Friday 31 December 2021

गजीनृत्य


गजीनृत्य प्रामुख्याने धनगर समाजात पिढ्यानपिढ्या चालत आलेली लोककला आहे. धनगर समाजाची बिरोबा, धुळोबा, सतोबा, नागोबा,भिवाडी, आयाक्का, बाळूमामा, सिदोबा आदी दैवते आहेत.त्यांची भक्ती आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी लोकनृत्याद्वारे लोकजागर केला जातो. गजी नृत्यामध्ये गजी वर्तुळाकार नाच करतात. गजनृत्यामध्ये नृत्य करणाऱ्यास गजी म्हणतात, तर ढोल वाजवणाऱ्यास ढोल्या म्हणतात. ढोलाच्या तालावरच ताल धरला जातो. गजाची घाई लावणाऱ्यास म्होऱ्या म्हणतात. या खेळात म्होऱ्याची भूमिका महत्वाची असते. रंगीत रुमाल उडवत डाव्या - उजव्या बाजूला वळत तालबध्द नृत्य करतात. नृत्यात पंचवीस ते तीस लोकांचा सहभाग असतो. त्यांचा पोषाख अंगात तीन बटनी नेहरु शर्ट, डोक्‍यावर तुरा काढलेला फेटा, दोन्ही हातांत रुमाल, कमरेलाही रंगीत रुमाल व विजार किंवा धोतर घातलेली असा असतो. ढोलवादक ज्याप्रमाणे ढोलावर टिपरी मारतो त्याप्रमाणे नृत्याचा प्रकार चाल बदलतो. ढोलवादकाचा हावभाव, त्याच्या पायांची हालचाल महत्त्वपूर्ण असते. तो आवाजामध्ये चढउतार करतो, त्याक्षणी नृत्याला गती आणि हळुवारपणा येत असतो. सनई, सूर, तुतारी नृत्यास ताल निर्माण करतात. गजनृत्याच्या पंचावन्न प्रकारांपैकी उपलब्ध असलेल्या नऊ - दहा प्रकारांना घाय असे म्हणतात. कापसी घाय, थोरली घाय, गळा मिठी घाय, रिंगन घाय, घोड घाय, टिपरी घाय, दुपारतीची घाय, इत्यादी. 

      देवदेवतांच्या यात्रांमध्ये रात्रभर या गजीनृत्याचा देवाची पालखी व रात्रभर तेलाची वात आरतीमध्ये जाळून जागर केला जातो. तसेच भंडारा,वालुग, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, विविध मान्यवरांचे स्वागत समारंभ, वाढदिवस, सत्कार समारंभ व आयोजलेल्या विविध महोत्सवामध्ये गजीनृत्याचे सादरीकरण केले जाते.अलिकडे गजी मंडळांचा ड्रेसकोड बदलत असून, सध्या पायात घट्ट चोळणा,डोक्यावर मखमली रुमाल व दोन्ही हातात दोन भरजरी रुमाल एकसारखा असा पोशाख केलेला असतो. गजी मंडळातील मोहर्‍या व ढोल्यायांचा ड्रेसकोड हे गजी मंडळाचे विशेष आकर्षण असते.

      पश्‍चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातल्या बहुसंख्य गावात हा खेळ खेळला जातो. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना दिल्ली येथे लाल किल्ल्यावर 26 जानेवारीला गजीनृत्य सादर करायला बोलावले होते. त्यावेळी हे लोकनृत्य दिल्लीकरांचे मोठे आकर्षण ठरले होते. नंतरदेखील लाल किल्ल्यावर हे नृत्य सादर करायला संधी मिळाली होती. गजी मंडळ ही लोककला म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे. वारसा आहे. पण नव्या पिढीला त्याच्याबाबत जास्त आकर्षण नाही. त्यामुळे काही भागातील ही लोककला लोप पावत चालली आहे. या संस्कृतीचे जतन करून त्याची जोपासना व्हायला हवी आहे.  सभा, समारंभातून, यात्रांमधून ही कला जिवंत राहण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Thursday 30 December 2021

तुफानों से क्या डरना और कठपुतली कक्षा-छठी


प्रश्न- एक वाक्य में जवाब लाखो।

1)सभी लोगों के साथ कैसे पेश आना चाहीए?

उत्तर-सभी लोगों के साथ प्यार से पेश आना चाहीए।

2)कौनसी बात टालने के लिए कवि ने कहा है?

उत्तर-दुसरों से नफरत करना टालना चाहीए।

3)किसको मदद मिलती है?

उत्तर- हिम्मत करनेवालों को मदद मिलती है।

4)जीवन में क्या करना चाहीए?

उत्तर- जीवन में सत्कर्म करना चाहीए।

5) जीवन क्या है?

उत्तर- जीवन हार-जीत का खेल है।

6)जीवन में कैसे रहना चाहीए?

उत्तर- जीवन में हंसकर रहना चाहीए।

7)अपनी कौनसी जिम्मेदारी है?

उत्तर- सब को सच्ची राह दिखाना अपनी जिम्मेदारी है।

8)अंधेरा कैसे दूर करना है?

उत्तर- आत्मज्ञान का दीप जलाकर अंधेरा दूर करना है।

9)देह-अभिमान के कारण क्या होता है?

उत्तर- देह-अभिमान के कारण महामारी फ़ैलती है।

10) किसको नहीं डरना चाहीए?

उत्तर- तुफानों से नहीं डरना चाहीए।


11) प्रीति के मित्रो के नाम बताओ?

उत्तर- तेजस, प्रसन्ना, मृण्मयी ये प्रीति के दोस्त थे।

12) किसकी आवाज सुनकर ये सभी बच्चे रुक गए?

उत्तर- सूत्रधार की आवाज सुनकर ये सभी बच्चे रुक गए।

13) सभी बच्चों ने अंदर कौनसा दृश्य देखा?

उत्तर- कठपुतलीयां रंगबिरंगी पहनावे पहनकर आँखे मटकाती इधर से उधर जा रही थी।

14) कठपुतली ने हाथ में नारियल लेकर क्या कहा?

उत्तर- कठपुतली ने हाथ में नारियल कहा- बहनों और भाईयों ,साथ में आई भाभीयों नमस्कार।प्रणाम। वेलकम।

15) नए कार्य का प्रारंभ कैसे किया जाता है?

उत्तर- नए कार्य का प्रारंभ नारियल फोडकर किया जाता है।

16) नारियल से क्या बाहर आया?

उत्तर- नारियल से फूल बाहर आया।

17) कठपुतलीयों के सामने से कौन भागी?

उत्तर- कठपुतलीयों के सामने से काली बिल्ली भागी।

18) बिल्ली का प्रिय खाद्य कौनसा है?

उत्तर- बिल्ली का प्रिय खाद्य चुहा है।

19)सूत्रधार ने छिंक का  क्या कारण बताया?

उत्तर- सूत्रधार ने छिंक का  कारण मिरची बताया।

20) हर घटना के पिछे कौनसा कारण होता है?

उत्तर-हर घटना के पिछे वैज्ञानिक या व्यावहारिक कारण होता है।

Tuesday 28 December 2021

अद्भुत धातू कलाकृतींचा किमयागार


माणसं कशानं झपाटून जातील काही सांगता येत नाही. आर्ट कलेकडे वळलेली माणसं चित्रकला, शिल्पकला या क्षेत्रात आपलं नाव कमावतात. मात्र यातही ते वेगळेपण जोपासतात. मुंबई- भायखळा येथील मेटल वर्क आर्टिस्ट स्वप्नील शिवाजी गोडसे याने धातूंपासून विविध कलाकृती साकारून कला क्षेत्रात स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे.  नुकतंच जहांगीर कलादालनात त्याचं 'दगड' हे अनोखे प्रदर्शन पार पडलं. या प्रदर्शनातून स्वप्नीलने धातूची अदभुत किमया कलाप्रेमींना दाखवली. घरात कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या गिरणी कामगाराच्या मुलाने आपल्या प्रतिभेच्या जोरावर हे यश मिळवलं आहे.

स्वप्नील गोडसे याने जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून 2010 मध्ये पदवी प्राप्त केली आहे. धातूचे हे कलेचे माध्यम निवडताना त्याने स्टील, लोखंड, तांबे, पितळ अशा धातूचा वापर करून  विभिन्न कलाकृती साकारल्या आहेत. नुकतेच साकारलेले 'दगड' हे त्याचे पहिले सोलो प्रदर्शन होते. या संकल्पनेविषयी स्वप्नील बोलताना तो म्हणतो की,, मी मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे. तिथे धरण बांधत असताना डोंगर पोखरताना बघितले आहे. त्या वेळी आतील दगड काढताना मला दिसत होते. ते दगड कायमस्वरूपी माझ्या मनावर कोरले गेले. तीच संकल्पना घेऊन मी पहिले सोलो प्रदर्शन करायचे ठरवले.

स्वप्नीलने अनेक उत्तमोत्तम धातूचे काम केले आहे. एम. एस. धोनी यांच्या रांची येथील बंगल्यात स्वप्नीलने तयार केलेले धातूचे शिल्प आहे. याआधी त्याने कॉपर शर्ट बनवला होता. कॉपरची गोण ही वेगळी कलाकृती त्याने साकारली होती. रे रोड येथे स्वप्नीलने स्टुडिओ उभारला आहे. या अभिव्यक्तीच्या क्षेत्रात 10 वर्षांहून अधिक काळ त्याने परिश्रमपूर्वक काम केले आहे आणि त्याला प्रचंड यशही मिळाले आहे.  स्वप्नीलचा प्रेमळ आणि प्रभावी संवाद यामुळे विचारांची देवाणघेवाण करण्याला सुलभता येते. याचमुळे त्याने व्यवसायातही चांगला जम बसवला आहे. अजूनही नवनवीन कलाकृती साकारण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

 जहागीर कलादालनात स्वप्नील गोडसे याचे 'दगड' प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात धातूंच्या मदतीने भूगर्भीय बदलांवर प्रकाश टाकण्यात आला. दगड आणि मानवी जीवनातील परिवर्तन, मानवी स्वभाव यांची सांगड घालण्याचा प्रयत्न स्वप्नीलने केला. स्वप्नील सांगतो, दगड म्हणजे डोंगर, डोंगर म्हणजे माती आणि माती म्हणजे जीवन. प्रत्येक जण मातीशी कनेक्ट असतो. दगडातून फुटलेली नवी पालवी, खास रिक्षा, दुचाकी किंवा मालवाहू वाहनांतून होणारा दगडांचा प्रवास, विकासाच्या नावाखाली झाडे तोडल्याने ओकंबोकं झालेली डोंगरे अशा त्याच्या कलाकृतींनी लक्ष वेधून घेततात.


मानवतावादी शांतिदूत डेस्मंड टुटू


त्वचेच्या रंगावरून उच्च-नीच ठरविण्याची पद्धत केवळ दक्षिण आफ्रिकेच्या नव्हे, तर जगाच्या इतिहासातील लज्जास्पद प्रकरण आहे. श्वेतांच्या अहंगंडातून आलेला हा वर्णद्वेष इतरांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकारही नाकारत होता. मानवतेला काळिमा फासणारी ही पद्धत नष्ट होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील जनतेला दीर्घ लढा द्यावा लागला.नेल्सन मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी लढय़ाचे वादातीत प्रणेते मानले जाते. परंतु अशा नेत्यांच्या संघर्षांचे आणि कष्टोत्तर यशाचे गमक समर्थ अशा दुसऱ्या फळीच्या नेत्यांमध्ये दडलेले असते. आर्चबिशप डेस्मंड टुटू हे मंडेला यांच्या मागील दुसऱ्या फळीमध्ये अग्रणी होते. या डेस्मंड टुटू यांचे रविवारी नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ‘ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर त्यांच्याशी शत्रुत्व घेण्याची काही गरजच उरत नाही,’ अशी भूमिका महात्मा गांधी यांनी स्वातंर्त्यलढय़ाच्या उत्तरार्धात घेतली होती. याच सूडबुद्धीविरोधी तत्त्वाचा अंगीकार टुटू यांनी केला. दक्षिण आफ्रिकेतील मूठभर गोऱ्या सत्ताधीशांच्या वर्णद्वेष्टय़ा धोरणांच्या विरोधात त्यांनी प्रखर लढा दिला. पण आपला संघर्ष हा वर्णद्वेषी वृत्तीविरोधात आहे, मूठभर गोऱ्यांविरोधात नाही याचे भान त्यांनी राखलेच, शिवाय विविध व्यासपीठांवर तशी भूमिकाही घेतली. वांशिक, वर्णीय संघर्षांमध्ये अशी नेमस्त भूमिका घेणारे चटकन लोकप्रिय होत नाहीत. काही वेळा त्यांच्या हेतूंविषयीदेखील शंका घेतल्या जातात. डेस्मंड टुटू हे धर्मोपदेशक होते. ते ‘गोऱ्या मिशनऱ्यांची’ भाषा तर बोलत नाहीत ना अशी शंका दक्षिण आफ्रिकेतील बहुसंख्य गौरेतर समाजातील काहींनी व्यक्त केलीच. परंतु महात्मा गांधींप्रमाणेच डेस्मंड टुटू यांनीही तळागाळापर्यंत लढा झिरपवण्यासाठी धर्मातील मानवतावादी तत्त्वांचा आधार घेतला. दक्षिण आफ्रिकेतील चर्च परिषदेचे अध्यक्ष आणि नंतर केपटाऊन अँग्लिकन चर्चचे आर्चबिशप या भूमिकेतून त्यांनी वर्णद्वेषी लढय़ाला चर्चचे पाठबळ दिले. पापक्षालनाची संधी आणि न्यायदानात सूडबुद्धी आणू न देणे ही तत्त्वे डेस्मंड टुटू यांनी कटाक्षाने पाळली.    दक्षिण आफ्रिकेतील पहिले कृष्णवर्णीय आर्चबिशप ठरलेले टुटू यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेमध्ये 7 ऑक्टोबर 1931 रोजी क्लेरकसोर्प येथे झाला. धर्माच्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या आधी ते काही काळ शिक्षक होते. प्रेमळ वृत्ती आणि धार्मिक तत्त्वचिंतनाचा अभ्यास यांतून त्यांची वैचारिक बैठक पक्की होत गेली. नैतिकतेची आणि सत्याची कास त्यांनी सोडली नाही. वर्णद्वेषाच्या विरोधातील लढ्याला त्यांनी अहिंसक स्वरूप दिले. या भूमिकेमुळे १९८४मध्ये त्यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले. नव्वदच्या दशकात दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी संघर्षाला यश आले; परंतु अन्यायाच्या विरोधातील टुटू यांचा लढा कायम राहिला. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर आणि अन्यायावर प्रहार करण्याचे काम त्यांनी कधीही सोडले नाही. प्रदीर्घ लढ्यानंतर नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षस्थानी आले, तरी टुटू यांचे काम थांबले नाही. मंडेला लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही, त्यांच्या चुकीच्या निर्णयांवर टीका करताना त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. गरिबीच्या विरोधात आणि एचआयव्हीचा संसर्ग रोखण्यात पुरेशी पावले उचलत नसल्याबद्दल टुटू यांनी दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन अध्यक्ष थाबो एम्बिकी यांच्या विरोधात भूमिका घेतली. झिम्बाब्वेमधील अत्याचारांच्या विरोधात दक्षिण आफ्रिकेने आवाज उठवावा, अशी भूमिकाही त्यांनी कायम घेतली. एम्बिकी यांच्यानंतर अध्यक्ष बनलेले जेकब झुमा यांना त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरोधी लढ्यातील अग्रणी असलेले आर्चबिशप डेस्मंड टुटू यांचे 26 डिसेंबर 2021 रोजी निधन झाले.

