खेळाडूंची संख्या- 4 पेक्षा अधिक
आवश्यक साहित्य-जिलेबी, दोरा
या करमणूकप्रधान खेळात जितके खेळाडू धावण्यासाठी असतात, तितके जिलेबीचे आकडे असणे आवश्यक असतात. जिथंपर्यंत शर्यत आहे,तिथे दोऱ्याला जिलेबी बांधून ठेवावेत. खेळाडूंच्या उंचीपेक्षा जरा जास्त उंचीवर जिलेबी टांगलेले असावेत. खेळाडूंनी उडी मारून जिलेबी तोंडात घ्यावयाची आहे. मागे हात बांधून खेळाडूंनी जिलेबी तोंडात पकडावयाची आहे. पहिल्यांदा जिथून धावण्याची शर्यत सुरू करावयाची आहे, तिथे ओळीने खेळाडूंना उभे करावे. दुसऱ्या बाजूला जिथंपर्यंत शर्यत आहे, तिथे आडव्या काठीला दोरीने जिलेबीचे आकडे बांधले जावेत. मुलांनी धावत जाऊन जिलेबी तोंडात पकडून पुन्हा माघारी पळत यायचे आहे. जो पहिला येईल,तो विजेता. यात तुम्ही पाहिले तीन क्रमांक काढू शकता. शिवाय जिलेबीच्या आकड्यांच्या जागी तुम्ही चॉकलेट किंवा अन्य वस्तू लटकावू शकता.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment