पंचांगाचे वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये खूप मोठे महत्व आहे. हिंदू धर्मात पंचांगाशिवाय कुठलाही उत्सव, सण आणि कार्याचा शुभारंभ सुरु करणे अशक्य मानले जाते. कारण पंचांगानेच होरा, अभिजित, राहू काळ, तिथी आणि मुहूर्त यांची गणना केली जाते. पंचांगाच्या पाच अंग; वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण याच्या आधारावर मुहूर्त काढला जातो. या पृष्ठांकवर तुम्ही दैनिक आणि मासिक सोबतच वेगवेगळ्या राज्यांचे प्रचलित पंचांग मध्ये वार, तिथी, नक्षत्र, योग, करण आणि सुर्योदय- सुर्यास्त व चंद्रोदय- चंद्रास्त या संबंधीत माहिती तुम्हाला मिळेल. हिंदु दिनदर्शिका आणि भारतीय दिनदर्शिका याच्या मदतीने आपल्याला आगामी वर्षाच्या तिज, उत्सव तिथी आणि इतर महत्वाच्या उत्सवांची माहिती मिळेल. याच्या व्यतिरिक्त पंचांगाच्या स्तंभामध्ये तुम्हाला शुभ आणि अशुभ मुहूर्त या संबंधित सुचना भेटतील. या व्यतिरिक्त तुम्ही घरबसल्या ऑनलाइन सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमच्या शहराचे पंचांग पाहू शकतात. पंचांगाने जुळलेली हे ऑनलाइन सेवेच्या मदतीने तुम्ही तिथी, उत्सव आणि मुहूर्त याबाबत माहिती घेऊ शकतात.
पंचांग हे एक हिंदू कॅलेंडर आहे. ज्याद्वारे तिथी, नक्षत्र, लग्न, सुर्योदय - सुर्यास्त आणि चंद्रोदय - चंद्रास्तची वेळ या व्यतिरिक्त अधिक ज्योतिषीय गणनांच्या बाबतीत माहिती आपण मिळवू शकतो. पंचांगात दिन विशेषाचे पूर्ण विवरण असते. त्याच प्रमाणे दैनिक पंचाग, मासिक पंचाग , वार्षिक पंचांग, पंचांग २०२० , गौरी पंचांग, भद्रा, आजचे नक्षत्र, आजची तिथी, आजचा कर्ण, आजचा योग, आजचा दिवस, चंद्रमार्ग गणनयंत्र या विषयी आम्ही सखोल आणि सटीक माहिती दिली आहे. पंचांगाच्या मदतीने तुम्ही शुभ मुहूर्त व अधिक ज्योतिषीय गोष्टी सखोल पाहू शकतात. ऍस्ट्रोसेज आपल्यासाठी एक उत्तम पंचांग सादर करत आहे. त्यात तुम्ही सर्व सण, उत्सव या विषयी माहिती घेऊ शकतात आणि सर्व राष्ट्रीय आणि स्थानिक सण आणि उत्सव आम्ही या मध्ये प्रदर्शित केले आहे व सोप्या पद्धतीने याची मांडणी केली आहे.
पंचांगाच्या मदतीने ग्रहांची चाल, नक्षत्र आणि समस्त खगोलीय घटनांची माहिती मिळेल. या व्यतिरिक्त पंचांगाच्या मदतीने विवाह, मुंडन आणि गृह प्रवेश सोबतच सर्वच मंगल कार्यासाठी शुभ मुहूर्ताची गणना केली जाते. हिंदू धर्मात तिथी विना कुठलाही सण आणि धार्मिक कार्य केले जात नाही. कारण हिंदू धर्माचे सर्व सण विशेष तिथी वर साजरे केले जातात. पंचागात तिथी चे आरंभ आणि सप्ताह वेळ दर्शवला जातो आणि त्याच्या मदतीने पर्व आणि सण साजरे करण्याचा निर्णय घेतला जातो.
No comments:
Post a Comment