Sunday 25 December 2022

जाणून घ्या सामान्य ज्ञान

1) आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? : गलगंड 

2) युनिव्हर्सल डोनर म्हणजे रक्‍तदाता होय? : ओ 

3) बटाटा काय आहे? : मूळ 

4) कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास कोणते जीवनसत्व मिळते ? : ड 

5) कोणत्या प्राण्यापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो? : डास 

6) वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? २१ टक्के 

7) वि. वा. शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? : कुसुमाग्रज 

8) मीनांबकम आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? : चेन्नई 

9) जनगणना दर किती वर्षांनी केली जाते? : 10 वर्षांनी 

10) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? : दुसरा 

11) भारतीय दूधक्रांतीचे जनक कोण आहेत? : डॉ. वर्गीस कुरियन 

12) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? : १९९४ 

13) भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण : सुचेता कृपलानी (1963 ते 1967, उत्तरप्रदेश) 

14) भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय : वर्ल्ड वन (मुंबई) 

15) सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात होतात? : जपान 

16) एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात : चेतापेशी 

17) कोणत्या देशात फक्त ८२५ छोकच राहतात?! वेटिकन सिटी 

18) तंब्राखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता? : निकोटीन 

19) कोरोना आजारात कोणत्या asst 'आपत्कालीन कर्ज सुविधा' सुरू केली : स्टेट बंक ऑफ इंडिया 

20) कोरोना विषाणू २०१९ चे पहिले प्रकरण कुठे समोर आले : चीनमधील ATTRA हुआनमध्ये 

21) कोरोनाच्या नवीन विषाणूला तात्पुरते नाव काय : 2019-nCov 


Tuesday 20 December 2022

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला सारस पक्षी


करकोचा व करकरा यांच्याबरोबरच सारसाचा गुइडी या पक्षिकुलात समावेश केलेला आहे. याचे शास्त्रीय नाव ग्रुस अँटिगोन असे आहे. ग्रुस या प्रजातीत दहा व इतर चार अशा एकूण 14 जाती आहेत. सायबेरियन क्रेन (ग्रुस ल्यूकोगेरॅनस) हे मध्य सायबेरियात आढळणारे पक्षी हिवाळ्यात भारतातील लडाख, अरुणाचल प्रदेशातील सांगती खोरे, भूतान, म्यानमार इ. ठिकाणी कळपाने येतात. ते वास्तव्यासाठी रुंद व प्रशस्त नद्यांची खोरी निवडतात. भारतीय उपखंडात सारस उत्तर आणि मध्य भारत, तराई नेपाळ आणि पाकिस्तान, थायलंड, म्यानमार इ. प्रदेशांत हा आढळतो. मैदानी प्रदेशांत पाण्याच्या आसपास, तलाव व तळी यांच्या काठावर, दलदलीच्या जागी किंवा शेतात हा राहतो. या पक्ष्यांची जोडपी असतात कधीकधी एक-दोन पिले त्यांच्यासोबत असतात.  महाराष्ट्रात सारस पक्षी केवळ गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शिल्लक आहे. भारतातही हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जगभरात केवळ 25 ते 37 हजारच सारस शिल्लक आहेत.  2018 च्या सर्वेक्षणानुसार, पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात मिळून 14 हजार 938 सारस शिल्लक आहेत. यापैकी बहुतांश सारस उत्तर प्रदेशात असून या राज्याचा तो राज्यपक्षी आहे.  महाराष्ट्रात देखील 50 च्या आसपास सारस शिल्लक आहेत. यातील सर्वाधिक सारस गोंदिया, त्यानंतर भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात केवळ एक सारस आहे.महाराष्ट्रात सारस पक्ष्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाने स्वत:हून घेतलेल्या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील तीनपैकी  दोन जिल्ह्यात सारस संवर्धन समिती गठीत झाली असून एका जिल्ह्यात अजूनही समितीचे गठन व्हायचे आहे. 

