Saturday, 3 October 2020

लालबहादूर शास्त्री


लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील स्वातंत्र्यसैनिक व भारताचे दुसरे पंतप्रधान होते. त्यांनी ९ जून, १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या कार्यकाळात १९६५ चे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौर्‍यावर असताना ११ जानेवारी, १९६६ रोजी त्यांचा हृदयविकाराचे दोन झटके येऊन मृत्यू झाला.

लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर, १९0४ साली वाराणसी येथे एका गरीब प्राथमिक शिक्षकाच्या घरी झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडिलांचे निधन झाले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्‍वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे तत्त्वज्ञान त्यांना समजाविले. वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विद्यापीठाची कोनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अँक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' हे होते.) 'सर्व्हन्ट्स ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले.

नेहरू, शास्त्रींना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविंदवल्लभ पंतांचे सेकट्ररी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. १९५१ मध्ये पं. जवाहरलाल नेहरूंनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजिनामा दिला. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणुका जिंकून दिल्या. २७ मे, १९६४ ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १0 जानेवारी, १९६६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटल्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कायार्साठी त्यांना मरणोत्तर भारतर% पुरस्काराने गौरवण्यात आले.

No comments:

Post a Comment