मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्मविष्काराचे नवे क्रांतिकारी वळण देणार्याच या कवीने आपल्या कवितांतून स्त्री-पुरुषातील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतींचा आविष्कार केला. त्यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी झाला.एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी ती स्वप्राणाने अशी हाक देऊन पृथ्वीला सुरलोक साम्य प्राप्त करून देण्याचे महास्वप्न आपल्या क्रांतदश्री प्रतिभेने पाहणार्यारे कवी केशवसुत. कवी केशवसुत म्हणजे मराठी कवितेच्या प्रांतात जुने जाऊ द्या मरणालागुनी असे म्हणत; आशय, अभिव्यक्ती अन् काव्यविचार यात आमूलाग्र परिवर्तन घडवत; आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी!
इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार सुनीत या नावाने त्यांनी मराठीत रूढ केला.
गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत. प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने व मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले.
त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. केशवसुतांची कविता हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. वर्डस्वर्थचा प्रभाव असणार्यात केशवसुतांनी भृंग, पुष्पाप्रत, फुलपाखरू अशा निसर्गकविता लिहिल्या. तुतारी, नवा शिपाई, गोफण केली छान या कवितांतून आपले क्रांतिकारी सामाजिक विचार ओजस्वीपणे मांडले. झुपुर्झा ही त्यांची गूढ अनुभूती व नावीन्पूर्ण अभिव्यक्तीची कविता. म्हातारी या त्यांच्या गूढगुंजनात्मक कविता. केशवसुत यांचे निधन ७ नोव्हेंबर १९0५ रोजी झाले.
No comments:
Post a Comment