Friday 26 October 2018

अन्न पदार्थ जास्त शिजवू नये

आपण तयार केलेले खाद्यपदार्थ खाण्याच्या वेळेपयर्ंत गार होऊन गेले, की आपण ते परत गरम करतो. किंवा केलेले अन्नपदार्थ जर शिल्लक राहिले, तर ते फ्रीजमध्ये ठेऊन आपण नंतर गरम करून खात असतो. कित्येक वेळेला उरलेल्या पदार्थांमध्ये अजून साहित्य घालून आपण त्यातून एक नवीनच पदार्थ तयार करतो. असे वारंवार गरम करण्यामुळे अन्नामधील पोषक तत्वे नष्ट होतात. त्यामुळे पदार्थ एकदा करून ठेवला, की तो वारंवार गरम करत राहणे आवर्जून टाळायला हवे. आणि काही अन्नपदार्थ असे आहेत, की एकदा शिजविल्यानंतर ते जर परत परत गरम केले गेले, तर ते खाण्यास योग्य न राहता, आरोग्यास धोकादायक ठरू शकतात.
एक दोन दिवस अन्नपदार्थ फ्रीज मध्ये ठेवले, की घरातील प्रत्येक जण आपापल्या सोयीने अन्न गरम करून घेत असतो. पण आपण बनवित असलेले काही अन्नपदार्थ वारंवार गरम केल्यास ते अन्नपदार्थ आपल्या शरीराला नुकसानकारक ठरू शकतात.मशरूम्स घालून केलेला कोणताही पदार्थ शक्यतो केल्यावर लगेचच खाऊन संपविणे योग्य असते. पण जर मशरूम्स ची भाजी उरलीच, तर ती परत गरम करून खाणे टाळावे. पुन्हा गरम केलेल्या मशरूम्सच्या भाजीमुळे पोट बिघडण्याची शक्यता असते. अंडे हे सुपरफूड म्हणून ओळखले जात असले, तरी अंड्यापासून बनविलेले अन्नपदार्थ ही त्वरित खाऊन संपविणे योग्य. उकडलेली अंडी, अंड्याचे ऑमलेट, अंडा करी इत्यादी अंड्यापासून बनविलेले पदार्थ पुन्हा गरम करून खाल्ल्यास त्याद्वारे फूड पॉयझनिंग चा धोका उद्भवू शकतो. दुसर्‍यांदा गरम करून खाल्लेले अंड्याचे पदार्थ पचनक्रिया बिघडवू शकतात. बटाट्याची भाजी आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनाच आवडते. ही भाजी करताना बटाटे उकडून घेतल्यानंतर ते गार झाल्यानंतरच त्याची भाजी करण्याची पद्धत आहे. पण उकडलेले बटाटे निवण्याकरिता ओट्यावरच ठेवले असता, त्यांच्या मध्ये बोटूलिझम नावचे बॅक्टेरिया तयार होत असतात. एकदा तयार केलेली बटाट्याची भाजी खाण्यापूर्वी परत गरम केल्याने देखील हे बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत. त्यामुळे बटाटे शिजवून घेतल्यानंतर गार करण्यासाठी बाहेर न ठेवता, फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवावेत.रेफ्रिजरेट केलेले चिकन जर परत गरम केले गेले, तर त्यामधील प्रथिनांचे कॉम्पोझिशन पूर्णपणे बदलू शकते. तसेच चिकन घालून तयार केलेला अन्नपदार्थ परत परत गरम करून खाल्ल्याने पोट ही खराब होऊ शकते. तसेच चिकनचा अन्नपदार्थ तयार करताना चिकन व्यवस्थित शिजले आहे किंवा नाही याकडे आवर्जून लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे भात शिजविल्यानंतर जेवण झाल्यानंतर ही शिल्लक राहिला असेल, तर तो फ्रीज मध्ये घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवावा. कच्च्या तांदळात जे जीवाणू असतात, ते भात शिजविल्यानंतरही त्यात राहतात. जर शिजवलेला भात उरला आणि तो तसाच ओट्यावरच झाकून ठेवला, तर रूम टेम्परेचरवर ह्या भातातील जीवाणूंचे परिवर्तन बॅक्टेरियामध्ये होते. हा भात खाल्ल्यानंतर उलट्या किंवा जुलाब होण्याचा धोका संभवतो. पालक किंवा इतर पालेभाज्यांमध्ये नायट्रेट हे तत्व मोठय़ा प्रमाणावर असते.
वारंवार गरम केल्याने या भाज्यांमधील नायट्रेट आरोग्यास धोकादायक ठरू शकते. तसेच बीट मधेही मोठय़ा प्रमाणावर नायट्रेट असते. त्यामुळ शिजविलेले बीट जर परत गरम करून खाल्ले तर पोटदुखी उद्भवू शकते. आता प्रश्न असा की अन्नपदार्थ जर परत परत गरम करून खाल्ल्याने ते आरोग्यास धोकादायक ठरत असतील, तर उरलेले अन्नपदार्थ वाया जाऊ देणे योग्य आहे का? मुळातच आपण जेवढे अन्न आवश्यक आहे, तेवढेच शिजविले, आणि शिजविलेल्या अन्नाचे त्वरित सेवन केले, तर हा प्रश्न उद्भविणारच नाही. त्यातून अन्न उरलेच तर ते योग्य पद्धतीने स्टोर करणे ही महत्वाचे आहे.

राज्यात ९0 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

यंदाच्या हंगामात मराठवाडा, खानदेशासह विविध ठिकाणी पावसाने पाठ फिरविल्याने राज्यातील साखर उत्पादन अंदाजापेक्षा १५ ते २0 टक्क्यांनी घटणार आहे. त्यातच हुमणी रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकताही घटणार असल्याने ९0 लाख टन साखर उत्पादन होईल, असे साखर क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
राज्यात सरासरी हेक्टरी ८८ टन ऊस उत्पादन होते. गेल्यावर्षी ते तब्बल ११६ टनांवर गेले होते. त्यामुळे विक्रमी ९५२ लाख टन ऊस गाळपातून १0७ लाख टन साखर उत्पादन झाले. या वर्षीच्या हंगामातही ९४१ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, असा अंदाज होता. त्यातून साखरेचे उत्पादन १0६ ते १0७ लाख टनादरम्यान असेल. यंदा खोडवा ऊसाचे प्रमाण ६0 टक्के असल्याने सरासरी ९0 टन प्रतिहेक्टरी ऊस उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला. तसेच यंदाच्या हंगामात ११.६२ लाख हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. सरासरीपेक्षा हे प्रमाण २.६0 लाख हेक्टरने अधिक आहे. या सर्व कारणांमुळे साखरेचे उत्पादन वाढेल असा अंदाज ऑगस्ट महिन्यात सहकार मंत्र्यांनी वर्तविला होता. शेवटच्या टप्प्यात पावसाने पाठ फिरविल्याने ऊसासह विविध पिकांच्या उत्पादकतेत मोठी घट होण्याचा अंदाज आहे.
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले, पावसाने ओढ दिल्याने मराठवाडा, खान्देश, सोलापूर आणि नगर जिल्हय़ातील स्थिती चिंताजनक आहे. या भागात एकूण उसाच्या ४0 टक्के क्षेत्र आहे. अत्यल्प पावसामुळे येथील उत्पादनात ४0 टक्के घट होईल. त्यातच पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी हुमणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादकतेत १0 टक्के घट होण्याचा अंदाज आहे. सरासरी १५ ते २0 टक्के उत्पादनात घट होईल. त्यामुळे यंदा साडेसातशे ते आठशे लाख टन ऊस गाळपातून ९0 ते ९२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल.

बाल गुन्हेगार आकडेवारी

बाल गुन्हेगारीत गुंतलेल्या मुलांच्या वयाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. अल्पवयीन असल्याची व्याख्या बदलण्यात आली आहे. आता १८ वर्षाच्या आतील मुलाऐवजी १६ वर्षाच्या आतील मुलांनाच बाल गुन्हेगार मानण्यात येणार आहे. हा बदल करण्यामागे असलेल्या कारणांची चर्चा करताना असे सांगितले गेले की देशात बाल गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे आणि ती वाढत असल्यामुळेच हा बदल करावा लागला आहे. मात्र त्याआधी खरोखरच बाल गुन्हेगारांची संख्या वाढली आहे का याचा अंदाज घेण्यात आला तेव्हा असे लक्षात आले की खरोखरच बाल गुन्हेगारांच्या संख्येमध्ये काही प्रमाणात वाढ होत आहे. या संबंधात सरकारने संसदेतच लेखी उत्तरे दिली आहेत.
देशामध्ये २0१२ साली ३१ हजार ९७३ बाल गुन्हेगार पकडण्यात आले होते. ती संख्या २0१३ साली ३५ हजार ८६१ एवढी झाली आणि २0१४ साली ती ३८ हजार ५६२ एवढी वाढली. देशातल्या गुन्हेगारांची माहिती देणार्‍या क्राईम रेकॉर्डस् ब्यूरो या संस्थेनेच ही माहिती दिली असल्याचे केंद्रिय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी लोकसभेत सांगितले. याचा अर्थ देशातली बालगुन्हेगारी वाढत आहे असा होतो. याबाबतीत मध्य प्रदेशाचा पहिला क्रमांक आहे आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल बिहार, गुजरात आणि राज्यस्थान याही राज्यातील बालगुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून आले आहे.
वाढती बालगुन्हेगारी आणि गरिबी यांचा काही संबंध आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता काही आकडे समोर आले. २0१२ साली दरवर्षी २५ हजार रुपये एवढी किंवा त्यापेक्षा कमी कमाई असणार्‍या गरीब कुटुंबातील मुले साधारण ५0 टक्के एवढय़ा गुन्ह्यांमध्ये गुंतल्याचे आढळले. म्हणजे गरीब मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणार्‍या गटातील मुलांची संख्या वरचेवर गुन्हेगारीत कमी असल्याचे दिसले आहे. गरीब मुलेच अधिक गुन्हे का करतात हा तसा फार पूवीर्पासून पडलेला प्रश्न आहे पण या प्रश्नाचे उत्तर म्हणावे तेवढे सोपे नाही. या मुलांच्या गुन्हेगारीचा यापेक्षा खोलात जाऊन अभ्यास झाला पाहिजे कारण त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे खरे कारण केवळ गरिबी हे नसून गरिबीसोबत नकळतपणे येणारा अशिक्षितपणा हे आहे. तेव्हा गुन्हेगारीचे मूळ शिक्षणात आहे आणि ती कमी करण्याचा मार्गही शिक्षणातूनच जातो. एकंदरित शिक्षणाला पर्याय नाही.

Thursday 25 October 2018

पंतप्रधान मोदींना सेऊल शांती पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. 'सेऊल पीस प्राईझ २0१८' असे या पुरस्काराचे नाव असून दक्षिण कोरियातील द सेऊल पीस प्राइझ कमिटीने (कल्चरल फाऊंडेशन) याची बुधवारी घोषणा केली.
पंतप्रधान मोदी यांची स्वदेशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याबाबत प्रयत्न, जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये भर टाकल्याबद्दल त्याचबरोबर भारतातील लोकांच्या विकासाला चालना दिल्याबद्दल मोदींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे द सेऊल पीस प्राईझ कमिटीने म्हटले आहे. एएनआयने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या हवाल्याने याबाबत ट्विट केले आहे.भ्रष्टाचाराविरोधात पावले उचलल्याने आणि समाजाच्या एकत्रीकरणाच्या प्रयत्नांद्वारे मोंदींनी भारताच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले आहेत. याचीही मोदींच्या पुरस्कार निवडीसाठी नोंद घेण्यात आली. २६ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मोदींना 'चॅम्पिअन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड' हा पर्यावरण विषयक पुरस्कार जाहीर झाला होता. मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना विभागून हा पुरस्कार देण्यात आला होता.

Wednesday 24 October 2018

दहा हजार धावांचा विराटचा विक्रम


भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विशाखापट्टणम वन डेत आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला आहे. त्याने एकदिवसाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला ओलांडला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात सर्वात जलद दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. सचिनने वन डेत 259 व्या डावात दहा हजार धावांचा पल्ला ओलांडला होता. विराट कोहलीने ती कामगिरी 204 व्या डावातच बजावली आहे. दरम्यान, विराट कोहली वन डेत वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. 29 डावांमध्ये त्याने 1574 धावा केल्या आहेत. विराटने सचिनचा 39 डावांमध्ये 1573 धावांचा विक्रम मागे टाकला
दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारे फलंदाज आणि त्यांनी खेळलेले सामने: विराट कोहली - 204 सामने सचिन तेंडुलकर 259 सामने सौरव गांगुली 263 सामने रिकी पाँटिंग 266 सामने जॅक कॅलिस 272 सामने महेंद्र सिंह धोनी - 273 सामने राहुल द्रविड - 279
10 हजारांपेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज सचिन तेंडुलकर 18426 कुमार संगकारा 14234 रिकी पाँटिंग 13704 सनथ जयसूर्या 13430 महेला जयवर्धने 12650 इंझमाम उल हक 11739 जॅक कॅलिस 11579 सौरव गांगुली 11363 राहुल द्रविड 10889 ब्रायन लारा 10405 तिलकरत्ने दिलशान 10290 महेंद्र सिंह धोनी - 10124

Saturday 20 October 2018

भारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३00 करोडपती

भारतातून दारिद्रय़ाचे उच्चाटन होण्यास अजून बराच काळ लोटावा लागणार आहे. परंतु, उच्च आर्थिक वाढीमुळे देशात कोट्यधीशांच्या संख्येत हजारोने भर पडत आहे. कोट्यधीशांच्या संख्येत भारतात यंदा ७,३00 कोट्यधीश वाढले असल्याची माहिती समोर आली आहे.
क्रेडिट स्विसच्या अहवालानुसार, २0१७-१८ मध्ये भारतामध्ये ७,३00 लोक मिलेनियर क्लबच्या यादीत सामिल झाले आहेत. या नव्या लोकांमुळे भारतामध्ये कोट्यधीशांची संख्या ३.४३ लाख झाली आहे. या करोडपतींच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती ६ ट्रिलियन डॉलर्स अर्थात ४४१ लाख कोटी रुपये आहे. २0२0 या वर्षापर्यंत देशातील करोडपतींची संख्या तब्बल ३,८२,000 वर पोहोचण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
देशातली गरिबी कमी झाली की नाही हा संशोधनाचा विषय आहे. देशातल्या करोडपतींची संख्या मात्र झपाट्याने वाढतच आहे. क्रेडिट स्विसच्या अहवालानुसार २0२३ पर्यंत भारतात करोडपतींची संख्या आणि गरीब-श्रीमंत तफावतीत फरक पडेल. अहवालात म्हटले आहे की, भेलेही भारतात संपत्तीच्या प्रमाणात वाढ झाली असेल. पण, यात प्रत्येक भारतीयाचा हिस्सा नाही. देशातील नागरिकांकडे असलेली संपत्ती अद्यापही चिंतनाचा विषय आहे. अहवालातील आकडेवारीवरून दिसते की, सुमारे ९२ टक्के लोकांकडे १0,000 डॉलरपेक्षाही कमी संपत्ती आहे. तर, दुसर्‍या बाजूला संपत्तीचा मोठा हिस्सा काही लोकांकडेच आहे. वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी क्रेडिट सुएझने दिलेल्या माहितीनुसार, भारतात २0१८ च्या मध्यापर्यंत ३ लाख ४३ हजार कोट्यधीश होते. मागील वर्षी त्यांची संख्या ७,३00 ने वाढली.
या नव्या कोट्यधीशांपैकी ३,४00 जणांकडे पाच-पाच कोटी डॉलर्स म्हणजेच ३६८-३६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे तर १५00 जणांकडे १0 कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे ७३६-७३६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. डॉलर्सच्या तुलनेत भारताच्या एकूण संपत्तीमध्ये २.६ टक्क्यांनी वाढल्यामुळे ६,000 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. २0२३ पर्यंत भारतात करोडपतींची संख्या आणि गरीब-श्रीमंत तफावतीत फरक पडेल.
भारतातील श्रीमंती आणि गरीब यांच्यातील तफावत ५३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. २0२३ पर्यंत भारतातील कोट्यधीशांच्या संखेत मोठी वाढ होणार आहे. २0२३ मध्ये भारतामध्ये ५,२६,000 लोक कोट्यधीश होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ऑनर ८ एक्स स्मार्टफोन भारतात लाँच



हुआवीचा उपब्रँड असलेल्या ऑनर स्मार्टफ ोन कंपनीने शुक्रवारी आपल्या एक्स सिरीज स्मार्टफोनच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत धमाकेदार नवीन ऑनर ८ एक्स मॉडेल बाजारात आणला आहे. गेल्या महिन्यात कंपनीने चीनमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने तीन व्हेरियंटमध्ये ऑनर ८ स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. तसेच, या स्मार्टफोनची किंमत व्हेरियंटनुसार असून या माबाईलची किंमत १४,९९९ रुपयापासून सुरू होते.
ऑक्टा-कोअर किरीन ७१0 ची शक्ती असलेल्या या स्मार्टफोनमध्ये १६.५१ सेमी फुल वू नॉच डिस्प्ले असून ९१ टक्के स्क्रीन-टू-बॉडी असा गुणोत्तर आहे. तसेच २.५ डी डबल टेक्श्‍चर अरोरा ग्लास बॉडीमुळे मोबाईलला एक वेगळा लुक आला आहे. हा स्मार्टफोन सुरुवातीला अँमेझॉन इंडिया वेबसाईटवर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. त्यानंतर या स्मार्टफोनची अधिकृत विक्री मार्केटमध्ये २४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्मार्टफोनच्या पाठीमागे प्रिमियम ग्लास फिनिशिंग देण्यात आले आहे. तर फ्रंटला नॉच डिस्प्ले आहे. तसेच, हा स्मार्टफोन ओरिओ बेस्ड इएमयूआय ८.२.0. सिस्टिमवर आधारित आहे. या स्मार्टफोनच्या रिअरमध्ये डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. या प्रायमरी कॅमेरा २0 मेगापिक्सल आणि सेकंडरी कॅमेरा २ मेगापिक्सल देण्यात आला आहे. तर फ्रंट सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल कॅमेरा आहे. याचा अपर्चर एफ /२.0 आहे. खास फोटोग्राफीसाठी एवन बेस्ड फीचर्स दिले आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये पॉवर सेविंगच्या फीचरसहित ३७५0 एमएएच बॅटरी दिली आहे. याचबरोबर, ब्लॅक, रेड आणि ब्लू कलरमध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये ऑनर ८ एक्स ६ जीबी+१२८ जीबी फोन १८,९९९ रुपये, ६ जीबी+६४ जीबी फोन १६,९९९ रुपये, तर ४ जीबी+६४ जीबी फोन १४,९९९ रुपयाला उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Thursday 18 October 2018

कारगिल विजय दिन'

२६ जुलै हा दिन 'कारगिल विजय दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी पाकिस्तानचे कंबरडे मोडून भारताने हे युद्ध निकालात काढले.
कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच र्मयादित राहिली, त्यामुळे याला र्मयादित युद्ध असे सुरुवातीला म्हटले ेगेले. पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने हे युद्धच होते असे जाहीर केले.
इ.स. १९९९च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.
कारगिलचे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते. त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. परंतु भारताने हे युद्ध कारगिलपुरतेच र्मयादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. म्हणूनच, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली. परिणामी, काही महिन्यांतच पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली. कारगिल हे पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. तेथे काश्मीरमधील इतर ठिकाणांसारखे हवामान आहे. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर ते वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६0 किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५,000 मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे, कारगीलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली. तरीही शूर भारतीय जवानांनी शौर्याची पराकाष्ठा करीत पाकला चांगलीच अद्दल घडवली. २६ जुलैला निणार्यकरीत्या हे युद्ध संपुष्टात आले.

नैसर्गिक आपत्तीमुळे भारताचे ५.८ लाख कोटींचे नुकसान

हवामान बदलामुळे मागील २0 वर्षांत आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे भारताला ५.८ लाख कोटी रुपयांचे (७९.५ अब्ज डॉलर) आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ही माहिती समोर आली आहे.
'आर्थिक नुकसान, गरिबी आणि आपत्ती: १९९८-२0१७' शीर्षकाखाली हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. हवामान बदलामुळे होणारे महत्त्वपूर्ण बदल किंवा मौसमी घटनांचे जागतिक अर्थव्यवस्थेवर पडणार्‍या प्रभावाचे यात मूल्यांकन करण्यात आले आहे.अहवालात म्हटले आहे की, १९९८ ते २0१७ दरम्यान हवामान बदलामुळे येणा?्या नैसर्गिक घटनांमुळे थेट होणार्‍या नुकसानीत १५१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. याचदरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेचे २९0८ अब्ज डॉलरचे थेट नुकसान झाले आहे. हा मागील दोन दशकात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत दुप्पट आहे.बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अहवालात म्हटले आहे की, हवामान बदलांमुळे जोखीम वाढत आहे. एकूण आर्थिक नुकसानीत मोठ्या मौसमी घटनांमुळे होणारी हानी ७७ टक्के आहे. जी २२४५ अब्ज डॉलरच्या जवळ आहे. त्याचप्रमाणे १९७८ ते १९९७ दरम्यान ८९५ अब्ज डॉलरचे थेट आर्थिक नुकसान झाले होते.यामध्ये अमेरिकेचे ९४४.८ अब्ज डॉलर, चीनचे ४९२.२ अब्ज डॉलर, जपानचे ३७६.३ अब्ज डॉलर, भारताला ७९.५ अब्ज डॉलर आणि प्युर्तो रिकोला ७१.७ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. पूर, वादळ आणि भुकंपामुळे होणारे जादा आर्थिक नुकसानीत तीन यूरोपीय देश आघाडीवर आहेत. यामध्ये फ्रान्सला ४८.३ अब्ज डॉलर, र्जमनीला ५७.९ अब्ज डॉलर आणि इटलीला ५६.६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण

जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' पुतळ्याचं काम पूर्ण झालं आहे. काम शेवटच्या टप्प्यात असून पुतळ्यावर अखेरचा हात फिरवला जात आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद््घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.
सरदार सरोवर धरणापासून खालच्या बाजूला नर्मदा नदीपासून केवळ साडेतीन किलोमीटर अंतरावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळा उभारणीसाठी तीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रस्तावित १८२ मीटर उंचीचा पुतळा लोखंड आणि तांबे यांच्या मिर्शणातून तयार करण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणापेक्षा दीडपट तर न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर २0१३ मध्ये पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. पुढील चार वर्षांत लॉर्सन अँन्ड टुब्रो या कंपनीला काम करण्यास देण्यात आले. या पुतळ्यासाठी जवळपास तीन हजार कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन अँन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती.पर्यटकांना सरदार सरोवर धरण आणि आजुबाजूचा परिसर पाहण्यासाठी ५00 फूट उंचीवर गॅलरी उभारण्यात येणार आहे.
हा पुतळा उभारण्यासाठी ३५00 कामगार आणि २५0 इंजिनिअर दिवस-रात्र मेहनत घेत होते.

मानसिक आजार

बदलती जीवनशैली, वाढती जीवघेणी स्पर्धा आणि त्यात टिकून राहण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. मुले, तरुण ते ज्येष्ठांपयर्ंत सर्वच वयोगटांतील लोक ताणतणावाला बळी पडत आहेत. दिवसेंदिवस मनोरुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मानसिक आजारी रुग्णांत नोकरदार वर्ग व महिला आघाडीवर आहेत. सवर्ंच क्षेत्रांतील नोकरदार मानसिक रोगांना बळी पडत आहेत. कमी पगार हेच केवळ आत्महत्यांचे कारण नाही, तर अतिताण हेही कारण आहे. डॉक्टरांनासुद्धा तणावाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अलीकडे डॉक्टरही आत्महत्या करायला लागले आहेत. सेल्स, मार्केटिंग, वितरण तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणार्‍या नोकरदारांना ठराविक उद्दिष्ट वेळेत गाठण्याचे दडपण असते. आरोग्याच्या तक्रारी, वरिष्ठांचे असहकार्य अशा अनेक बाबींना सामोरे जावे लागते.
मानसिक आजाराला सामोरे जावे लागणार्‍यांत नोकरदार महिलांची संख्या वाढत असून, घर आणि नोकरी यात समन्वय साधताना त्यांना तणाव व नैराश्याला तोंड द्यावे लागते. नोकरीतील अनिश्‍चितता, अपुरा पगार, टार्गेट्स पूर्ण झाली नाही तर कारवाईची चिंता, जीवनशैलीतील बदल अशी प्रमुख कारणे आहेत. या कारणांमुळे नोकरदारांचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. त्यातही उच्च शिक्षण घेऊनही मनासारखी नोकरी मिळत नसल्याने आत्महत्यांचा मार्ग अनुसरणारे अनेक तरुण आहेत. देशात उच्चशिक्षित तरुण, तरुणींमध्ये बेरोजगारीचं प्रमाण सर्वात जास्त आहे. तलाठी, कारकून किंवा पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी इंजिनिअरिंगच्या पदवीधारकांचे अर्ज येतात. दहावी-बारावीची पात्रता आवश्यक असलेल्या जागांसाठी द्विपदवीधर, पीएच.डी धारकांचे अर्ज येतात. गेल्या दोन-तीन दशकांत देशाची आर्थिक प्रगती झाली; पण त्या तुलनेत नोकर्‍यांचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. गेल्या काही वर्षांत सगळ्याच राज्यांत बेरोजगारी वाढली आहे. आतापयर्ंत दरवर्षी पगारात जेमतेम तीन टक्के वाढ होत आली आहे; पण या कामगारांचे दरमहा वेतन १0 हजार किंवा त्याहून कमी असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण हे त्यांच्यापुढील एक आव्हान आहे. त्यातूनही आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे. गेल्या तीन दशकांमध्ये र्शमिक उत्पादकता सहा पटीने वाढली; पण पगारात केवळ दीड टक्केच वाढ झाली आहे. सरकारी कर्मचारीच फक्त त्याला अपवाद असतील. महिन्याला ५0 हजार रुपयांहून अधिक पगार घेणारे नोकरदार देशात केवळ एक टक्काच आहेत. एकसमान कामासाठी महिला आणि पुरुषांच्या पगारात बरीच तफावत आहे. एकीकडे सरासरी दहा टक्के वेतनवाढ होईल, अशा बातम्या माध्यमांतून येत असताना दुसरीकडे प्रत्यक्षात इतकी वेतनवाढ होणारा वर्ग हा अतिशय अल्प असतो. वाढती महागाई आणि वेतनात न होणारी वाढ हेही नैराश्यवाढीचे एक कारण आहे. कुटुंबाच्या भल्याची चिंता असणे स्वाभाविक असले तरी त्यातूनही मार्ग काढला पाहिजे. आत्महत्या किंवा मानसिक आजार बळावू देणे योग्य नाही.

भास्करबुवा बखले

.मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक, संगीतकार भास्करबुवा बखले यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८६९ रोजी सुरतजवळील कठोर गावी झाला. बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे त्यांनी गायनकलेचा श्रीगणेशा केला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखाँ यांनी किलरेस्कर नाटक मंडळीत बखलेबुवांचे नाटकातील गाणे ऐकून आनंदाने बुवांची स्वत: शिकवणी घेतली. फैजमहंमदखाँ, नथ्थनखाँ आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. पर्शिमानंतर पुढे त्यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून लोक त्यांना देवगंधर्व म्हणू लागले.शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली वापरून भास्करबुवांनी मराठी नाट्यगीते संगीतबद्ध केली. किलरेस्कर व गंधर्व नाटक कंपन्यांत त्यांनी संगीत विषयाचे प्रमुख गुरू म्हणून काम केले. जालंधर, सियालकोट, कराची, म्हैसूर येथील मैफिली भास्करबुवांनी गाजवल्या.१९११ साली भास्करबुवांनी भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. त्यांनी व गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान व संगीत स्वयंवर नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय भास्करबुवा बखले यांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते.

महर्षी विठ्ठल रामजी

विठ्ठल रामजी शिंदे हे महाराष्ट्रातील अस्पृश्यतानिवारण कार्यातील थोर समाजसुधारक, ब्राह्मधर्म प्रचारक, संशोधक व लेखक. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील जमखंडी या संस्थानच्या गावी मराठा कुटुंबात झाला. भारतातील विविध प्रांतांत केलेल्या प्रवासात अस्पृश्य वर्गाची दुरवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घालावे, अशी प्रेरणा शिंदे यांना झाली. त्यांच्या दृष्टीने हे धर्मकार्यच होते. १९0१ च्या खानेसुमारीचा आधार घेऊन, भारतातील विविध प्रांतांतील अस्पृश्यांची लोकसंख्या एकषष्ठांश असल्याचे लेखाच्या व व्याख्यानाच्या द्वारा मांडून ह्या अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक देशी मिशन स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली, व त्याप्रमाणे न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ड्रिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना १६ ऑक्टोबर १९0६ मध्ये केली आणि स्वत: सेक्रेटरी राहून कामाला प्रारंभ केला. शतकानुशतके बहिष्कृत अवस्था लादून अस्पृश्य ठरविल्यामुळे ह्या वगार्ला प्राप्त झालेला निकृष्टपणा नाहीसा करून त्यांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनविणे, हा त्यांनी आपल्या कायार्चा एक भाग मानला; तर उच्चवर्णियांच्या मनातील अस्पृश्यताविषयक भ्रामक समजूत नष्ट करणे, हा त्या कायार्चा दुसरा भाग मानला जातो.

Monday 15 October 2018

संदीप कौर

भारताच्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. आशियाई चषकात पदकं मिळवलेले अनेक खेळाडू छोट्या भागातून आले आहेत. पण या खेळाडूंना बर्‍याच आव्हानांचा सामना करावा लागतो. ही आव्हानं सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक असतात. १६ वर्षांच्या संदीप कौरने स्वत:ला सिद्ध केलं आहे. अनेक आव्हानांना सामोरं जात ती बॉक्सर बनली आहे. 
अनेक यशस्वी अँथलिटची कहाणी संघर्षाने भरलेली असते. त्याला सामाजक, आर्थिक, शारीरिक आणि मानसिक आव्हानांना सामोरं जात पुढे यावं लागतं. या आव्हानांचा सामना केल्याने त्यांना यश मिळतंच असं नाही. पण आयुष्यात नव्या संधी निर्माण होतात. १६ वर्षांच्या संदीप कौरबद्दलही असंच म्हणता येईल. पंजाबमधल्या पटियाला जिल्ह्य़ातील हसनपूर गावातली संदीप कौर बॉक्सर आहे. संदीप कौरला सामाजिक आणि आर्थिक अशा दोन्ही स्तरांवर संघर्ष करावा लागला. तचे वडील सरदार जस्वीर सिंग रिक्षाचालक आहेत. आपल्या तुटपुंज्या कमाईत ते घराचा खर्च कसाबसा चालवायचे. आपलं कुटुंब उपाशी झोपणार नाही याची काळजी घ्यायचे. 
पंजाबमधील काही भागात पुरूषप्रधान संस्कृती नांदते. महिलांनी घरची कामं करायची, बॉक्सिंगसारखा खेळ त्यांच्यासाठी नाही असाच समज इथे प्रचलित आहे. संदीपच्या वडिलांनाही या मानसकतेला सामोरं जावं लागलं. मुलीला बॉक्सिंगला पाठवायला तिथल्या लोकांचा विरोध होता. पण या विरोधाला न जुमानता त्यांनी संदीपला पूर्ण पाठिंबा दिला. त्याची गोड फळं आता संदीप चाखते आहे. तने पोलंडमध्ये झालेल्या सिलेसयन बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. याआधी वरिष्ठ महलांच्या ४८ किलो वजनी गटात मेरी कोमने पदक पटकावलं. 
संदीपला काकांकडून बॉक्सिंगचं बाळकडू मिळालं. तिचे काका समरनजीत सिंग जवळच्या गावातल्या अकादमीत बॉक्सिंगचा सराव करायला जात असत. लहानपणी संदीपही काकांसोबत या अकादमीत जात असे. तथे तिने बर्‍याच तरूणांना बॉक्सिंग करताना पाहिलं आण या खेळातला रस वाढू लागला. तिने वयाच्या आठव्या वर्षापासून बाॅिक्संग ग्लोव्हज घालून सरावाला सुरुवात केली. संदीपला गावकर्‍यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. पण तिने कोणाचाही विरोध जुमानला नाही. आज संदीप कौरचं गावात खूपच कौतुक होत आहे. ती गावातल्या असंख्य मुलींसाठी प्रेरणास्थान बनली आहे. संदीपला बॉक्सिंगला पाठवू नये यासाठी कुटुंबावरही बराच दबाव होता. पण त्यांनीही या दबावाला भीक घातली नाही. त्यामुळे आज संदीपला हे यश मिळालं आहे. गावागावातल्या मुलींना अशाच प्रोत्साहनाची गरज आहे.

मानसिक आजार

बदलती जीवनशैली, वाढती जीवघेणी स्पर्धा आणि त्यात टिकून राहण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. मुले, तरुण ते ज्येष्ठांपयर्ंत सर्वच वयोगटांतील लोक ताणतणावाला बळी पडत आहेत. दिवसेंदिवस मनोरुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मानसिक आजारी रुग्णांत नोकरदार वर्ग व महिला आघाडीवर आहेत. सवर्ंच क्षेत्रांतील नोकरदार मानसिक रोगांना बळी पडत आहेत. कमी पगार हेच केवळ आत्महत्यांचे कारण नाही, तर अतिताण हेही कारण आहे. डॉक्टरांनासुद्धा तणावाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अलीकडे डॉक्टरही आत्महत्या करायला लागले आहेत. सेल्स, मार्केटिंग, वितरण तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणार्‍या नोकरदारांना ठराविक उद्दिष्ट वेळेत गाठण्याचे दडपण असते. आरोग्याच्या तक्रारी, वरिष्ठांचे असहकार्य अशा अनेक बाबींना सामोरे जावे लागते.
मानसिक आजाराला सामोरे जावे लागणार्‍यांत नोकरदार महिलांची संख्या वाढत असून, घर आणि नोकरी यात समन्वय साधताना त्यांना तणाव व नैराश्याला तोंड द्यावे लागते. नोकरीतील अनिश्‍चितता, अपुरा पगार, टार्गेट्स पूर्ण झाली नाही तर कारवाईची चिंता, जीवनशैलीतील बदल अशी प्रमुख कारणे आहेत. या कारणांमुळे नोकरदारांचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. त्यातही उच्च शिक्षण घेऊनही मनासारखी नोकरी मिळत नसल्याने आत्महत्यांचा मार्ग अनुसरणारे अनेक तरुण आहेत. देशात उच्चशिक्षित तरुण, तरुणींमध्ये बेरोजगारीचं प्रमाण सर्वात जास्त आहे. तलाठी, कारकून किंवा पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी इंजिनिअरिंगच्या पदवीधारकांचे अर्ज येतात. दहावी-बारावीची पात्रता आवश्यक असलेल्या जागांसाठी द्विपदवीधर, पीएच.डी धारकांचे अर्ज येतात. गेल्या दोन-तीन दशकांत देशाची आर्थिक प्रगती झाली; पण त्या तुलनेत नोकर्‍यांचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. गेल्या काही वर्षांत सगळ्याच राज्यांत बेरोजगारी वाढली आहे. आतापयर्ंत दरवर्षी पगारात जेमतेम तीन टक्के वाढ होत आली आहे; पण या कामगारांचे दरमहा वेतन १0 हजार किंवा त्याहून कमी असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण हे त्यांच्यापुढील एक आव्हान आहे. त्यातूनही आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे. गेल्या तीन दशकांमध्ये र्शमिक उत्पादकता सहा पटीने वाढली; पण पगारात केवळ दीड टक्केच वाढ झाली आहे. सरकारी कर्मचारीच फक्त त्याला अपवाद असतील. महिन्याला ५0 हजार रुपयांहून अधिक पगार घेणारे नोकरदार देशात केवळ एक टक्काच आहेत. एकसमान कामासाठी महिला आणि पुरुषांच्या पगारात बरीच तफावत आहे. एकीकडे सरासरी दहा टक्के वेतनवाढ होईल, अशा बातम्या माध्यमांतून येत असताना दुसरीकडे प्रत्यक्षात इतकी वेतनवाढ होणारा वर्ग हा अतिशय अल्प असतो. वाढती महागाई आणि वेतनात न होणारी वाढ हेही नैराश्यवाढीचे एक कारण आहे. कुटुंबाच्या भल्याची चिंता असणे स्वाभाविक असले तरी त्यातूनही मार्ग काढला पाहिजे. आत्महत्या किंवा मानसिक आजार बळावू देणे योग्य नाही.

विद्यार्थी आणि फळे

आजकाल स्पर्धा परीक्षांना बसणार्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. प्रशासकीय सेवा, त्यातून मिळणारी शाश्‍वती, सामाजिक स्थान तसेच आव्हानात्मक परीक्षा म्हणून अनेकजण या वाटेकडे वळतात. यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळेच तरूणाई मोठय़ा प्रमाणावर आकृष्ट होत आहे. मात्र, व्यापक स्वरूपाच्या स्पर्धेची जाणीव ठेवूनच या परीक्षांकडे पहायला हवं. बरेचदा विद्यार्थी शिक्षणानंतर प्रदीर्घ काळ या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी घालवतात. हा काळ त्यांच्या दृष्टीनं मानसिक ताणतणावाचा असतो. काही जण सुस्थापित करीअरवर पाणी सोडतात. स्पर्धा परीक्षांमधील यश हेच ध्येय समोर ठेवून काही वैयक्तिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. मात्र, इतकं करूनही अपेक्षित यश मिळतंच असं नाही. अशावेळी येणारं नैराश्य घातक असतं. या अपयशानं वर्तमान नव्हे तर भविष्यकाळही बाधित होतो. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यवहार्य हवा. तसे पाहता एक वर्षाचा ११ ते १२ तासाचा नियोजित अभ्यास ही परीक्षेची किमान गरज आहे. परीक्षेची पद्धती लक्षात घ्यायला हवी. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचं एक वर्ष गृहित धरावं. म्हणजे दोन वर्षांचा अभ्यास आणि एक संपूर्ण परीक्षेचा अनुभव ही यासाठी किमान पात्रता धरणं योग्य आहे. यात यश आलं तर सोन्याहून पिवळं, मात्र अपयश आलं तरी ते खिलाडुवृत्तीनं स्वीकारण्याची तयारी हवी. अपयश म्हणजे कारकिर्दीचा अंत नाही हे लक्षात ठेवून परीक्षेला सामोरे जा आणि यशस्वी व्हा.आजकाल स्पर्धा परीक्षांना बसणार्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. प्रशासकीय सेवा, त्यातून मिळणारी शाश्‍वती, सामाजिक स्थान तसेच आव्हानात्मक परीक्षा म्हणून अनेकजण या वाटेकडे वळतात. यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळेच तरूणाई मोठय़ा प्रमाणावर आकृष्ट होत आहे. मात्र, व्यापक स्वरूपाच्या स्पर्धेची जाणीव ठेवूनच या परीक्षांकडे पहायला हवं. बरेचदा विद्यार्थी शिक्षणानंतर प्रदीर्घ काळ या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी घालवतात. हा काळ त्यांच्या दृष्टीनं मानसिक ताणतणावाचा असतो. काही जण सुस्थापित करीअरवर पाणी सोडतात. स्पर्धा परीक्षांमधील यश हेच ध्येय समोर ठेवून काही वैयक्तिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. मात्र, इतकं करूनही अपेक्षित यश मिळतंच असं नाही. अशावेळी येणारं नैराश्य घातक असतं. या अपयशानं वर्तमान नव्हे तर भविष्यकाळही बाधित होतो. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यवहार्य हवा. तसे पाहता एक वर्षाचा ११ ते १२ तासाचा नियोजित अभ्यास ही परीक्षेची किमान गरज आहे. परीक्षेची पद्धती लक्षात घ्यायला हवी. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचं एक वर्ष गृहित धरावं. म्हणजे दोन वर्षांचा अभ्यास आणि एक संपूर्ण परीक्षेचा अनुभव ही यासाठी किमान पात्रता धरणं योग्य आहे. यात यश आलं तर सोन्याहून पिवळं, मात्र अपयश आलं तरी ते खिलाडुवृत्तीनं स्वीकारण्याची तयारी हवी. अपयश म्हणजे कारकिर्दीचा अंत नाही हे लक्षात ठेवून परीक्षेला सामोरे जा आणि यशस्वी व्हा.

तयारी स्पर्धा परीक्षेची

आजकाल स्पर्धा परीक्षांना बसणार्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. प्रशासकीय सेवा, त्यातून मिळणारी शाश्‍वती, सामाजिक स्थान तसेच आव्हानात्मक परीक्षा म्हणून अनेकजण या वाटेकडे वळतात. यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळेच तरूणाई मोठय़ा प्रमाणावर आकृष्ट होत आहे. मात्र, व्यापक स्वरूपाच्या स्पर्धेची जाणीव ठेवूनच या परीक्षांकडे पहायला हवं. बरेचदा विद्यार्थी शिक्षणानंतर प्रदीर्घ काळ या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी घालवतात. हा काळ त्यांच्या दृष्टीनं मानसिक ताणतणावाचा असतो. काही जण सुस्थापित करीअरवर पाणी सोडतात. स्पर्धा परीक्षांमधील यश हेच ध्येय समोर ठेवून काही वैयक्तिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. मात्र, इतकं करूनही अपेक्षित यश मिळतंच असं नाही. अशावेळी येणारं नैराश्य घातक असतं. या अपयशानं वर्तमान नव्हे तर भविष्यकाळही बाधित होतो. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यवहार्य हवा. तसे पाहता एक वर्षाचा ११ ते १२ तासाचा नियोजित अभ्यास ही परीक्षेची किमान गरज आहे. परीक्षेची पद्धती लक्षात घ्यायला हवी. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचं एक वर्ष गृहित धरावं. म्हणजे दोन वर्षांचा अभ्यास आणि एक संपूर्ण परीक्षेचा अनुभव ही यासाठी किमान पात्रता धरणं योग्य आहे. यात यश आलं तर सोन्याहून पिवळं, मात्र अपयश आलं तरी ते खिलाडुवृत्तीनं स्वीकारण्याची तयारी हवी. अपयश म्हणजे कारकिर्दीचा अंत नाही हे लक्षात ठेवून परीक्षेला सामोरे जा आणि यशस्वी व्हा.आजकाल स्पर्धा परीक्षांना बसणार्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. प्रशासकीय सेवा, त्यातून मिळणारी शाश्‍वती, सामाजिक स्थान तसेच आव्हानात्मक परीक्षा म्हणून अनेकजण या वाटेकडे वळतात. यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळेच तरूणाई मोठय़ा प्रमाणावर आकृष्ट होत आहे. मात्र, व्यापक स्वरूपाच्या स्पर्धेची जाणीव ठेवूनच या परीक्षांकडे पहायला हवं. बरेचदा विद्यार्थी शिक्षणानंतर प्रदीर्घ काळ या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी घालवतात. हा काळ त्यांच्या दृष्टीनं मानसिक ताणतणावाचा असतो. काही जण सुस्थापित करीअरवर पाणी सोडतात. स्पर्धा परीक्षांमधील यश हेच ध्येय समोर ठेवून काही वैयक्तिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. मात्र, इतकं करूनही अपेक्षित यश मिळतंच असं नाही. अशावेळी येणारं नैराश्य घातक असतं. या अपयशानं वर्तमान नव्हे तर भविष्यकाळही बाधित होतो. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यवहार्य हवा. तसे पाहता एक वर्षाचा ११ ते १२ तासाचा नियोजित अभ्यास ही परीक्षेची किमान गरज आहे. परीक्षेची पद्धती लक्षात घ्यायला हवी. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचं एक वर्ष गृहित धरावं. म्हणजे दोन वर्षांचा अभ्यास आणि एक संपूर्ण परीक्षेचा अनुभव ही यासाठी किमान पात्रता धरणं योग्य आहे. यात यश आलं तर सोन्याहून पिवळं, मात्र अपयश आलं तरी ते खिलाडुवृत्तीनं स्वीकारण्याची तयारी हवी. अपयश म्हणजे कारकिर्दीचा अंत नाही हे लक्षात ठेवून परीक्षेला सामोरे जा आणि यशस्वी व्हा.

दैनंदिन 70 "इंग्रजी सुविचार " मराठी अर्थासहीत.

*1. Knowledge is power.* (ज्ञान ही खरी शक्ती आहे.)
*2. Work is worship.* (कर्म हीच पूजा आहे.)
*3. Health is wealth.* (चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.)
*4. Time is money.* (वेळ मूल्यवान आहे,त्याचा योग्य वापर करा.)
*5. Haste makes waste.* (घाईने कामात चुका होतात.)
*6. Character is destiny.* (माणसाचे भवितव्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते.)
*7. Exuberance is Beauty.* (चेहऱ्यावरील उत्साह/प्रसन्नता ही खरी सुंदरता होय.)
*8. Practice makes man perfect.* (सरावाने मनुष्यास कुशलता प्राप्त होते.)
*9. Confidence is a key to success.* (आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे.)
*10. Sound mind in sound body.* (निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते.)
*11. Experience is the best teacher.* (अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे.)
*12. Never have a resistance to change.* (चांगल्या बदलाला कधीही नाकारू नये.)
*13. No pains, no gains.* (त्रास सहन केल्याशिवाय काहीही मिळत नाही.)
*14. Hope is walking dream.* (आशा हे जागेपणीचे स्वप्न आहे.)
*15. Charity begins at home.* (सेवाभाव/परोपकाराची सुरुवात घरापासून होते.)
*16. Fortune favours the brave.* (धाडसी लोकांना नशीबही साथ देते./चालणाऱ्याचे नशीबही चालते.)
*17. Well beginning is the half done.* (चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे.)
*18. Positive attitude creates positive peoples.* (सकारात्मक विचार सकारात्मक लोकांची/समाजाची निर्मिती करते.)
*19. Good things happens to good peoples.* (चागल्या लोकांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात.)
*20. To teach is to learn twice.* (दुसऱ्याला एखादी गोष्ट समजून सांगणे हे ती गोष्ट दोनदा शिकण्यासारखे आहे.)
*21. No wisdoms like silence.* (शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कोणतेही नाही.)
*22. Difficulty is a severe instructor.* (आलेली समस्या खूप चांगली प्रशिक्षक असते./आलेली समस्या खूप सारे शिकवून जाते.)
*23. Good luck never comes late.* (चांगले नशीब कधीच उशीरा येत नाही.)
*24. Delay in justice is injustice.* (उशीरा दिलेला न्याय हा अन्यायासारखाच असतो.)
*25. Actions speaks louder than words.* (कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते.)
*26. Progress is the law of life.* (पुढे चालत राहणे हाच जीवनाचा नियम आहे./चलना जीनेका नाम है।)
*27. A good deed is never lost.* (चांगले कार्य कधीच वाया/विसरले जात नाही.)
*28. Failure is the first step of success.* (अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.)
*29. More you struggle, more you become strong.* (तुम्ही जेवढा अधीक संघर्ष करता, तेवढे तुम्ही अधीक मजबूत/कनखर बनता.)
*30. Every man is the creature of his own fortune.* (प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या भाग्याचा निर्माता आहे.)
*31. Good handwriting is the mirror of good learning.* (चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे.)
*32. Slow but steady can win the race.* (हळूवार पण सातत्याने तुम्ही प्रगती केली तर तुम्ही जिंकू शकता.)
*33. A friend in neef is a friend indeed.* (गरजेच्या वेळी जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र.)
*34. Where there is  will there is way.* (ईच्छा असेल तिथे मार्ग असतो.)
*35. Change your thought and you will change your world.* (तुमचे विचार बदलवा आणि तुमचे जग आपोआप बदलेल.)
*36. A journey of thousand miles begins with a first step.* (हजारो मैलांचा प्रवास पहीले पाऊल पुढे टाकल्यानेच सुरू होतो.)
*37. He that burns most, shines most.* (जो जास्त जळतो, तोच जास्त चमकतो.)
*38. Patience is a plaster for all sores.* (संयम/सबुरी हा सर्व दुःखावरील इलाज आहे.)
*39. He who makes no mistakes makes nothing.* (जे कधीच चुकत नाही ते सहसा काहीच करत नाही.)
*40. The pen is mightier than sword.* (लेखनी ही तलवारी पेक्षा श्रेष्ठ आहे.)
*41. He who moves not forward goes backward.* (जे पुढे जात नाही ते मागे ढकलले जातात.)
*42. If you act to be happy, you will be happy.* (जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.)
*43. A positive attitude can overcome a negative situation.* (सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकते.)
*44. The roots of education are bitter but the fruit is sweet.* (शिक्षणाची मुळे कडू असली तरी फळ गोड असते.)
*45. Hard times are the moments of reflection.* (कठीण परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य/चिकाटी दाखवण्याची खरी वेळ आहे.)
*46. Your best teacher is your last mistake.* (तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे.)
*47. I listened and I forgot, I watched and I remembered, I do and I understand.* (मी ऐकलो आणि विसरलो, मी पाहीले आणि माझ्या लक्षात राहले, मी करून पाहले आणी मला समजले.)
*48. Every success has a trails of failure behind it.* (प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी शृंखला असते.)
*49. Be concern with action only not with its result.* (आपले कार्य करत रहा त्याच्या फळाचा विचार करू नका.)
*50. Every day may not be good but there is something in every day.* (प्रत्येक दिवस चांगला असेलच असे नाही परंतु प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असतेच.)
*51. The only time you fail is when you fall down and stay there.* (तुम्ही फक्त त्याच वेळी हरता जेव्हा तुम्ही खाली पडता आणि तिथेच थाबता.)
*52. Hope is the affirmation of positive thought.* (आशावाद हा सकारात्मक विचाराचे प्रतिक आहे.)
*53. The life without goal is life without meaning.* (ध्येयाविणा जीवन निरर्थक आहे.)
*54. It's not how long, but how well, we live.* (किती काळ जगला यापेक्षा किती चांगले जगलात याला महत्त्व आहे.)
*55. The darkest hour is before the dawn.* (कुट्ट अंधाराची वेळ सुर्योदया पुर्विची असते./अपयशाच्या कुट्ट अंधारानंतर यशाची पहाट होते.)
*56. The brave die once, cowards many times.* (शूर लोक एकदाच मरतात, भ्याड लोक प्रत्येक क्षणी मरत जगतात.)
*57. The great artist is simplifier.* (महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो.)
*58. It is not work that kills but worry.* (कामापेक्षा कामाच्या चिंतेनेच माणूस जास्त मरतो.)
*59. None but the brave deserves the fair.* (शूर लोकच न्याय मिळवण्यास पात्र ठरतात.)
*60. Desire is the very essence of man.* (अभिलाषा/ईच्छा हाच मनुष्य जीवनाचा सार/तत्वगुण आहे.)
*61. Hearing brings wisdom, speaking repentance.* (ऐकल्यामुळे ज्ञान/बुद्धीमत्ता मिळते, बोलण्यामुळे पश्चाताप.)
*62. Prayer is the voice of faith.* (प्रार्थना ही श्रद्धेचा आवाज आहे./प्रार्थना म्हणजे आत्म्याचा  आवाज.)
*63. Whatever you cannot understand, you cannot possess.* (जो आप समझ नहीं सकते, वो आप कभी हासिल नहीं कर सकते.)
*64. United we stand, divided we fall.* (एकत्र असल्यास आपण प्रतिकार करू शकतो, वेगळे झाल्यास आपण नमविले जातो.)
*65. Character is simply a habit long continued.* (तुमच्या दीर्घ/चालत आलेल्या सवयींतून तुमचे चारित्र्य घडते.)
*66. True wealth is celebrating the present moment.* (आत्ताची वेळ साजरी करता येणे ही खरी संपत्ती आहे./आनंदी मन हा माणसाचा खरा खजिना आहे.)
*67. Imperfect action is better than perfect inaction.* (परिपक्व निष्क्रियतेपेक्षा, अपरिपक्व कृती कधीही चांगली./मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण चांगले.)
*68. Instead of cursing the darkness, be the one to light a candle.* (परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्या.)
*69. Happines is found in your heart, not in your circumstances.* (आनंद हा तुमच्या मनात असतो, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टीत/सभोवतालच्या परिस्थितीत नसतो.)
*70. You only lose when you give up.* (तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडून देता.)

Sunday 14 October 2018

आर्थिक संकटाची चाहूल


चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 8.2 टक्के नोंदला गेला. त्यामुळे देशाची वाटचाल जोमाने होणार अशी आशा वाढली. मात्र रुपयाची घसरण, चालू खात्यावरील वाढती तूट आणि जागतिक घडामोडी यांचा परिणाम तीव्र होण्याची चिन्हे आहेत. ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनाच्या विकासाचा दर 4.3 टक्क्यांवर आला आणि महागाईवाढीचा दर 3.77 टक्के झाला आहे. एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) 3.3 टक्के आर्थिक तूट ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य कसे होणार ही चिंता आहे. निर्यातीत, जीएसटीत घट सरकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे काही योजना आहे असे वाटत नाही. आयात वाढत आहे आणि निर्यात घटत आहे ही भारताची आजचे स्थिती आहे. एप्रिल-जून या तिमाहीत चालू खात्यावरील तूट जीडीपीच्या 2.4 टक्के झाली. जुलैमध्ये निर्यात वाढून 25 अब्ज 77 कोटी डॉलर्स झाली असली तरी आयात 43 अब्ज 79 कोटी डॉलर्सची झाली. ही तफावत मोठी आहे. चालू आर्थिक वर्ष संपताना चालू खात्यावरील तूट 2.8 टक्के होण्याचा अंदाज आहे. खनिज तेलाची आयात हा देशाचा मोठा खर्च आहे आणि तो भरून काढण्यासाठी निर्यात वाढत नाही ही काळजीची बाब आहे. अनेक करांची जागा घेणारा वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंमलात आल्याने त्यावर सरकारचे उत्पन्न मुख्यत: अवलंबून आहे. एप्रिलमध्ये 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी जमा झाला; पण नंतर सतत त्यात घट होत आहे. ऑगस्टमध्ये ती रक्कम 93 हजार 690 कोटी रुपयांपर्यंत घसरली होती, सप्टेंबरमध्ये त्यात किंचित सुधारणा होऊन ती 94 हजार 442 कोटी रुपयांवर गेली; पण यामध्ये राज्यांचाही वाटा असतो. अंदाजपत्रकातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी केंद्राला दरमहा किमान 1 लाख कोटी मिळणे गरजेचे आहे. परंतु वाढत्या महागाईने नागरिकांची क्रयशक्ती कमी झाली आहे हे सत्य आहे. पेट्रोल-डीझेल व स्वयंपाकाचा तसेच वाहनांच्या गॅसच्या दरात सतत वाढ होत आहे. गेल्या बारा महिन्यांत रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत13 टक्क्यांनी घटली आहे. खनिज तेलासाठी देशाला त्यामुळे जास्त पैसा मोजावा लागत आहे. भारतीय वस्तूंच्या किंमतीही त्यामुळे कमी झाल्या असल्या तरी जगातून त्यास मागणी का येत नाही? याचा विचार करून त्यावर उपाय योजण्यास सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार चालू व पुढच्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर 3.7 टक्के असेल. नाणेनिधीचा आधीचा अंदाज 3.9 टक्के होता. भारत आता जगापासून अलिप्त नाही. जागतिक वाढ मंदावली तर तिचा परिणाम भारतावरही होणारच; परंतु आताचे सरकार त्याचा विचार करणार नाही. कारण लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे देशाच्या दीर्घकालीन लाभाचा विचार न करता राजकीय लाभाची गणिते मांडली जातील. आर्थिक संकटाची चाहूल यामुळे गडद होते.



Saturday 13 October 2018

धम्मचक्र प्रवर्तन दिन

धम्मचक्र प्रवर्तन दिन (धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन) हा भारतीय बौद्धांचा प्रसिद्ध व सर्वात प्रमुख सण आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ५ लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी अशोक विजयी दशमी (दसरा) व १४ ऑक्टोबर रोजी देशभरासह जगभरातून लक्षावधी बौद्ध अनुयायी एकत्र येऊन दीक्षाभूमी येथे हा सण साजरा करतात. इ.स.पू. तिसर्‍या शतकात सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तेव्हा पासून हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून बौद्ध अनुयायी साजरा करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी १४ आक्टोबर १९५६ रोजी नागपुरमध्ये आपल्या ५,00,000 अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता. ती पवित्र भूमी आज दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते. हे वर्ष बुद्धाब्ध (बौद्ध वर्ष) २५00 होते. या दिवशी अनेक देशांतून आणि भारताच्या प्रत्येक राज्यांतून बौद्ध अनुयायी दरवर्षी दीक्षाभूमी, नागपुर येथे येऊन धम्मचक्र प्रवर्तन दिवस हा उत्सव साजरा करतात.

लोहगड

पुणे जिल्हय़ातील लोहगड हा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्णकिल्ला असून ब्रिटीश सरकरने या किल्ल्याला २६ मे १९0९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गाची एक जोडगोळी उभी आहे. त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड. लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते. पलीकडेच तिकोना ऊर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे. तुंग ऊर्फ कठीणगडही येथेच आहे. अंदरमावळ आणि पवनमावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे.
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. सातशे वर्षापूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असा अंदाज निघतो. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्‍हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. १६३0 मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड-विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला.
१६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७0 मध्ये मराठय़ांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सूरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. १७१३मध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांना दिला. १७२0 मध्ये आंग्रेंकडून तो पेशव्यांकडे आला. १७७0 मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधून घेतली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८00 मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८0२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८0३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
गडावर चढतांना सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सपार्कार मार्गावरून जावे लागते. (१) गणेश दरवाजा : हय़ाच्याच डाव्या-उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहेत. (२) नारायण दरवाजा : हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई. (३) हनुमान दरवाजा : हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. (४) महादरवाजा : हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९0 ते ११ जून १७९४ या कालावधीत केले. महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गालागतो. दग्र्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्न अवशेष आढळतात. याच दग्र्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याची घाणी आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथर्‍यात बसवली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी लागते. या कोठीत राहाण्याची सोय होते. कोठीत अनेक खोल्या आहेत. दग्र्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. तेथे एक शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळे सोळाकोनी आहे. मोठा तळ्याच्या पुढे विंचूकाटाकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्‍चिमेस विंचूकाटा आहे. हा विंचूकाटा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचूकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. लोहगडावरच्या इमारती पडलेल्या आहेत. १00 लोक झोपू शकतील एवढी एक गुहासुद्धा गडावर आहे. लोहगडाचे उत्तरेकडचे टोक निमुळते होत गेले आहे.


मुलांची गोष्ट

मुक्तीचा मार्ग
एकदा एका राजाला त्याच्या राजपुरोहिताने सांगितले की, श्रीमद्भागवताचे पूर्ण पारायण केले तर त्याच्या र्शवणाने त्याला मुक्ती मिळेल. आपल्यालाही मुक्ती मिळावी अशी राजाची इच्छा होती. त्याला हा मार्ग फारच सोपा वाटला, त्याने पारायण करविले. पारायण पूर्ण झाल्यावर स्वत: मुक्त करण्यास त्याने राजपुरोहितांना सांगितले. राजपुरोहिताची गाळण उडाली, राजाला मुक्ती कशी मिळवून द्यावी, त्याने यासाठी आठ दिवसांची मुदत मागून घेतली. त्याच्या मुलीने त्याला काळजीचे कारण विचारले, कारण ऐकून ती म्हणाली, ठीक आहे राजाच्या या मुक्तीच्या प्रश्नाचे उत्तर मी देईन. आठव्या दिवशी राजपुरोहित आपल्या मुलीबरोबर दरबारात गेले. पुरोहितकन्येने राजाला बागेत येण्याची विनंती केली. बागेत गेल्यावर तिने दोघांनाही वेगवेगळ्या झाडांना बांधले. झाडाला बांधलेल्या तिच्या वडीलांना मोकळे करण्याची विनंती तिने राजाला केली. याने राजा रागावला, चिडला व तो म्हणाला, मी स्वत:च बांधलो गेलो आहे मी काय राजपुरोहिताना मोकळे करणार. राजाचे उत्तर ऐकताच मुलगी म्हणाली, महाराज, अशाच प्रकारे प्रत्येक जीव हा कर्मबंधनाने बांधला गेला आहे. ते दुसर्‍यांना काय मुक्त करणार, प्रत्येक मनुष्य आपल्या कर्माचा हिशोब करण्यात गुंतलेला असतो मग खर्‍या अर्थाने मुक्त होण्यासाठी सद्गुरुच वाट दाखवू शकतात.

वडिलांची पुण्याई
पंडित रामप्रसाद गरीब होते. परंतु आतिथ्य करण्यात अग्रेसर होते. पंडितजींची कमाई स्वत:वर कमी आणि दुसर्‍यावर जास्त खर्च होत होती. एकदा पंडितजींच्या घरी काही पाहुणे आले. जेवणानंतर त्या लोकांनी पंडितजींना संध्याकाळच्या गाडीची तिकिटे काढण्यास सांगितले. त्यादिवशी पंडितजींकडे काहीच पैसे नव्हते. याबाबत पाहुण्यांकडे ते काहीच बोलले नाही. त्यांनी आपल्या मित्राकडे चौकशी केली पण हाती काहीच लागले नाही. ते चिंतेत बसले होते. इतक्यात खेडवळ वाटणारा वयस्कर माणूस त्यांच्याकडे आला व म्हणाला, ''रामप्रसाद पंडीत आपणच का?'' रामप्रसाद होय म्हणाले असता, वयस्कर माणसाने त्यांना त्यांच्या वडिलांचे नाव हरिप्रसाद होते का असे विचारले. रामप्रसाद हो म्हणताच त्या माणसाचे डोळे भरून आले व तो म्हणाला. ''बेटा, २0 वर्षापूर्वी तुझे वडील आणि मी एकत्र प्रवास करत होतो. त्यावेळी माझा खिसा कोणीतरी कापला व माझे पैसे लांबविले. त्यावेळी तुझ्या वडिलांनी मला पैसे दिले होते ते परत करण्यास मी आलो आहे. त्यावेळी त्यांनी जर मला मदत केली नसती तर आजचा दिवस मी पाहूच शकलो नसतो. त्यानंतर मी गावी गेलो, पै-पै साठवून त्यांचे पैसे एकत्र केले पण त्यांच्या निधनाची वार्ता मला समजली म्हणून तेव्हा जमले नाही तर आज स्वत: ते पैसे परत करण्यास मी आलो आहे.'' असे म्हणून त्याने ते पैसे पंडितजींना दिले व एकही क्षण न थांबता तो माणूस निघून गेला. पंडीतजींनी त्या पैशातून पाहुण्यांची व्यवस्था केली व ईश्‍वराचे आभार मानले.
तात्पर्य : परोपकारी वृत्ती माणसाच्या कामी येते. कधी काळी उपयोगी केलेले उपकारसुद्धा या ना त्या रूपाने परतफेड करण्यासाठी कोणी ना तयार होऊन आपले कामी येतो.

इच्छांना अंत नसतो
एक राजा प्रजेच्या सुखसुविधेकडे लक्ष द्यायचा. तरीही प्रजेकडून दर दिवसाला नवीन मागणी यायची. प्रजेला संतुष्ट ठेवण्यासाठी राजा रात्रंदिवस झटत होता. परंतु प्रजेच्या इच्छेला अंत नव्हता. अखेरीस राजा आजारी पडला. कारण तो दु:खी कष्टी राहत होता. काय केल्याने प्रजा सुखी राहील याचा तो विचार सातत्याने करत असे. अनेक वैद्यांनी राजाच्या प्रकृतीची तपासणी केली. राजावर उत्तमात उत्तम उपचार करण्यात आले, औषधपाणी करण्यात आले. परंतु, फायदा होत नव्हता. कारण राजाचे दुखणे हे मानसिक स्वरुपाचे होते. योगायोगाने एके दिवशी हिमालयातील साधू त्याच्याकडे आले. राजाने त्यांना आपली व्यथा सांगितली. राजा म्हणाला, महाराज तुम्ही परमज्ञानी आहात, माझ्यावरील संकट दूर करा. साधूंना सर्व परिस्थिती माहिती होती. राजाला शारीरिक नव्हे तर मानसिक आजार होता. तो दूर करण्याची गरज होती. त्यांनी राजाला समजावले, तुझी विचार करण्याची पद्धतच तुझी व्यथा बनली आहे. तू प्रजेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आटापिटा करतो आहेस, पण तू हे विसरतोस की, मन हे चंचल असते. मनात विविध प्रकारच्या इच्छा उत्पन्न होतच राहतात. त्यामुळे तुझी प्रजा काही ना काही इच्छा व्यक्त करणारच, तू त्यांना जितके देत जाशील तितके त्यांचा हव्यास वाढत जाईल. मनाच्या संतुष्टीला सीमा नसते. सुख इच्छेची नियंत्रित पूर्ती करण्यामध्ये आहे. तेव्हा इच्छा नियंत्रणात ठेवण्याची गरज असते. तीच सवय जनतेला लावली पाहिजे. यामुळे तू स्वत:चे मानसिक स्वास्थ्य हरवून बसला आहेस. राजाला आपली चूक लक्षात आली.
तात्पर्य : इच्छा या अमरवेलीसारख्या असतात. त्या अर्मयाद असतात, पहिली इच्छा किंवा शंभरावी इच्छा ही अर्मयादच असते, तिला मरण नाही फक्त र्मयादित ठेवणे किंवा नियंत्रण ठेवणे हेच आपल्या हातात आहे.

व्याकरणकार तर्खडकर

अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर (९ मे १८१४-१७ ऑक्टोबर १८८२) यांचा जन्म मुंबईत झाला. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खासगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. गुजराती व फारसी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते. संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्र™ोने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. हय़ा व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहिले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. त्यातून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. हय़ा टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यापैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाड्मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्र महत्त्वाचे आहे. याशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक (१८३६), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६0), धर्मविवेचन (१८६८), पारमहंसिक ब्राह्मधर्म (१८८0) आणि शिशुबोध (१८८४) अशी त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे सर्मथन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला 'विधवार्शुमार्जन' हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी हय़ांच्या यमुनापर्यटन या कादंबरीत अंतभरूत करण्यात आला होता. मुंबई येथे त्यांचे निधन झाले. सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक थॉमस अल्वा एडिसन (११ फेब्रुवारी १८४७ - १८ ऑक्टोबर १९३१) म्हणजे अनेक नव्या विद्युत, प्रकाश व ध्वनी उपकरणांचे जनक. त्यांचा जन्म मिलान, ओहायओ येथे झाला. त्यांचे शिक्षण मिशिगनमधील पोर्ट ह्यूरन येथील शाळेत केवळ तीन महिनेच झाले होते. वयाच्या बाराव्या वर्षापासून रेल्वेत संदेशवाहकाचे व त्यानंतर पंधराव्या वर्षापासून निरनिराळ्या शहरांत तारायंत्रावर काम करून त्यांनी आपला चरितार्थ चालविला. फावल्या वेळात ते अभ्यासात व प्रयोगकार्यात निमग्न असत. मत नोंदविणार्‍या त्यांच्या विद्युत यंत्राकरिता १८६८ मध्ये त्यांना पहिले पेटंट मिळाले. त्यानंतरच्या काही वर्षांत त्यांनी एकाच तारेवर दोन वा अनेक संदेश एकाच वेळी वाहू शकणार्‍या व स्वंयचलित तारायांत्रिक पद्धतीचा तसेच टंकलिखाणाच्या आवृत्त्या काढण्याकरिता विद्युत लेखणीचा (याचाच पुढे 'मिमिओग्राफ' या स्वरूपात विकास झाला) शोध लावला. कार्बन प्रेषकाचा (ध्वनितरंगांचे विद्युत प्रवाहात रूपांतर करणार्‍या साधनाचा) शोध लावून (१८७७-७८) ग्रॅहॅम बेल यांचा दूरध्वनी व्यवहारोपयोगी करण्यास त्यांनी मदत केली. एडिसन यांचा सर्वपरिचित व सर्वांत मूळचा शोध फोनोग्राफचा होय (१८७७). त्यांचा मूळचा नमुना हाताने फिरवावयाच्या टीनच्या पत्र्याच्या वृत्तचितीचा (नळकांड्याच्या आकाराचा) होता. दहा वर्षानंतर त्यांनी मोटरने चालणारा व मेणाची वृत्तचितीकार तबकडी उपयोगात आणणारा फोनोग्राफ तयार केला. त्यानंतर त्यांनी, सांगितलेला मजकूर लिहून घेण्यास मदत करणारे 'एडिफोन' या कचेर्‍यांच्या कामकाजास उपयुक्त असलेल्या उपकरणाचा शोध लावला. व्यवहारोपयोगी विजेचा उद्दीप्त (तापलेल्या तंतूपासून प्रकाश देणारा) दिवा तयार करण्यासाठी त्यांनी केलेले अनेक प्रयोग निष्फळ ठरले व त्यांकरिता त्यांना ४0,000 डॉलरपेक्षाही जास्त खर्च सोसावा लागला. परंतु, अखेरीस २१ ऑक्टोबर १८७९ रोजी काचेच्या निर्वात फुग्यात ठेवलेल्या कार्बनयुक्त कापसाच्या धाग्याचा उद्दीप्त दिवा तयार करण्यात त्यांना यश आले. नंतरच्या दहा वर्षांत त्यांनी विजेद्वारे प्रकाश, उष्णता व शक्ती यांच्या निर्मितीसाठी व वितरणासाठी तीन तारांच्या पद्धतीचा शोध लावला. विद्युत जनित्र (डायनामो) व मोटर यांत सुधारणा केल्या आणि विद्युत रेल्वेच्या विकासास मदत केली. १८९१-१९00 या काळात त्यांनी प्रामुख्याने लोह खनिजांची सांद्रता (दिलेल्या घनफळात असणारे खनिजाचे प्रमाण) चुंबकीय पद्धतीने वाढविण्यासंबंधी संशोधन केले. त्यानंतर त्यांनी शिशाच्या संचायक विद्युत् घटापेक्षा (विद्युत भार साठवून ठेवणार्‍या घटापेक्षा) बराच हलका असा एक नवीन प्रकारचा निकेल हायड्रेट , आयर्न ऑक्साईड व पोटॅशियम हायड्रॉक्साईड उपयोगात आणणारा संचायक विद्युत घट तयार केला. १८९१ मध्ये त्यांनी प्राथमिक स्वरूपाच्या चलचित्रपट कॅमेर्‍याचे (किनेटोस्कोपिक कॅमेरा) व नंतर चलचित्रपट पडद्यावर दाखविणार्‍या प्रक्षेपकाच्या पेटंटसाठी अर्ज केला. उद्दीप्त दिव्याच्या गोलकामध्ये एक धन विद्युत भारित धातूची पट्टी बसविल्यास दिव्यातील तप्त तंतूपासूनधातूच्या पत्र्याकडे विद्युत प्रवाह वाहतो असा त्यांनी १८८३ मध्ये शोध लावला. ते ऑरेंज येथे मृत्यू पावले.

भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम

भारतीय शास्त्रज्ञ आणि अकरावे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१५ ऑक्टोबर १९३१ - २७ जुलै २0१५) हे आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एससी. झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वत:चे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी संबंध आला. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील 'सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल'च्या संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्यावेळी डॉ. कलाम पुन्हा 'डीआरडीओ'मध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने पद्मभूषण, पद्यविभूषण व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. ते अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक पर्शिमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील २0 वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत. विविध पुस्तकांचे स्वतंत्र किंवा सहलेखन केले. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय. आय. एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै २0१५ रोजी अखेरचा श्‍वास घेतला. कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.
भारतीय शास्त्रज्ञ आणि अकरावे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१५ ऑक्टोबर १९३१ - २७ जुलै २0१५) हे आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एससी. झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वत:चे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी संबंध आला. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील 'सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल'च्या संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्यावेळी डॉ. कलाम पुन्हा 'डीआरडीओ'मध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने पद्मभूषण, पद्यविभूषण व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. ते अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक पर्शिमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील २0 वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत. विविध पुस्तकांचे स्वतंत्र किंवा सहलेखन केले. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय. आय. एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै २0१५ रोजी अखेरचा श्‍वास घेतला. कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे. त्यांचा जन्मदिवस राज्यात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

Thursday 11 October 2018

राममनोहर लोहिया

समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांचा जन्म २३ मार्च १९१0 रोजी उत्तरप्रदेशातील अकबरपूर येथे झाला. अडीच वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे वडील महात्मा गांधींचे अनुयायी होते. मुंबईच्या मारवाई शाळेत त्यांचे शिक्षण झाले. १९२0 मध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या दिवशी विद्यार्थ्यांसोबत पहिल्यांदा आंदोलन केले. गांधींच्या आवाहनानुसार त्यांनी दहा वर्षांचे असताना शाळा सोडून दिली. १९२१ मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांची भेट जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत झाली. १९२४ मध्ये ते प्रतिनिधी म्हणून काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झालेत. १९२५ मध्ये त्यांनी दहावीची परीक्षा दिली यात त्यांनी ६१ टक्के गुण मिळवले. यानंतर वाराणशीच्या काशी विद्यापीठात शिकायला गेले. पुढे कोलकाता येथे शिक्षण घेतले. अखिल बंग विद्यार्थी संमेलनात नेताजी सुभाषचंद्र बोस न पोहोचल्यामुळे त्यांच्याकडे संमेलनाचे अध्यक्षपद देण्यात आले. १९२८ मध्ये ते काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाले. नंतर ते विद्यार्थी संघटनेत सक्रीय झाले. सायमन कमिशन विरोधातील आंदोलनात त्यांनी भाग घेतला. पुढे १९३0मध्ये अग्रवाल समाजाच्या मदतीने शिक्षणासाठी इंग्लंडला व बर्लिनला गेले. भगत सिंग यांना फाशी देण्याचा त्यांनी लीग आँफ नेशन्सच्या बैठकीत निषेध केला.१७ मे१९३४ रोजी त्यांनी समाजवादी पार्टीच्या स्थापनेचा निर्णय घेतला. २२ आँक्टोबर १९३४ रोजी मुंबईत काँग्रेस सोशलिस्ट पक्षाची स्थापना केली.

नैसर्गिक आपत्तीमुळे भारताचे ५.८ लाख कोटींचे नुकसान

हवामान बदलामुळे मागील २0 वर्षांत आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे भारताला ५.८ लाख कोटी रुपयांचे (७९.५ अब्ज डॉलर) आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ही माहिती समोर आली आहे.
'आर्थिक नुकसान, गरिबी आणि आपत्ती: १९९८-२0१७' शीर्षकाखाली हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. हवामान बदलामुळे होणारे महत्त्वपूर्ण बदल किंवा मौसमी घटनांचे जागतिक अर्थव्यवस्थेवर पडणार्‍या प्रभावाचे यात मूल्यांकन करण्यात आले आहे.अहवालात म्हटले आहे की, १९९८ ते २0१७ दरम्यान हवामान बदलामुळे येणा?्या नैसर्गिक घटनांमुळे थेट होणार्‍या नुकसानीत १५१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. याचदरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेचे २९0८ अब्ज डॉलरचे थेट नुकसान झाले आहे. हा मागील दोन दशकात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत दुप्पट आहे.बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अहवालात म्हटले आहे की, हवामान बदलांमुळे जोखीम वाढत आहे. एकूण आर्थिक नुकसानीत मोठ्या मौसमी घटनांमुळे होणारी हानी ७७ टक्के आहे. जी २२४५ अब्ज डॉलरच्या जवळ आहे. त्याचप्रमाणे १९७८ ते १९९७ दरम्यान ८९५ अब्ज डॉलरचे थेट आर्थिक नुकसान झाले होते.यामध्ये अमेरिकेचे ९४४.८ अब्ज डॉलर, चीनचे ४९२.२ अब्ज डॉलर, जपानचे ३७६.३ अब्ज डॉलर, भारताला ७९.५ अब्ज डॉलर आणि प्युर्तो रिकोला ७१.७ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. पूर, वादळ आणि भुकंपामुळे होणारे जादा आर्थिक नुकसानीत तीन यूरोपीय देश आघाडीवर आहेत. यामध्ये फ्रान्सला ४८.३ अब्ज डॉलर, र्जमनीला ५७.९ अब्ज डॉलर आणि इटलीला ५६.६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

नव्या व्यावसायिक वाटांचा शोध

आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण काही ना काहीतरी आपल्याला शिकवतच असतो. जो क्षण आपल्याला शिकवतो, तेच खरं शिक्षण. पण असं जरी असलं, तरीही शालेय शिक्षण पूर्णझाल्यावर आपल्या प्रत्येकाला नोकरी-व्यवसाय करण्यासाठी पुढील शिक्षण घ्यावेच लागते. सर्वसाधारणपणे दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला पुढील शिक्षणाची दिशा ठरवावी लागते. सद्यस्थितीत विविध शिक्षणाच्या अनेक वाटा खुल्या झाल्या आहेत. अगदी त्या अगणित आहेत, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही आणि त्यामुळेच संभ्रमावस्था निर्माण होते.
आपल्यासाठी अथवा आपल्या पाल्यासाठी नेमकी कोणती दिशा ठरवावी, कोणते शिक्षण निवडावे, कोणते करिअर भावी आयुष्यात अर्थ आणि स्थैर्य प्राप्ती करून देईल, असे अनेक प्रश्न आपल्याला अधिकच गोंधळात टाकतात. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी पात्रतेचे निकषनिरनिराळे असून, त्या संबंधीची माहिती त्या त्या विद्यापीठाच्या तसेच शैक्षणिक संस्थांच्या नियमांनुसार ठरविण्यात आलेली असते. काही अभ्यासक्रमांसाठी सामायिक अथवा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया व संबंधित परीक्षा देणं क्रमप्राप्त ठरतं.
विविध नव्या व्यावसायिक वाटा : पारंपरिक अभ्यासक्रम, तंत्रशिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम, उच्च शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम, वैद्यकीय क्षेत्रातले अभ्यासक्रम, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम, शेतकी क्षेत्रातील अभ्यासक्रम, विविध परकीय भाषांचे अभ्यासक्रम, वृत्तपत्रविद्या व पत्रकारितेच्या क्षेत्रातील अभ्यासक्रम, सिने-नाट्य अभिनय व नृत्यप्रकारातील अभ्यासक्रम, नाट्य, जाहिरात व वास्तुविद्या, योगा विषयीचे अभ्यासक्रम, औषधविषयक, पायदळ-हवाईदल-नौसेना विषयक अभ्यासक्रम, बँंक व फायनान्स क्षेत्रातील अभ्यासक्रम, आदी.
वरील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही अनेक व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम विविध विद्यापीठ स्तरांवर तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध असून, पुढे दिलेल्या काही संकेतस्थळांवर सविस्तर माहिती मिळविता येईल. सद्य:स्थितीत विश्‍वविद्यालय अनुदान आयेाग म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन (यूजीसी) यांनी मान्यता दिलेली महाराष्ट्रातील पुढील विद्यापीठे विविध ठिकाणी निरनिराराळे लहान-मोठे प्रमाणपत्र, पदविका, पदवी तसेच त्यापुढील उच्च शिक्षण देत आहेत. अशा काही यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठांची नावे तसेच त्यांची संकेतस्थळे याविषयी माहिती पुढीलप्रमाणे :
१) विश्‍वविद्यालय अनुदान आयोग म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन (यूजीसी) : www.ugc.ac.in
२) कोकण कृषी विद्यापीठ, दापोली : www.dbskkv.org
३) महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स, नाशिक : www.muhsnashik.com
४) महाराष्ट्र अँनिमल अँड फिशेरी सायन्स युनिव्हर्सिटी, नागपूर : www.mafsu.in
५) मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई : www.mu.ac.in
६) पुणे युनिव्हर्सिटी, पुणे : www.unipune.ac.in
७) शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर : www.unishivaji.ac.in
८) श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकर्सी वुमेन युनिव्हर्सिटी, मुंबई : www.sndt.ac.in
९) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, नाशिक : www.ycmou.digitaluniversity.ac
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निवडलेले आपले करिअर निश्‍चितच सुख, समृद्धी, धन, धान्य, भूमी, गृह, ऐश्‍वर्य, वाहन सर्वकाही आपल्याला सहज देऊ करणारं ठरूशकेल.

Wednesday 10 October 2018

विचारधन

* तुम्हाला उद्यासाठी तयारी करायची असेल ,तर तुम्हीच आजचा सदुपयोग करा,कारण आजमधूनच उद्याचा सोनेरी दिवस उगवतो.

* गेलेल्या काळाकडे पाहून आपण जीवन समजू शकतो,पण येणाऱ्या काळावर लक्ष ठेवून आपण जीवन जगू शकतो.

* तुम्ही फक्त वर्तमानाची काळजी करा,भविष्य आपली काळजी स्वतः करते.

* इतिहास निर्माण करणाऱ्यांकडे  कधीही इतिहास लिहिण्याइतका वेळ असत नाही.त्यामुळे असं म्हटलं जातं की,इतिहास निर्माण करणारे वेगळे असतात आणि इतिहास लिहिणारे वेगळे असतात.

* कधीही कालची आणि ऊद्याची काळजी करत बसू नका ,कारण कालच्यापासून आपल्याला काहीच मिळत नाही आणि उद्याची आपल्याला काही माहिती नसते.त्यामुळे वर्तमानाचाच विचार करा.

* भूतकाळात आपल्या हातून घडलेल्या चुका आणि उद्याचा काळजी यांचा विचार करत बसला तर आजचा दिवस वाया घालवाल.

