जगातील सर्वात लांब असलेला सागरी पूल चीनमध्ये आहे. चीनची मुख्य भूमी आणि हाँगकाँग यांना जोडणारा हाँगकाँग-झुहाई-मकाऊ हा जगातील सर्वात लांब सागरी पूल असून तो ऑक्टोबर २०१८ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला. पर्ल नदीच्या मुखापाशी लिंगडिंगयांग उपसागरात बांधलेला हा पूल ५५ कि.मी. लांबीचा असून, त्याचे काम डिसेंबर २००९ मध्ये सुरू झाले होते.अब्जावधी डॉलर खर्च करून बांधलेल्या या पुलामुळे हाँगकाँग व झुहाई या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ तीन तासांऐवजी अवघ्या ३० मिनिटांत करता येईल जेणेकरून पर्ल खोऱ्यातील ही दोन प्रमुख शहरे अधिक जवळ आली आहेत. ही दोन शहरे सोडली तरी चीनमधील आणखी ११ शहरांमधून हा पूल जातो.
हा पूल भूकंप, वादळ आणि माल वाहतूक करणाऱ्या बोटींपासूनही सूरक्षित राहू शकतो. चीनच्या ग्रेटर बे परिसरात हा पूल असून जवळपास ५६ हजार ५०० चौरस किलोमीटरचा परिसर हा पूल व्यापतो.
या पूलाच्या बांधणीसाठी ८ अब्ज डॉलरचा खर्च आला आहे. हाँगकाँग- झूहाई-मकाऊ या पूलाचं वैशिष्ट्य म्हणजे यात समुद्राखालील बोगदा असणार आहे. या पूलाच्या बांधणीसाठी ४ लाख २० टन स्टीलाचा वापर केला आहे. तर भूयारी मार्गासाठी ८० हजार टन पाईप वापरले आहेत. यापूर्वीही चीनमध्ये आणखी दोन सर्वात लांबीचे समुद्र पूल बांधण्यात आले आहेत. लांबीच्या बाबतीत या दोन्ही पुलांचा विक्रम या बनविण्यात हाँगकाँग-झुहाई-मकाऊ या पुलाने मोडला आहे. यापूर्वी उभारण्यात आलेला समुद्रातील पूल अत्याधुनिक तत्रंज्ञानाने बांधला आहे. 'किंगडाओ-जियाओझोऊ बे' असे पुलाचे नाव असून तो आठ पदरी बांधण्यात आला आहे. या पुलाची एकूण लांबी ३६.४८ किलोमीटर एवढी आहे. या पुलाला २.३ अब्ज डॉलर खर्च आला आहे. या पुलाचे काम मे २००७ पासून चालू होते.
किंगडाओ शहराचे हा पुल झाल्यामुळे शेजारील हुआंगडाओ जिल्ह्याला जोडणार आहे. याच्यापूर्वी पूर्व चीनमधील झियांग प्रांतातील झियांगजिंग व निंग्बो शहराला जोडणारा ३६ किलोमीटर लांबीचा हांगझोऊ येथे सागरी सेतू (पुल) दुनियाचा सर्वात मोठा मानला जात होता. त्यानंतर चीनमध्येच ३६.४८ किमीचा सागरी सेतू बनवून चीनने आपला विक्रम मोडत जगातील सर्वात लांब सागरी पुल उभारण्याचा विक्रम नोंदवला होता. आता तिसऱ्यांदा हा विक्रम चिननेच मोडला आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment