणि दिल्ली रेडियो स्टेशनवरही गाणी गायला मिळाली. त्यानंतर त्यांनी लाहोरमध्ये निर्माण झालेले चित्रपट 'खजांची' आणि 'खानदान' यासाठी गाणी म्हटली. ही गाणी अतिशय लोकप्रिय झालीआणि भारतभ गाजली. त्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्या स्वप्नाची नगरीत, मुंबईत आल्या. मुंबईमध्ये आल्यानंतर शमशाद यांनी नौशाद अली, राम गांगुली, एस.डी. बर्मन, सी रामचंद्र, खेमचंद प्रकाश आणि ओ.पी. नय्यर सारख्या दिग्गज संगीतकारांसाठी गाणी गायली.
No comments:
Post a Comment