Monday 27 December 2021

गेब्रियल बोरीक: चिलीचा सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष


अलीकडच्या काळात जगातल्या काही देशात तरुणांचं आणि त्यातही महिलांचं नेतृत्व पुढे आलं आहे आणि त्यांनी सत्ता मिळवली आहे. २०१९ मध्ये फिनलंड येथे साना मारिन वयाच्या ३४ व्या वर्षी पंतप्रधान झाल्या. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिन्डा आर्डन २०१७ मध्ये ३७ वर्षाच्या असताना पंतप्रधान झाल्या. मॅक्रॉन फ्रान्सचे अध्यक्ष झाले तेव्हा ते ३९ वर्षांचे होते. तर  आता गेब्रियल बोरीक नावाच्या ३५ वर्षाच्या डाव्या विचाराच्या तरुणाला चिलीच्या मतदारांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिलं आहे. बोरीक यांच्या विजयामुळे चिली येथे जल्लोष साजरा करण्यात येत आहे. जोस एन्टोनियो कास्ट नावाच्या उजव्या विचाराच्या उमेदवाराचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बोरीकने प्रचंड मताने पराभव केला. अलीकडे समाजवादी विचारांचा पेरू, बोलिव्हिया, होन्डुरास आणि व्हेनेझुएलाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. ११ मार्चला बोरिक राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील.विद्यार्थी आंदोलनाचं महत्त्व लॅटिन अमेरिकेतील चिली या देशाने सिद्ध केलं आहे. चिलीचे माजी हुकुमशहा ऑगस्तो पिनोशेचेदेखील कास्ट समर्थक. जनरल पिनोशे यांनी १९७३ मध्ये बंड करून मार्क्सवादी साल्वाडोर आलंदेला उलथवून सत्ता हस्तगत केलेली. पिनोशेची सत्ता १९९० पर्यंत होती. त्या काळात तीन हजाराहून अधिक विरोधकांची हत्या करण्यात आलेली. कास्ट मुक्त अर्थव्यवस्थेच्या बाजूचे. गेल्या एक-दीड वर्षात कास्टच्या लोकप्रियतेत वाढ झालेली. दुसरीकडे बोरीक रस्त्यावर उतरून चिलीच्या सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडत असे. त्यांचा प्रचाराचा मुख्य मुद्दा चिलीचे रूपांतर लोककल्याणकारी देशात करायच होतं. त्यांचे विरोधी त्याची तो साम्यवादी असल्याची टीका करत असे. श्रीमंतांवर अधिक कर लावून सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी त्याचा उपयोग करण्यात येईल असा प्रचार बोरीक करत असे.

सान्तियागो ही देशाची राजधानी. बोरीक इथला विद्यार्थी नेता होता. देशाच्या खासगी शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात हजारो विद्यार्थ्यांचे त्यांनी मोर्चे काढले होते. चांगलं शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे,असं मोर्चा व जाहीर सभेतून ते लोकांना सांगत असे. चिलीत श्रीमंत आणि गरीबांमध्ये खूप दरी आहे. २०१९ च्या ऑक्टोबरमध्ये चांगली शिक्षण व्यवस्था व चांगली पेन्शन योजनासाठी आणि श्रीमंतांना फायदे करून देणारी आर्थिक व्यवस्था संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. त्याची नोंद घेऊन राष्ट्राध्यक्ष सेबास्टियन पिनेटा यांनी नवीन राज्यघटना तयार करण्याची जाहिरात केली. आता नवीन घटनेचे काम सुरू आहे. पुढच्या वर्षी नवीन राज्यघटनेवर जनमत घेण्यात येणार. राज्यघटनेसाठी बनवण्यात आलेल्या समितीत निम्म्या संख्येत महिला आहेत. २१ वर्षाचा एक तरुणही समितीत आहे. आताची राज्यघटना जनरल पिनोशेच्या काळातली आहे. पिनोशेच्या राजवटीत लोकांवर प्रचंड अत्याचार करण्यात आलेले. मानवाधिकारांचे खुलेआम उल्लंघन करण्यात येत होतं.तरुण, कामगार आणि महिलांनी मोठ्या संख्येत मतदान केलं आणि त्याचा फायदा बोरीकला झाला.  कामगारांच्या प्रश्नांवर ते सतत बोलत असल्याने कामगार त्यांच्या बाजूने उभे राहिले.बोरीक हे चिलीचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष असतील.

 त्यांनी म्हटलं आहे की, ‘आमचं धोरण सर्वसमावेशक असणार. विद्यार्थ्यांवरील कर्ज माफ करण्यात येईल आणि चांगली पेन्शन योजना बनवण्यात येईल.’

 राष्ट्राध्यक्ष पिनेटा यांनी त्यांचे अभिनंदन केले. कास्ट यांनी पण बोरीक यांच अभिनंदन केलं. बोरीक यांच्या आघाडीत साम्यवादी पक्षाचाही समावेश आहे. क्युबा, कोलंबिया, पेरू, बोलिवीया, ऊरूग्वे, कोस्टारिकाने लगेच त्याचं कौतुक करून अभिनंदन केलं.२०११ च्या विद्यार्थी आंदोलनात बोरीक सहभागी झालेले आणि हळूहळू नेतृत्व त्यांच्याकडे आलं. विद्यार्थी आंदोलनानंतर ते दोनदा संसदेत निवडून आले. त्यानंतर राष्ट्राध्यक्षपदासाठी उभा राहण्याचा निर्णय त्याने घेतला.असणार. कामगारांच्या अपेक्षा पूर्ण करणं बोरीकसाठी सोपे नसणार; पण रस्त्यावर उतरून संघर्ष करत त्याने सत्ता मिळवली आहे. या संपूर्ण काळात त्याच्यासोबत प्रामुख्याने विद्यार्थी होते. बोरीक डाव्या विचारांचा असल्याने कामगार आणि महिलांची त्यांच्यकडून खूप अपेक्षा आहेत. हवामान बदलाचा पण त्यांनी गंभीरतेने विचार केला असून काही नवीन खाण प्रकल्प रद्द करण्याचा विचार त्याने व्यक्त केला आहे. चिली येथे तांब्याचा प्रचंड साठा आहे आणि अनेक देशाला तांब्याचा पुरवठा चिली करत आहे. चिली देशात श्रीमंत आणि गरीबांमध्ये प्रचंड दरी आहे. एक टक्के लोकांकडे चिलीची २५ टक्के संपत्ती आहे. चिली येथे कामगार, कर्मचारी आठवड्याला ४५ तास काम करतात. आता कामाचे तास ४० करण्यात येतील, असं बोरीसने म्हटलं आहे. 

तरुण नेतृत्व आणि त्यांचे देश


डाव्या विचारसरणीचा नेता गॅब्रिएल बोरिक हा चिली या लॅटिन अमेरिकन देशाचा  सर्वात  तरुण राष्ट्रपती बनणार आहे. त्याचं अवघ वय 35 आहे.बोरीक बोरिक पुढील वर्षी मार्च 2022 मध्ये देशाची कमान हाती घेतील. चिली  पुढील वर्षी अशा काही देशांपैकी एक असेल, ज्याने तरुण नेतृत्वाला देशाची धुरा सांभाळण्याची संधी दिली. जगात असे अनेक देश आहेत, जिथे 1980 नंतर जन्मलेले तरुण नेते देशाची धुरा सांभाळत आहेत. आणि विशेष म्हणजे हा पराक्रम अनेक देशांनी केला आहे. चला तर, अशा देशांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी सुमारे 35 वर्षांच्या नेत्यांकडे देशाची धुरा सोपवण्यास मागेपुढे पाहिले नाही.

ऑस्ट्रिया  देखील अशा देशांपैकी एक आहे, ज्याने 40 वर्षाखालील नेता देशाचा प्रमुख बनवला आहे. 1986 मध्ये जन्मलेले सेबॅस्टियन कुर्झ दोनदा देशाचे राष्ट्रपती झाले. डिसेंबर 2017 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी कुर्झ ऑस्ट्रियाचे पहिले राष्ट्रपती बनले. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा या पदावर आपली मोहोर उमटवली. ऑक्टोबर 2021 पर्यंत ते या पदावर राहिले. कुर्ज यांना सर्वात कमी वयात देशाचे परराष्ट्र मंत्री बनण्याचा मान मिळाला आहे.

फिनलंडची  कमानही युवा नेतृत्वाच्या हाती आहे. 16 नोव्हेंबर 1985 रोजी जन्मलेल्या सना मरिन या सध्या देशाच्या पंतप्रधान आहेत. त्या देशाच्या 46 व्या आणि तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. 8 डिसेंबर 2019 रोजी वयाच्या 34 व्या वर्षी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मरिन या पंतप्रधान बनणाऱ्या देशातील सर्वात तरुण व्यक्ती आणि जगातील दुसरी सर्वात तरुण नेत्या आहेत. 2015 पासून त्या फिनलंड संसदेच्या सदस्या आहेत.

युक्रेनमध्येही  युवा नेतृत्वाला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. वकील ओलेक्सी होनचारुक ऑगस्ट 2019 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले. 7 जुलै 1984 रोजी जन्मलेले ओलेक्सी होनचारुक 29 ऑगस्ट 2014 रोजी वयाच्या 35 व्या वर्षी देशाचे राष्ट्रपती झाले. तथापि, त्यांना हे पद जास्त काळ टिकवता आले नाही आणि मार्च 2020 मध्ये त्यांनी हे पद सोडले. होनचारुकच्या आधी, व्लादिमीर झेलेन्स्की स्वतः अध्यक्ष होते, वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी हे पद स्वीकारले.

साल्वाडोरमधील पुराणमतवादी व्यापारी नायब बुकेले यांनी जून 2019 मध्ये वयाच्या 37 व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ते एक अतिशय लोकप्रिय सहस्राब्दी राजकारणी आणि व्यापारी आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वडील मुस्लिम आहेत तर आणि ख्रिश्चन आई आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांच्या धार्मिक श्रद्धा वादग्रस्त राहील्या होत्या. 24 जुलै 1981 रोजी जन्मलेले बुकेले हे देशाचे 43 वे राष्ट्रपती आहेत.

अंडोरामध्ये, माजी न्यायमंत्री झेवियर एस्पॉट झामोरा हे 16 मे 2019 रोजी वयाच्या 39 व्या वर्षी फ्रान्स आणि स्पेनमधील छोट्या देशाचे सरकार प्रमुख झाले. 30 ऑक्टोबर 1979 रोजी जन्मलेले जामोरा हे देशाचे सातवे पंतप्रधान आहेत.

कार्लोस अल्वाराडो, लेखक, पत्रकार आणि कोस्टा रिका मधील माजी कामगार मंत्री, यांनी 8 मे 2018 रोजी वयाच्या 38 व्या वर्षी पदभार स्वीकारला. ते देशाचे 48 वे राष्ट्रपती आहेत. अल्फ्रेडो गोन्झालेझ फ्लोरेस 1914 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी ते देशातील दुसरे सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत.

जेसिका आर्डर्न या न्यूझीलंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत, आणि जेव्हा त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्या 37 वर्षांच्या होत्या. 26 ऑक्टोबर 2017 रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 26 जुलै 1980 रोजी जन्मलेली जेसिका आर्डर्न ही जगातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या नेत्यांपैकी एक आहे आणि 2008 मध्ये ती पहिल्यांदाच खासदार बनली होती. त्या देशाच्या 40 व्या पंतप्रधान आहेत. वयाच्या 37 व्या वर्षी पंतप्रधान बनणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या सर्वात तरुण नेत्या आहेत.

भारतीय वंशाचे लिओ वराडकर  हे वयाच्या 38 व्या वर्षी जून 2017 मध्ये आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. लिओचे वडील, डॉ. अशोक वराडकर, 1960 च्या दशकात महाराष्ट्रमधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड गावातून युनायटेड किंग्डममध्ये स्थलांतरित झाले. पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी आरोग्य आणि पर्यटनासह अनेक मंत्रालये सांभाळली आहेत.

फ्रान्समध्ये, वयाच्या 39 व्या वर्षी, गुंतवणूक बँकर इमॅन्युएल मॅक्रॉन हे 14 मे 2017 रोजी देशाचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले. मॅक्रॉनने ब्रिजिट ट्रोग्नेक्सशी लग्न केले आहे. जे एमियन्समधील ला प्रॉव्हिडन्स हायस्कूलमध्ये शिक्षक घेतले.

एस्टोनियामध्ये, जुरी रातास 23 नोव्हेंबर 2016 रोजी वयाच्या 38 व्या वर्षी देशाचे पंतप्रधान झाले. 2014 मध्ये वयाच्या 34 व्या वर्षी त्यांनी तवी रोईवास यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. जोसेफ मस्कट यांनी मार्च 2013 मध्ये वयाच्या 39 व्या वर्षी माल्टाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. 22 जानेवारी 1974 रोजी जन्मलेल्या जोसेफ यांनी 11 मार्च 2013 रोजी वयाच्या 39 व्या वर्षी या पदाची सूत्रे हाती घेतली. ते देशाचे 13 वे पंतप्रधान होते.

नाशिकचा फ्लॉवर पार्क


मोगल साम्राज्याच्या काळात इ.स. 1487 मध्ये नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून गुलशनाबाद नावाने जगप्रसिद्ध होते. येथे गुलाबाची मोठ्या प्रमाणावर शेती व्हायची. येथील वातावरणही फुलांच्या वाढीसाठी, त्यांच्या फुलण्यासाठी पोषक होते. इंग्रजही याचमुळे या शहराच्या प्रेमात पडले होते. त्याचमुळे इथे मुंबई, ठाण्यानंतर देवळाली कॅम्पपर्यंत रेल्वेची सुविधा त्यांनी उभारली होती. नाशिकमध्ये फुलणारी फुले ब्रिटिश स्वातंत्र्यानंतर ब्रिटनमध्ये परतताना ते सोबत घेऊन गेले. पण आपल्याकडून ती जवळजवळ नामशेष झाली. दुसरीकडे दुबईसारख्या वाळवंटात मिरॅकल गार्डनसारखे अप्रतिम फुलांचे गार्डन बहरवले जाऊ शकते तर आपल्या नाशिकमध्ये का नाही? याच विचारातून नाशिक फ्लॉवर पार्कची उभारणी  करण्यात आली. 

नाशिक येथील उद्योजक शशिकांत जाधव यांच्या संकल्पनेतून त्र्यंबकेश्वर रोडवर अंजनेरीजवळ आठ एकर क्षेत्रावर नाशिक फ्लॉवर पार्क साकारण्यात आले आहे. येथील अनुकूल हवामान या फुलांसाठी फायदेशीर ठरले आहे.  जागतिक स्तरावर दुबई येथील मिरकल गार्डनच्या धर्तीवर नाशिक फ्लॉवर पार्क साकारण्यात आले आहे. कल्पकता, संशोधन व स्थानिक मनुष्यबळाचा वापर करून हे उद्यान साकारले आहे.  सामूहिक कल्पकतेतून टाकाऊ घटकांचा अधिक वापर करून येथे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या उद्यानात पिटोनिया, झेनिया, डायनथस, पॅन्सि, एरेंथियम, कोलिअस, वडेलिया, लेडीबर्ड कॉसमस आदी फुलझाडांची आकर्षक लागवड करण्यात आली आहे. गुलाब, झेंडू, सूर्यफूल, कमळ, बोगनवेल या फुलांचाही या पार्कमध्ये समावेश आहे. या फुलांचा व विविध वेलींचा वापर करून मोर, हत्ती, शहामृग, शेतकरी आदी प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या पार्कमध्ये 128 प्रकारची विविध फुले आहेत. फ्लॉवर पार्कमध्ये लाल माती, कोकोपीट व खतांच्या मिश्रणाचा वापर करून विशिष्ट आकाराच्या कुंड्यांमध्ये रोपांची लागवड करण्यात आली आहे. या उद्यानात संपूर्णपणे सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यात आला आहे. सलग सहा महिने 40 ते 50 लाख फुलांचा बहर पाहायला मिळतो. 

विविध जातींच्या, रंगांच्या शोभिवंत फुलझाडांची या पार्कमध्ये मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये पिटोनियाची 20 रंगांची रोपे, झेनियाची ९ रंगांची तर डायनथसच्या 80 रंगांच्या रोपांचा समावेश आहे. या झाडांचे जीवनमान 5 महिन्यांचे असल्याने फ्लॉवर पार्कमध्ये ही फुलझाडे मार्चपर्यंत पाहायला मिळणार आहे.विस्तीर्ण पार्कमध्ये सहकुटुंब भ्रमंतीचा आनंद घेता यावा  म्हणून 'किड्स एरिना' ची निर्मिती करण्यात आली आहे. येथे मुलांसाठी 20 ते 25 खेळांची व्यवस्था केली गेली आहे.

गोड्या पाण्यातील देशविदेशातील माशांचा 'अॅक्वेरियम' तयार करण्यात आला आहे.60 मोठ्या टॅकमध्ये माशांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. प्रत्येक प्रजातीचा मासा काय खातो, कसा जगतो आदी रोचक माहिती मिळते. पार्कमध्ये छोटेखानी 'बर्ड पार्क'देखील आहे. मोठ्या संख्येने लव्ह बर्ड, अमेरिकन कबुतर, चीनच्या कोंबड्या असे अनेक पक्षी येथे भेटतात. मुख्य आकर्षण ठरते तो ब्राझिलचा 'इग्वाना' म्हणजे सरड्यासारखा दिसणारा प्राणी. साडेपाच फुटाचा इग्वाना केवळ साडेचार वर्षाचा आहे. धष्टपुष्ट इग्वाना 100 टक्के शाकाहारी असून तो भाजीपाला खातो. अॅडव्हेंचर पार्क', 'रोप वे'चा आनंद घेता येतो. निसर्गरम्य वातावरणात नाशिक फ्लॉवर पार्कमध्ये सुखद वास्तव्याची सुविधाही उपलब्ध आहे. लेह, लडाखच्या धर्तीवर पार्कमध्ये 25 वातानुकूलित तंबू (टेन्ट) उभारण्यात आले आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Tuesday 21 December 2021

धुळ्यातील शिक्षकाने बनवल्या नारळाच्या करवंटीपासून भन्नाट वस्तू


नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' म्हणतात. या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग करता येतो. असे असतानाही खोबरे खाऊन झाल्यानंतर बहुतेक जण कसलाही विचार न करता करवंटी फेकून देतात. धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे जिल्हा परिषद शाळेतील सुनील मोरे या शिक्षकाने मात्र टाकाऊ करवंटीपासून हजारो शोभिवंत वस्तू तयार केल्या आहेत. नोकरी सांभाळून गेली अनेक वर्षे ते आपला छंद जोपासत आहेत. विशेष म्हणजे कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता आजवर शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी याचे विनामूल्य प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगाराचा मार्गदेखील उपलब्ध करून दिला आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात केवळ नोकरी, व्यवसायापुरती बांधीलकी न ठेवता पर्यावरणासाठीदेखील काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने सुनील यांनी टाकाऊ करवंटीपासून शोभिवंत वस्तू बनवायला सुरुवात केली.

कामानिमित्त कोकणात असताना डिसेंबर २००८ मध्ये त्यांना पर्यटनासाठी सिंधुदुर्गात जाण्याचा योग आला. समुद्रकिनारी असलेल्या एका स्टॉलवर शहाळ्यापासून तयार केलेल्या माकड, घुबड अशा प्रतिकृतींनी त्यांचे लक्ष वेधले. त्या प्रतिकृती न्याहाळताना आपल्यालादेखील असे काही करता येईल का? असा विचार त्यांच्या मनात डोकावला. त्यानंतर कोणत्याही प्रशिक्षण, मार्गदर्शनाशिवाय केवळ जिद्द, चिकाटी आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी करवंटीपासून शोभिवंत बनवायला सुरुवात केली.

घरातच साकारले कलादालन

सुनील मोरे यांनी आजवर करवंटीपासून मासे, नारळाचे झाड, फुले, दागिने, शोपीस, फुलपाखरे, स्मृतिचिन्ह, सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृती, गणपती, पक्ष्यांची घरटी, मोबाईल स्टॅड, ढोलकी अशा बऱ्याच वस्तू तसेच कासवाच्या शंभर प्रतिकृती तयार केल्या आहेत. एक कलाकृती बनवण्यासाठी त्यांना २ ते ४ तास लागतात. करवंटीला आकार देण्यासाठी ते हॅकसा ब्लेड, पॉलिश पेपर, एमसील आदी साहित्याचा वापर करतात. घरातच त्यांनी कलादालन उभारले आहे. त्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाची दखल घेऊन आजवर त्यांना मोठमोठ्या व्यासपीठावर पुरस्कृत केले आहेत. याशिवाय 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड'नेदेखील दखल घेतली आहे.

मोरे सांगतात की,देवाला नारळ अर्पण करतात. मात्र त्याचा वापर झाल्यावर करवंटी फेकून दिली जाते. या करवंट्या शेवटी उकिरड्यावर, गटारीत पडलेल्या आढळतात. त्यामुळे गटारी तुंबतात तर कधी रोगजंतू त्यावर अंडी घालतात. याच कारणामुळे टाकाऊ करवंटीपासून मी क्रिएटिव्ह वस्तू बनवायला सुरुवात केली.


Thursday 18 November 2021

5.जिल्हा प्रशासन (इयत्ता सहावी नागरिकशास्त्र) प्रश्नोत्तरे


प्रश्न 1.खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

उत्तर-जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो.

2.जिल्हाधिकारी यांना कोणकोणती कामे करावी लागतात?

उत्तर- शेती:-शेतसारा गोळा करणे, शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे, दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यांवर उपाययोजना करणे. कायदा व सुव्यवस्था- जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणे, सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे.सभाबंदी, संचारबंदी जारी करणे.निवडणूक अधिकारी- निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे.निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे. मतदार याद्या अद्ययावत करणे. आपत्ती व्यवस्थापन- आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे. आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला आदेश देणे. आपत्ती ग्रस्तांचे पुनर्वसन करणे.

3.पोलीस अधीक्षक कोणत्या ठिकाणी असतात?

उत्तर- महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो.

4.जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱयांना कोणती मदत करतात?

उत्तर- जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱयांना मदत करतात. 

5.जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला काय म्हणतात?

उत्तर- जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला 'जिल्हा न्यायालय' म्हणतात?

6.तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते?

उत्तर-प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो. तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते.

7.न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते?

उत्तर-न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते.

8.कोणकोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते?

उत्तर-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची पूर्वसूचना मिळू शकते.उदाहरणार्थ-पुराची, वादळाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे. या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते.

प्रश्न2- जोड्या जुळवा

अ गट-(अ) जिल्हाधिकारी (आ) जिल्हा न्यायालय (इ) तहसीलदार

ब गट- (1)तालुका दंडाधिकारी (2)कायदा व सुव्यवस्था राखणे (3) तंटे सोडवणे

उत्तर-(अ) तालुका दंडाधिकारी-तंटे सोडवणे (ब) जिल्हा न्यायालय-  तंटे सोडवणे 

(क) तहसीलदार-तालुका दंडाधिकारी

प्रश्न 3.खालील मुद्द्यांवर चर्चा करा.

1)आपत्ती व्यवस्थापन

उत्तर- आपल्याला वेगवेगळ्या आपत्तींचा सामना करावा लागतो. पूर,आग, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट, भूकंप, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींबरोबरच दंगली, धरण फुटणे, बॉंबस्फोट, साथीचे आजार यांसारख्या आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा प्रकारच्या आपत्तींमुळे लोकांचे फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन तसेच जीवित व वित्तहानी होते.त्यामुळे पुनर्वसनाचे प्रश्नही महत्त्वाचे ठरतात. आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला 'आपत्ती व्यवस्थापन' असे म्हणतात. आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची पूर्वसूचना मिळू शकते.उदाहरणार्थ-पुराची, वादळाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे. या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते.

Tuesday 16 November 2021

10.प्राचीन भारत:सांस्कृतिक (इयत्ता सहावी इतिहास) प्रश्नोत्तरे


प्रश्न 1.खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1.प्राचीन भारतातील विद्यापिठाची यादी करा.

उत्तर- प्राचीन भारतातील विद्यापीठे- तक्षशिला विद्यापीठ,वाराणसी, वलभी, नालंदा विद्यापीठ, कांची

2.कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे,त्याची यादी करा.

उत्तर- तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे.


2. नावे लिहा.

अ) प्राचीन भारतातील महाकाव्ये....

उत्तर- रामायण,महाभारत


प्रश्न 3.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(1) रामायण हे महाकाव्य .............. ऋषींनी रचले.

उत्तर-वाल्मिकी

(2) भारतीय वैद्यकाशास्त्राला ............ असे म्हटले जाते. 

उत्तर- आयुर्वेद

(3) हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय............ विद्यापीठात होती. 

उत्तर-नालंदा विद्यापीठ

प्रश्न 4.थोडक्यात उत्तरे लिहा.

(1) तिपिटक म्हणजे काय ते स्पष्ट करा.

उत्तर-तिपिटकामध्ये तीन पिटके आहेत.पिटक म्हणजे पेटी.याठिकाणी त्याचा अर्थ 'विभाग' असा आहे. 1. सुत्तपिटक- यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहेत. 2.विनयपीटक-यामध्ये भिक्खू आणि भिक्खूनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत.3.अभिधम्मपिटक- यात गौतम बुद्ध धर्माचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले आहे.

(2) भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे? 

उत्तर-'भगवद्गीता' हा हिंदुचा पवित्र ग्रंथ आहे. तो महाभारताच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असा संदेश दिला आहे.

(3) आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे?

उत्तर- आयुर्वेदात रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे.

(4) संघम साहित्य म्हणजे काय?

उत्तर-संघम म्हणजे विद्वान साहित्यिकांची सभा. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य 'संघम साहित्य' म्हणून ओळखले जाते.

प्रश्न 5.चर्चा करा.

मौर्य आणि गुप्त काळातील स्थापत्य व कला.

उत्तर- मौर्य आणि गुप्तकाळात भारतीय स्थापत्यकलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला.सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. सांची येथील स्तूप आणि उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली, असे दिसते. गुप्तकाळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. महाबलीपूरमची मंदिरे त्याची साक्ष देतात. पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कांस्यमूर्ती बनवण्यास सुरुवात झाली. दिल्ली जवळील मेहरौली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते, हे समजते.

 प्रश्न 6.एका वाक्यात उत्तरे लिहा.

1.प्राचीन भारतात कोणकोणत्या भाषामधून साहित्यनिर्मिती झाली?

उत्तर- संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषामधून साहित्यनिर्मिती झाली. 

2.संघम साहित्यात कोणती महाकाव्ये प्रसिद्ध आहेत?

उत्तर- सिलप्पधिकरम आणि मणीमेखलाई ही संघम साहित्यातील महाकाव्ये प्रसिद्ध आहेत.

3.जैन आगमग्रंथ कोणकोणत्या भाषामध्ये लिहिला आहे? 

उत्तर-जैन आगमग्रंथ हा अर्धमागधी, शौरसेनी, माहाराष्ट्री अशा प्राकृत भाषामध्ये लिहिला आहे.


8.मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये (इयत्ता सहावी इतिहास) प्रश्नोत्तरे


प्रश्न 1.सांगा पाहू.

1)भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे.

उत्तर- कुशाण

2)कनिष्काने काश्मीरमध्ये बसवलेले शहर.

उत्तर-कनिष्कपूर

3)वीणावादनात प्रवीण असलेला राजा.

उत्तर- समुद्रगुप्त

4)कामरूप म्हणजेच.

उत्तर- प्राग्ज्योतिष . प्राग्ज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर


प्रश्न 2.चर्चा करा व लिहा

1.सम्राट कनिष्क

उत्तर-कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने कनिष्कपूर हे शहर वसवले होते.कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. कनिष्काने सोन्याचे नाणे पाडले होते.

2) मेहरौली येथील लोहस्तंभ.

उत्तर- दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे दीड हजार वर्षांहून अधिक जुना आहे. तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे. हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्तांच्या काळातील आहे.

प्रश्न 3.चीनच्या बौद्ध भिक्खू युआन श्वांग याने महाराष्ट्रातील लोकांविषयी कोणते गौरवपूर्व उद्गार काढले आहेत?

उत्तर-"महाराष्ट्रातील लोक मानी आहेत.कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात,पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करीत नाहीत. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते मदत करतात. शरण आल्यास ते अपाय करीत नाहीत."

प्रश्न 4.खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1.कोणत्या राजांना 'इंडो-ग्रीक राजे' असे म्हटले जाते.

उत्तर- भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती.त्या राजांना'इंडो-ग्रीक राजे' असे म्हटले जाते.

2.इंडो-ग्रीक राजांमध्ये कोणता राजा प्रसिद्ध होता?

उत्तर- मिनंडर राजा हा इंडो -ग्रीक राजांमध्ये प्रसिद्ध होता.

3.दुसऱ्या चंद्रगुप्तांच्या काळात कोणता भिक्खू चीनमधून भारतात आला होता?

उत्तर- दुसऱ्या चंद्रगुप्तांच्या काळात फाहियान हा भिक्खू चीनमधून भारतात आला होता.

4.हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने कोणता ग्रंथ लिहिला होता?

उत्तर- हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने 'हर्षचरित' हा हर्षावर्धनाच्या जीवनावरील  ग्रंथ लिहिला होता.


7.मौर्यकालीन भारत (इयत्ता सहावी) प्रश्नोत्तरे


प्रश्न 1.खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1.सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या?

उत्तर- सिकंदाराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या.

2.बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले?

उत्तर-बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले.

3.मौर्य काळात कोणते व्यवसाय होते?

उत्तर-मौर्य काळात शेती, हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते.

4.सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत?

उत्तर-सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह,हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची शिल्पे आहेत.

5.इ.स.पूर्व सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाचे साम्राज्य कोठून कोठपर्यंत पसरलेले होते?

उत्तर- इ.स.पूर्व सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाचे साम्राज्य  वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते?

6.दारिक नावाचे चलन कोणी सुरू केले?

उत्तर- सम्राट दार्युश याने दारिक नावाचे चलन सुरू केले.

7. ग्रीक सम्राट सिकंदर कोठे मरण पावला?

उत्तर- ग्रीक सम्राट सिकंदर हा बॅबिलोन येथे इ.स.पू.323 मध्ये मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे.

8. 'मुद्राराक्षस' हे नाटक कोणी लिहिले?

उत्तर-विशाखदत्त या संस्कृत नाटककाराने 'मुद्राराक्षस' हे नाटक लिहिले. यात धनानंद राजाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्य याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानकातून उलगडले आहे.

9.चंद्रगुप्त मौर्य याने आपले उरलेले आयुष्य कोठे घालवले?

उत्तर-चंद्रगुप्त मौर्य याने आपले उरलेले आयुष्य कर्नाटकातील श्रवणबेलगोळ येथे घालवले.

10.सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला?

उत्तर- कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.

11.सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे सांगा.

उत्तर- अशोकाने प्रजेसाठी सुखसोई निर्माण करण्यावर भर दिला. माणसांना तसेच पशूंना मोफत औषधपाणी मिळावे, अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले.सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या.विहिरी खोदल्या.

12.मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती?

उत्तर-मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती.

13.भारताची राजमुद्रा कशाच्या आधारे तयार करण्यात आली आहे?

उत्तर- भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या  आधारे तयार करण्यात आली आहे.

प्रश्न 2 .सांगा पाहू (म्हणजे काय?)

1.सत्रप- भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी सिकंदाराने ग्रीक अधिकाऱयांच्या नेमणुका केल्या होत्या. त्यांना सत्रप म्हणतात.

2.सुदर्शन- गुजरात राज्यातील जुनागढजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धारण बांधले होते.

3.'देवानं पियो पियदसी'- याचा अर्थ :देवाचा प्रिय प्रियदर्शी

4.अष्टपद-पूर्वी बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते.

प्रश्न 3. आठवा आणि लिहा

1.चंद्रगुप्त मौर्य याच्या साम्राज्याची व्याप्ती- चंद्रगुप्त मौर्य याने नंद राजा धनानंद याचा पाडाव करून मगधावर इ. स.पू.325 च्या सुमारास स्वतः ची सत्ता प्रस्थापित केली. नंतर त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार सुरू केला. पुढे सेल्युकस निकेटर याचा पराभव करून अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार,हेरात हे प्रदेश आपल्या साम्राज्यास जोडले.

2.सम्राट अशोक याच्या साम्राज्याची व्याप्ती- अशोक इ. स.पूर्व 273 मध्ये मगधच्या सत्तेवर आला. त्याने कलिंगवर स्वारी करून विजय मिळवला. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत ,तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते.


Monday 15 November 2021

7.खडक व खडकांचे प्रकार (इयत्ता सहावी) प्रश्नोत्तरे


अ) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

1) पृथ्वीच्या पृष्ठभागाचे कवच (शिलावरण) कशाचे बनलेले आहे?

उत्तर- पृथ्वीच्या पृष्ठभागाचे कवच (शिलावरण) कठीण आहे, तसेच ते माती व खडक यांचे बनलेले आहे.

2) खडकांचे प्रकार किती व कोणते?

उत्तर- खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात. 1)अग्निजन्य खडक/अग्निज खडक/ मूळ खडक 2) गाळाचे खडक/स्तरित खडक ) रूपांतरित खडक

3) ज्वालामुखी कशाला म्हणतात?

उत्तर- पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते.त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठांच्या भेगांमधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात. त्याला ज्वालामुखी म्हणतात.

4)माहिती सांगा- प्युमिस खडक

उत्तर- प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे. ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो. तो सच्छिद्र असतो. त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो.

5) महाराष्ट्र पठार व सह्याद्री कोणत्या खडकांनी बनले आहेत. या अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे.

6) कोणत्या खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही? 

उत्तर- अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही.

7) गाळाचे खडक कोणते?

उत्तर- वाळूचा खडक, चुनखडक, पंकाश्म (शेल) , प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत.

8) जीवाश्म (fossil) कशाला म्हणतात?

उत्तर- गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. यांना जीवाश्म म्हणतात.

9)दिल्ली येथील प्रसिद्ध लालकिल्ल्याचे बांधकाम कोणत्या खडकाने केले आहे?

उत्तर- राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लालकिल्ल्याचे बांधकाम केले आहे.

10) आग्रा येथील ताजमहाल कोणत्या खडकाने बांधलेला आहे?

उत्तर-आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. हा रूपांतरित खडक आहे. हा दगड राजस्थानमधील मकाराना येथील खाणीतून आणला गेला होता.

11) नर्मदा नदीचे तट कोणत्या खडकाचे आहेत?

उत्तर- मध्य प्रदेशात भेडाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. सूर्योदय, सूर्यास्तावेळी आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात. हे दृष्य फार मनोवेधक असते.

12)जांभा खडक कोठे आढळतो?

उत्तर-महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीच्या भागात जांभा खडक आढळतो. हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळतो.


6 महासागरांचे महत्त्व (सहावी इयत्ता) प्रश्नोत्तरे


खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1.महासागरांचे क्षेत्रफळ लिहा

उत्तर-(अ) पॅसिफिक महासागर-16,62,40,977 चौकिमी (ब)अटलांटिक महासागर- 8,65,57,402 चौकिमी (क) हिंदी महासागर-7,34,26,163 चौकिमी (ड) दक्षिण महासागर- 2,03,27,000 चौकिमी (इ) आर्क्टिक महासागर-1,32,24,479 चौकिमी

2.सजीवसृष्टी जमिनीवर जास्त आहे की जलावरणात?

उत्तर- जमिनीवरील एकूण सजीवसृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त सजीवसृष्टी जलावरणात (पाण्यात) राहते.

3.कोणत्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते?

उत्तर-महासागर,सागर किंवा समुद्र यांच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते.

4.ज्वालामुखीमुळे कोणकोणते घटक पाण्यात मिसळतात?

उत्तर-ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे,राख, क्षार व वायू पाण्यात मिसळतात.

5.जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय कोणता?

उत्तर-'मृत समुद्र' हा जगातील सर्वांत क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो.

6.खाऱ्या पाण्यापासून आपल्याला काय मिळते?

उत्तर-खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते.

7.मीठ हा पदार्थ कसा मिळवला जातो?

उत्तर- मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागात 'मिठागरे' तयार करून मिळवला जातो.

8.मिठाप्रमाणेच कोणते घटक समुद्रात असतात?

उत्तर- मिठाप्रमाणेच फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन अशी अनेक खनिजे समुद्रात असतात.

9.मासे आपल्याला कोठून मिळतात?

उत्तर- मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर यांतून मिळतात.

10.जल जीवांचा उपयोग कशाकशांसाठी करतात?

उत्तर- जल जीवांचा उपयोग आहार, औषधनिर्मिती, खतनिर्मिती, संशोधन इत्यादींसाठी वापर होतो. 

11.भारतामध्ये कोणकोणते जीव खाल्ले जातात?

उत्तर-भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी (शार्क) रावस इत्यादी समुद्री जीव खाल्ले जातात.

12.कोणकोणत्या देशांतील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते?

उत्तर- मालदीव,मॉरिशस, सेशल्स बेटे इत्यादी देशांतील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते.

13.किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते कारण सांगा.

उत्तर- हवेतील बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते,त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते.

14. वारे का वाहतात?

उत्तर- जमीन व पाण्याच्या तापण्यातील फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते व परिणामी पृथ्वीवर वायूदाब पट्टे निर्माण होतात.या वायूदाबातील फरकामुळे वारे वाहतात.

15. सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आला आहे कारण सांगा.

उत्तर- सागरसानिध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते. हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारी उत्पादने, विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य यांमुळे सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आला आहे.

16. महासागरातील खारे पाणी क्षारविराहित करून पिण्यायोग्य करण्याची व्यवस्था कोणत्या शहरात करण्यात आली आहे?

उत्तर- महासागरातील खारे पाणी क्षारविराहित करून पिण्यायोग्य करण्याची व्यवस्था संयुक्त अमिरातीमधील दुबई या शहरात करण्यात आली आहे.

17. खारफुटीचे लाकूड कसे असते?

उत्तर- खारफुटीचे लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ असते. इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी या लाकडांचा उपयोग होतो. 

18.सागरतळातून कोणकोणते खनिज पदार्थ मिळतात?

उत्तर- सागरतळातून लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मँगनीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ मिळतात. तसेच खनिज तेल व नैसर्गिक वायूदेखील मिळतो.

19. जलमार्गातून कशांतून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते?

उत्तर- जलमार्गाने जहाजे, ट्रॉलर, बोटी, नावा यांतून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते.

20.सागर किनारा लाभलेल्या कोणत्या देशांना सागरी मालवाहतुकीमुळे महत्त्व मिळाले आहे?

उत्तर-सागर किनारा लाभलेल्या स्पेन, नार्वे, जपान यांसारख्या  देशांना सागरी मालवाहतुकीमुळे महत्त्व मिळाले आहे.

21.पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे?

उत्तर-पृथ्वीचा सुमारे 70.80 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे.

22. महासागरांचे प्रदूषण कोणकोणत्या कारणांमुळे होत आहे?

उत्तर- मानव आपल्या गरजा भागविण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यातून अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत असतो. यांत(1) शहरांमध्ये निर्माण होणारा घनकचरा सागरजलात टाकणे.(2)तेलगळती (3)जहाजांतून टाकले जाणारे साहित्य (4) मासेमारीचा अतिरेक (5) किनाऱ्यावरील खारफुटी जंगलतोड (6)पाणसुरुंगामुळे होणारे विध्वंस (7) उद्योग व शहरे यांतून सोडले जाणारे सांडपाणी (8) समुद्रातील उत्खननामुळे होणारे प्रदूषण

23.कोणकोणते जलचर प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत?

उत्तर- निळा देवमासा, समुद्री कासव, डॉल्फिन इत्यादी जलचर प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

24. कोणत्या जलभागाला दक्षिण महासागर असे म्हणतात?

उत्तर- 60 अंश दक्षिण या अक्षवृत्तापासून अंटार्क्टिक खंडाच्या किनारपट्टीच्या जलभागाला दक्षिण महासागर असे म्हणतात.

अ) गटात न बसणारा घटक ओळखा आणि सांगा

1) शंख, मासे, खेकडा, जहाज उत्तर- जहाज

2) अरबी समुद्र, भूमध्य समुद्र, मृत समुद्र, कॅस्पियन समुद्र उत्तर- मृत समुद्र

3)श्रीलंका, भारत, नार्वे, पेरू उत्तर-भारत

4) दक्षिण महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, बंगालचा उपसागर उत्तर- बंगालचा उपसागर 

5)नैसर्गिक वायू, मीठ, सोने, मँगनीज उत्तर- नैसर्गिक वायू

Thursday 11 November 2021

अशी झाली 'बालदिना'ची सुरुवात


आजची मुले उद्याचे भविष्य आहेत.  आणि तेच भविष्याचे निर्माते आहेत. त्यामुळे त्यांना महत्त्व यावे, यासाठी 'बालदिन' म्हणजेच 'चिल्ड्स- डे' साजरा करण्याचे ठरले. भारतात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी 'बाल दिन' साजरा केला जातो. भारताशिवाय इतर अनेक देशांमध्येही मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात बालदिन साजरा केला जातो. पहिल्यांदा 'आंतरराष्ट्रीय बाल दिन' साजरा करण्याची कल्पना 1857 मध्ये अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथील डॉक्टर चार्ल्स लिओनार्ड यांना सुचली. त्यांनी ठरवलं की जून महिन्याच्या दुसऱ्या रविवारी बालदिन साजरा करायचा.  त्याला त्यांनी 'रोझ-डे' असे नाव दिले. नंतर त्याचे नाव 'फ्लॉवर-डे' ठेवण्यात आलं आणि शेवटी 'बालदिन' असे नामकरण झाले.

