वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी त्यांनी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८९0 रोजी झाला. संगीत शारदा ह्या नाटकातील मूर्तिमंत भीती उभी ह्या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीर्वादाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. ह्या नाटक मंडळींचे पहिले नाटक संगीत सौभद्र १९0८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सादर केले गेले. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रातही सादर केले गेले. केशवराव महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळे प्रेक्षकांना हे नाटक विशेष आवडले. त्यांच्या स्वत:च्या कोल्हापूर शहरातून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
केशवरावांनी वीर वामनराव जोशी यांजकडून राक्षसी महत्त्वाकांक्षा हे नाटक लिहून घेऊन १९१३ साली ते रंगभूमीवर आणले. हे नाटक त्याकाळी अतिशय लोकप्रिय झाले. त्यातील केशवरावांनी केलेली मृणालिनीची भूमिका अप्रतिम होत असे. याच काळात त्यांनी गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्याकडून गाण्याची दीक्षा घेतली व गायनकलेतही त्यांनी प्रावीण्य मिळविले.
मानापमान नाटकात केशवरावांची धैर्यधराची भूमिका फार तडफदार पणे करणारे संगीतसूर्य केशवराव भोसले मराठी रंगभूमीवरील एक सुप्रसिद्ध संगीतगायक नट.स्त्री भूमिका करणारे ,दिग्दर्शक ,निर्माते अशी त्यांची ओळख होती टिपेच्या सुरांना सहज व स्वच्छपणे पोहोचणारा आवाज आणि अत्यंत प्रभावी तान हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते. रंगभूमीवरील सजावटीबाबत नवनवीन प्रयोग करून केशवरावांनी त्यात अनेक सुधारणा केल्या. कालांतराने त्यांनी स्त्रीभूमिका सोडून पुरुषभूमिका करण्यास सुरुवात केली. हाच मुलाचा बाप, संन्याशाचा संसार, शहाशिवाजी इ. नाटकांतील त्यांच्या नायकाच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या. जुन्या नाटकांपैकी मानापमान नाटकात केशवरावांची धैर्यधराची भूमिका फार तडफदार होत असे. त्यातील त्यांची पदे त्याकाळी अतिशय लोकप्रिय झाली.
१९२१ साली टिळक स्वराज्य फंडाच्या मदतीसाठी गंधर्व व ललितकलादर्श या नाटकमंडळ्यांतर्फे मानापमान नाटकाचा संयुक्त प्रयोग झाला. त्यात साहजिकच केशवरावांकडे धैर्यधराची भूमिका आली. त्यांच्या जोडीला बालगंधर्व-भामिनी आणि गणपतराव बोडस-लक्ष्मीधर असा मातबर संच जमल्यामुळे हा प्रयोग दृष्ट लागण्यासारखा झाला. १९२१ सालची संगीत शाह शिवाजी नाटकातील शिवाजी महाराजांची भूमिका हि त्यांच्या आयुष्यातील शेवटची भूमिका होती. केशवराव फक्त ३१ वर्ष जगले. केशवराव भोसले यांचे ४ ऑक्टोबर १९२१ निधन झाले.
No comments:
Post a Comment