Wednesday, 14 October 2020

जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’


ऑक्सफोर्ड पॉवर्टी आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संस्थांनी प्रसिद्ध केलेला जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हे 107 विकसनशील देशांना व्यापणारी बहुआयामी दारिद्र्याचे आंतरराष्ट्रीय परिमाण आहे. ‘जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’ (MPI) अहवालातल्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत -107 विकसनशील देशांमध्ये, 1.3 अब्ज लोक म्हणजेच 22 टक्के लोक बहुआयामी दारिद्रयात जगत आहेत.

बहुआयामी दरिद्री लोकांपैकी निम्मे (644 दशलक्ष) 18 वर्षाखालील बालके आहेत. सहापैकी एक प्रौढ यांच्या तुलनेत तीनपैकी एक बालक दरिद्री आहे.
बहुआयामी दरिद्री लोकांपैकी जवळजवळ 84.3 टक्के लोक उप-सहारा आफ्रिका (558 दशलक्ष) आणि दक्षिण आशिया (530 दशलक्ष) प्रदेशात आहेत.
67 टक्के बहुआयामी दरिद्री लोक मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आहेत. भारताने (2005/2006–2015/2016 या काळात) राष्ट्रीय पातळीवर तसेच बालकांपैकी बहुआयामी दरिद्री लोकांची संख्या (273 दशलक्ष) केली असून ती सर्वात मोठी घट आहे. तसेच MPI गुण देखील निम्मे केले.
2019/2020 जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक’मध्ये भारताचा 62 वा (गुण: 0.123) क्रमांक आहे.
इतर ठळक बाबी- संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकासासंबंधी उच्च-स्तरीय राजकीय व्यासपीठावर दरवर्षी जुलै महिन्यात हा निर्देशांक जाहीर केला जातो. मात्र कोविड-19 महामारीमुळे बऱ्याच राष्ट्रांची संपर्ण माहिती प्राप्त झालेली नसल्यामुळे 2019 साली प्रसिद्ध केलेल्या माहितीचा आधार घेऊन यावर्षीचा अहवाल तयार करण्यात आला. ‘जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2020’ (MPI) यावर देखरेख ठेवून त्यात सुधारणा करण्याची जबाबदारी नोडल संस्था म्हणून नीती आयोग (भारत) या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.

DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी.

ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने (माच 6) लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकलची (HSTDV) ही चाचणी होती.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने हे व्हेइकल विकसित केले आहे. सकाळी 11 वाजून तीन मिनिटांची चाचणी करण्यात आली. त्यासाठी अग्नि मिसाइलचा बूस्टर म्हणून वापर  करण्यात आला. या क्षेपणास्त्राचा वेग प्रति सेकंद दोन किलोमीटरपेक्षा जास्त असेल. डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हायपरसोनिक मिसाइल टीमने ही चाचणी केली. HSTDV चाचणीचे सर्व निकष पूर्ण केले.

No comments:

Post a Comment