🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝
एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंत ऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसऱ्याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'
तात्पर्य : सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.
●●●●●●●●
'घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो. दरवाजाच्या तुलनेने कुलूप लहान असते. कुलपाच्या तुलनेत चावी लहान असते, परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते. त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार, हे मात्र नक्की...
●●●●●●●●
प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान दिला पाहिजे. बोलताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे.
●●●●●●●●
शब्द दुवा आहे. शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे.
●●●●●●●●
आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात, याला महत्त्व आहे.
●●●●●●●●
गुरुजी : मुलांनो, पाण्याचा अपमान कसा कराल ?
बंड्या : पाणी गरम करायचं आणि अंघोळच नाही
करायची...
😆😅😆😅😆😅😂😅😆😂😅
*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली*
🐰🐰🐰🐰🐰🐰🐰🐰🐰🐰🐰
No comments:
Post a Comment