कधीकाळी याच महाराष्ट्रात सुमारे शंभर सारस होते. निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत ‘आययूसीएन’च्या यादीत या पक्षाची नोंद संकटग्रस्त अशी आहे. सारस हा उडू शकणारा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे, पण गेल्या काही दशकात पाच फूट उंच, आठ फूट लांब पंख आणि सात किलो वजनाच्या या पक्ष्याची संख्या उच्चदाब वीजवाहिन्या, रायासानिक खते आणि कीटकनाशके आदींमुळे झपाटय़ाने कमी होत आहे. महाराष्ट्रात या पक्ष्यांचा अधिवास टिकवून ठेवण्याचा मान गोंदिया जिल्ह्यातील ‘सेवा’ या संस्थेला जात आहे. या संस्थेचे अध्यक्ष व मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन सारस संवर्धनाची धुरा गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सांभाळली आहे. वनखाते आणि स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेल्या या पक्ष्याची दखल नागपूर उच्च न्यायालयाने घेतल्यानंतर वनखाते आणि स्थानिक प्रशासन जागे झाले. नामशेषाच्या मार्गावरील या पक्ष्याच्या संवर्धनासाठी सध्यातरी सर्व एकत्र आल्याचे दिसून येत आहे.

सारस हा गिधाडापेक्षा मोठा असून 120–152 सेंमी. उंच असतो. मान व पाय बरेच लांब डोके आणि मानेचा वरचा भाग लालभडक डोक्याचा माथा राखी मान पांढरी संपूर्ण शरीर निळसर-करड्या रंगाचे डोळे नारिंगी चोच टोकदार व हिरवट रंगाची, पाय लाल व पिसेविरहित असतात. मादी नरापेक्षा लहान असते. सारस पक्षी झाडावर बसत नाहीत. ते नेहमी जमिनीवरच भटकत असतात. झाडाझुडपांचे कोवळे धुमारे, वनस्पतिज पदार्थ, किडे, सरडे, गोगलगायी इ. यांचे भक्ष्य आहेत. या पक्ष्यांचा जोडा जन्मभर टिकतो. एकमेकांच्या सान्निध्यात राहूनच ते भक्ष्य टिपीत असतात व उडून दुसरीकडे जाताना देखील ते बरोबरच जातात. सारस गुपचुप भक्ष्य टिपीत असतात, त्यांना कोणी त्रास दिला किंवा हुसकले, तर ते कर्ण्याच्या आवाजासारखा मोठा आवाज काढतात. उडतानादेखील ते असाच आवाज करतात. उडत असताना मान पुढच्या बाजूला लांब, ताठ केलेली असते व पाय मागे लोंबत असतात. ते जमिनीपासून जास्त उंचीवरून उडू शकत नाहीत परंतु त्यांचा वेग जास्त असतो.

जुलै–सप्टेंबर यांचा विणीचा हंगाम असतो. घरटे बरेच मोठे बोरू, वेत, लव्हाळी व गवत यांचे बनविलेले असते सामान्यतः ते दलदलीच्या जागेवर किंवा पाणी साठलेल्या भाताच्या खाचराच्या मध्यभागी असते. मादी फिकट हिरव्या किंवा गुलाबी-पांढऱ्या रंगाची दोन अंडी घालते कधीकधी त्यांच्यावर तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे ठिपके असतात. नर-मादी घरट्यातील अंड्यांचे अतिशय जागरूकतेने रानमांजर, मुंगूस व कुत्री यांपासून संरक्षण करीत असतात. पिलू अंड्यातून बाहेर पडल्यावर लगेचच हिंडू-फिरू लागते. ते नर-मादीच्या संरक्षणाखाली वाढते.