लहान मुलांसाठी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करणारा तुर्की प्रजासत्ताक हा पहिला देश ठरला. फार पूर्वी 1920 मध्ये त्यांनी 23 एप्रिल हा बालदिन म्हणून घोषित केला.  यानंतर 1925 मध्ये जिनेव्हा येथे पहिल्यांदाच संपूर्ण जगासाठी बालदिन निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथील 'वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन चाइल्ड वेल्फेअर' या कार्यक्रमात तसा प्रस्ताव ठेवण्यात आला.  त्यानंतर 4 नोव्हेंबर 1949 रोजी रशियातील वुमन्स इंटरनॅशनल डेमोक्रॅटिक फेडरेशनने ठरवले की 1 जून हा दिवस 'मुलांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून साजरा केला जाईल.  तेव्हापासून, बहुतेक कम्युनिस्ट देशांमध्ये 1 जून हा बालदिन म्हणून साजरा केला जातो.

1954 मध्ये पहिल्यांदाच युनायटेड किंग्डमने जगातील सर्व देशांमध्ये एकाच दिवशी एकत्रितपणे 'बालदिन' साजरा करण्याचा प्रयत्न केला. शेवटी 20 नोव्हेंबर 1959 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने  'डिक्लेरेशन ऑफ द राइट्स ऑफ द चाइल्ड'  चा स्वीकार केला आणि दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी जागतिक बालदिन साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी 'जागतिक बालदिन' साजरा केला जातो. असे सर्व असूनही अजूनही बहुतेक  देश स्वतःचा बालदिन साजरा करतात, जसे की न्यूझीलंडमध्ये मार्चच्या पहिल्या रविवारी आणि जपानमध्ये 5 मे रोजी बालदिन साजरा केला जातो. आजही 50 हून अधिक देश 1 जून रोजी बालदिन साजरा करतात. यापैकी अमेरिका हे पुढारलेले राष्ट्र दरवर्षी जूनच्या दुसऱ्या रविवारी बालदिन साजरा करते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू लहान मुलांवर खूप प्रेम करत. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी देशभर 'बालदिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Monday 8 November 2021

प्राजक्ता अदमाने:आधुनिक तंत्राचा वापर करून मध संकलन करणारी उद्योजिका


गडचिरोलीच्या प्राजक्ता अदमाने-कारू हिचा उल्लेख "मधकन्या'असा केला जातो. ती आता उद्योजक म्हणून पुढे आली आहे. 'कस्तुरी' या नावाने ती मध विकते.  आधुनिक तंत्राचा वापर करून मध गोळा केला जातो. यामुळे मधमाशांना इजा पोहचत नाही. निसर्गाचे नुकसानही होत नाही. याचे प्रशिक्षणही प्राजक्ता इतरांना देते. तिने निसर्गप्रेम व उद्योग या दोन्हींचा संगम साधत अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मधमाश्यांचं पोळं जाळून किंवा तोडून मध मिळवण्याऐवजी आधुनिक तंत्राने मधमाश्या पाळून, त्यांच्या माध्यमातून मध व इतर उत्पादन घेण्याची पद्धत त्यांनी स्थानिकांसमोर खुली केली. अदमाने म्हणाल्या, “गडचिरोलीच्या वैविध्यसंपन्न वनांमध्ये वावरत मी लहानाची मोठी झाले. नक्षलग्रस्त मागास भाग असल्याने अजूनही येथे उच्च शिक्षणाच्या सोयी नाहीत. त्यासाठी लोक बारावीनंतर नागपूर किंवा पुण्याला जातात. मी नागपुरात राहून फार्मसीचं शिक्षण घेतलं. काही काळ नोकरी केली. मग एमबीए करून पुण्यात पाच वर्षे नोकरी केली; पण निसर्गाशी जोडून घेऊन आपला स्वतःचा एखादा उद्योग-व्यवसाय असावा, हे प्रकर्षाने वाटत होतं. मधमाशीपालनाचं आधुनिक तंत्र तोपर्यंत माहीत झालं होतं. त्या संदर्भात मी वडिलांशी चर्चा केली. उत्तम पगाराची नोकरी सोडून मधमाशी पालनासंबंधी प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात पदार्पण केलं. या घटनेआधी मी जंगलात फिरताना जागोजागी झाडांवर मधमाश्यांची पोळी पहायचे. ती जाळून किंवा पाडून स्थानिक आदिवासी मध मिळवायचे, हेही माहीत होतं, पण याने निसर्गाची हानी होते, हे ज्ञान मला नव्या अभ्यासातून कळलं होतं. मधमाश्या वनस्पतींच्या परागीभवनात फार मोठी भूमिका बजावतात, त्या नष्ट झाल्या तर जंगलं जगणार नाहीत. मधमाश्यापालन विशिष्ट पेट्यांमधून करण्याच्या पद्धतीमुळे मधमाश्यांना हानी पोहचत नाही. मध व मेण तसंच पराग आदी इतर उत्पादनही मिळवता येतात. या नव्या पद्धतीने मी मधमाश्या पालन करायचं ठरवलं." अदमाने यांनी स्पष्ट केलं की, महाराष्ट्रात अशा त-हेने मधमाशीपालन अजून बाल्यावस्थेत आहे. हरियाना व राजस्थान या राज्यांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर असल्याने मी तेथे वरचेवर जाऊन, अनुभवींकडून शिकून घेतलं. वेगवेगळ्या वनस्पतींच्या फुलोऱ्यांवर मधमाश्या कशा प्रकारे काम करतात, फुलोरा संपल्यावर दुसऱ्या जागच्या फुलोरा शोधत कशा स्थलांतर करतात वगैरे लक्षात घेऊन मधुमक्षिका पालकांसाठी एक वार्षिक दिनदर्शिका तयार करण्यात येते. यासंबंधी राष्ट्रीय पातळीवरील मंडळामार्फत असे मार्गदर्शक प्रयत्न केले जातात. संबंधित यंत्रणांकडून मला मिळालेल्या अनुदानातून मी दीडशे पेट्या घेतल्या. सुरुवातीला बाहेरच्या राज्यांतील मजूर आणले. हळूहळू स्थानिकांना सर्व माहिती करून दिली. खादी ग्रामोद्योग महामंडळातर्फे मधमाशी पालनासंदर्भात चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी मी तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून काम करते. खादी ग्रामोद्योग महामंडळासाठी अकरा जिल्ह्यांमध्ये मी पुरवठादार आहे. पोळ्यांमधून मिळणाऱ्या मधाबरोबरच मेण व पराग आदी उत्पादनही आम्ही विकतो. या उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात माझी कुचेष्टा करणारे कित्येकजण आता मार्गदर्शन घ्यायला येतात. सन्मानपूर्वक आता माझा उल्लेख 'मधकन्या' म्हणून केला जातो. गडचिरोलीतलं माहेर आणि नागपूर जिल्ह्यातील उमरेड या गावी सासर, या दोन्ही ठिकाणी मधमाश्यांच्या कृपेने माझी ये-जा सतत चाललेली असते.


Thursday 28 October 2021

काही वनस्पतींची पानं पाहून आश्चर्य वाटेल

वनस्पती विश्वात विविध प्रकारची झाडं,रोपं आढळून येतात. काही वनस्पती फारच छोटी असतात,तर काही झाडं विशालकाय असतात. त्यातही काही झाडांची पानं खूप छोटी असतात,काही मोठी असतात. काही झाडांची पानं लांब असतात, काही फारच अरुंद असतात. अशाच काही वनस्पतींची माहिती करून घेणार आहोत. ही माहिती वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.


व्हिक्टोरिया अॅमेझोनिका

 वॉटर लिली कुटुंबातील ही सर्वात मोठी वनस्पती आहे.  पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये हिच्या पानांचा आकार  सर्वात मोठा आहे.  प्लेटसारख्या दिसणाऱ्या हिच्या  पानाचा व्यास 3 मीटर (सुमारे 10 फूट) पर्यंत आहे.  हिची पाने खूप मजबूत असतात.  ही पाने सरोवर किंवा नदीच्या पृष्ठभागावर तरंगताना दिसतात, 26 फूट लांबीपर्यंत देठांना जोडलेली असतात.  तुमच्यासारखी एक-दोन लहान मुलं हिच्या पानावर सहज बसू शकतात.  बसण्यापूर्वी पानावर पारदर्शक प्लास्टिकचा थर टाकला जातो, जेणेकरून शरीराच्या वजनामुळे पान फुटू नये.  ही वनस्पती दक्षिण अमेरिका खंडातील अॅमेझॉन बेसिनमध्ये आढळते.


रॅफिया रेगलीस

 खजूर झाडाच्या 20 प्रजातींचा  रॅफिया वंशामध्ये समावेश करण्यात आला आहे.  यापैकीच एक प्रजाती रॅफिया रेगलीस आहे.  या झाडाचे पान 25.11 मीटर म्हणजेच 82  फूट लांब असते. पानांची ही इतकी लांबी 9 मजली इमारतीच्या बरोबरीची असते. झाला ना आश्चर्यचकित!  पानाची रुंदी 3 मीटर म्हणजे सुमारे 10 फूट आहे. रॅफिया रेगलीस ही वनस्पती दक्षिण आफ्रिका खंडातील अंगोला, कॅमेरून, रिपब्लिक ऑफ काँगो, गॅबॉन आणि नायजेरिया यांसारख्या देशांमध्ये आढळून येते.


वुल्फिया

 वोल्फिया ही 9 ते 11 जलीय वनस्पती प्रजातींपैकी एक प्रजाती आहे. यात पृथ्वीवर वाढणाऱ्या सर्वात लहान फुलांच्या वनस्पतींचा समावेश होतो.  त्यांना वॉटरमील किंवा डकवीड असेही म्हणतात.  वोल्फिया प्रजातीच्या वनस्पतींची पाने जगातील सर्वात लहान मानली जातात.  वोल्फिया वनस्पती तलाव, सरोवर आणि दलदलीच्या पृष्ठभागावर शेकडो हजारांच्या संख्येने तरंगताना दिसते.  मुलांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वुल्फिया वनस्पतीचा आकार पेनच्या निबपेक्षाही लहान असतो.  प्रत्येक वनस्पतीला एक सपाट अंडाकृती अशी खूप लहान पाने असतात, ज्याची लांबी एक चतुर्थांश इंच असते.

 वोल्फिया प्रजातीच्या वनस्पतीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत असते.  म्हणूनच ही वनस्पती आशिया खंडातील बहुतांश भागात भाजी म्हणून खाल्ली जाते.  एका मानवी तळहातावर एका वेळी शेकडो वुल्फिया वनस्पतीची रोपे ठेवू शकतो.


गुनेरा मॅनिकटा

 मुलांनो, तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या झाडांची, वनस्पतींची काळजी घेतली आहे. तुम्ही त्यांची पाने पाहिली असतील.  काही झाडांची पाने तुमच्या करंगळी एवढी तर काही पाने तळहाताएवढी मोठी असतात. मात्र वनस्पतिविश्वात गुनेरा मॅनिकटा या वनस्पतीच्या   पानांचा आकार सर्वात मोठा असतो.  गुनेरा मॅनिकटा ही  ब्राझीलमध्ये उगवणारी गनेरेसा कुटुंबातील एक वनस्पती आहे.  याला ब्राझिलियन जायंट-रुबार्ब किंवा जाइन्ट रुबार्ब म्हणूनही ओळखले जाते. या वनस्पतीच्या पानांचा आकार पाहिल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. याच्या पानांचा आकार एका  प्रौढ माणसाच्या आकारापेक्षाही मोठा असतो.  या वनस्पतीची पाने 2 मीटर म्हणजे 8 फूट रुंद आणि 3.4 मीटर म्हणजे 11 फूट लांब असतात.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Wednesday 27 October 2021

सर्वात मोठा रॉकिंग हॉर्स


मुलांनो, घोडा असलेल्या पाळण्याला  इंग्रजीत रॉकिंग हॉर्स म्हणतात.  तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असा एक रॉकिंग हॉर्स आहे, जो सहा मजली इमारतीपेक्षा उंच आहे.  त्याला बिग रॉकिंग हॉर्स असे नाव देण्यात आले आहे.  हा दक्षिण ऑस्ट्रेलियातील गुमेराचा शहरात आहे.हा रस्त्याच्या एका बाजूलाच असल्याने प्रवाशांच्या आकर्षणाचा एक भाग बनला आहे. हा रॉकिंग हॉर्स  1981 मध्ये बांधला गेला. या मोठ्या रॉकिंग हॉर्सला पांढऱ्या रंगाने रंगवण्यात आले  आहे.  खालच्या पाळण्याची फक्त दुमडलेली बाजू लाल रंगाची आहे.तिथल्या लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या  मोठ्या रॉकिंग हॉर्सच्या डोक्यापर्यंतची एकूण उंची 18.3 मी (60 फूट) आणि लांबी 10.5 मीटर (34 फूट) आहे.त्याच्या डोक्याची उंची 6.1 मीटर (20 फूट) आहे.  हा जगातील सर्वात मोठा रॉकिंग हॉर्स मानला जातो.  त्याची संपूर्ण रचना 25 टन वजनाच्या स्टील फ्रेमने बनलेली आहे.  बिग रॉकिंग हॉर्समध्ये तीन स्तरांचे प्लॅटफॉर्म आहेत. पहिल्यांदा जमिनीपासून 15 फूट उंच बांधलेल्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर जाता येते.  हा प्लॅटफॉर्म दुमडलेल्या लाल रंगाचा भाग घोड्याच्या पायांच्या जवळ आहे.  येथे घोड्याच्या पायांच्या आतील बाजूस पायऱ्या बांधलेल्या आहेत, ज्या पाठीच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात.  हा फ्लॅटफॉर्म  जमिनीपासून 35 फूट उंच आहे.  प्लॅटफॉर्म मानेच्या हिश्श्याशी संलग्न आहे.  मानेच्या आतही पायऱ्या आहेत, ज्यामुळे वरच्या बाजूला तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाता येते.  डोक्यावर एक आयताकृती लहान व्यासपीठ आहे.  हे व्यासपीठ जमिनीपासून 60 फूट उंचीवर आहे.  त्याची उंची सुमारे सहा मजली इतकी आहे.इथे उभे राहून बिग रॉकिंग हॉर्सजवळ असलेली टॉय फॅक्टरी,कॅफे आणि प्राणी संग्रहालय पाहता येते.प्लॅटफॉर्मवरून पाहिल्यावर खालच्या वस्तू खूपच छोट्या दिसतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


छोटा गोंडस गिनी पिग


मुलांनो, तुम्हाला गिनीपिग नावाच्या एका छोट्याशा प्राण्याबद्दल माहिती आहे का?  हा छोटा प्राणी खूपच गोंडस आहे. जरी त्याचे नाव पिगी म्हणजेच डुकराशी संबंधित असले तरी, त्याचा  जैविकदृष्ट्या डुकराशी  दुरान्वयेही संबंध नाही. गिनी पिग ससा वर्गातील प्राणी आहे. याला कॅव्ही किंवा घरगुती कॅव्ही या नावानेही ओळखले जाते. गिनी पेरू, इक्वेडोर आणि कोलंबिया देशांमध्ये राहणारे इंका आदिवासी समाजातील लोक फार पूर्वीपासून गिनी पिग पाळत ​​होते.  ते गिनी पिगला एक स्वादिष्ट अन्न मानत.