Tuesday 9 October 2018

वाढवा सामान्य ज्ञान


१) इथोपियाची राजधानी कोणती?
२) अंगोला या देशात कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे?
३) राजस्थानमध्ये किती जिल्हे आहेत?
४) बीजिंगचे पूर्वीचे नाव काय?
५) औद्योगिक व्यवसायाला उपयुक्त असणार्‍या पिकांना काय म्हणतात?
उत्तर : १) आदिस अबाबा २) प्रजासत्ताक शासन पद्धती 
३) ३३ ४) पेकिंग ५) व्यापारी पिके

१) डोमोनिका या देशाची राजधानी कोणती?
२) 'मित्रमेळा संघटना' या संस्थेचे स्थापना वर्ष कोणते?
३) घरगुती हिंसेपासून महिलांच्या सुरक्षेसाठी घरगुती हिंसा कायदा राष्ट्रपतींनी कधी संमत केला?
४) ११व्या पंचवार्षिक योजनेला कोणते नाव देण्यात आले होते?
५) ज्ञानपीठ पुरस्काराचे स्वरुप काय?
उत्तर : १) रोसे २) १९00 ३) १३ सप्टेंबर २00
४) 'राष्ट्रीय शिक्षण योजना'
५) रोख अडीच लाख रुपये, वाग्देवीची कांस्यमूर्ती आणि प्रशस्तिपत्रक

१) भारतीय क्रिकेट संघाने आपला पाचशेवा कसोटी सामना नुकताच कोणत्या देशाविरुद्ध खेळला?
२) जीएसटी कौन्सिलच्या सहसचिवपदी कोण आहेत?
३) भारतीय स्वातंत्र्याचा पहिला ध्वजारोहण सोहळा कुठे पार पडला?
४) आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले?
उत्तर : १) न्यूझीलंड २) अरुण गोयल ३) लाल किल्ला ४) १९५६

१) महाराष्ट्रातील प्रमुख वेधशाळा कोठे आहे?
२) उत्तर व्हिएतनाममधील सोंग की नदीच्या काठावर वसलेलं महत्त्वाचं शहर कोणतं?
३) १९८५ हे वर्ष काय म्हणून साजरं करण्यात आलं?
४) आंध्र प्रदेशमध्ये अवकाशयान केंद्र कोठे आहे?
५) पृथ्वीच्या आपल्या आसाभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात?
उत्तर : १) पुणे २) हनोई ३) इंटरनॅशनल इयर ऑफ यूथ 
४) श्रीहरिकोटा ५) स्वांगपरिभ्रमण गती



नादिया मुराद

युद्धातील लैंगिक हिंसाचाराविरोधात केलेल्या कामाबद्दल नादिया मुराद आणि कांगोचे डॉ. डेनिस मुकवेगे यांना २0१८ सालचा मानाचा नोबेल शांतता पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. स्वत: बलात्काराची शिकार ठरलेल्या नादियाने लैंगिक अत्याचाराविरोधातील लढाई लढतानाच जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उल्लेखनीय काम केल्यानेच त्यांचा गौरव करण्यात येत आहे. यंदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी ३३१ जणांची नावे आली होती. त्यातून मुकवेगे यांच्यासह नादिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आतापर्यंत ९८ जणांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यात १0४ लोकांचा आणि २७ संघटनांचा समावेश आहे. १९९३ मध्ये जन्मलेल्या नादिया या इराकच्या असून त्या यजिदी समुदायातील आहेत. इसीस या दहशतवादी संघटनेने त्यांचे अपहरण केले होते. त्यांच्यावर या दहशतवाद्यांनी अनेकदा बलात्कार करून त्यांचे शोषण केले होते. त्यांना इसीसची'सेक्स स्लेव्ह'ही म्हटले जाते. या दहशतवाद्यांच्या तावडीतून पळाल्यानंतर नादिया यांनी जगभरातील महिलांच्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत जनजागृती करण्याचे काम केले. त्यांनी लिहिलेले द लास्ट गर्ल, माय फाईट अगेन्स द इस्लामिक स्टेट ही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. संघर्षग्रस्त आणि युद्धग्रस्त भागामध्ये महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार थांबावेत यासाठी नादिया प्रयत्नशिल आहेत. इसीसच्या दहशतवाद्यांनी २0१४ मध्ये अपहरण केले होते. तीन महिने बंदी बनवून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला होता. इसीसचा ताबा येण्यापूर्वी त्या आई आणि भावंडासोबत उत्तर इराकच्या शिंजाजवळील कोचू गावात राहत होत्या. उदरनिर्वाह शेतीवरच चालत होता. ३ ऑगस्ट २0१४ रोजी इसीसने याजिदी लोकांवर हल्ला केला. तेव्हा त्यांच्या गावावर हल्ला होणार असल्याची कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. ''मला एका पुरुषाला विकण्यात आले. त्याला माझ्यासाठी काही कपडे विकत घ्यायचे होते आणि नंतर मला विकण्याचा त्याचा मानस होता. तो कपडे आणण्यासाठी बाहेर गेला. मी घरी एकटीच होते. मी तिथून पळून गेले. मी मोसूलच्या गल्लीबोळातून पळू लागले. मी एका मुस्लिम कुटुंबाचं घर ठोठावलं. मी त्यांना माझी हकीकत सांगितली. त्यांनी माझी मदत केली. कुर्दिस्तानच्या सीमेपर्यंत येण्यासाठी त्यांनी माझी मदत केली.'' तिच्या मुखातून निघणारे शब्द दु:खाचे वादळ घेऊन येतात. आता नादियाला नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यामुळे लैंगिक अत्याचाराविरुद्ध लढणार्‍यांना बळ मिळणार आहे. 

कादंबरीकार आर. के. नारायण

प्रसिद्ध कादंबरीकार आर. के. नारायण यांचा जन्म १0 आँक्टोबर १९0६ रोजी झाला. त्यांचे पुर्ण नाव रासीपुरम अय्यर नारायणसामी होते. भारतीय लेखकांच्या तीन सर्वात महान साहित्यिकांमध्ये त्यांची गणना होते. कादंबरी आणि कथा प्रकाराच्या माध्यमातून त्यांनी विविध स्तर आणि रुपातील मानवीय विकास आणि अध:पतनाचे चित्रण केले. गाईड कादंबरीसाठी १९६0 मध्ये त्यांना साहित्य अकादमी हा सर्वोच्च सन्मान मिळाला. १९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी अँन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्या वाचताना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे. यावर अनेकांचा विश्‍वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी कथांमधून उभे केले आहे. साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.

श्रुती मराठे

अभिनेत्री
९ ऑक्टोबर १९८६
श्रुतीचा जन्म बडोद्याचा. शालेय तसेच कॉलेजचं शिक्षण पुण्यात झालं. लहानपणी तिला अभिनयाऐवजी खेळात विशेष रस होता. मात्र दहावीत असतानाच तिला स्मिता तळवलकर यांच्या ‘पेशवाई’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिला एकापाठोपाठ एक अशा नवनवीन संधी मिळत गेल्या. श्रेयस तळपदेची निर्मिती असलेला ‘सनई चौघडे’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट. ‘रमा माधव’, ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’, ‘प्रेमसूत्र’, ‘तिचा बाप त्याचा बाप’, ‘लागली पैज’, ‘असा मी तसा मी’, ‘तप्तपदी’ हे तिचे काही महत्त्वाचे चित्रपट. ‘लग्नबंबाळ’, ‘क्लीनबोल्ड’ या नाटकांमध्येही तिनं काम केलं आहे. श्रुतीनं मराठीबरोबरच तमीळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिथं ती श्रुती प्रकाश या नावानं ओळखली जाते.

Monday 8 October 2018

सुलेखा तळवलकर

अभिनेत्री
जन्म : ८ ऑक्टोबर
सुलेखा तळवलकर यांचे शिक्षण मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये झाले. ‘सातच्या आत घरात’ हे तिचं पहिलं व्यावसायिक नाटक. २००४ मध्ये याच नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ या मालिकेद्वारे सुलेखानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘आई’ चित्रपटामध्ये सुलेखानं शेफाली जाधवची व्यक्तिरेखा साकारली होती. ‘तुझ्या माझ्यात’, ‘तिन्हीसांजा’, ‘श्यामचे वडील’, ‘कॅनव्हास’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘कदाचित’ हे तिचे महत्त्वाचे चित्रपट. ‘जावईशोध’, ‘बोलाचीच कढी बोलाचाच भात’, ‘श्रावणसरी’, ‘अवंतिका’, ‘कन्यादान’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या तिच्या उल्लेखनीय मालिका आहेत.

नॉलेज पार्क 1


प्रश्न-उत्तर 
1)2018 च्या आशियाई स्पर्धा या देशात झाल्या ....
क.भारत ख.इराण ग.चीन घ.इंडोनेशिया
2)2018 च्या आशियाई स्पर्धेत भारताने इतकी सुवर्णपदके  जिंकली....
क.18 ख.15 ग.19 घ.24
3) आशियाई स्पर्धेत भारत या खेळात नेहमी सुवर्ण पदक जिंकत आला आहे,पण या खेपेला सुवर्णपदक जिंकू शकला नाही....
क) धावणे ख.टेनिस ग.कबड्डी घ. हॉकी 
4) आशियाई स्पर्धेत या वर्षी या खेळाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आणि भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेत पदकदेखील मिळवले....
क) कुस्ती ख.ब्रिज ग.टेनिस घ. बुद्धिबळ
5) 2018 च्या आशियाई स्पर्धेत सर्वाधिक पदकांची लयलूट या देशाने केली....
क.चीन ख. इंडोनशिया ग.इराण घ. दक्षिण कोरिया 
6) टेनिसच्या या स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक जिंकले...
क. पुरुष एकेरी ख.महिला एकेरी ग.पुरुष दुहेरी घ.महिला दुहेरी
7) पुढच्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये या देशात होणार आहेत....
क.भारत ख.चीन ग. पाकिस्तान घ.दक्षिण कोरिया

उत्तरे:1)2) 3) 4) 5) 6) 7)

विक्टोरिया मेमोरियल
कोलकात्यातील सर्वात प्रसिद्ध इमारत आहे ही विक्टोरिया मेमोरियल. कोलकाता पाहायला आलेला प्रत्येक पर्यटक ही इमारत पाहिल्याशिवाय राहत नाही. 1901 मध्ये क्वीन विक्टोरिया हिच्या मृत्यूनंतर तिच्या स्मरणार्थ कोलकातामध्ये एक भव्य इमारत उभारण्याचा निर्णय घेतला गेला. जॉर्ज पंचम याने 4 जानेवारी 1904 मध्ये ला या इमारतीची कोनशिला उभारली.इमारत बांधायला तब्बल 17 वर्षे लागली. 1921 मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली.कोलकाताच्या 'मैदान' परिसरात उभारलेली ही सुंदर इमारत संगमरवरीपासून बनवली गेली आहे. या इमारतीच्या डावीकडे काही अंतरावरून हुगली नदी वाहते. आता या इमारतीला संग्रहालय बनवण्यात आले आहे.

जास्वंदीचे फूल
नजरेत भरणारा रंग आणि पाच पाकळ्यांनी मनोहारी बनलेल्या जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्‍या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते."शू-फ्लॉवर' हे नाव असल्याचे कारण जास्वंदीची फुले काळ्या चामडी बुटांवर घासली तर पॉलिश केल्याप्रमाणे बूट चकाकतात.जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानांत उठून दिसतात. जास्वंदीमध्ये एक हजार सूक्ष्म रंगछटा आहेत.जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे सव्वादोनशे प्रकार आहेत. त्यातील काही पाच-सहा मीटर उंच वाढतात. उंच वाढणार्‍यांत "हिबिस्कस कॅनाबिनस' ही जात असून, ती त्याच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे. भरपूर सेल्युलोजयुक्त कर्बोदके असलेल्या या वनस्पतीला "केनाफ' म्हणतात आणि कागदनिर्मितीच्या उद्योगात तो एक महत्त्वाचा कच्चा माल आहे.केस वाढीसाठी आणि काळे होण्यासाठी जास्वंदीचे फूल महत्त्वाचे औषधी गुणधर्म असणारे फूल आहे.

अनोखा क्रिकेटर 
इंग्लंडचा क्रिकेटपटू एलिस्टर कूक याने वयाच्या 33 व्या वर्षात क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.क्रिकेट विश्वात कसोटी खेळात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये कूक हा पाचव्या क्रमांकाचा खेळाडू आहे. इंग्लंडमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक सामने खेळणारा, सर्वाधिक धावा काढणारा आणि सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम एलिस्टरच्या नावावर आहे.आपल्या आपल्या पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात अर्धशतक आणि शतके ठोकण्याचा तो इंग्लंडचा एकमेव खेळाडू आहे.