सारस अधिवास संरक्षणावर लक्ष केंद्रित करायला हवे.विजेच्या धक्क्यांपासून सारस पक्ष्यांना वाचवण्यासाठी महागडे उपाय योजण्यापेक्षा कमी खर्चातील उपाययोजनादेखील परिणामकारक ठरू शकतात. साध्या ‘पीव्हीसी पाइप’ने उच्चदाब वीजवाहिन्या झाकल्या तरीही त्यातून अपेक्षित परिणाम साधला जाईल.  नदीतील अवैध वाळू उत्खननामुळेही सारसांचा अधिवास धोक्यात आला आहे. ओलसर जमिनीच्या पर्यावरणावर म्हणजेच ‘वेटलॅण्ड इकॉलॉजी’ या महत्त्वाच्या मुद्दय़ाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday 19 December 2022

वाढवा तुमचे सामान्य ज्ञान

@ जांभा खडक कोणत्या जिल्ह्यात सापडतो? : रत्नागिरी 

@ मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? : आचार्य बाळशास्त्री जांभेकर 

@ तांब्याच्या पत्र्यावर कोरलेलं लेख म्हणजे काय असते? : ताम्रपट

@ होमो सेपियन म्हणजे काय? : बुद्धिमान माणूस 

@ हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे? : रावी नदी 

@ आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे? : अथर्ववेद 

@ तागाच्या उत्पादनात भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?: पश्‍चिम बंगाल 

@ भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण कोणते? : गंगानगर (राजस्थान) 

@ तेलंगणा प्रदेशात दगडी कोळशाच्या खाणी कुठे आहे? : सिंगारेनी 

@ कोणत्या प्राण्याला 'वाळवंटातील जहाज' म्हणतात? : उंट 

@ महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे? : 288 

@ कोणत्या शास्त्रज्ञाला भारताचा मिसाईल मॅन म्हटले जाते? : डॉ. एपीजे अब्दुल कलाम 

@ रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कुठे आहे ? : कर्जत 

@ हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? : सांगली 

@ महाराष्ट्रात हत्ती संशोधन केंद्र कुठे आहे? : वर्धा 

@ पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? : लोह 

@ कोरोना विषाणूला 'आंतरराष्ट्रीय आणीबाणी' कोणी घोषित केले : जागतिक आरोग्य संघटना (WHO) 

@ WHO ने कोरोना विषाणूला काय नाव दिले आहे? : कोविड-19 

@ मानवामध्ये कोरोना विषाणू कोणत्या संसर्गामुळे होतो? : श्‍वसन 

@ भारतातील कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला? : केरळ 

@ कोरोना विषाणू लशीची पहिली मानवी चाचणी कोणत्या देशात सुरू झाली? : अमेरिका 

@ पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ? : मेघदूत जलाशय 

@ भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? : मुंबई 



मागील आठवड्यातील ठळक घडामोडी राष्ट्रीय (18 डिसेंबर 2022 अखेर)

@ काँग्रेस नेते सुखविंदर सिंग सुखू यांनी हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यपंत्री म्हणून १९ डिसेंबर रोजी शपथ घेतली. 

@ गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले. 

@१८ डिसेंबर रोजी दीपिका पदुकोणने फिफा विश्‍वचषक २०२२ च्या ट्रॉफीचे अनावरण केले. 

@ न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी १२ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. 

@ आठवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव २०२२ भोपाळ येथे २१ ते २४ जानेवारीदरम्यान होणार आहे. 

@ पटेल यांची दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ. 

@ पहिल्या कार्बन न्यूट्रल फार्मचे केरळमध्ये उद्घाटन. 

@ स्किल इंडिया मिशनअंतर्गत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (MSDE) १२ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ मेळा (पौ एमएनएएम) आयोजित केला होता. ९७ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या २५ राज्यांमध्ये मेळावा संपन्न.

@ केंद्रीय जलशक्‍ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी १५ डिसेंबर रोजी जलशक्‍ती राज्यमंत्री बिश्‍वेश्वर तुडू यांच्या उपस्थितीत सातव्या भारत जल प्रभाव शिखर परिषदेचे (आयडब्हूआयएस 2022) उद्‌घाटन केले. 

@ तामिळनाडू स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य. गेल्या सप्टेंबरमध्ये हरित तमिळनाडू मिशन आणि या आगस्टमध्ये तामिळनाडू वेटलँड मिशन सुरू केले होते.

@ बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या विजयाची आठवण म्हणून १६ डिसेंबरला भारतात विजय दिवस साजरा केला जातो. 

@ गामोसा, तंदूर , रेडग्राम आणि लडाख जर्दाळूंना आसाममधून जीआय टग मिळाला. 

@ यूएन कमिशन ऑन द स्टेटस आफ वुमनमधून इराणची हकालपट्टी करण्यात आली. 

@ महाराष्ट्र, गुजरात, गोवा एरियल आर्मी यॉचिंग नोड यांनी 'ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशनियन चॅम्पियनशिप'चे १३ ते २० डिसेंबरला गिरगाव चौपाटी येथे आयोजन. 

@ कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ डॉ. पीसी रथ यांची निवड करण्यात आली. 

@ डॉ. बिरेंद्र सराफ महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून नियुक्‍त. 

अर्थजगत

@जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सोतारामन, बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मुझुमदार-शॉ आणि Nykaa च्या संस्थापक फाल्गुनी नायर या सहा भारतीय महिलांचा समावेश. ३६ व्या क्रमांकावर असलेल्या निर्मला सीतारामन यांनी सलग चौथ्यांदा या यादीत.

@ फर्स्ट-एव्हझ बोएमडब्ल्यू एक्सएमचे अनावरण. यात आकर्षक डिझाइन, शक्तिशाली स्टान्स, तेवीस इंचपर्यंतचे व्हील्स, शक्तिशाली इंजिन्स, जवळपास ८८ km (डब्ल्यूएलटीपी) पर्यंतच्या ऑल इलेक्ट्रिक रेंजसह पहिले इलेक्ट्रिफाईड हाय-परफार्मन्स मॉडेल. 

@ कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातील सर्वात मोठे व्यावसायिक जेट टर्मिनल सुरू झाले. 

@ एचडीएफसी बँकेने भारत सरकारच्या 'स्टार्टअप इंडिया' या प्रमुख उपक्रमाच्या भागीदारीत सामाजिक स्टार्टअप्ससाठी सहाव्या वार्षिक अनुदान कार्यक्रमाची घोषणा केली. 

@ अक्सिस बँकेची टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (टाटा एआयजी) सोबत भागीदारी. टाटा एआयजीच्या ग्रुप मेडिकेअर उत्पादनांतर्गत समलेंगिक जोडीदारांनाही पंधरा लाखांच्या विम्याच्या रकमेसाठी संरक्षण. 

@ नियामक पर्यवेक्षण सुधारण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यासाठी आरबीआयच्या ७ ग्लोबल कन्सल्टन्सी फर्म्स

@ एसबीआयने गेल्या चार आर्थिक वर्षात १.६५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. 

@ यूएनच्या अहवालानुसार, जागतिक व्यापाराचे मूल्य १२ टक्क्यांनी वाढून अंदाजे $३२ ट्रिलियन झाले. 

@ पी. टी. उषा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. 

@  सिंडी हुक यांची २०३२ ऑलिम्पिक आयोजन समितीच्या सोईओ म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. 

@  इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा आणि ५० बळो घेणारा तिसरा क्रिकेटपटू. 

७ इंग्लंडचा टी-२० विश्‍वचषक विजेता कर्णधार जोस बटलर आणि सिद्रा अमीन यांची नोव्हेंबर २०२२ साठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड. 

@ दिव्या टीएसने महिला एअर पिस्तुल राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकले. 

@  फिना वर्ल्ड स्वीमिंग चॅम्पियनशिप २०२२ मध्ये चाहत अरोराने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रम केला. 