विशेष म्हणजे अमेरिकेचा शोध लागल्यानंतर लगेचच खाण्याच्या उद्देशाने गिनी पिगला युरोप खंडात आणले गेले. आता फक्त पेरूमधील काही स्थानिक लोक गिनी पिग खातात. पण आज दक्षिण अमेरिका आणि इतरत्र त्यांचा  पाळीव प्राणी म्हणून सांभाळ केला जातो. तिथले लोक गिनी पिग पाळीव प्राण्यांच्या दुकानातून खरेदी करतात.  गिनी पिगच्या शरीराची लांबी सुमारे 25 सेमी आणि वजन सुमारे एक किलोग्रॅम असते.  त्यांना शेपूट नसते. त्यांचे कान लहान, पण केस नसलेले आणि गोल असतात. त्यांच्या पुढच्या पायांना चार बोटे असतात आणि मागच्या पायांची तीन बोटांसारखी रचना आहे.  त्यांच्यावर नखेही असतात. गिनी पिग हा शाकाहारी प्राणी आहे. अन्न खाताना ते मागच्या पायावर बसतात. जंगलात मात्र ते बिळात राहतात. फक्त संध्याकाळी खाण्यासाठी बिळातून बाहेर पडतात. पाळीव प्राणी म्हणून सांभाळ करताना त्यांना वेळोवेळी अन्न आणि पाणी द्यावे लागते. मेडिकल सायन्सशी संबंधित संशोधनात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. गिनी पिगचे आयुष्य साधारण आठ वर्षांचे असते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

Wednesday 20 October 2021

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ


१) अग अग म्हशी मला कुठं नेशी - एखादी गोष्ट स्वतः इच्छा असून करता येत नसली म्हणजे दुसऱ्याच्या आडून ती करणे .

२) अती खाणे मसणात जाणे - खाणे आणि पिणे यामध्ये अतिरेक झाल्यास परिणाम घातक होतो.

३) असतील शिते तर जमतील भुते - आपल्याजवळ जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत मित्रांची वाण नसते.

४) असेल हरी तर देई खाटल्यावरी - नशिवावर हवाला ठेवणारे लोक स्वतः प्रयत्न करीत नाहीत. ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात .

५) असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ - भलत्याच माणसाशी गाठ पडली असता किंवा मैत्री जडली असता आपले प्राण धोक्यात पडतात .

६) अती तेथे माती - एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला म्हणजे त्याचा परिणाम वाईट होतो.

७) अती शहाणा त्याचा बैल रिकामा - जो मनुष्य फार शहाणपणा करावयास जातो, तो अंती फसतो.

८) अति राग भीक माग - संतापी माणूस आपलेच नुकसान करून घेतो .

९) अडला नारायण गाढवाचे पाय धरी - थोर माणसांनाही प्रसंगी मूर्खाची मनधरणी करावी लागते.

१०) आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास- चांगली किंवा वाईट गोष्ट करण्यात आनंद मानणाऱ्यांना संधी प्राप्त झाली की जास्त उत्साह येतो. / एखादी गोष्ट करायला अनुत्सुक माणसाला न करायला नेमके कारण सापडते.

११) आयत्या बिळावर नागोबा - विनासायास दुसऱ्याच्या कष्टाचा फायदा मिळणे.

१२) आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ?- स्वतःजवळ नाही तर तो दुसऱ्यास काय देणार ?

१३) आपला हात जगन्नाथ - आपल्याला घेण्याची संधी मिळताच मुबलक घेणे.

१४) आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना - दोन्ही वाजूंनी कोंडमारा.

१५) आईजीच्या जिवावर बाईजी उदार - दुसऱ्याचा पैसा खर्च करून उदारपणा दाखविणे.

१६) आधी पोटोबा मग विठोवा - अगोदर स्वार्थ मग परमार्थ .

१७) अंथरूण पाहून पाय पसरावे - मिळकत पाहून खर्च करावा .

१८) आयत्या पिठावर रेघोट्या - स्वतः श्रम न करता दुसऱ्याच्या कष्टाचे फळ घेणे.

१९) इकडे आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे .

२०) आंधळे दळते नि कुत्रे पीठ खाते - एकाने मेहनत करावयाची व त्याचा फायदा दुसऱ्यांनी घ्यावयाचा.

२१) आंधळा मागतो एक डोळा , देव देतो दोन - थोड्या लाभाची अपेक्षा असताना जास्ती लाभ होणे.

२२) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे .

२३) उचलली जीभ लावली टाळ्याला - अविचाराने बोलणे .

२४) उथळ पाण्याला खळखळाट फार - अल्पज्ञान असलेला आपल्या ज्ञानाचा फार गाजावाजा करतो.

२५) उंदराला मांजर साक्ष - ज्याच्यापासून आपला फायदा आहे त्याच्यावद्दल विचार न करता साक्ष देणे.

२६) उधाराचे पोते सव्वा हात रिते - माल उधार घेणाराचे वजन , माप , भाव इ .मध्ये नेहमी नुकसान होते , म्हणून उधारीचा व्यवहार करू नये. उधार देणारा वजनात मारून फायदा घेतो.

२७) उद्योगाचे घरी ऋद्धीसिद्धी पाणी भरी - उद्योगी माणसाला वैभव प्राप्त होते .

२८) एक ना धड भाराभर चिंध्या - एकावेळी अनेक गोष्टी केल्याने एकही बरोबर होत नाही.

२९) एकादशीच्या घरी शिवरात्र - अडचणीमागे अडचण येणे .

३०) एका हाताने टाळी वाजत नाही - भांडण एका पक्षाकडूनच होते असे नाही , दुसऱ्या पक्षाचाही त्यात काहीतरी दोष असतो .

३१) ऐकावे जनाचे करावे मनाचे - अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे.

३२) कधी तुपाशी कधी उपाशी - सांसारिक स्थिती नेहमी सारखी नसते; तिच्यात बदल होत असतो . सुखदुःखमय जीवन असते.

३३) कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले , तरी कडू ते कडूच - दुर्जन कशानेही सुधारत नाहीत.

३४) कर नाही त्याला डर नाही - जो अपराधी नाही त्याला शिक्षेची भीती वाळगण्याचे कारण नाही.

३५) करावे तसे भरावे - ज्या प्रकारचे कृत्य करावे त्या प्रकारचे परिणाम भोगण्यास तयार असावे.

३६) कसायाला गाय धार्जिणी - दुष्ट आणि कठोर माणसाशी सर्व लोक नम्रतेने वागतात.

३७) कानामागून आला आणि तिखट झाला - वयाने लहान असून मोठ्यांना शिकविणे ,वरचढपणा दाखविणे .  लहान असूनही डोईजड.

३८) कामापुरता मामा ताकापुरती मावशी - काम साधून घेण्यापुरते गोड बोलणे .

३९) काप गेले नि भोके राहिली - वैभव नष्ट झाले आणि वैभवाच्या गप्पा किंवा निरर्थक खुणा मात्र शिल्लक राहिल्या.

४०) काखेला कळसा आणि गावाला वळसा - वस्तू जवळ असून भान न राहून तिचा गावभर शोध करणे.

४१) कुन्हाडीचा दांडा गोतास काळ - आपलाच जातभाई फितूर झाला म्हणजे फार घात करतो

४२) कुसंतानापेक्षा निःसंतान बरे - वाईट पुत्र असण्यापेक्षा मुळीच नसलेला वरा .

४३) कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटावयाचे राहत नाही - जी गोष्ट होणारच आहे , ती क्षुल्लक अडथळयास जुमानत नाही .

४४) कोल्हा काकडीला राजी - क्षुद्र मनुष्य क्षुल्लक वस्तूच्या लाभाने आनंदतो .

४५) कोळसा किती उगाळला तरी काळाच - वाईट गोष्टीची कितीही छाननी केली तरी त्यातून वाईटच निघणार.

४६) कोरड्याबरोबर ओले जळते - वाईटांच्या संगतीने चांगलेही वाईट होतात.

४७) खऱ्याला मरण नाही- खरे कधी लपत नाही , ते केव्हा ना केव्हा तरी उघडकीस येते.

४८) खायला काळ भुईला भार - निरर्थक , आळसात फुकट आयुष्य घालविणाऱ्याला उद्देशून म्हणतात.

४९) खाई त्याला खवखवे- अपराध करणाऱ्याला आपला अपराध जाणवत असतो.

५०) खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी- परिस्थितीशी जुळते न घेणारा व स्वतःच्या मताप्रमाणे वागणारा.

५१) खाण तशी माती- आई-बापांचे गुणधर्म मुलांच्या अंगी उतरतात .

५२) खोट्याच्या कपाळी गोटा - खोटे काम करणाऱ्याला शिक्षा होते.

५३) गर्वाचे घर खाली - अभिमानी माणसाचे शेवटी नुकसानच होते.

५४) गरज सरो वैद्य मरो - आपले काम संपल्यावर उपकारकर्त्याला विसरून जाणे . कृतघ्नपणा दाखवणे.

५५) गरजवंताला अक्कल नसते - गरजू मनुष्य मूर्खासारखा वागतो . / गरजू माणसाला नाईलाजाने मूर्खपणा पत्करूनही याचना करणे भाग पडते.

५६) गाव करील ते राव करणार नाही - गावचे सगळे गावकरी एकमताने वागले तर त्यांच्या हातून महत्कार्य होते , तसे प्रत्यक्ष राजाच्याही हातून होत नाही.

५७) गाढवाला गुळाची चव काय - एखाद्या वस्तूचे महत्त्व अडाणी माणसाला कसे कळणार?

५८) गाढवांचा गोंधळ , लाथांचा सुकाळ - मूर्ख लोक एके ठिकाणी जमा झाले तर ते मूर्खपणाचीच कृत्ये करणार .

५९) गाढवापुढे वाचली गीता , कालचा गोंधळ बरा होता - अरसिक मनुष्याला मौल्यवान गोष्टीची योग्यता कळत नाही.

६०) गुरुची विद्या गुरूला फळली - एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.

६१) गोगल गाय अन् पोटांत पाय - कपटी मनुष्य.

६२) घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात - प्रतिकूल परिस्थितीत लहान - मोठे सर्वच उलट वागू लागतात.

६३) घरोघरी मातीच्या चुली - सर्वसाधारण स्थिती सर्वत्र एकसारखीच .

६४) चालत्या गाड्याला खीळ घालणे - व्यवस्थित चाललेल्या कामात विघ्न आणणे.

६५) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे - प्रत्येकाचे केव्हातरी अधिकार गाजविण्याचे दिवस येतात . | प्रत्येकाला केव्हा ना केव्हा वर्चस्वाची संधी मिळते.

६६) चोर सोडून संन्याशाला सुळी देणे- गुन्हेगाराला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे .

६७) चोराच्या उलट्या बोंबा - आपणच गुन्हा करून आपणच ओरडा करणे.


Thursday 14 October 2021

रावणाच्या दहा मस्तकांचे रहस्य


हिंदू दिनदर्शिकेनुसार आज दसरा आहे. भगवान रामाने यादिवशी रावणाचा वध केला.आणि देवी दुर्गाने नऊ रात्री आणि दहा दिवसांनी महिषासुरावर विजय मिळवला होता.म्हणून हा सण असत्यावर सत्याचा विजय म्हणून 'विजयादशमी' या नावानेही साजरा केला जातो.दहा डोके असल्याने रावणाला दशानन म्हटले जाते.पण तुम्हाला माहीत आहे का की रावणाला दहा डोकी कशी मिळाली आणि ते कशाचे प्रतिनिधित्व करतात? चला तर मग जाणून घेऊया रावणाच्या दहा मस्तकांचे रहस्य...

जेव्हा रावणास महादेव झाले प्रसन्न

 त्रिलोक विजेता रावण हा भगवान महादेवांचा परमभक्त होता. एकदा त्याने शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले. जेव्हा हजारो वर्षे रावणाच्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले नाहीत, तेव्हा निराश होऊन रावणाने भगवान शंकराला आपले मस्तक अर्पण करण्याचा निर्णय घेतला. भगवान शिवाच्या भक्तीत लीन झालेल्या रावणाने भोलेनाथला आपले मस्तक अर्पण केले. पण तरीही रावणाचे प्राण गेले नाहीत. शीर अर्पण केल्यानंतर त्या जागी दुसरे डोके आले. असे करून रावणाने भगवान शंकराला तब्बल नऊ वेळा मस्तक अर्पण केले. जेव्हा रावणाला दहाव्या वेळेस आपले मस्तक शंकरास अर्पण करायचे होते, तेव्हा भगवान शिव स्वतः रावणावर प्रसन्न झाले आणि शिवाची कृपा मिळाल्यावर रावण तेव्हापासून दशानन बनला. या कारणामुळे रावण हा भगवान शिवचा परम भक्त मानला जातो.

वाईटाचे दहा डोके

विजयादशमीला रावणाचे पुतळे जाळण्याची परंपरा आहे. रावण हे अहंकाराचे प्रतीक आहे, रावण सत्ता आणि शक्तीचा गैरवापर करण्याचे प्रतीक आहे आणि रावण हे ईश्वरापासून विन्मुख होण्याचे प्रतीक आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, रावणाचे दहा डोके हे दहा वाईट गोष्टींचे प्रतीक आहेत. रावणाचे दहा मस्तक काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, वासना, भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अहंकाराचे प्रतीक मानले जाते. रावण देखील या नकारात्मक भावनांनी प्रभावित झाला आणि या कारणामुळे श्रीमंत आणि ज्ञानी असूनही त्याचा नाश झाला. वाल्मिकी रामायणानुसार रावण दहा डोके,  मोठी दाढ, तांब्यासारखे ओठ आणि वीस हात  घेऊन जन्माला आला होता. तो कोळशासारखा  काळा होता आणि त्याच्या दहा ग्रिव्हांमुळे त्याच्या वडिलांनी त्याचे नाव दशग्रीव ठेवले. या कारणामुळे रावण दशानन, दशकंधन नावाने प्रसिद्ध झाला. दहा मस्तके असल्याचा भ्रम रावण भगवान शिवाचा परमभक्त, त्याच्या दहा मायावी शक्तीसाठीदेखील ओळखला जातो.  अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये असे नमूद केले आहे  की, रावणाचे दहा डोके होते हे फक्त भ्रम निर्माण  करण्यासाठी. कारण रावणाला दहा डोकी मुळात  दहा नव्हतीच. त्याच्या गळ्यात नऊ रत्नांचा हार होता असे म्हणतात. या पुष्पहारामुळे रावणाला दहा मस्तके असल्याचा भ्रम निर्माण होत असे. रत्नांची ही माला रावणाला त्याची आई कैकसीने दिली होती.


Wednesday 13 October 2021

कवठेमहांकाळची महांकाली देवी


एखाद्या देवीच्या नावावरुन त्या गावचे नाव रुढ होणे म्हणजे तसे दुर्मिळ. कमंडलू नदीच्या तीरावर वसलेले हे शहर म्हणून कवठे व ग्रामदेवता श्री महाकाली देवीच्या नावावरुन 'कवठेमहांकाळ' असे नाव पडल्याचे सांगतात. पूर्वाभिमुख या मंदिरात देवीच्या दोन मुर्ती आहेत. पूर्वी कमंडलू नदीला आलेले पाणी महांकाली मंदिराच्या पायरीला लागत होते. नदीत दोन कुंड आहेत. त्यातील अंबाकुंडात एका भक्ताला मुर्ती सापडली. ती महांकाली देवीच्या डाव्या बाजूला दिसते. मंदिरापुढे असलेली दीपमाळ साधारण १४० वर्षांची आहे. संस्थान काळात पटवर्धन राजेंच्या पुढाकाराने १९०९ मध्ये मंदिराचा प्रथम जीर्णोध्दार होऊन ५० फूट लांब व ३० फूट रुंदीचे घडीव बांधकाम केले. छतावर चौपाकी पध्दतीची मंगलुरी कौले, सभा मंडपाचे सागवानी खांब बदलण्यात आले. पूर्वी नवरात्रीत सागवानी खांबाना शेतकरी ऊस, ज्वारीचे खुंट, नारळाच्या झावळ्यांनी सुशोभित करत. नक्षीकाम केलेल्या रंगीबेरंगी काचेच्या हंड्यांमध्ये मेणबत्ती किंवा दिवे लावल्याने त्याचा प्रकाश सभामंडप उजळून टाकत असे. सन २००० मध्ये मंदिराचा दुसऱ्यावेळी झालेल्या जीर्णोध्दाराने मंदिराचे रुपडेच पालटले. मंदिराचा गाभारा, सभामंडप संगमरवरी असून २०१० साली कलशारोहण समारंभही झाला. मंदिरात श्री गणेश, श्री मारुती, शिवलिंगही आहे. उजवीकडे तुळस, मागच्या बाजूला श्री नागदेव आणि एक काळ्या पाषाणाची वीरगळ आहे. गर्भगृहात जय-विजय यांचे स्तंभ असून जवळच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे.

नित्य पूजेवेळी अभिषेक, देवीसाठी साडी-चोळी, पुष्पसेवा स्वीकारली जाते. विशेष प्रसंगी होणारी पान-पूजा आकर्षक असते. मंदिराचा 'क' वर्ग पर्यटनस्थळात समावेश केला आहे. गुरव बंधूंच्या कित्येक पिढ्या देवीचे पुजारी आहेत.


गुड्डापूरची श्री धानम्मादेवी


कर्नाटक सीमेवरील जत तालुक्यातील गुड्डापूर येथील धानम्मादेवी समस्त महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. देवीच्या दर्शनासाठी वर्षभर लोकांची रिघ असते. लिंगायत धर्माचे संस्थापक श्री बसवेश्वर यांच्या त्या समकालीन. श्री धानम्मा म्हणजे भक्ती, ध्यान, साधना, संसार व क्रांतीचा अपूर्ण संगम आहे. आध्यात्मिक मुलगी, संसारी गृहिणी ते गणाचार दलाचे सेनाप्रमुख असा त्यांचा जीवन प्रवास अलौकिक आहे. जतपासून सुमारे बावीस किलोमीटरवरील गुड्डापूर हे गाव. या गावास मोठा ऐतिहासिक धार्मिक वारसा लाभला आहे. लिंगायत धर्माचे जागतिक दर्जाचे हे श्रद्धापीठ श्री धानम्मा देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. जगन्माता, महाशरणी वरदायिनी श्री धानम्मा देवीने जन्मस्थळ जत तालुक्यातील उमराणी हे गाव. श्री बसवेश्वरांनीच त्यांचे धानम्मा हे नाव ठेवले. गुड्डापूर त्यांचे सासर. तेथे त्यांनी आपले महात्म्य प्रकट केले. ती त्यांची कर्मभूमी, तर बसवकल्याण ही धर्मभूमी. सध्या नवरात्रीत कर्नाटकसह महाराष्ट्रातून लोक येत आहेत. दरवर्षी कार्तिकी अमावास्येला नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात श्री धानम्मा देवीची यात्रा भरते. गुड्डापूरचे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे. गेल्या काही वर्षांत लोकवर्गणीतून या मंदिराचा विकास होत आहे. सुंदर व भव्य गोपूर उभारण्यात आले आहे. मंदिरात देवीची ध्यानस्थ अवस्थेत बसलेली सुंदर मूर्ती आहे. हे मंदिर लिंगायत धर्माचे जागतिक दर्जाचे धर्मपीठ बनले आहे. धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र म्हणून या मंदिराचा पुढील काही वर्षात या परिसराचा विकास होणार आहे. या गावामुळे लिंगायत समाजाच्या भाविकांसाठी जत तालुका नकाशात आला आहे.


हातनूर-विसापूर पंचक्रोशीची होनाई देवी


तुळजापूरच्या भवानी देवीचा अवतार म्हणून तासगाव तालुक्यातील हातनूर येथील श्री होनाई देवीचा उल्लेख केला जातो. हातनूर-विसापूर पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे इथे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. देवीची आख्यायिका सांगितल्या जातात. त्यात ही देवी कन्नड मुलखातून आल्याचे सांगितले जाते. प्राचीन काळी गावालगत ओढ्याकाठी परीट घाटाजवळ देवीचे मंदिर होते. घाटावर कपडे धुण्याचे अस्वच्छ पाणी देवीच्या अंगावर जात असल्यामुळे देवी अप्रकट झाली. मात्र गावापासून जवळ असणाऱ्या डोंगरावर पुन्हा देवी प्रकट झाली. देवी डोंगरावर असल्याचा दृष्टांत पुजाऱ्याला झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी खोदकाम केले असता घोड्यावर स्वार असलेली मूर्ती सापडली. गावातील लोकांनी या ठिकाणी देवीची स्थापना केली. ज्या डोंगरावर देवीची स्थापना झाली, तो होनाईचा डोंगर म्हणून आता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते, की छत्रपती शिवराय या डोंगरावर वास्तव्याला होते. या ठिकाणी किल्ला बांधण्याचा त्यांचा मानस होता. मात्र जवळच इथे असणाऱ्या नाथबाबाच्या डोंगरावरून शत्रू हल्ला करू शकतो, म्हणून त्यांनी तो बेत रद्द केला. इथे असलेले घोड्याचे नाल शिवरायांच्या घोड्याचे असल्याचे सांगतात. श्रावणात येथे मंगळवारी व शुक्रवारी भाविकांची गर्दी असते. नवरात्रीत दररोज भाविक गडावर दर्शनासाठी येतात. दसऱ्यादिवशी पाटील वाड्यातून देवीची मिरवणूक काढण्यात येते.

यादिवशी पहाटेपासून भाविक ओढ्याकाठी असणाऱ्या मंदिरापासून होनाई मंदिरापर्यंत दंडवत घेतात. नव्या पोर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. सध्या मंदिराचे बांधकाम वेगाने करण्यात येत आहे. पर्यटनस्थळ म्हणून या देवस्थानचा परिसर विकसित होत आहे.


शिराळ्याची आंबामाता


करवीरवासिनी अंबामाता मूळची शिराळा येथील आणि कोल्हासुराचा वध केल्यानंतर कोल्हापूर निवासिनी झाली, अशी आख्यायिका आहे. जिवंत नागपूजेसाठी शिराळा हे नाव जगप्रसिद्ध झाले आहे. गोरक्षनाथ, अंबामाता मंदिर, समर्थ रामदास स्वामी स्थापित ११ मारुतीपैकी एक मारुती शिराळा येथे असल्याने धार्मिक व ऐतिहासिक असे या गावाचे महत्त्व आहे. येथील अंबामाता मंदिरातील मूर्ती पाषाणावर भाताच्या कोंड्यापासून बनवलेली व कमळावर बसलेली आहे. तालुक्यातील गिरजवडे येथे गिरजासुराचा वध केल्यानंतर जोतिबा व अंबामाता यांची शिराळा येथे भेट झाली. त्याठिकाणी हे मंदिर उभे करण्यात आले आहे. या भेटीमुळे या गावचे नाव अंबामातेचे वसतिस्थान असलेले गाव म्हणून 'श्री आलय' पडले होते. याचबरोबर सर्वांचे येथे रक्षण होईल, असा वर दिल्याचेही श्री नाथ लिलामृत, करवीर माहात्म्य, श्री रामदासांच्या काव्यपंक्तीत उल्लेख आहेत. श्री गोरक्षनाथ यांचे येथे वास्तव असताना ते या मंदिर परिसरात भिक्षा घेऊन आल्यानंतर थांबत असत. ते या गावात वास्तव्यास असतानाच त्यांनी जिवंत नागाची पूजा सुरू केली. या मंदिरात गणेश, शनी मारुती, जोतिबा याचबरोबर शेष नागाची मूर्ती आहे. या मंदिराचा मुख्य गाभारा व पुढील मंडप यांचे दगडामध्ये बांधकाम करण्यात आले आहे. या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. नागपंचमीला मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते.


Sunday 19 September 2021

हवामान बदलामुळे निर्वासित होण्याची वेळ


जग आज अनेक संकटांशी लढा देत आहे.  हिंसा, दहशतवाद आणि आर्थिक संकटापासूनते साथीच्या आजारांपर्यंत अनेक प्रकारच्या समस्या आपल्यासमोर आहेत.  तथापि, या सर्व धोक्यांदरम्यान, सर्वात वेगवान गहन होणारी चिंता म्हणजे हवामान संकट.  या संदर्भात, जगातील अनेक देशांनी एक सर्वमान्य उपाय शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे खरा, परंतु हे देश एकमेकांवर जबाबदारी टाकण्याचा खेळ करत आहेत.  अशी ही बेजबाबदार प्रवृत्ती भविष्यात प्रत्येकाला महागात पडणार आहे,हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही.  हवामान संकटाबाबत बरेच अभ्यास, संशोधन झाले आहेत, जे सूचित करतात की जर पुढील काही वर्षांमध्ये अर्थपूर्ण आणि ठोस पुढाकार घेतला गेला नाही तर जगातील मानवीसह सर्वच जीवनाचे संकट लक्षणीय वाढेल.  मग विकासाचा कोणताही दावा आणि वैज्ञानिक समज आपल्याला क्वचितच मदत करेल.  परिस्थिती अशी आहे की हवामानाची बदललेली लक्षणे आणि हवामानाच्या परिणामांमुळे विविध देशांची मोठी लोकसंख्या आज विस्थापित झाली आहे.  निर्वासितांची समस्या आणि हवामानाचे संकट हे एक आव्हान आहे ज्यावर अद्याप जागतिक व्यासपीठावर चर्चा झालेली नाही.

हवामान बदलाचे धोके पूर्वीपेक्षा आज अधिक जाणवत आहे. तसेच हे धोके एकाच भागात किंवा खंडात नाही तर जगाच्या सर्वच भागात एकाच वेळी निर्माण होत आहेत.  बदलणारा मोसम आणि बदलत्या हवामानाच्या पद्धतींमुळे, जगभरातील अनेक देशांना आता हवामान निर्वासितांच्या समस्येला कसे सामोरे जावे याची वेगळी समज विकसित करण्याची नैतिक आणि राजकीय धोरणात्मक गरज निर्माण झाली आहे.  हवामान निर्वासितांच्या समस्येला इतर निर्वासितांच्या समस्येशी जोडून सरलीकृत पद्धतीने पाहिले जाऊ शकत नाही.

वास्तविक, हवामान बदलामुळे  निर्वासित झालेले हे असे लोक आहेत ज्यांना हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे आपले मूळ क्षेत्र, समुदाय किंवा प्रदेश सोडून रोजगारासाठी इतरत्र जावे लागत आहे.  जगातील पहिल्या हवामान निर्वासित गटामध्ये पापुआ न्यू गिनीमधील कार्टेरेट बेटावरील चाळीस कुटुंबांचा समावेश आहे, ज्यांची एकूण लोकसंख्या 2000 आहे.  2009 पासून त्या भागात समुद्राची पातळी लक्षणीय वाढली आहे.  मात्र त्यांनी याबाबत आवाजही उठवला होता.  परंतु 2013 पर्यंत त्यांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष दिले गेले नाही.  अशा दुर्लक्षित परिस्थितीमुळे, शेवटी त्यांना ते क्षेत्र सोडावे लागले.  त्यांना भीती होती की एप्रिल 2014 मध्ये ते पूर्णपणे पाण्यात बुडतील.  जर आपण या अशा संकटाकडे उदासीन पद्धतीने बघितले तर त्याची विशालता अधिक तीव्रपणे वाढत राहील. एक धोक्याची घंटा लक्षात घेतली पाहिजे की, जगात राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण वाढण्याऐवजी कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) च्या अंदाजानुसार 1990 ते 2100 दरम्यान समुद्र पातळी 0.18 ते 0.6 मीटर वाढेल.  याचा अर्थ बांगलादेशसारखे देश 2050 पर्यंत या समुद्राच्या महापुरामुळे त्यांची एकूण 17 टक्के जमीन गमावतील.  याचाच अर्थ असा की नंतर 20 कोटी हवामान निर्वासित फक्त बांगलादेशात जन्म घेतील.