@ सुप्रसिद्ध मराठी लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे १० डिसेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. 

@ पोलंडचे एकमेव अंतराळवीर जनरल मिरोस्लाव हर्माझेव्स्की यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी नुकतेच निधन झाले. 




Sunday 11 December 2022

माहीत आहे का तुम्हाला?

@ कॅनडामधीत्न दहा वर्षांचा मुलगा ल्यूक बोल्टनने “सर्वात लांब तुटलेला दुधाचा दात’ (२.६ सेंटीमीटर) या श्रेणीत गिनिज नुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. हा दात २०१९  मध्ये एका डेंटिस्टने काढत्ला होता. 

@ गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम हँडलने “जगातील सर्वात लांब लग्नाचा ड्रेस (६,९६२.६ मीटर) हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा ड्रेस सायप्रसची मारिया पारस्केवा नावाच्या  महिलेने घातला होता. 

@ 'ब्रिटनमधील जेड मर्फी या युवकाने आपला चेहरा इन्स्टाग्राम फिल्टरसारख्या बनवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी वर ३० लाख रुपये खर्च केले 

@ पृथ्वीवर सर्वात जास्त दिवस जगणारा प्राणी म्हणजे कासव. त्याचे वय साधारणता १५० ते २००  वर्षे असते. 

@ 'हवेत उड्डाण घेताना आपण आपल्या शरीरातील सुमारे ८ टक्के पाणी गमावतो. खाचे कारण हवामान-नियंत्रित  वातावरणातीत्न अर्द्रता १० ते १५ . टक्क्यांपर्यंत कमी असू शकते. 

@ शालेय बसेसचा रंग पिवळा असतो  कारण इतर रंगांच्या तुलनेत मानवी डोळ्यांना पिवळा रंग अधिक उठून दिसतो. हा रंग रात्री आणि धुक्यात देखील अगदी सहज दिसून येतो, जो अपघातांपासून बचाव करतो. 

@ नेपाळ हा एकमेव देश असा आहे, ज्याचा राष्ट्रीय ध्वज आयताकृती नाही. 

@ एका सर्व्हेनुसार, जगातील सर्वात सुशिक्षित देशांच्या यादीत कॅनडा देश  पहिल्या क्रमांकावर येतो. 

@ वायव्य थायलंडच्या पाडांग जमातीतील स्त्रियांची मान ७.७ इंच लांबींपर्यंत आहे. हे मानवी मानांच्या सरासरीच्या लांबीच्या दुप्पट आहे. 

@ आपल्याला झोपेत पडलेले स्वप्न हे आपणास जाग आल्यानंतर १० मिनिटांच्या आत आपण ९० टक्के स्वप्न विसरून जातो. 

@ जगभरात मधमाश्यांच्या एकूण २० हजार जाती आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ४ टक्के मधमाश्या मध बनवू शकतात.

@ जगातील ९० टक्के शुद्ध पाणी हे एकट्या अंटार्क्टिकामध्ये आहे. 

@ 'टॉम अँड जेरी' मालिका १९४०  मध्ये विल्यम आणि जोसेफ बारबेरा यांनी बनवली. 

@ जपानमधील लोक सहीऐबजी स्वतः  च्या स्टॅम्पचा वापर करतात. या स्टॅम्पला जपानी भाषेत 'हंको' असे म्हणतात. 

@ जगातील सर्वात उंच आणि जास्त रुंदीची अशी दोन्ही प्रकारची झाडे ही अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आहेत. 

@ शुद्ध सोने इतके मऊ असते की ते हातांनी देखील मोडले जाऊ शकते. 

@ भारतातील पहिला सूर्योदय अरुणाचल प्रदेशच्या डोंग जिल्ह्यात होतो. डोंग जिल्हा हे भारतातील सर्वात पूर्वेकडील ठिकाण आहे, म्हणूनच येथे सूर्योदय सर्वात आधी अनुभवला जातो.