हवामान निर्वासित लोकांना हवामान बदलाच्या परिणामांव्यतिरिक्त, इतर अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते.  राजकीय समस्या त्यांच्यापेक्षा इतरांसाठी जास्त त्रासदायक असतात.  बऱ्याचदा असे दिसून येते की त्यांना त्यांच्या जागी परत जाण्यास भाग पाडले जाते कारण त्यांना नवीन ठिकाणी राहण्याचा किंवा स्थायिक होण्याचा कायदेशीर अधिकार नसतो.त्यामुळे त्यांचे कुत्रे हाल खात नाही. साहजिकच मोठ्यांनी देशांनी हवामान बदलाची जबाबदारी एकमेकांवर टाकण्यापेक्षा जगाला यातून सुरक्षितपणे कसे बाहेर काढता येईल हे पाहायला हवे आणि यासाठी तात्काळ पावले उचलायला हवीत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


कधीकाळी इंग्रजीला घाबरणारी सुरभी बनली आयएएस अधिकारी


स्पर्धा परीक्षांबाबत हिंदी माध्यमातून किंवा अन्य प्रादेशिक भाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम असतो.  विद्यार्थ्यांमध्ये असा पक्का ग्रह झालेला असतो की यूपीएससीमध्ये यश मिळवायचं असेल तर आपलं इंग्रजी चांगलं पाहिजे.  ही धारणा मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील सुरभी गौतमने चुकीची सिद्ध केली.  सुरभी गौतमचे सुरुवातीचे शिक्षण सतना जिल्ह्यात केले, तिने हिंदी माध्यमात इंटरमीडिएट पर्यंत शिक्षण घेतले, सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे तिलाही तिच्या इंग्रजीवर कॉन्फिडेंस नव्हता.

लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या सुरभी गौतमने इंटरमीडिएट नंतर अभियांत्रिकीमध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि एका नामांकित महाविद्यालयात बीटेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.  इथे सुरभीला इंग्रजीचा प्रभाव कळला.  एक गुणवंत विद्यार्थी असूनही, ती शिक्षकांच्या नजरा टाळायची, कारण तिला तिच्या इंग्रजीवर प्रभुत्व वाटत नव्हते.  पण सुरभीने ही तिची कमजोरी होऊ दिली नाही तर त्याऐवजी त्याचा अभ्यास सुरू केला.  काही महिन्यांतच, तिचे इंग्रजी फक्त सुधारलेच नाही, तर तिला तिच्या स्वप्नांची खात्री पटली, जी तिने लहानपणी पाहिली होती.

एका मुलाखतीत सुरभी गौतमने तिच्या लहानपणीचे दिवस आठवून सांगितले होते की, अभ्यासात उत्तम असल्यामुळे ती नेहमीच शिक्षकांची आवडती होती, पाचव्या वर्गात जेव्हा गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले तेव्हा तिचे शिक्षक तिला म्हणाले होते की तोही एक दिवस एका मोठ्या पदावर पोहचशील. यानंतर माध्यमिक परीक्षेत तिला गणित आणि विज्ञान दोन्हीमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले.  एका वृत्तपत्राने तिला एका मुलाखतीत तिला विचारले की तिला तिच्या कारकिर्दीत काय व्हायला आवडेल.तेव्हा तिने त्यावेळी तिच्या पाचवीच्या वर्गातील शिक्षकाचा पुनरुच्चार केला आणि सांगितले की मी एक मोठी अधिकारी होईन.  यानंतर तिने ठरवले की तिला यूपीएससी परीक्षा पास करायची आहे.

अभियांत्रिकी पदवी मिळवल्यानंतर सुरभीने अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले.  ज्यामध्ये त्याने गेट, इस्रो, दिल्ली पोलीस, एफसीआय, एसएससी आणि सीजीएलच्या परीक्षांमध्ये यश मिळवले, या काळात तिने आयईएसची परीक्षा दिली आणि येथे तिने प्रथम क्रमांक पटकावला.  यानंतर सुरभीला तिच्या यूपीएससीच्या तयारीबद्दल आत्मविश्वास आला.  ती 2016 मध्ये सामील झाली आणि पहिल्याच प्रयत्नात 50 वा क्रमांक मिळवून संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न साकार केले.

सुरभी, जी इंग्रजीला घाबरत होती, ती ज्यावेळी मुलाखतीसाठी गेली होती, तेव्हा तिच्यात आत्मविश्वास इतका ठासून भरला होता की तिथे तिला 275 पैकी 198 गुण मिळाले.  ती स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगते की UPSC मध्ये यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्ट कट नाही, फक्त तुम्हाला चांगली तयारी करावी लागेल, जर तुम्ही अभ्यासक्रमानुसार स्वतःची रणनीती आखली तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Sunday 12 September 2021

सामाजिक,वास्तववादी चित्रपटाचे प्रणेते:बिमल रॉय


बिमल रॉय हे भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक होते.  त्यांना सामाजिक आणि वास्तववादी चित्रपटांचे प्रणेते म्हटले जाते.  भारतीय चित्रपट जगतात त्यांचे योगदान लक्षणीय होते.  त्यांचा जन्म 12 जुलै 1909 रोजी ढाका (बांगलादेश) मधील बंगाली जमीनदार कुटुंबात झाला, जो त्यावेळी ब्रिटिश भारताच्या पूर्व बंगाल आणि आसाम प्रांताचा भाग होता.  चित्रपटांतील त्यांच्या आवडीमुळे ते कलकत्त्याला आले.  तिथून त्याचा चित्रपटांचा प्रवास सुरू झाला.

करिअर

कलकत्त्याच्या न्यू थिएटर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कॅमेरा सहाय्यक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.  या काळात त्यांनी दिग्दर्शक पीसी बरुआ यांच्या 1935 च्या 'देवदास' हिट चित्रपटासाठी प्रसिद्धी छायाचित्रकार म्हणून सहकार्य केले.  1940 आणि 1950 च्या दशकात रॉय समांतर सिनेमा चळवळीचा भाग होते.  जेव्हा कोलकातास्थित चित्रपट उद्योगाची स्थिती खालावली, तेव्हा रॉय आपल्या टीमसह मुंबईला गेले आणि तिथून एक नवीन चित्रपट सुरू केला.  1952 मध्ये त्यांनी 'बॉम्बे टॉकीज' साठी 'माँ' चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीला पुन्हा सुरुवात केली.  बिमल रॉय हे त्यांच्या 'रोमँटिक-वास्तववादी मेलोड्रामा' चित्रपटांसाठी ओळखले जात, जे मनोरंजनाबरोबरच महत्त्वाच्या सामाजिक समस्यांवर आधारित होते.

'मधुमती' प्रेरणादायी 

 बिमल रॉय यांनी दिग्दर्शक ते निर्माता, संपादक आणि सिनेमॅटोग्राफर पर्यंत चित्रपटांमध्ये काम केले.  'दो बिघा जमीन', 'परिणीता', 'बिराज बहू', 'मधुमती', 'सुजाता', 'पारख', 'बंदिनी', 'माँ', 'देवदास','प्रेमपत्र' 'यासह त्यांच्या चित्रपटांची यादी बरीच मोठी आहे.  त्यांचा 'मधुमती' हा व्यावसायिक चित्रपटातील अतिशय प्रभावशाली चित्रपट ठरला.  भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन उद्योग आणि जागतिक चित्रपटांमध्ये पुनर्जन्म या विषयावर काम करणाऱ्यांसाठी हा चित्रपट प्रेरणास्त्रोत असल्याचे मानले जाते.  'कर्ज' (1980) चित्रपटासह अनेक चित्रपट 'मधुमती' पासून प्रेरणा घेऊन बनवले गेले.  1958 मध्ये त्यांना 'मधुमती' चित्रपटासाठी नऊ चित्रपट पुरस्कार मिळाले.  हा विक्रम सुमारे साततीस वर्षे त्याच्या नावावर राहिला. या चित्रपटासाठी संगीतकार सलील चौधरी यांनी रचलेली धुने आजही लोकांच्या ओठांवर आहेत.

 चित्रपट पुरस्कार

 बिमल रॉय यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार जिंकले, ज्यात अकरा फिल्मफेअर पुरस्कार, दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि कान चित्रपट महोत्सवात एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार.  त्यांना 1959 मध्ये 'मधुमती', 1960 मध्ये 'सुजाता' आणि 1961 मध्ये 'पारख' आणि 1964 मध्ये 'बंदिनी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

 बिमल रॉय यांचा प्रभाव भारतीय चित्रपट आणि जागतिक चित्रपट दोन्हीमध्ये दूरगामी होता.  भारतीय चित्रपटसृष्टीत त्याचा प्रभाव मुख्य प्रवाहातील व्यावसायिक हिंदी चित्रपट आणि उदयोन्मुख समांतर सिनेमा या दोन्हीवर होता.  त्यांचा 'दो बिघा जमीन' (1953) हा कला आणि व्यावसायिक सिनेमा यशस्वी होणारा पहिला चित्रपट होता.  1953 मध्ये या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवला.त्यांचे निधन 8 जानेवारी 1965 रोजी मुंबई येथे झाले. 



मलाबार नौदल युद्ध सराव


मलाबार हा खऱ्या अर्थाने एक बहुपक्षीय नौदल युद्धसराव आहे. याची सुरुवात १९९२ मध्ये झाली. त्यानंतर १९९५ आणि १९९६ या दोन वर्षांत आणखी दोन वेळा भारत आणि अमेरिकी नौदलांकडून संयुक्तपणे मलाबार नौदल युद्धसराव करण्यात आला. पण त्यानंतर मात्र २००२ पर्यंत त्यात मोठा खंड पडला होता. पुढे २००७ मध्ये पहिल्यांदा या सरावामध्ये भारत आणि अमेरिकेव्यतिरिक्त जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांनीदेखील भाग घेतला. गेल्या आठ वर्षांपासून म्हणजेच २०१४ सालापासून भारत, अमेरिका आणि जपान हे तीन देश दरवर्षी या युद्धसरावात सहभागी होत आहेत. सुरुवातीच्या काळात हा युद्धसराव फक्त द्विपक्षीय होता. यामध्ये भारत आणि अमेरिका ही दोनच राष्ट्रे सहभागी होत होती. मात्र आता तो चार देशांच्या संयुक्त युद्ध कार्यक्षमतेचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरला आहे. भारताचे संयुक्त सेनादलप्रमुख जनरल बिपिन रावत यांनीच सांगितल्याप्रमाणे क्वाडचा मुख्य हेतू सर्व सहभागी राष्ट्रांसाठी आंतरराष्ट्रीय समुद्रामध्ये संचार करण्याचं स्वातंत्र्य निश्चित करणे, त्यासाठी प्रयत्न करणे हाच आहे.

२०१५मध्ये पहिल्यांदा जपान कायमस्वरूपी सदस्य म्हणून या सरावात सहभागी झाला. तेव्हा मलाबार सराव द्विसदस्यीयवरून त्रिसदस्यीय झाला. पण गेल्या वर्षीची घटना ही या सराव प्रक्रियेतला मैलाचा दगड ठरली! १० वर्षांत पहिल्यांदाच गतवर्षी क्वाड गटातले सर्वच्या सर्व देश या सरावात सहभागी झाले होते. २०२०च्या मलाबार युद्ध सरावामध्ये ऑस्ट्रेलियादेखील सहभागी झाला होता.

भारताने सांगितले आहे की, शांतता, स्थैर्य आणि या भागातील सर्वच देशांसाठी समृद्धीविषयी बांधिल आहोत. आमचे यावरदेखील एकमत झाले आहे की या भागामध्ये नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था, कायद्याचा आदर करणं, आंतरराष्ट्रीय समुद्रामध्ये मुक्त संचाराचं स्वातंत्र्य असणं आणि संबंधित देशांची अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित राहणं नितांत आवश्यक आहे. आमचं सामरिक सहकार्य याच ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी बांधील आहे!’

मलाबार युद्धसरावात प्रामुख्याने प्रत्यक्ष युद्धसदृश परिस्थितीतील वातावरण गृहीत धरून त्या अनुषंगाने निर्णय आणि त्यावर कृती यांचा सराव केला जातो. गेल्या वर्षी याच प्रकारातील ‘दुहेरी वाहक’ पद्धतीचा सराव करण्यात आला. त्यामध्ये भारताची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य आणि अमेरिकन नौदलाची निमित्झ ही युद्धनौका सहभागी झाली होती. या दोन प्रमुख युद्धनौकांबरोबरच दोन्ही देशांकडून इतर जहाजे, अजस्र पाणबुडय़ा आणि लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला होता.

यावर्षी, हवेत आणि पाण्यात अशा तीनही पातळ्यांवर मारा करण्याच्या क्षमतांची चाचणी घेतली गेली. तसेच, युद्धसदृश परिस्थितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या कल्पक निर्णयांचीदेखील अंमलबजावणी केली गेली. अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या सरावांमधून चारही देशांच्या नौदलांमध्ये एखादी संयुक्त नौदल कारवाई करण्यासाठीचा समन्वय आणि परस्पर सामंजस्य वाढण्यास मदत होते. तसेच, क्वाडमधल्या चारही देशांमध्ये असलेली धोरणात्मक एकात्मता होण्यासदेखील मदत होते.

यंदाच्या ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या मलाबार नौदल युद्ध सरावामध्ये भारताकडून आयएनएस शिवालिक ही बहुउद्देशीय स्टेल्थ युद्धनौका, आयएनएस कदमत ही पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि पी८आय हे दीर्घ पल्ल्याची गस्तक्षमता असणारं विमान या युद्ध सरावामध्ये सहभागी झालं. अमरिकेकडून या सरावात यूएसएस बॅरी, यूएसएनएस रॅप्पाहॅनॉक, दी यूएसएनएस बिग हॉर्न आणि पी८ए हे गस्ती विमान सहभागी झाले. जेएस कागा, जेएस मुरासमी आणि जेएस शिरानुई या अजस्र युद्धनौका जपानकडून सहभागी झाल्या. त्यांच्यासोबत पी१ हे गस्ती विमान आणि एक पाणबुडीदेखील जपानी नौदलाच्या ताफ्यात होती. क्वाड गटातला चौथा देश असणाऱ्या ऑस्ट्रेलियन नौदलाकडून या सरावामध्ये एचएमएएस वारामुंगा ही युद्धनौका उतरवण्यात आली होती.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली