Monday 30 November 2020

अविनाश साबळे:भारतीय ॲथ्लेटिक्समध्ये पहिला


गेल्या वर्षी विश्व ॲथ्लेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान ३ हजार मीटर रस्टीपलचेजमध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविणारा २६ वर्षीय महाराष्ट्राचा अविनाश साबळे ६१ मिनिटांपेक्षा कमी वेळेत हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिला भारतीय धावपटू ठरला. त्याने नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या एअरटेल दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये भारतीयांमध्ये अव्वल स्थान पटकावले. त्याने १ मिनिट ३० सेकंदानी राष्ट्रीय विक्रम मोडला. साबळे सर्व भारतीय धावपटूंच्या बराच पुढे होता. एकूण स्पर्धकांमध्ये तो १० व्या स्थानी राहिला.  श्रीनू बुगाथा दुसऱ्या स्थानी राहिला. त्याने १ तास ४ मिनिट १६ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली तर दुर्गा बहादूर बुद्धा १:०४:१९ वेळेसह तिसऱ्या स्थानी राहिला. भारतीय ॲथ्लेटिक्स महासंघाच्या (एएफआय) अधिकृत रेकॉर्डनुसार माजी राष्ट्रीय हाफ मॅरेथॉन विक्रम १:०३:४६ कालिदास हिरवेच्या नावावर होता. या कामगिरीमुळे साबळेने दिल्ली हाफ मॅरेथॉनमधील भारतीयाच्या विक्रमामध्ये सुधारणा केली आहे. सुरुवातीला हा विक्रम बुगाथाच्या नावावर होता. त्याने १ तास चार मिनिट ३३ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली होती.साबळे २०१८ मध्ये अभिषेक पालनंतर दुसऱ्या स्थानी होता. महाराष्ट्रातील मांडवा गावातील शेतकऱ्याचा मुलगा असलेला साबळेने गेल्या वर्षी दोहा विश्व ॲथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेज फायनलमध्ये ८ मिनिट २१.३७ सेकंद वेळेसह ऑलिम्पिक पात्रता मिळविली होती. त्या स्पर्धेत त्याला १३ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.  भारतीय सेनेत सध्या कार्यरत असलेल्या साबळेने गेल्या वर्षी आशियाई ॲथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ३हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते.

वासुदेव बळवंत फडके स्मारक


पुणे शहरातील संगम पुलाजवळच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या जुन्या कार्यालयाच्या आवारात देशासाठी तारुण्याची होळी केलेल्या वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक आहे. या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये सत्र न्यायालय होते. इंग्रजांविरुद्ध धनगर, कोळी, रामोशी आदी उपेक्षित समाजातील तरुणांना संघटीत करुन स्वातंत्र्याचा सशस्त्र लढा उभारणाऱ्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या स्मारकाची सध्या मात्र दुरवस्था झाली आहे. फडकेंनी इंग्रजांविरुद्ध बंडाचे निशान फडकावल्यानंतर इंग्रजांनी त्यांना विजापूरनजीक अटक करून १८७९ साली पुण्यात आणले होते. त्यांच्यावर याच सत्र न्यायालयामध्ये खटला चालविण्यात आला. खटला सुरू असताना सार्वजनिक काका फडकेंचे वकीलपत्र घेण्यासाठी धैर्याने पुढे आले. महादेव चिमाजी आपटेंनी न्यायालयात फडकेंची बाजू बेडरपणे मांडली. त्यांचे सहायक वकील म्हणून चिंतामण पांडुरंग लाटे यांनी न्यायालयात फडकेंचा बचाव केला. खटला सुरु असताना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावर इंग्रजांनी फडकेंच्या बंडात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला होता.  खटला सुरु असताना फडकेंना तेथीलच एका खोलीमध्ये डांबण्यात आलेले होते. 17 जुलै 1879 ते 9 जानेवारी 1880 या कालावधीमध्ये फडके या कोठडीमध्ये होते. जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात झाली. या संपूर्ण लढ्याची साक्षीदार असलेल्या या वास्तूमधील स्मारक दुर्लक्षित आहे या स्मारकामध्ये वासुदेव बळवंत फडकेंच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडींचे चित्रण असलेले म्युरल्स आहेत. प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या कसबी हातांनी फडकेंच्या आयुष्याचे शिल्परुपी चित्रण केले आहे  स्मारकाच्या घुमटावर पराग घळसासी आणि रामचंद्र खरटमलांनी त्याचे रेखाटन केलेला फडकेंचा अर्धाकृती पुतळा आहे.फडकेंना कैद्येत ठेवण्यात आलेली कोठडी सुस्थितीत आहे. स्मारकाभोवती उद्यान उभारण्यात आले होते,पण आज ते इथे दिसत नाही. 


धामापूर तलाव:वर्ल्ड हेरिटेज


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या परिसरात सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी, माड-पोफळीची झाडे आहेत. दुतर्फा डोंगराच्याच मधोमध धामापूर हा ऐतिहासिक तलाव आहे. या तलावाच्या काठावर श्री भगवतीचे प्राचीन देवालय आहे.पाच एकर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण तलावाचा जलाशय अत्यंत नितळ आणि स्वच्छ असून नौकाविहार उपलब्ध आहे. आता या तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटने पुरस्कृत केले गेले आहे.महाराष्ट्रातील हा पहिलाच तलाव आहे. आतापर्यंत तेलंगणातील दोन साईट्सना ही जागतिक ओळख मिळाली होती. यंदा आंध्र प्रदेशमधल्या तीन साईट्स आणि महाराष्ट्रातील धामापूर तलावाला प्रथमच हा जागतिक सन्मान मिळाला आहे. जगातील  74 हेरिटेज इरिगेशन साईटस्मध्ये जपानमधील 35, पाकिस्तानमधील  1 व श्रीलंका येथील 2 साईट्स यांना आतापर्यंत हा जागतिक सन्मान  मिळाला आहे. स्यमंतक संस्थेतर्फे धामापूर तलावाचे तपशीलवार डॉक्युमेंटेशन सेंट्रल वॉटर कमिशनला सादर केले गेले होते. सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे  ७१ व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये धामापूर तलावाला हा सन्मान दिला जाणार आहे. 2018 मध्ये कॅनडा येथे झालेल्या 69 व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये भारताला पहिल्यांदा ‘सदरमट्ट आनीकट्ट’ आणि ‘पेड्डा चेरू’  या तेलंगणा राज्यातील दोन साईट्सना ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’  म्हणून पुरस्कृत केले गेले होते.  

2020 च्या 71व्या  सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये जगातील 14 साईट्सना ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’  म्हणून पुरस्कृत केले जाणार आहे.  यापैकी भारतात आंध्र प्रदेशमधील ‘कुंबम तलाव’, ‘के. सी. कॅनल’ , ‘पोरुममीला टँक’ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धामापूर तलाव यांचा समावेश आहे.  

Sunday 29 November 2020

किंग ऑफ व्हॅक्सीन: डॉ.सायरस पूनावाला


भारतासह जगभर पसरलेल्या कोरोना संसर्गाच्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी लस निर्मितीच्या कामात  पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट गुंतली आहे. ऑक्सफर्डच्या माध्यमातून सिरमकडून विकसित केली जाणारी ही लस लवकरच उपलब्ध होणार असून पहिल्यांदा भारताला प्राधान्य दिले जाणार आहे. मग अन्य देशात ही लस पोहचणार आहे.  त्यामुळे सध्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ.सायरस पूनावाला यांचेही नाव  चर्चेत आहे. त्यांना 'किंग ऑफ व्हॅक्सीन' या नावाने ओळखले जाते. देशातील जनतेसाठी अत्यावश्यक तसेच परवडणारी औषधे बनवण्याचा उद्देश उराशी बाळगून 1966 साली डॉ.सायरस पूनावाला यांनी सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली.या काळात परदेशातून भारतात मोठया प्रमाणात औषधे आयात केली जात. त्यामुळे या औषधांच्या किंमती जास्त असत. सर्वसामान्य लोकांना ती परवडत नसत. मात्र सायरस यांनी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून  सर्वसामान्यांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देत आज संस्थेने मानाचे स्थान मिळवले आहे. संस्थेने  रेबीज, गोवर, गालगुंड, रूबेला, डांग्या खोकला, टिटॅनस, घटसर्प, क्षयरोग, रोटा व्हायरस आणि हिपॅटायटिस-बी जीवरक्षक प्रतिबंधक लसींचे अब्जावधी डोस उत्पादन करून अनेक देशांना वितरित केले आहे.

संशोधक वृत्ती नसानसांत भिनलेले डॉ.पूनावाला हे अत्यंत कडक शिस्तीचे मानले जातात. त्यांचा स्वभाव अत्यंत रोखठोक असा आहे. वेळोवेळी त्यांच्यातील सडेतोडपणा व स्पष्टवक्तेपणा अनेकांनी अनुभवला आहे. प्रचंड कष्ट करण्याची क्षमता व कामाप्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या बळावरच त्यांनी संस्थेला आंतरराष्ट्रीय लौकिक प्राप्त करून दिला आहे. डॉ.सायरस आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे दोघेही एकेकाळचे बीएमसीसीचे आणि वर्गमित्र आहेत. या जोडगोळीने आपापल्या क्षेत्रात उतुंग यश मिळवले आहे. त्यांची मैत्री आजही टिकून आहे. अलीकडेच फॉर्ब्सच्या यादीत डॉ. पूनावाला यांना टॉप टेनमध्ये समावेश झाला आहे. भारतातील श्रीमंतांच्या या यादीत मुकेश अंबानी यांचे पाहिले स्थान कायम आहे. तर सिरमचे। सर्वेसर्वा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायरस पूनावाला यांनी सहावे स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ झाली असून पूनावाला यांनी सहावे स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ झाली असून पूनावाला यांची संपत्ती 11.5 बिलियन डॉलर एवढी आहे. त्यांचे पुत्र आदर पूनावाला यांच्याकडे सध्या सिरम या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी आहे. डॉ. सायरस यांना मागील वर्षी 'आयसीएमआर' जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. पुण्यातील मांजरी येथे विस्तीर्ण जागेत पसरलेली सिरम ही संस्था अत्याधुनिक तंत्रज्ञानायुक्त आहे. येथून जगभरातील 170 देशांत औषधांचा पुरवठा केला जातो. जगभरातील 65 टक्के बालकांनी एकदा तरी सिरमच्या औषधांचा डोस घेतला असेल, असे अभिमानाने सांगितले जाते. सायरस यांचा पूर्वी घोड्यांचा व्यवसाय होता. त्यातूनच ते पुढे औषध निर्मितीकडे वळले. मुंबईत ते 750 कोटींच्या घरात राहतात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday 28 November 2020

जगभरात आगीमुळे4400 प्रजाती धोक्यात


जगभरात आगीच्या बदलणाऱ्या घटनांमुळे तब्बल 4400 प्रजाती धोक्यात आल्या आहेत,असे एका नव्या संशोधनात समोर आले आहे. इंडोनेशियातील ओरांगउटानसह पशुपक्ष्यांच्या अनेक प्रजातींचा यात समावेश आहे.'सायन्स' या नियतकालिकेत प्रकाशित झालेल्या या संशोधनाद्वारे पर्यावरणावर होणारे प्रतिकूल मानवी परिणाम टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. संशोधकांच्या मते नुकत्याच लागलेल्या आग्नेय आशिया, दक्षिण अमेरिका, क्विंसलँडपासून आर्क्टिक सर्कलपर्यंत लागलेल्या आगीनी परिसंस्था नष्ट झाली.आफ्रिकेतील सव्हान्नासारख्या परिसंस्थेसाठी सततच्या आगी महत्त्वाच्या आहेत. या भागात आगीच्या घटना कमी झाल्यास झुडुपांचे अतिक्रमण होऊ शकते.त्यातून मोकळा परिसर पसंत करणारे काळविटासारखे शाकाहारी प्राणी विस्थापित होऊ शकतात.मानवी हस्तक्षेपाबरोबर जागतिक तापमानवाढ ,जैविक आक्रमण आदी कारणांचा समावेश होतो.

मेलबर्न विद्यापीठाचे संशोधक ल्युक केली म्हणाले,"नव्या उपायांमध्ये मोठ्या प्रमाणावर आधीवासांची पूननिर्मिती,कमी ज्वलनशील मोकळ्या हिरव्या जागांची निर्मिती आदी उपायांचा समावेश होऊ शकतो. आगीमुळे वनस्पती व प्राण्यांच्या अनेक प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. जगात काही भागात अतिशय मोठ्या आगी लागत आहेत.या ठिकाणी आगी लागण्याचा इतिहासही आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण युरोप व पश्चिम अमेरिका तील जंगले आणि झुडुपांमध्ये आग अधिक काळ धुमसत असल्याचे तसेच आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण संशोधकांनी व्यक्त केले आहे.

Friday 27 November 2020

महात्मा ज्योतिबा फुले


विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्हय़ातील कटगुण हे होते. त्याच गावी त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. 

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद््रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्‍चय केला. त्याप्रमाणे त्यांनी १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली. ज्योतीबांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त महिलांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होत. मानवी हक्कावर १७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला.

कोणताही धर्म ईश्‍वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे, असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्‍वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. त्यांनी लिहिलेल्या 'शेतकर्‍याचा असूड' या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्‍वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या 'सार्वजनिक सत्यधर्म' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे. २४ सप्टेंबर १८७३ रोजी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. तृतीय रत्न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे. त्यांनी २८ व्या वर्षी १८५५ साली हे नाटक लिहिले.

माउंट एव्हरेस्टची उंची 0.86 मीटरने वाढली


नेपाळमध्ये 2015 साली झालेल्या भूकंपानंतर जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची घटल्याचा दावा केला जात होता. या दाव्यातीळ तथ्य पडताळून पाहण्यासाठी चीन आणि नेपाळ याांनी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची नव्याने मोजणी  मोजणी करण्याचे काम हाती घेतले होते.त्यानुसार माऊंट एव्हरेस्टची 0.86 मीटरने वाढली आहे. नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे. त्याची अधिकृत उंची  48.886  मीटर (29 हजार 29 फूट) इतकी आहे. 1954 मध्ये भारतीय सर्वेक्षण विभागाने पहिल्यांदा या शिखराची उंची मोजली होती. अनेकांनी शिखराची उंची मोजली होती. मात्र, 1954 साली केलेली मोजणी अधिकृतरित्या स्वीकारण्यात आली. 1975 मध्ये चिनी सर्वेक्षकांनी माउंट एव्हरेस्टची उंची मोजली होती. त्यावेळी एव्हरेस्टची उंची  8848.13  मीटर इतकी उंची नोंदवण्यात आली होती. माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. एका माहितीनुसार नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणून ओळखले जाते तर तिबेटमध्ये चोमो लुंग्मा म्हणतात. 1856 मध्ये ब्रिटिश राजवटीमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये या शिखराची उंची 29 हजार 29 फूट इतकी निश्चित करण्यात आली. या अगोदर हे शिखर 'पीक XV' या नावाने ओळखले जात होते. त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल) ॲन्ड्‌र्‍यू वॉ होते. त्यांनी आपल्या 1843 मध्ये निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याचे म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.1865 पासून माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.

माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून हे शिखर सर करण्याचा प्रयत्‍न करतात. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी के२ अथवा कांचनगंगा या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे. इतर कोणत्याही 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत, तरीही अतिउंची व खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात. या शिखरावर पहिली चढाई 1953 मध्ये ब्रिटिश मोहिमेतील न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली. त्यानंतर आजवर 2 हजार 436 गिर्यारोहकांकडून 3 हजार 679  चढाया झाल्या आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Tuesday 24 November 2020

रोहिणी भाजीभाकरे: विश्वविक्रमी उपक्रम


कुठल्याही कामात लोकसहभाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे लोकांना त्याचे मोल कळते आणि त्यांच्या सहभागातून काम तडीस नेले जाते. असाच प्रयत्न प्रशासकीय स्तरावरून एखाद्या उपक्रमाचा मोठ्या कार्यक्रमातून जनजागृती केल्यास नागरिकांच्या मनावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्राची कन्या असलेल्या आणि तामिळनाडू राज्यातल्या सेलमच्या तत्कालीन जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिद्री यांनी लोकसहभागातून जागतिक हात धुवा दिन साजरा केला. आणि त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली. 2018 साली हा उपक्रम राबविला होता. त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. यातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व चांगल्यारितीने समजले होते. 

जनतेची स्वच्छतेविषयी जाणीव समृद्ध होऊन सुदृढ, निरोगी व आरोग्यदायी, आनंदी जीवनासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जागतिक स्तरावर 15 ऑक्‍टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून तामिळनाडू राज्यातील सेलमच्या तत्कालीन जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्राच्या कन्या रोहिणी भाजीभाकरे-बिद्री यांनी 2018 साली एका मैदानावर एकाच वेळी 4 हजार 24 नागरिकांना एकत्र करत, अनुभवी प्रशिक्षणार्थीकडून याबाबत मार्गदर्शन करत नागरिकांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करून घेतली होती. याची नोंद जागतिक गिनीज बुकामध्ये करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतेच्या विविध कार्यक्रमापैकी वैयक्तिक स्वच्छता हात धुणे हा एक कार्यक्रम आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम 15 ऑक्‍टोंबर रोजी सर्वत्र राबविला जातो. प्रशासकीय स्तरावर या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाते. परंतु इतर नागरिकांकडून या उपक्रमात पाहिजे, तसा प्रतिसाद मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन सेलमच्या तत्कालीन जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिद्री यांनी प्रशासकीय स्तरावर या उपक्रमाचे दोन टप्प्यात आयोजन करून, एका मैदानावर एकाच वेळी 4 हजार 24 नागरिकांना एकत्र करीत अनुभवी प्रशिक्षणार्थी लोकांकडून हात धुण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले होते. बरेच आजार हे हात व्यवस्थित न धुतल्याने कसे कमी होतात व आरोग्याच्या दृष्टीने हात धुणे किती महत्वाचे आहे, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली होती. त्यामुळे एकाच वेळी एकाच मैदानावर चार हजारांपेक्षा अधिक लोकांनी व त्याचवेळी संपूर्ण सेलम जिल्ह्यात बारा लाख लोकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला होता. यामध्ये गृहिणी, विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्वांचाच समावेश होता. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक गिनीज बुकने घेतली आहे. विशेष म्हणजे ही महाराष्ट्रासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे.सध्या कोरोना या महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. यावर उपाय म्हणून शासनाकडून नागरिकांना हात धुण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. परंतु रोहिणी भाजीभाकरे यांनी 2018 साली नागरिकांमध्ये हात-धुण्याबाबत प्रशासकीय स्तरावर मोठा कार्यक्रम घेऊन जनजागृती केली होती. यातून त्यांची भविष्याबाबतची दूरदृष्टी दिसून येते. रोहिणी भाजीभाकरे या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रुक येथील रहिवासी आहेत. त्यांचे हे प्रशासकीय स्तरावरील कार्य नक्कीच  अभिमानास्पद व कौतुकास्पद असेच आहे. 

 

Monday 23 November 2020

ख्वाला अलरोमेथी :विक्रमी जगभ्रमंती


माणसाने मनात आणलं तर तो काहीही करू शकतो. याची उदाहरणं आपण नेहमी पाहतो. माणसाच्या जिद्द, कठोर मेहनत आणि सातत्यापुढे काहीच अशक्य नाही. हेच एका अरब तरुणीने करून दाखवलं आहे. संयुक्त अरब अमिरातीची रहिवासी असलेल्या डॉ. ख्वाला अलरोमेथी या तरुणीने  तीन दिवस, 14 तास, 46 मिनिटे आणि 48 सेकंदात सात खंड आणि 208 देशांचा प्रवास करणारी जगातील पहिली महिला ठरली आहे.  ख्वालाच्या या विक्रमाची घोषणा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डे'च्या निमित्ताने नुकतीच करण्यात आली आहे. ख्वालाची ही जगभ्रमंती 13 फेब्रुवारी 2020 रोजी सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे पूर्ण झाली.  कोरोनाचा संसर्ग जगात वाढण्यापूर्वी तिने हा आपला प्रवास पूर्ण केला होता.  'गिनीज बुक'ने आता तिला प्रमाणपत्र दिले आहे.  वेगवेगळ्या देशांची संस्कृती जाणून घेण्यासाठी ख्वालांनी हा प्रवास केला. तिला हेही सिद्ध करून दाखवायचं होतं की, अरब देशातील लोकदेखील इतर देशांप्रमाणे विश्वविक्रम करू शकतात.

याआधी हा विश्वविक्रम ज्युली बेरी आणि कसी स्टीवर्ट या अमेरिकन जोडगोळीच्या नावावर होता. त्यांनी 92 तास, 4 मिनिटं आणि 19 सेकंदात 208 देशांतून प्रवास केला होता. मात्र हा विक्रम ख्वालाने मोडीत काढला आणि जगभरात तिचं नाव झालं. विशेष म्हणजे याआधी कोणत्याही तरुणीनं,  तेही एकट्यानं असा प्रवास केला नव्हता. सर्वात तरुण,एकट्या प्रवासी-सोलो ट्रॅव्हलर म्हणूनही कमी वेळात जास्तीत जास्त देशात जाण्याचा विक्रम तिने केला. यंदा गिनिज रेकॉर्डची थीमच होती,'डिस्कव्हर युअर  वर्ल्ड'!  गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने ख्वालाचे हास्यमुद्रा असलेले अनेक फोटो आपल्या वेबसाइटवर टाकले आहेत. यात  गिनीज बुकने तिचा जगातील विविध सुंदर ठिकाणांसमोर 'हिजाब' घातलेला फोटो प्रसिद्ध  केला आहे. तिने हा सगळा प्रवास विमानाने केला आहे. ख्वालाच्या म्हणण्यानुसार, तीन दिवसांत इतका लांबचा वेगवान प्रवास करणे तितकेसे सोपे नव्हते.  ती म्हणते की या कार्यासाठी खूप संयम राखावा लागतो. तिला यातून एकच सांगायचं आहे की, महिलादेखील मनात आणलं, तर अशक्य ते शक्य करू शकते. तिला जे हवं ते ती करू शकते. मुळात तिचा देश खूप काही वेगळं करणारा आहे. जगातील सर्वात उंच इमारत असो किंवा तिथल्या पोलिसांकडे जगातील वेगवान कार असो,अनेक गोष्ट तिथे आश्चर्य देणाऱ्या आहेत. मग इथल्या महिलांनी आश्चर्यकारक काही केलं म्हणून बिघडलं कुठं? म्हणूनच तिने हा आश्चर्यजनक प्रवास केला.  तिने आपल्या  यशाचे श्रेय मित्र आणि तिच्या कुटुंबीयांना देते.  ख्वालाला मिळालेला हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तिने आपल्या देशाला आणि समाजाला समर्पित केला आहे.  तिला वाटतं की, तिच्या या विक्रमाने प्रेरित होऊन बहुतांश महिलांनी अशा प्रकारचा प्रवास करायला पुढं यावं.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Sunday 22 November 2020

ओम महाजन: सायकलिंगमध्ये विश्वविक्रम


एकादा छंद माणसाच्या आयुष्याला कलाटणी देऊन जातो. त्यामुळे माणसानं कोणता तरी एक छंद जोपासायला हवा. नाशिकच्या 17 वर्षाच्या ओम महाजनला सायकलिंगचा छंद होता आणि आज त्यातूनच त्याने एक विश्वविक्रम केला आहे. त्याने काश्मीर ते कन्याकुमारी अंतर 8 दिवस, 7 तास, 38 मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. काश्मीरमधील श्रीनगरच्या जगप्रसिद्ध लाल चौकातून ओमने 13 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी राइडला सुरुवात केली. ओमने 3 हजार 900 किलोमीटर अंतर 8 दिवस 7 तास 38 मिनिटांत पूर्ण केले. ओम नेहमी सायकलिंगमध्येच असायचा, पण एक प्रकारे ते स्प्रिंटींग प्रमाणे असायचे. त्याने नेहमीच सायकलिंगचे स्वप्न पाहिले आणि लॉकडाऊन सुरू झाल्यावर रेस एक्रॉस अमेरिकामध्ये सहभागी होण्याचे ध्येय ठरवले. नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार होती,पण 600 किलोमीटरच्या पात्रता फेरीत सहभागी होण्यात अडचण निर्माण झाली.त्यामुळे  त्याने रेस एक्रॉस इंडियाला प्राधान्य दिले. 

मुलांनी शाळा व कॉलेजसाठी सायकलचा वापर करावा ‘बी कूल.... पेडल टू स्कूल’ हे स्लोगन घेऊन ही राइड ओमने  केली.शिवाय नाशिक सायकलिस्टचे दिवंगत अध्यक्ष जसपाल सिंग यांना ती समर्पित केली आहे. श्रीनगर - दिल्ली - झांशी ते नागपूर, हैदराबाद - बंग‌ळुरू - मदुराई ते कन्याकुमारी असा त्याचा मार्ग होता. ओमने त्याचे वडील डॉ. हितेंद्र आणि काका डॉ. महेंद्र महाजन यांचे मार्गदर्शन व प्रेरणा घेऊन ही गरुडझेप घेतली. श्रीनगरपासून त्याने सुरुवात केली आणि मध्यप्रदेशमधील संततधार पावसातून मार्ग काढत दक्षिणेच्या दिशेने वळला. तेथून तो आपल्या इच्छित स्थळी पोहचला. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीनगर ते कन्याकुमारी सर्वात वेगवान सायकल प्रवासाचा विक्रम यापूर्वी ओमच्या काकांच्याच नावे होता. पुढे तो विक्रम भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू यांनी मोडला. पन्नू यांनी 8 दिवस 9 तासांत हे अंतर पार केले. गिनीज बुकमध्ये त्याची नोंद होणे बाकी होते.त्यापूर्वीच नाशिकचेच रॅम विजेते सायकलपटू डॉ. हितेंद्र महाजन यांचा चिरंजीव असलेल्या या ओमने नवा विक्रम नोंदवला. त्यामुळे रेकॉर्ड पुन्हा नाशिकच्याच नावे झाला आहे. ओमचे वडील हितेंद्र आणि काका महेंद्र यांनी एकत्रित संघ तयार करून 2015 मध्ये रेस एक्रॉस अमेरिका स्पर्धा जिंकली होती. त्यांच्या खात्यावर सर्वात जलद गोल्डन क्वॉर्डीलेटरलचा विक्रमही नोंद आहे. कोविड-19च्या संकटामुळे कंसास (अमेरिका) येथे लवकर जाता आले नाही. या ठिकाणी ओमने क्रीडा व्यवस्थापनाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. अजून अभ्यासक्रम सुरू झाला नाही,तोपर्यंत त्याने सरावासाठी वेळ सत्कारणी लावला.ओमचे पुढील लक्ष्य रेस एक्रॉस अमेरिकाचे आहे.ही स्पर्धा जगातील सर्वात कठीण मानली जाते. यात यश संपादन करण्यासाठी12 दिवसांत 4 हजार 800 किलोमीटर सायकलिंग करावे लागते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Thursday 19 November 2020

डॉ. शकील अहमद- अव्वल शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश


जम्मू-काश्मीरचे रहिवासी असलेले डॉ. शकील अहमद हे भारताच्या 313 वैज्ञानिकांपैकी एक आहेत, ज्यांची स्टॅनफोर्ड विद्यापीठाने अव्वल वैज्ञानिक म्हणून निवड केली आहे.  प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील पहिल्या दोन टक्के शास्त्रज्ञांची यादी जाहीर केली असून, या यादीत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने भारतीयांच्या नावांचा समावेश आहे.  या शास्त्रज्ञांमध्ये डॉ. शकील यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. खरं तर देशाच्या अतिदुर्गम भागातल्या स्थानिकांना शिकवण्यासाठी शकील अहमद यांनी बर्‍याच मोठ्या ऑफर नाकारल्या. ते पुंछ जिल्ह्यातील मेंढर येथील शासकीय पदवी महाविद्यालयात रसायनशास्त्र शिकवतात. ते त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पिढीतील सुशिक्षित व्यक्ती आहेत. अहमद यांना पहिल्यापासूनच   समाजासाठी काहीतरी करण्याची सुप्त भावना होती. त्यांना  शिक्षणासाठी करावा लागलेला संघर्ष माहित होता. वडिलांचे निधन झाले तेव्हा ते केवळ एक वर्षाचे होते. मुळातच हुशार असलेले अहमद यांनी केवळ शिष्यवृत्तीच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण केले.  मर्यादित साधनं असलेल्या राजौरीमध्ये ते लहानाचे मोठे झाले.

सन 2017 मध्ये अहमद यांनी दिल्ली येथील 'आयआयटी'मध्ये शिक्षण घेतले.याच दरम्यान त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात अध्यापन करण्याची ऑफर आली.  त्यांना आपल्या भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात विज्ञान शिकण्यास प्रोत्साहित करायचे होते. पुढे  अहमद यांच्या प्रयत्नांचे परिणामही दिसून आले.  तीन वर्षांपूर्वी तेथे मोजकेच विद्यार्थी होते, जे रसायनशास्त्रातील तज्ञ होते.  आज त्यांच्याकडे केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांची मोठी तुकडी आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात 50 टक्के मुली आहेत. कॉलेज व्यतिरिक्तचा बहुतेक वेळ ते रिसर्चमध्ये घालवतात. सध्या ते  पॉलिमर्स विकसित करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या संशोधन कार्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळांची गरज आहे,मात्र तेवढा खर्च पेलवणारा नाही.त्यामुळे त्यांना  त्यासाठी दिल्लीला जावं लागतं. तसेच अधिकृत सुटी असली की ते जामिया मिल्लिया इस्लामियाला जातात.

 प्रयोगशाळा बनवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च येतो.   इतका निधी नाही.  जामियातून पीएचडी आणि आयआयटी दिल्लीच्या संशोधनामुळे त्यांना दोन्ही संस्थांच्या प्रयोगशाळांमध्ये काम करण्याची परवानगी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये अहमद यांची तीसहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाली आहेत. विज्ञान क्षेत्रात त्यांचं नाव प्रस्थापित झालं आहे.  ते अमेरिकेच्या केमिकल सोसायटी आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे सदस्य आहेत.  पॉलिमर, नॅनो मटेरियल आणि ग्रीन मटेरियल या क्षेत्रात त्यांनी पंधरा पुस्तके लिहिली आहेत. अहमद यांच्या व्यतिरिक्त जम्मू-काश्मीरमधील आणखी दोघा डॉक्टरांनाही त्यांच्या संशोधनासाठी जगातील आघाडीच्या वैज्ञानिकांमध्ये स्थान मिळाले आहे.  शेर-ए-काश्मीर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे माजी संचालक डॉ. एम.एस. खुरू आणि इंटरनल-पल्मोनरी मेडिसिन विभागाचे डॉ. परवेझ ए कौल यांचाही स्टॅनफोर्डच्या यादीत समावेश आहे.  डॉ. एम.एस. खुरु 'हेपेटायटीस-ई' मधील संशोधनासाठी जगभरात ओळखले जातात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Wednesday 18 November 2020

दुर्मिळ विषारी साप:पोवळा


दुर्मिळ विषारी जातीचा साप महाराष्ट्रासह गुजरात,पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि कर्नाटकात अनेक ठिकाणी आढळून येतो. या सापाला हिंदीत कालाधारी मुंगा असे संबोधले जाते.इंग्रजीत याचे नाव कोरल स्नेक असे आहे तर शास्त्रीय भाषेत याला कॅलीऑपीस मेलानुरस म्हणतात. हा साप जाडीने कमी आणि रंगाने फिकट तपकिरी , डोके आणि मानेचा रंग काळा असतो तर शेपटीवर दोन काळे कडे असतात.पोवळा हा वाळ्या सारख्या दिसणारा व वाळ्यापेक्षा काहीसा मोठा साप आहे. जमिनीखाली गवत,दगडाखाली वास्तव्यास असतो. याची लांबी 35 ते 54 सेंटीमीटर असते. आकाराने लहान असल्याने हा साप अन्य प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडतो. हा साप लाजाळू असतो.हा अतिशय विषारी असून सहसा मानवीवस्तीत आढळत नाही.या सापाचे विष मज्जा संस्थेवर परिणाम करत असल्यामुळे चावल्यास सूज येणे,चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणं दिसतात. चावलेला भागात यातना होतात. वीस ते तीस मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येण्याची शक्यता असते.या सापळा डिवचल्यास शेपटी वर करून खवल्याचा लाल व निळा रंग प्रदर्शित करतो.  हा साप दुर्मिळ असल्याने सर्पदंशाच्या घटना अभावानेच आढळतात. प्रजनन सुकलेल्या पाळापाचोळ्यात किंवा दगडाच्या सपाटीत 7 समजून स्वतःहून पकडण्याची चूक करतात. त्यामुळे धोका निर्माण होतो. वास्तविक कोणताही साप दिसला तरी त्याला न मारता सर्पमित्र अथवा कोणत्याही प्राणीमात्रास कळवावे. सर्पजातीचे संरक्षण होणे गरजेचे आहे, कारण साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. अलीकडच्या काळात हा साप अमरावती, यवतमाळ, भंडारा,सांगली जिल्ह्यात अनेकदा आढळून आला आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

Monday 16 November 2020

मध्य हिमालयीन प्रदेशातील 25 पिके लुप्त


 कुमाऊं क्षेत्रात बलिया बेसिनच्या हवामान बदलावर करण्यात आलेल्या  संशोधनानुसार पारंपारिक शेती, अन्न सुरक्षा आणि लोकांच्या आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम दिसून आला आहे.  सरासरी तापमानात एक डिग्री सेल्सिअसपर्यंत फरक दिसून आला असून पावसाच्या प्रमाणातही चार मिलिमीटरपर्यंत वाढ झाल्याचं आढळून आलं आहे.  पिकाच्या 25 प्रजाती नामशेष झाल्या आहेत.  काही पिके वेळेआधीच तयार होत आहेत.  साहजिकच त्याचा परिणाम उत्पादनावरही होत आहे.  याव्यतिरिक्त, पारिस्थितिकी तंत्र (इकोसिस्टम) मध्ये वेगवान बदल नोंदविण्यात आला आहे.  या संशोधनात सरकारकडून जमीन वापराच्या धोरणासह  विविध विषयांवर ठोस उपाययोजना तयार करण्याची मागणी होत आहे.

 या संशोधन कार्यासाठी, केंद्र सरकारच्या भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, विद्यापीठ अनुदान आयोग संशोधन प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प यांनी आर्थिक आणि अन्य मदत केली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आशिया पॅसिफिक नेटवर्क, आंतरराष्ट्रीय जल व्यवस्थापन संस्था यांसारख्या संस्थादेखील यात सहभागी झाल्या आहेत.  संशोधक मोहनसिंग संमाल आणि त्यांचे संशोधन संचालक डॉ. भगवती जोशी यांनी मानवीय शेती, अन्न सुरक्षा आणि मानवी आरोग्यावर होणार्‍या हवामान बदलाच्या परिणामाचा अभ्यास करण्यात आला. अशा प्रकाराचे हे पहिले संशोधन आहे, ज्यासाठी मध्य हिमालयीन प्रदेशात पसरलेल्या बलिया बेसिनच्या सुमारे 82 चौरस किलोमीटर क्षेत्राची निवड केली गेली होती.

भौगोलिकदृष्ट्या हा प्रदेश अत्यंत संवेदनशील भौगोलिक भाग (मध्यम आणि शिवालिक हिमालय) आहे. संशोधनानुसार पांढरा मका, कुळथी डाळ, भट्ट, चनौसी, सकमत, नागरेकोटी, लाल भात, अंजना, के -22, ज्वार, बाजरी, मंडुआ, कौशी, जेथी, तारुन, कुउला, कचनार, गुळार, करुआ, कुकुराचा, बिच्छू गवत किगुडा यासारखी पिके या प्रदेशातून लुप्त झाली आहेत.

एवढेच नव्हे तर तिथल्या राहणीमानानुसार  लवकर तयार होणाऱ्या  पिकांकडे लोक आकर्षित झाले आहेत. अशा पिकांमुळे केवळ महिलांच्या आरोग्यावरच विपरित परिणाम होत नाही तर एका वर्षात अनेक पिके घेतल्यामुळे इथल्या मातीचेही आरोग्य बिघडत चालले आहे. पूर्वी सहा महिन्यांचे पीक घेतल्यानंतर शेतं रिकामी ठेवली जायची, परंतु आता दर दोन ते तीन महिन्यात मका, भाज्या इत्यादी पिकं घेतली जात आहेत.  पारंपारिक शेतीऐवजी हायटेक शेती केली जात असल्याने पिकांवर विविध रोग पडत आहेत. यासाठी संशोधनात भू-उपयोग नियोजन धोरण तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.

 संशोधन अहवाल काय सांगतो-

 या संशोधन अहवालात मध्य हिमालयीन भू-भागाच्या अभ्यास क्षेत्रातील सरासरी तापमानात जवळपास एक डिग्री सेल्सिअसची घट नोंदली गेली आहे.  पावसाच्या प्रमाणातही चार मिमीने वाढ झाली आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांच्या संख्येत सरासरी 46 टक्के घट झाली आहे. सतत होणारा पाऊस आता चार ते सहा दिवस अगोदरच थांबत आहे. डॉ.भगवती जोशी यांच्या म्हणण्यानुसार हे संशोधन करायला पाच वर्षे चार महिने लागले. 14 ऑक्टोबर 2014 रोजी या संशोधनाचे काम सुरू झाले होते आणि  ते 9 जानेवारी 2020 रोजी पूर्ण झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Friday 13 November 2020

लोणार सरोवर: आंतरराष्ट्रीय पाणथळ


उल्कापातामुळे निर्माण झालेल्या आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराची आंतरराष्ट्रीय ओळख आता आणखी भक्कम झाली आहे.कारण या खाऱ्या पाण्याच्या सरोवराला 'आंतरराष्ट्रीय पाणथळ' हा दर्जा मिळाला आहे. 'रामसर' मध्ये भारतातील एकूण 41 पाणथळ जागांचा समावेश झाला आहे. आता लोणार सरोवराची यात वर्णी लागली आहे. जगभरातील पाणथळ जागांचे संरक्षण करण्याबाबत उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी इराणमधील रामसर येथे पर्यावरण आणि निसर्ग तज्ज्ञाची परिषद 2 फेब्रुवारी1971 रोजी झाली होती. पाणथळ जागांचे संरक्षण, संवर्धन आणि विकास करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने जागतिक सहकार्य घेऊन कृती करणे हा उद्देश परिषदेत ठरवण्यात आला होता. हे प्रसिद्ध लोणार सरोवर साधारणपणे 50 ते 55 हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. अंदाजे 60 मीटर लांब आणि काही कोटी टन  वजनाच्या लघुग्रहाने आपल्या पृथ्वीवर जोरदार टक्कर दिली. या टकरीत 60 ते 70 लाख टन वजनाच्या अणुबाँब स्फोटाएवढी ऊर्जा निर्माण झाली. याचा परिणाम म्हणजे 1.83 किलोमीटर व्यासाचे आणि जवळपास 150 मीटर खोलीचे आघाती विवर (खोल खड्डा) तयार झाले.  लोणार सरोवर म्हणजेच हे विवर.याच्या सभोवतालच्या परिसराचे पाच विभाग केले आहेत. पहिला म्हणजे उल्कापातामुळे झालेल्या विवराच्या बाहेरचा प्रदेश, उताराचा भाग, तेलाचा सपाट भाग, भोवतालचा दलदलीचा भाग आणि शेवटचा भाग म्हणजे सरोवर. बसाल्ट खडकात (अग्निजन्य) निर्माण झालेले जगातील सर्वात मोठे आघाती विवर, हे सरोवराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यातील पाणी वर्षभर खारटच असते. या पाण्यात जवळपास 11 ते 12 विविध प्रकारचे क्षार आढळतात. क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने या पाण्यात कोणताही जीव जगूच शकत नाही. से.जी.अलेक्झांडर या इंग्रज अधिकाऱ्याने 1823 मध्ये या सरोवराचा अभ्यास केला, मात्र कित्येक वर्षे हे उपेक्षितच होते. त्यानंतर 1965 च्या सुमारास आलेल्या एका वृत्तपत्रीय लेखातून लोकांना  थोडीफार माहिती मिळाली. अनेक संशोधन संस्थांनी 1972 मध्ये केलेल्या संशोधनाअंती लोणार सरोवर आघाती विवर असल्याचे सिद्ध झाले. आणि खऱ्या अर्थाने याची जगाला ओळख झाली. तेव्हापासून आजपर्यंत असंख्य देश-विदेशातील संस्था आणि व्यक्तींनी यावर संशोधन केले. जगात यासारखे केवळ तीन सरोवर असल्याने 'नासा'सारख्या संस्थांनीदेखील याची दखल घेतली. चंद्र आणि मंगळावरील विवरांचा अभ्यास करण्यासाठी आज देश-विदेशातील अभ्यासक इथे भेट देण्यासाठी येतात. सरोवराच्या काठावर तसेच गावच्या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील 15 मंदिरे विवरामध्येच सामावली आहेत.  सभोवताली अनेक पुरातन वास्तूदेखील आहेत. या सर्व मंदिरांचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीने केलेले आहे. घनदाट झाडी, मंदिरे यामुळे इथे अभ्यासकांसोबतच भाविकही गर्दी करतात. सरोवर आणि आजूबाजूच्या निसर्गाचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने हा परिसर वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. आता 'रामसर'मध्ये सरोवराचा समावेश झाल्याने या भागाचा आणखी विकास होण्यास मदत होणार आहे.

पाणथळ जागांमध्ये जैवविविधतेचा विकास आणि संवर्धनाचे कार्य सुरू असते. मात्र जगातील अनेक पाणस्थळांचा व्यावसायिक उपयोग केला जातो अथवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशाप्रकारचे नैसर्गिक पाणवठे हे विविध जीवजंतुनचे संरक्षक आणि उत्पादक परिसंस्था म्हणून ओळखले जातात. तलाव, खारफुटी वने, नद्या ,दलदल, प्रवाळ बेटे आणि सरोवरे पाणथळ म्हणून ओळखले जातात. नैसर्गिक ठिकाणांबरोबरच कृत्रिम मिठागरे आणि भातशेतीसुद्धा पाणथळच असते. यावर्षी दख्खनच्या पठारावर असलेले बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आणि उत्तर प्रदेशातील किथम या मानवनिर्मित तलाव या दोन ठिकाणांची 'रामसर'मध्ये समावेशासाठी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार हे दोन्ही पाणथळ आता 'रामसर' च्या संकेतस्थळावर झळकली आहेत. यामुळे लोणार सरोवराला असलेली आंतरराष्ट्रीय ओळख आणखी भक्कम होईल. याबरोबरच जगभरातील पर्यटक आणि निसर्गप्रेमींची पावले लोणारकडे वळतील. शिवाय लोणार सरोवराच्या विकासासाठी आता सरकारला उपाययोजना कराव्या लागणार आहेत. 

या सरोवराचे पाणी खारट असल्याने गोडेपणी अथवा नदीप्रमाणे जीवजंतू येथे आढळत नाहीत. पाणी बाहेर पदन्यास वाव नसल्याने उन्हाळ्यात बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. सरोवराच्या काठावर पक्ष्याच्या 160 प्रकारच्या जाती आढळतात. सरपटणारे 46 प्राणी तसेच 12 प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात. यामध्ये दुर्मिळ असलेल्या राखाडी लांडग्याचाही समावेश आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली

Wednesday 11 November 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान

१) देशात डाळींचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते?
२) पश्‍चिम घाटात किती किलोमीटर लांब पर्वत आहे?
३) 'बॉर्न अगेन ऑन द माउंटन' पुस्तकाचे लेखक कोण?
४) धातुशास्त्रावर संशोधन करणारी झारखंडमधील संस्था कोठे आहे?
५) देशातील पहिले अणुशक्ती केंद्र कोठे उभारण्यात आले?
उत्तर : १) मध्यप्रदेश २) १७00 क.मी ३) अरुणमा सिन्हा ४) जमशेटपूर ५) तारापूर
वाढवा सामान्य ज्ञान
१) कोणत्या ग्रहांना जुळे ग्रह असं म्हणतात?
२) जस्टीस आंदोलनाचे नेते म्हणून कोणाला ओळखतात?
३) राष्ट्रीय विज्ञान संस्था कोठे आहे?
४) चाणक्य यांचं संपूर्ण नाव काय?
५) २0१४ चा मिस युनिव्हर्स किताब कोणी जिंकला?
उत्तर : १) पृथ्वी व शुक्र २) व्ही. रामस्वामी ३) कोलकाता ४) विष्णूदास गुप्ता ५) पलुनाना वेगा
 वाढवा सामान्य ज्ञान
१) द. आफ्रिकेच्या शेअर बाजाराचे नाव काय?
२) 'अमृतवेल' या कादंबरीचे लेखक कोण?
३) ढगांच्या अभ्यासाला काय म्हणतात? 
४) ओबी ही नदी कोणत्या देशातून वाहते?
५) अवकाशात बंदुकच्या गोळीच्या आकाराचा उपग्रह कोणी पाठवला आहे?
उत्तर : १) जेएसई २) वि.स.खांडेकर ३) मेटेरॉलॉजी ४) रशिया ५) चीन
वाढवा सामान्य ज्ञान
१) क्रिकेटचा पहिली वर्ल्ड कप स्पर्धा कोणत्या वर्षी पार पडली? 
२) 'इस्त्रो'च्या व्यावसायिक विभागाचे नाव काय?
३) 'राजीव गांधी खेल अभियान' चे बदललेले नाव काय?
४) जागतिक चिमणी दिन कधी साजरा केला जातो?
५) युरोपियन युनियनचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर : १) १९७५ २) अँट्रिक्स कॉर्पोरेशन ३) खेलो इंडिया ४) २0 मार्च ५) ब्रिसेल्स
वाढवा सामान्य ज्ञान
१) अल्बानियाची राजधानी कोणती?
२) झुलू ही आदिवासी जमात कोणत्या प्रदेशात राहते?
३) 'रेड टेप अँड व्हाईट कॅप' चे लेखक कोण?
४) इरावती नदीवरील मोठे बंदर कोणते?
५) इंग्लंडमधील राजे-राण्या, प्रसिद्ध पुरुष आणि बेनामी सैनिकांच्या समाध्या कोठे आहेत?
 उत्तर : १) तराना २) सुदानी गवताळ प्रदेश ३) पी.व्ही.आर.राव ४) मंडाले ५) वेस्ट मिनिस्टर अँबे   
 

लक्ष्मी मेनन: रद्दी कागदांपासून बनवला इको-पेन


माणसाच्या डोक्यात कल्पना कोठून येतात कळत नाही, पण त्यामुळेच नवनवीन शोध लागले. संशोधनं झाली आणि त्यामुळे माणसाचं आयुष्य आरामशीर झालं. असं असलं तरी काही शोधांमुळे ,काहींच्या अतिरेकामुळे पर्यावरणाला हानी पोहचते. काही उत्पादनं मनुष्य-प्राणी-पक्षी यांच्या जीवावर उठली. आज प्लास्टिक हे एक उदाहरण आहे. अशी असंख्य उत्पादनं आहेत. पण काही माणसं पर्यावरणाची काळजी घेत एखादं उत्पादन बनवतात व ती लोकप्रिय बनवतात. असंच एक उत्पादन केरळ राज्यातल्या लक्ष्मी मेनननं बनवलं आहे. ते आहे, रद्दीच्या कागदांपासून बनवलेलं पेन. 'युज अँड थ्रो' असलेला हा पेन उपयोग संपल्यावर टाकाऊ असला तरी त्यात असलेल्या झाडाच्या 'बी' मुळं कुठं तरी एकादं रोप उगवतं आणि पुढे जाऊन त्याचं झाड होतं. पर्यावरणावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये हे पेन फारच लोकप्रिय झालं आहे. हे अप्रत्यक्षपणे वृक्षारोपण करण्यासारखं आहे.

लक्ष्मीचा जन्म केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एका छोट्याशा गावात झाला. केरळ भेटीत ती अनाथ मुलांना शिल्पकला शिकवायची.  दरम्यान, तिने त्यांना कागदापासून पेन कसे तयार करायचे हे शिकवले.  तिने अशा काही पेना बनवून  सॅनफ्रान्सिस्कोमधील एका आर्ट गॅलरीला पाठविले होते आणि विकले गेले होते. या पेना एका कार्यशाळेत मुलांनी बनवल्या होत्या.   येथूनच मग पेपर पेनमध्ये विविध झाडांच्या बियाणांचा अंतर्भाव  करण्याची कल्पना पुढे आली आणि शिवाय  पर्यावरणाला धोका असलेल्या प्लास्टिक पेनला पर्याय म्हणूनही  हा पेन पुढे आला.

लक्ष्मीने आणखी एका गोष्टीची निर्मिती केली आहे.ती आता केरळमधल्या घराघरांत पाहायला मिळते.ती म्हणजे चेकुट्टी बाहुली. कापडाच्या चिंध्यापासून बनवलेली ही बाहुलीदेखील खूप चर्चित आहे. तिला केरळमधील विनाशकारी पूरानंतर याची कल्पना आली.  विणकरांचे गाव असलेले चंदमंगलम एका आठवड्यापेक्षा अधिक काळ पाण्याखाली होते.  यात खूप कपडे भिजले. अक्षरशः त्याच्या नंतर चिंध्या झाल्या.  या चिंद्यामधून तिने एक चेकट्टी बाहुली बनविली. आणि पुढे तिने या बाहुल्यांची निर्मितीच सुरू केली. आज केरळमधील प्रत्येक घरात एक बाहुली आहे.  लक्ष्मी मेनन आज इको-पेन आणि चेकुट्टी बाहुल्यांचे उत्पादन घेऊन कोट्यवधी रुपयांची मालकीण बनली आहे. लक्ष्मी सांगते की, आपलं डोकं नेहमी रिकामं असावं. त्यामुळे अनेक आयडिया सुचतात. संकटातून बाहेर पडण्याचा मार्गदेखील सापडतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Tuesday 10 November 2020

गोवा आणि कॅसिनो


देशविदेशातील पर्यटकांना सुट्टीचा विषय आला की 'गोवा' आठवतो. गोवा म्हटले की येथील निसर्गरम्य समुद्रकिनारा, पर्यटन स्थळे व कॅसिनो लोकांना खुणावतात. त्यात कॅसिनोमध्ये देशी विदेशी पर्यटक भेट देऊन आपले नशीब आजमावण्याचा प्रयल करतात. सणवार किंवा 'विकेंड' चा प्लॅन करून पर्यटक गोव्यात येतात. कॅसिनोंना भेट देण्यासाठी लाखो देशी विदेशी पर्यटक गोवा गाठतात. राज्यात कॅसिनो हे 1999 सालापासून सुरू आहेत. देशात गोवा हे एकमेव राज्य आहे, जिथे जुगार कायदेशीर चालतो. इथे कॅसिनोचा 400 कोटीच्यावर व्यवसाय चालतो.यातून राज्य सरकारला चांगला महसूल मिळतो. राज्यात सध्या सुमारे 15 कॅसिनो असून त्यातील सहा 'ऑफ शोअर' (किनाऱ्याबाहेर) कॅसिनो व उर्वरीत ‘ऑन शोअर' (जमिनीवर) कॅसिनो आहेत. 'ऑफ शोअर' कॅसिनो हे केवळ पणजी शहराच्या समोरील मांडवी नदीच्या पात्रात आहेत. राज्यातील नऊपैकी आठ जमिनीवरील कॅसिनो उत्तर गोव्यात असून फक्त एकच दक्षिण गोव्यातील एका तारांकीत हॉटेलात आहे. या कॅसिनोंना दर दिवसाला सूमारे 25 हजार ग्राहक भेट देतात. ही संख्या विकेंडला वाढते. कॅसिनोंच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात पहिल्यांदा 'गेमिंग कमिशन' नेमण्यात आले आहे.

कॅसिनोत प्रवेशासाठी 2 हजार 500 ते 8 हजार
रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येते. ग्राहकाला जुगार
स्वत:च्या पैशातून खेळावा लागत असला तरी, तेथील
खाद्य पदार्थ, मद्यपान व मनोरंजन कार्यक्रमांचा आस्वाद कितीही वेळा घेण्यास मिळते. त्यामुळे अनेक
पर्यटक कॅसिनोंना भेट देण्याला पसंती देतात. गोव्यातील ऑफ शोअर कॅसिनोवर शेजारील राज्यातील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. विकेंडला शेजारील राज्यातील नागरिक खासगी वाहने घेऊन पणजीत येतात. या शिवाय दिल्ली, पंजाब, तामीळनाडू आदी राज्यातील लोक देखील कॅसिनोत जायला रांगा लावत असतात. राज्यात विधानसभेची निवडणूक झाली की सत्तेवर आले सरकार कॅसिनो व्यवसायाला पाठींबा देते. आणि कॅसिनोतविरोध करत अलेल्या संघटना व स्वयंसेवी संस्थांसोबत विरोधी पक्षही जोडला जातो. त्यानंतर
विरोधकांकडून येणाऱ्या 'कॅसिनो बंद करा' च्या घोषणांना अनदेखा करत व त्यांना पदराखाली घेत सत्ताधारी पक्ष तथा सरकार कॅसिनोतून मिळत असलेल्या महसूलाची आकडेवारी पुढे करते. राज्यातील निवडणूकींमध्ये कॅसिनो मांडवीतून
हटविण्यात येईल, हा मुद्दा बहुदा सर्वच पक्षांच्या
जाहीरनाम्यात असतो.
कॅसिनोच्या व्यवसायातून सरकारला मोठे उत्पन्न मिळते. तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कॅसिनो महत्वाची भूमिका निभावते. कॅसिनो व्यवसायातून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. राज्य सरकारला 2018-19 या
आर्थिक वर्षात, 'ऑफ शोअर' आणि 'ऑन शोअर'
या दोन्ही कॅसिनो व्यवसायातून 411 कोटींचा महसूल
प्राप्त झाला आहे. छोट्या कॅसिनोमध्ये 200 ते 250 जणांना प्रवेश दिला जातो, तर  मोठ्या कॅसिनोमध्ये 500 ते 600 लोकांना प्रवेश दिला जातो. इथे खास जुगार खेळायला लोक येतात. काही लोकं मजा म्हणून खर्च करतात तर काही लोक खरोखरच नशीब अजमावयाला येतात. आत प्रवेश मिळाल्यावर खाण्या-पिण्यावर मोफत कितीही ताव मारला मिळते.

Sunday 8 November 2020

हरप्रीत सिंह- भारतीय विमान कंपनीची पहिली महिला प्रमुख


'एअर इंडिया'च्या पहिल्या महिला पायलट हरप्रीत एडी सिंह यांनी 32 वर्षांपूर्वी या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी महिलांना मार्ग मोकळा करून दिला. त्या आता गव्हर्नमेंट एव्हिएशन सर्व्हिसच्या प्रादेशिक सहाय्यक अलायन्स एअरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्या आहेत.हरप्रीत सिंग यांची 1988 मध्ये 'एअर इंडिया'मध्ये महिला पायलट म्हणून नियुक्ती झाली होती. आरोग्याच्या कारणामुळे त्यांना विमानाचे उड्डाण करता आले नसले तरी उड्डाण सुरक्षेच्या दिशेने त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  त्या भारतीय महिला पायलट असोसिएशनच्या अध्यक्षही होत्या.  एयरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष आणि मुख्यालयात परिषद सदस्य म्हणून त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवला आहे.

 'आयजीआरयूए'कडून 'कॉर्मिशयल पायलट'चा परवाना मिळविण्याबरोबरच त्या एक पात्र प्रशिक्षिकाही आहेत. विमान आणि उड्डाण सुरक्षेशी संबंधित असलेल्या विविध लोकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्याचं काम करतात. त्या भारतातल्या उड्डाण सुरक्षिततेच्या पहिल्या महिला प्रमुख आहेत. याव्यतिरिक्त, त्या सेवेच्या मानवीय पैलू आणि सहयोगी विभागाच्या प्रशिक्षणासाठी विविध अभ्यासक्रम आयोजित करतात, ज्यामध्ये एअरलाइन्स आणि कॉर्पोरेट संस्थांचे लोक देखील सहभाग घेतात.एक महिला म्हणून 'पहिली' हा शब्द त्यांच्या नावाशी अनेक गोष्टींमध्ये जोडला गेला आहे. त्या 'एअरलाइन्स'मधील गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या पहिल्या महिला प्रमुख आणि 'आयओएसए', 'आयएसएजीओ' आणि 'एलओएसए' साठी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता आणि सुरक्षा मानदंडांच्या पहिल्या मुख्य लेखा परीक्षक आणि मूल्यांकनकर्ता आहेत.  त्यांनी सिक्युरिटी मॅनेजमेंट अँड रिस्क मॅनेजमेन्ट मध्ये डिप्लोमा केला आहे.  'एअरलाइन्स'मधील आपत्कालीन प्रतिक्रिया विभागाच्याही त्या पहिल्या महिला प्रमुख म्हणूनही होत्या. त्यांनी 'एअरलाइन्स' सेवेमध्ये मानवीय प्रतिसादासाठी  'एंजल्स ऑफ एअर इंडिया' ला आकार दिला आणि पर्यावरण व्यवस्थापन आणि हरित उपक्रम प्रमुख म्हणूनही काम केले.  हरप्रीत यांच्याकडे या सर्व उपलब्ध्या आहेत, ज्यामुळे नागरी विमान वाहतुकीच्या 110 वर्षांच्या इतिहासातील भारतीय एअरलाईन्सच्या सीईओ पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.  खुल्या अवकाशात उड्डाण करू इच्छिणाऱ्या  प्रत्येक मुलीसाठी त्या प्रेरणा आहेत. इथे एक गोष्ट जाणून घेणे मनोरंजक ठरेल, ते म्हणजे एअर इंडियामध्ये महिला वैमानिकांची संख्या सर्व भारतीय एअरलाईन्सपेक्षा सरासरीने अधिक आहे.  एवढेच नव्हे तर जगभरात महिला वैमानिकांच्या संख्येत सरकारी विमानसेवा खूप पुढे आहे.  महिला वैमानिकांची संख्या जगात सरासरी दोन ते तीन टक्के आहे, परंतु भारतात हेच प्रमाण सरासरी दहा टक्के इतके आहे.  इतकेच नव्हे तर गेल्यावर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एअर इंडियाच्या 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 देशांतर्गत उड्डानांचे महिलांनी संचालन केले. यात चालक म्हणून फक्त महिलाच होत्या.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत


पन्हाळा


पन्हाळा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य ठिकाण असले तरी पन्हाळा हे एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून एक हजार फूट उंचीवर आहे.

पन्हाळ्याला साधारण बाराशे वर्षांचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते. हे नाव पाली भाषेतील आहे. येथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला. २ मार्च १६६0 ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढय़ात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६00 माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद  व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. 

१६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१0 मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली. 

गडावरील  राजवाडा पाहण्यासारखा आहे. हा ताराबाईचा वाडा होय. यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे. राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. ही सज्जाकोठी.याच इमारतीस संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यास ठेवले होते. शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत.

राजदिंडी  ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजी महाराज सिद्दी जौहरचा वेढय़ातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले. अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहेत. यात वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेर्‍या, दारूगोळ्याची कोठारे आणि एक टाकसाळ होती.

 गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. याला सोमाळे तलाव म्हणतात. तळ्याच्या काठावर सोमेश्‍वर मंदिर आहे. या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्र मावळ्यांनी लक्ष चाफ्याची फुले वाहिली होती. तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची. याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते, त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुत: हा पागा आहे. मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत. जवळच  एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे. संभाजी मंदिरापुढे गेल्यावर एक झोकदार इमारत दिसते, ती धर्मकोठी. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.

तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानींची, काळ्या दगडांची वास्तू दिसते. ती म्हणजे अंदरबाव. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे, तर मधला मजला हा चांगला ऐसपेस आहे. त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो. राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. याच्या बांधणीवरून ते साधारण १000 वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय. तीन दरवाजाचे नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इ. स. १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६0 मावळ्यानिशी किल्ला जिंकला.


कुणाची काय कामे


केळ्याचे साल : पृथ्वीची भेट घडवून देणारा दलाल.

सिनेमा हॉल : पैसे देऊन अटक करुन घ्यायचे ठिकाण

जेल : विना पैशाचे वसतीगृह

चिंता : वजन कमी करण्याचे सर्वात स्वस्त औषध.

मृत्यू : पासपोर्ट शिवाय पृथ्वी सोडून जाण्याची सुट.

कुलुप : बिनपगारी वॉचमन

कोंबडा : खेड्यातील अलार्म घडी

भांडण : वकीलाचा कमावता पुत्र.

स्वप्न : फुकटचा चित्रपट.

दवाखाना : रोग्यांचे संग्रहालय.

स्मशान भूमी : जगाचे शेवटचे स्टेशन,

देव : कधीच न भेटणारा महाव्यवस्थापक.

विद्वान : अकलेचा ठेकेदार.

चोर : रात्री काम करणारा प्रामाणिक व्यापारी.

जग : एक महान धर्मशाळा.

●●●●●●●●

आयुष्याच्या चित्रपटाला, वन्स मोअर नाही... हव्याहव्याशा वाटणाऱ्या क्षणाला, डाउनलोड करता येत नाही. नकोनकोशा वाटणाऱ्या क्षणाला, डिलीट ही करता येत नाही... कारण हा रोजचा तोच तो असणारा, रिअॅलीटी शो असणार नाही... म्हणून सगळ्यांशी प्रेमाने वागा, कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. 

●●●●●●●●

जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते ! फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते! पैशाला महत्त्व देणारा भरकटतो तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो!

●●●●●●●

गुरुजी : 'मी उपाशी आहे' या वाक्यात कोणता काळ आहे?

बंड्या : दुष्काळ.

कपडे फाटेपर्यंत बंड्याला हाणला

*********

शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा  'सापाच्या शेपटीवर पाय देणे'

गण्या : बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे...

संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

हा बदल नक्की केव्हा झाला?


वीस पंचवीस वर्षांपूर्वी नोकरी करणारा मुलगा पगार निमूटपणे वडिलांच्या हातात देत होता, ! मग वडील त्यातून घरातला काही खर्च करायचे, थोडी बचत केली जायची आणि मुलाला येण्याजाण्याच्या तिकीटापुरते आणि दिवसाला फार तर एक चहा पिता येईल इतके पैसे दिले जात होते. आता मुलाला पगार किती मिळतो हे विचारायला आई-वडील कचरतात. मुलगा त्या पैशाचे काय करतो हे विचारायची हिम्मत-इच्छा आई-वडिलांकडे नसते...! हा बदल केव्हा झाला....?

कॉलेजमध्ये जाताना साडी ऐवजी पंजाबी ड्रेस घालायला मिळतोयाचा आनंद मानणारी मुलगी आता तिच्या मुलीला हाफ पेंन्टमध्ये फिरताना बघते. मनातल्या मनात चरफडते पण स्पष्टपणे मुलीला अंगभर कपडे घाल असे म्हणायची हिंमत करत नाही....! हा बदल केव्हा झाला....?

वयात आलेली मुलगी संध्याकाळच्या आत घरात असायची, घरकामात मदत करायची. आता एकदा स्वयंपाक घरात येऊन खायला काय आहे ते बघते आणि स्वतःच्या खोलीत जाऊन परस्पर ऑर्डर करून खाणं मागवते. हा बदल केव्हा झाला......?

लग्नाअगोदर मुला-मुलीने एक-दोन वेळा भेटणे म्हणजे पुढारलेपण मानणारे आता नातवंडांचे लिव इन रिलेशनशिप स्वीकारतात. हा बदल केव्हा झाला.....?

वर्षातून एकदा होळीच्या वेळी मोठ्या लोकांपासून लपून भांग पिण्याचा कार्यक्रम ठरवणारी आता प्रौढ झालेली माणसं घरातल्या तरुण मुलंपुढे सहज ग्लास भरु लागली. हा बदल कधी झाला....?

नातवंडांना जवळ घेणारी, नातीच्या केसांना तेल लावून देणारी, गोष्टी सांगणारी आजी, आता सकाळी योगा क्लासला जाते आणि नातवंडांशी टीव्हीच्या रिमोटसाठी भांडते. हा बदल केव्हा झाला.....?

घरातल्या कोणाशी बोलत नाहीत अशांना कॉन्सिलर जवळचा वाटतो. त्याला पैसे देऊन त्याचा सल्ला मागतात; पण स्वतःच्या भावंडांवर विश्वास ठेवायला तयार नसतात. तोच प्रकार पैशाच्या व्यवहाराबद्दल. नवरा-बायको दोघेही कमावतात. पण कुठे खर्च झाले. किती गुंतवले, कुठे गुंतवले. ते फक्त सीएला माहित असते. मुलीच्या संसारातले सगळे लहानसहान तपशील जाणून घेणारे आई-वडील, मुलगा आणि सुनेच्या बाबतीत मात्र अलिप्त राहतात. असं का होतंय.....?

वडीलधाऱ्यांचा मान ठेवणाऱ्यांच्या मुली नवऱ्याचा येता-जाता अपमान करतात, सगळ्यांसमोर उणं-दुणं काढतात. अशा वेळी मुलीचे आई-वडील कसनुसं हसतात आणि मुलाचे आई-वडील हतबद्ध होतात. हा बदल कधी झाला......?

तरुण मुले एक नोकरी सोडतात, दुसरी धरतात. राहत्या गावातून दुसऱ्या गावी जातात. सगळे ठरल्यावर आई-वडिलांना फक्त सांगितले जातं. त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तर आई-वडिलांना सांगण्याचीही गरज नसते. मित्रांबरोबर ट्रीपला जाणे, ब्रेकअप होणे,

सिनेमाला जाणे, पार्टी करणे, स्वतःसाठी नवीन वस्तू, फोन, कपडे वगैरे खरेदी करणे, अशा गोष्टीत आई-वडिलांनी दखल दिलेली मुलांना आवडत नाही. असं का होतं..? हा बदल कधी झाला.......?

नातेवाईकांकडे जाणं, शेजाऱ्यांकडे वेळप्रसंगी जाणं, लग्न समारंभात सहभागी होणं, कुळाचार पाळणे, देवळात जागे, पूजा करणे, इत्यादी गोष्टींवर आता काही घरात नाराजी नाही तर भांडणे होतात. असं का होतं...? हा बदल कधी झाला.... ?

मान्य आहे. दोन पिढ्यांमध्ये अंतर असतेच. पाचवारी नेसणाऱ्या सुनेबद्दल नऊवारी नेसणाऱ्या सासूने तेव्हाही नाराजी व्यक्त केली होती. पण आता पन्नाशी पार केलेल्या पिढीत आणि त्यांच्या मुलांच्या पिढीत अंतर नाही दरी निर्माण झाली असं वाटतं. हा बदल नक्की केव्हा झाला.......? खरंच विचार करायला हवा...

संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

अंतराळातून सीमेवर शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी उपग्रहाचे प्रक्षेपण


इस्त्रोच्या १0 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने ७ नोव्हेंबर २०२० रोजी आपल्या अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईटसह १0 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. इस्रोच्या या पावलामुळे आता शत्रूंवर अंतराळातून नजर ठेवणे सोपे होणार आहे. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटर भागातून इस्त्रो एका उपग्रहाचे करण्यात आले. इस्रोचे हे ५१ वे मिशन आहे.

इस्त्रोने शनिवारी दुपारी ३ वाजून १२ मिनिटांनी अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट इओएस-0१चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या स्पेस स्टेंटरवरुन या सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या काळात भारताने प्रथमच आपले सॅटेलाईट अंतराळात प्रक्षेपण केले आहे. पीएसएलव्ही-सी ४९ च्या माध्यमातून इओएस-0१ आणि इतर ९ कर्मशिअल सॅटेलाईटचे अंतराळात प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोने प्रक्षेपित केलेल्या ९ विदेशी उपग्रहांमध्ये लिथुआनियाचा एक, ल्युक्सेमबोर्गचे चार आणि अमेरिकेच्या चार उपग्रहांचा समावेश आहे. यासोबतच रिसॅट -२ बीआर-२ सह इतर वाणिज्यक सॅटेलाईट्सचं प्रक्षेपण अंतराळात करण्यात आले. आगामी डिसेंबर महिन्यात पीएसएलव्ही सी-५0 आणि जानेवारी २0२१ मध्ये जीसॅट-१२आर यांचे सुद्धा अंतराळात प्रक्षेपण केले जाणार आहे. 

सैन्याला ठरणार उपयुक्त 

ईओएस-0१ अर्थ ऑब्झर्व्हेशन रिसेट सॅटेलाईटचे अँडव्हान्स सीरीज आहे. यामध्ये सिंथेटिक अँपर्चर रडार लावण्यात आले आहे. जे कुठल्याही वेळी आणि कुठल्याही वातावरणात पृथ्वीवर लक्ष ठेवू शकेल. या उपग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्याद्वारे ढगांच्या आड असतानाही पृथ्वीवर लक्ष ठेवून स्पष्ट चित्र टिले जाऊ शकते. याचा फायदा भारतीय सैन्याला होणार आहे. भारताने अंतराळात या उपग्रहाचे प्रक्षेपण केल्यामुळे पाकिस्तान आणि चीनची अवस्था खूपच बिकट झाली आहे. ईओएस-0१ अंतराळातून असे फोटोज क्लिक करेल जे इतर उपग्रहांना शक्य नाहीये. हा उपग्रह सीमेवरील शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठीही प्रभावी ठरणार आहे. तसेच शत्रूंच्या हालचालींबद्दल अचूक माहिती देऊ शकेल. भारताने नुकताच अमेरिकेसोबत बीईसीए- करारावर स्वाक्षरी केली आहे ज्याद्वारे सीमेवर लक्ष ठेवण्यास मदत होईल. 


Friday 6 November 2020

निसर्ग सौंदर्याने नटलेले माथेरान


माथेरान म्हटलं की, डोळ्यांसमोर उभी राहते ती गर्द हिरवाई आणि खऱ्या अर्थाने झुकझुक चालणारी रेल्वे. साधारण ८०३ मीटर किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा वैविध्यपूर्ण, घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्चिम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. या कडांनाच पॉइंट्स म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉइंट्सना नावे दिली. त्यामुळे सहाजिकच पॉइंट्सची नावे इंग्रजीत आहेत. मॅलेट नावाचा इंग्रज अधिकारी सन १८५० मध्ये ठाण्याचा कलेक्टर होता. त्याने चौक गावातून हा डोंगर पाहिला. तो स्वतः एक ट्रेकर होता. त्यामुळे तो डोंगराकडे आकर्षित झाला. स्थानिक व्यक्तीला बरोबर घेऊन तो आत्ताच्या वन ट्री हिल पॉइंटवरून  वर चढला आणि रामबाग पॉइंटवरून खाली उतरला.  नंतर याच आकर्षणामुळे तो पुन्हा एकदा इथे आला  आणि राहण्यासाठी घर बांधले. त्याच्या मागोमाग  त्याचा इतर मित्रपरिवार आणि इंग्रज माथेरानला  स्थायिक झाले.

माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा  सुटावलेली, वेगळी डोंगररांग आहे. कल्याणच्या मलंगगडापासून ती सुरू होते. मलंगगडाला लागून बदलापूरच्या 'टवली' गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर 'नवरानवरी'चा डोंगर लागतो. यावर असणाऱ्या बारीकसारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर 'म्हैसमाळ' नावाचा डोंगर लागतो. नंतर आरपार भोक असणारा 'नाखिंद' डोंगर लागतो आणि  मग 'पेब' दिसतो. त्याच्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत. यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो.

माथेरानचे हवामान अतिथंड किंवा उष्ण असे कधीच नसते. येथील सहलीच्या दृष्टीने सर्वांत योग्य काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च महिन्यात आहे. या काळात झालेल्या पावसाने माथेरान हिरवेगार झालेले असते. ठिकठिकाणी धबधबेही दिसतात. माथेरानच्या जंगलात १५० प्रकारचे वृक्ष आढळतात. विविध जातींच्या तसेच औषधी वनस्पतीही इथे आहेत. हे जंगल सदाहरित व निमसदाहरित या प्रकारांत मोडते. त्यामुळे जास्त पर्जन्यमानाला अनुकूल असणारी जांभूळ, हिरडा, बेहडा, खैर, पांढरीची झाडे दिसतात. या जंगलाचा फायदा म्हणजे कुठल्याही पॉइंटवर जाताना सावली मिळते व उन्हाचा कधीही त्रास होत नाही. इथल्या पक्षिसृष्टीत बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बुलबुल,दयाल, लार्क, तांबट, किंगफिशर, धनेश, रॉबिन, बार्बेट आदी पक्षी आहेत.पॅराडाइज,फ्लायकॅचर एक पांढराशुभ्र व लांब शेपटी असणारा पक्षी येथे आढळतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Wednesday 4 November 2020

बाबा नेहमीच मागे का असतात...


●आई नऊ महिने ओझं वाहते, वडील २५ वर्षे ओझं वाहतात. दोघेही बरोबरीचे आहेत, तरीही... बाबा मागे का आहेत? हे माहीत नाही,

● आई कुटुंबासाठी मोबदला न घेता काम करते, बाबा कुटुंबासाठी सर्व पगारच खर्च करतात. दोघांचे प्रयत्न समान आहेत. तरीही... बाबा मागे का पडतात? हे माहीत नाही.

● आई आपल्याला पाहिजे ते शिजवते. बाबा आपल्याला पाहिजे ते खरेदी करतात. दोघांचे प्रेम समान आहे, परंतु आईचे प्रेम वरिष्ठ म्हणून दर्शवले जाते. बाबा मागे का पडतात? हे माहीत नाही.

●जेव्हा आपण फोन करतो तेव्हा आपल्याला आधी आईशीच बोलावेसे वाटते. दुखापत झाल्यास आपण 'आई गं' असेच ओरडतो. जेव्हा आपल्याला वडिलांची गरज असते तेव्हाच आपल्याला त्यांची आठवण होते. परंतु वडिलांना कधीच वाईट वाटले नाही, की इतर वेळी मुलांना आपण आठवत नाही. पिढ्यान्पिढ्या मुलांचे प्रेम मिळवतांना आपण पाहतो, की बाबा नेहमीच मागे पडतात का? हे माहीत नाही.

● कपाटांमध्ये रंगीबेरंगी साड्या आणि मुलांसाठी पुष्कळ कपड़े भरलेले असतात, परंतु वडिलांकडे फारच कमी कपडे असतात. कुटुंबीयांच्या गरजेपुढे त्यांना स्वतःच्या गरजेची काळजी नसते. तरी... बाबा अजूनही मागे का आहेत? हे माहीत नाही.

●आईकडे सोन्याचे अनेक दागिने असतात; पण वडिलांकडे एकच रिंग असते, कदाचित ती ही नसते. तरीही आई कमी दागिन्यांची तक्रार करते, आणि बाबा कधीच करत नाहीत. तरी अजूनही बाबा मागे का आहेत? हे माहीत नाही.

● आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी बाबा आयुष्यभर खूप कष्ट करतात, पण घरातच जेव्हा जेव्हा ओळख मिळते, तेव्हा बाबा नेहमीच का मागे पडतात? हे माहीत नाही.

●आई म्हणते, ह्या महिन्यात मुलांची शिकवणी फी देण्याची गरज आहे. सणानिमित्त मला साडी घेऊ नका; परंतु वडील स्वतःसाठी नव्या कपड्यांचा साधा विचारही करत नाही, तरीही... बाबा का मागे पडतात? हे माहीत नाही.

●आई-वडील म्हातारे झाल्यावर मुले म्हणतात, आई कमीत कमी घरातील कामात मदत करते, पण ते म्हणतात, बाबा निरुपयोगी आहेत. बाबा मागे का पडतात? हे माहीत नाही.

●वडील मागे, ‘मागच्या बाजूला' आहेत. कारण ते कुटुंबाचा कणा आहेत. त्यांच्यामुळेच आपण सगळे उभे आहोत. म्हणून तर ते... मागे आहेत.

●आई श्रेष्ठ आहे. पण, म्हणून... बाबा कनिष्ठ नाहीत, एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की, कुठलाही मोठेपणा न मिरवणारा बाबा आमचा भक्कम आधार आहे.

★★★★★★

आई : किचनमधून छोटी प्लेट आण जरा,

मुलगी : कुठे आहे? दिसत नाहीये.

आई : गॅसची शेगडी दिसतेय का?

मुलगी : हो...

आई : ती पेटव आणि मोबाईल जाळ त्यात, मग दिसेल!


Tuesday 3 November 2020

चक्रीवादळ


निसर्गचक्र चालताना ऋतुत बदल होत असताना वारे बदल होतात. हे वारे कधी कधी अगदी विध्वंसकही होतात, त्यांना चक्रीवादळे असे म्हणतात. वादळांचे एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते. एखाद्या विशिष्ट ठिकाणी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमीनीच्या दिशेने वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतेच असे नाही, मात्र वाऱ्यांमध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते. भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते आणि त्यामुळे भारताकडे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हरिकेनचा धोका असतो. दक्षिण प्रशांत महासागरात आणि ऑस्ट्रेलियात साधारण नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये वादळे येतात तर आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलाही याच काळात वादळे धडकतात. अटलांटिक महासागर, मध्य व ईशान्य प्रशांत महासागर, कॅरेबियन समुद्र व मेक्सिकोच्या उपसागरात वादळ निर्माण झाले की त्यांना ‘हरिकेन’ म्हणतात. प्रशांत महासागराच्या वायव्येला निर्माण झालेल्या वादळाला ‘टायफून’ म्हणतात. हिंद महासागरात म्हणजे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातल्या वादळांना उष्णकटिबंधीय वादळे म्हटले जाते. प्रचंड पाणी, बर्फ साठलेला ढग स्वत:भोवतीच गोलगोल फिरत खाली आला की त्याला टोरनॅडो म्हटले जाते. वादळांचा वेग व त्यामुळे त्यांनी हानी करण्याची क्षमता यावरून त्यांना एक ते पाच या प्रकारात गणले जाते. ताशी 63 किमी वेगाचे वादळ – श्रेणी एक ताशी 120 किमी वेगाचे वादळ – श्रेणी दोन ताशी 119 ते 153 किमी वेगाचे वादळ – श्रेणी तीन ताशी 249 किमी वेगाचे वादळ – श्रेणी पाच. 

विशिष्ट भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. फुले, नद्या, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात. भारतीय उपखंडातल्या वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत. याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातल्या वादळांची नावे ठरवली जातात.

गाणारे गाढव


एका गावात एक गाढव राहत होते. त्याचा मालक दुष्ट होता. त्याच्याकडून काम करून घ्यायचा, पण त्याला खायला पुरेसे देत नव्हता. गाढवाची उपासमार होत असे. मग ते मालकाचा डोळा चुकवून गावाभोवतीच्या रानात जाऊन मिळेल ते खाई. असेच एकदा रानात गेल्यावर त्याची एका लांडग्याशी मैत्री झाली. दोघांनी मिळून काकडीच्या मळ्यात जाऊन भरपूर काकड्या खाल्ल्या. दोघांनाही काकड्या आवडल्या. हा दिनक्रम काही दिवस चालू राहिला. गाढव गुबगुबीत दिसू लागले होते. ते खूप आनंदात होते. रात्री लांडग्याबरोबर काकड्या खाताना गाढव म्हणाले, मला आज गावेसे वाटते आहे. मी छान गाणं म्हणतो. लांडगा घाबरला,

तो म्हणाला, असं करू नकोस, तू गाणं म्हटलस तर मळ्याचा मालक जागा होईल आणि आपल्याला मारेल; पण गाढव ऐकायला तयार नव्हते. लांडग्याने त्याला तुझा आवाज चांगला नाही, भलते धाडस करू नकोस, असे परोपरीने विनवले, पण गाढव काही ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी निरूपायाने लांडगा म्हणाला, तुला गायचे तर गा, पण मी पलीकडे जाऊन थांबतो, मग गा. असे म्हणून लांडगा मळ्यातून बाहेर पडला. गाढवाने गायला म्हणजे ओरडायला सुरुवात केली. व्हायचे तेच झाले. मळ्याचा मालक जागा झाला आणि त्याने गाढवाला बदडून काढले.

तात्पर्य : कोणतेही कृत्य करताना परिणामांचा विचार करावा.

●●●●●●●

वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात! वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा!

●●●●●●●

पुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो...

लेखक : कसे वाटले नाटक? नाटकात काही बदल आवश्यक आहेत का?

पुणेकर : नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते,

त्याऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.

लेखक : का?

पुणेकर : म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.


ह्रदयस्पर्शी सुविचार


●१) मदत करणाऱ्याला  कधीच धोका देवू नका, आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका.

●२) मुलगा आई- वडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो  पैशापुढेही आपले आई वडील आहेत हे विसरलेला असतो.

●३) आयुष्यात कितीही मोठे बना ; पण माणुसकी सोडू नका.

●४) "मदत" एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात.

●५) रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही ; त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावे लागते.

●६) पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते ; आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते.

●७) लहानपणी वाटायचे, परीक्षा फक्त शाळेतच असतात ; आज समजलं, आयुष्य जगताना खूप परीक्षा द्याव्या लागतात.

●८) वाईट दिवस अनुभवल्या शिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.

●९) लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.

●१०) घर किती मोठं आहे याला महत्त्व नसून घरात  किती सुखी आहेत हे खूप महत्त्वाचे आहे.

●११) आपल्यामधील विश्र्वास पर्वतालाही हलवू शकतो ; परंतु आपल्या मनामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतो.

●१२) गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो हे लक्षात ठेवा. 

१३) कुत्र्याचे सारे गुण माणसांनी घेतले ; पण इमानदारी नाही घेतली.

●१४) स्त्रीच्या गर्भातून जन्म घेवून त्यानेच पाटी लिहिली, "स्त्रियांना येथे प्रवेश नाही". कमाल आहे माणसा तुझी.

●जगांत तीन मुख्य आश्चर्ये आहेत-1)आपण जन्मभर ज्या "मी" बरोबर राहतो, त्याचें स्वरूप आपल्याला कळत नाही. 2)जीवनाचें सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारें करतो, ते मन आपल्या ताब्यांत येत नाही.

3) क्षणोक्षणीं प्रपंचांत सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणी तयार नाही, हे तिसरें आश्चर्य होय! 

●१५)मला कोणाची गरज नाही हा "अहंकार" आणि सर्वांना माझी गरज आहे हा "भ्रम" या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.

●१६)आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो.

●१७)स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या.

न्यूझीलंडच्या पहिल्या भारतीय वंशाच्या मंत्री: प्रियांका राधाकृष्णन


न्यूझीलंडमध्ये जॅसिंडा अर्डर्न या पुन्हा पंतप्रधान झाल्या आहेत.त्यांनी नुकतेच आपले मंत्रिमंडळ स्थापन केले असून यात 50 टक्के महिलांना संधी दिली आहे. भारतीयांसाठी गौरवाची गोष्ट म्हणजे या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या महिलेला स्थान मिळाले असून प्रियांका राधाकृष्णन या न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत.धोरणात्मकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचे ठरणारे सामाजिक वैविध्य, विकास व जनकल्याण खाते सांभाळण्याची जबाबदारी प्रियंका राधाकृष्णन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या खात्यांसह काहीसे जिकिरीचे, रोजगार खातंही त्यांच्याकडे असणार आहे.   प्रियांका केवळ भारतीय वंशाच्या नव्हेत तर त्यांना जन्म चेन्नईमध्ये झाला आहे. आईवडील दोघेही भारतीयच. चेन्नईहून हे कुटुंब सिंगापूरला गेले आणि तिथे शालेय शिक्षण पूर्ण करून प्रियंका वेलिंग्टनमध्ये समाजकार्य पदवी अभ्यासक्रमासाठी न्यूझीलंडला आल्या, तेव्हापासून इथल्याच झाल्या.आर्डर्न ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, त्या ‘लेबर पार्टी’शी प्रियंका राधाकृष्णन गेली सुमारे आठ वर्षे जोडल्या गेल्या आहेत. समाजकार्याचे शिक्षण घेत असतानाच त्या न्यूझीलंडमधील भारतीय व अन्य स्थलांतरितांच्या संपर्कात आल्या, त्यांचे प्रश्न जाणून घेताना स्थलांतरित कामगार वा नोकरवर्गाच्या समस्या तसेच कौटुंबिक हिंसाचार यांवर लक्ष केंद्रित करण्याचे प्रियंका यांनी ठरवले. ऑकलंड शहरात त्या पूर्णवेळ कामही करू लागल्या. मात्र समाजातील प्रश्न केवळ व्यक्तींमुळे निर्माण झालेले नसतात, तर धोरणांचे पाठबळ त्यांना नसते म्हणूनही वाढलेले असतात, तेव्हा धोरणे बदलण्यासाठी प्रसंगी संघर्ष केला पाहिजे, हे चेन्नईत कामगार चळवळीत असलेल्या आजोबांचे संस्कार आठवून प्रियांकाही त्या वेळी सत्ताधारी नसलेल्या लेबर पार्टीत सहभागी झाल्या. या पक्षात उमेदवार ठरवण्यासाठी ‘गुणवत्ता यादी’ तयार केली जाते. त्या यादीत २०१४ मध्ये प्रियंका २३ व्या, तर त्यानंतरच्या निवडणुकीत (२०१७) बाराव्या आल्या होत्या! या त्रैवार्षिक निवडणुकांची उमेदवारी २०१७ मध्ये त्यांना मिळाली. त्या हरल्या, पण त्यांना पक्षाच्या कोट्यातून खासदारकी देण्यात आली. यंदाच्या निवडणुकीतही अवघ्या ६०८ मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र न्यूझीलंडच्या पक्षनियुक्त खासदार पद्धतीमुळे त्यांना पुन्हा कायदेमंडळात स्थान मिळालं आणि मंत्रिपदाची कठीण परीक्षा देण्यास आता त्या सिद्ध झाल्या आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक


माणसाला राहण्यासाठी सध्या तरी पृथ्वीशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. पण अवकाशात अन्य सूर्यमालेत अथवा आपल्या सूर्यकक्षेत मानववस्ती किंवा मानवाला राहण्यासाठीचे वातावरण शोधण्याची धडपड माणूस सातत्याने करतो आहे. असं असलं तरी माणसाने पृथ्वीशिवाय राहण्याचं तात्पुरतं ठिकाण शोधलं आहे नव्हे त्याची चक्क निर्मिती केली आहे. आणि ते ठिकाण म्हणजे 'आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक'. अवकाशस्थानकाच्या माध्यमातून माणूस तब्बल दोन दशके या अवकाश स्थानकात (आयएसएस) राहत आहे. येथे तेव्हापासून अंतराळ प्रवाशांचे जाणे-येणे सुरू आहे. 2 नोव्हेंबर 2000 रोजी अमेरिकन अंतराळयात्री बिल शेफर्ड यांनी रशियन सहकारी सगेंई क्रिकालेव्ह व युरी गिडजेंको यांच्यासमवेत अंतराळ स्थानकावर पाहिले पाऊल ठेवले होते. तेव्हापासून गेल्या दोन दशकात 19 देशांचे 241 लोक या स्थानकावर राहून आले आहेत. 'आयएसएस' हे एक मोठे अवकाश यान आहे. येथे अंतराळयात्री राहतात. तसेच ही एक अद्ययावत प्रयोगशाळा असून येथे अंतराळयात्री वेगवेगळे प्रयोग अथवा शोध लावण्याचे काम करत असतात. हे अवकाशयान पृथ्वीपासून सुमारे 250 मैल म्हणजे 402 किमी अंतरावरून पृथ्वीभोवती फिरत असते. याचा ताशी वेग तब्बल 17 हजार 500 किमी इतका प्रचंड आहे. 

'अंतराळ स्थानक'चा पहिला भाग म्हणजे कंट्रोल मोड्युलच्या रुपात 1998 मध्ये रशियन रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आला. पुढे अनेक वर्षात त्याला अनेक भाग जोडले गेले. सर्व सज्जता झाल्यावर 2 नोव्हेंबर 2000 मध्ये पाहिले पथक 'आयएसएस' वर दाखल झाले. यामध्ये अमेरिका,रशिया, जपान आणि युरोपच्या प्रयोगशाळांचा समावेश यात आहे. पहिल्या त्रिकुटाने म्हणजे सर्गेई, युरी गिडजेंको आणि बिल शेफर्ड यांनी कझाकस्थानमधून 30 ऑक्टोबर2000 रोजी 'आयएसएस' च्या दिशेने झेप घेतली. या अंतराळस्थानकसाठी आतापर्यंत120 अब्ज डॉलर्स इतका खर्च आला आहे. हे यान पृथ्वीभोवती एक फेरा 90 मिनिटात पूर्ण करते. हे अवकाशस्थानक 109 मीटर लांब असून येथे पॅगी व्हिटसन या अंतराळवीराने सर्वात जास्त एकूण 665 दिवस घालवले आहेत. याया 'अंतराळस्थानका' (स्पेस स्टेशन) च्या माध्यमातून मानवाची अंतराळातील उपस्थिती निश्चित झाली. येथून लावण्यात येणारे शोध मानवासाठी लाभदायक ठरू लागले आहेत. या अवकाश स्थानकच्या माध्यमातून अवकाशातील दुसरे जग शोधणे ,हे 'नासा'चे प्रमुख लक्ष्य आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday 2 November 2020

अण्णासाहेब किलरेस्कर

 मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार, संपूर्ण नाव बळवंत पांडूरंग किलरेस्कर. जन्म धारवाड जिल्हयात गुर्लहोसूर या गावी ३१ मार्च १८४३ रोजी झाला. संगीत नाटकांचं युग सुरू करणारे रंगकर्मी म्हणजे अण्णासाहेब किलरेस्कर. संगीत सौभद्र आणि संगीत शाकुंतल या त्याकाळी गाजलेल्या आणि त्यातील नाट्यगीतांमुळे आजही लोकप्रिय असलेल्या नाटकांचे नाटककार म्हणजेच अण्णासाहेब किलरेस्कर. एका पारशी नाटकाचा प्रयोग त्यांनी पाहिला आणि असाच एखादा नाट्यप्रयोग मराठीत करून तो रंगभूमीवर आणायचा, असं त्यांनी ठरवलं. कथानक शोधता शोधता कालिदासांच्या अभिज्ञान शाकुंतल या कलाकृतीने त्यांच्या मनात घर केलं. त्यातूनच संगीत शाकुंतल या नाटकाचा जन्म झाला.

वयाच्या बाराव्या वर्षापयर्ंत कानडी व मराठी भाषांचा अभ्यास त्यांनी घरीच केला. नंतर कोल्हापूर व धारवाड येथे शिक्षणासाठी राहून मुलकी परीक्षेपयर्ंत ते शिकले. त्यापुढील शिक्षणासाठी पुण्यास असताना त्यांना नाटकांचा नाद लागला व ते नाटक मंडळयांस पदे रचून देऊ लागले. स्वत:ची नाटक मंडळी काढून त्यांनी काही नाटकेही केली. तथापि ही नाटक मंडळी मोडली आणि ते गुर्लहोसूर येथे येऊन राहिले. त्यांनंतर त्यांनी वकिलीची परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी न झाल्यामुळे ते नोकरी करू लागले. शिक्षक, जमादार आणि महसूल आयुक्ताच्या कचेरीतील कर्मचारी अशा विविध प्रकारच्या नोकर्या त्यांनी केल्या. अण्णासाहेबांनी प्रांरंभी अल्लाउद्दिनाची चितुडगडावरील स्वारी हे नाटक लिहावयास घेतले होते, ते अपुरेच राहिले. शिक्षक असताना शांकरदिग्जय हे गद्य त्यांनी लिहिले (१८७३) पुणे येथे १८८0 साली एका पारशी नाटक मंडळीचे ऑपेराच्या धर्तीवरील एक नाटक त्यांच्या पाहण्यात आले. तसे नाटक मराठीत करुन दाखविण्याची इच्छा त्यांस होऊन त्यांनी कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतल या नाटकाचे भाषांतर केले. त्यामध्ये स्वत:ची पदेही घातली आणि उत्तम नटसंच मिळवून ते रंगभूमीवर आणले (१८८0) या नाटकास लाभलेले अपूर्व यश आणि लोकप्रियता पाहून १८८0 मध्ये किलरेस्कर नाटक मंडळीची स्थापना केली. त्यानंतर सुभद्राहरणावरील संगीत सौभद्र हे नाटक स्वतंत्रपणे त्यांनी लिहिले. निधन २ नोव्हेंबर १८८५ रोजी झाले.

सोडून द्यावं


एकदोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल तर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं. विनाकारण त्यांच्यापुढं आपलं डोकं खराब करण्यात अर्थ नाही. जर काही माणसं ऐकूनही न ऐकल्यासारखं करत असतील  तर आपण त्यांच्याशी उगाचंच संवाद साधणं सोडून द्यावं. मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं सोडून द्यावं. आपल्यासाठी ते चांगलेच आहे.तसेच एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं सोडून द्यायला हवं. आणखी एक महत्त्वाचा सल्ला- आपल्या हातात काही नाही; हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं. आणि  स्वतःला जोखता आलं पाहिजे. ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागला तर स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यायला हवं. फार डोक्याला ताप करून घ्यायचा नाही. प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हटलं जातं की, तुलना करणं सोडून दिलं पाहिजे. आणि आनंदाने जगताना आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज जमाखर्चाची मांडणी करणं सोडून द्यावं.

●●●●●●●

गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते.  ते म्हणाले,''मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत: 

कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. 

'मी व्हिस्की पितो' किंवा 'मी रम पितो'

या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो?'

झम्पू : तरतरी प्रयोग..!

गुरूजींनी व्याकरणाची पुस्तके जाळली! 

●●●●●●●

घरी जाताना, मोबाईल पाहत जात होतो.शेजारच्या घरात कधी गेला  कळलेच नाही वॉट्सअँपच्या नादात! 

आणि आश्‍चर्य म्हणजे, त्या घरातील बाईने चहा आणून दिला, सिरीयलच्या नादात.. आणि नंतर थोड्या वेळाने!

मी चहा पित असताना तिचा नवरा आला घरात आणि

मी दिसताच सॉरी घर चुकले म्हणून  बाहेर निघून गेला फेसबुकच्या नादात..

●●●●●●●

मुलगा : लगीन करते का माझ्यासंग? 

मुलगी : का? 

मुलगा : लय फेमस आहे मी?  पूर्ण भारत शोधून राहिलाय मला

मुलगी : कोण रं रं रं तू?

मुलगा : म्या विकास होय...!

Sunday 1 November 2020

माणसं मनातली


मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला , शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं. काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात , आपली होऊन जातात. तर , काही कितीही सहवासात राहिली , तरी त्यांची आतून ओढ नसतेच. चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल , तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं. शरीराची सुंदरता वया बरोबर संपते , तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं , मनाला ते कधीच नसतं. शेवटी काय , आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो , शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा , शालीनता , प्रामाणिकपणा , आणि विनयशीलता असेल , तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते. म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही , देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो. आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं ! आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई. ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही. आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ? नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत. कदाचित , पुन्हा भेटतील , न भेटतील ?

●●●●●●●

मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो, विरोधात घडली की दु:खी होतो आणि स्वत:विषयीच नाराज होतो. पण आयुष्य हे असेच असते. सुख दु:खाचे हेलकावे घेतच चालावे लागते. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होते. आयुष्य सजवायचे असते ते अशा इंद्रधनुष्यांनी. तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते, इंद्रधनुष्य फुलवण्याची...!

●●●●●●

माणसाच्या परिचयाची सुरूवात जरी चेहर्‍याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मांनीच होते. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण, या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील.

●●●●●●●●

एक तंबाखू बहाद्दर आणि दारुडा दोघेही, मोटीव्हेशनच्या व्यवसायात आले!..

पहिला म्हणाला,'ज्ञानाच्या तंबाखूवर, विचारांचा चुना मळून, त्याला कर्माच्या तळहातावर, परिश्रमाच्या बोटांनी आपटल्यास, यशाची सुंदर पिचकारी मारता येते!'

दुसऱ्याने उत्तर दिले,'बुद्धीच्या बाटलीतून, सुविचारांचे मद्य, कृतीच्या पेल्यात ओतून, त्यासोबत दृढनिश्चयरुपी चखन्याचा आस्वाद घेतला असता, यशाची सुंदर झिंग आपोआप चढते!'

😅😂🤣😅😂🤣😅😂🤣😅😂

*संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली*

🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜🐜

जितेंद्र अभिषेकी


एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक म्हणून सबंध महाराष्ट्रातच नव्हे तर देशात परिचित असलेले पं जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म २१ सप्टेंबर १९३२ साली गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणार्‍या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. 

ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उदरु शेरोशायरी पयर्ंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते. सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं र्मम होते. अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवित झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे.या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होते. त्यांनी एकूण १७ नाटकांना संगीत दिले. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा.मैलाचा दगड ठरलेल्या 'कट्यार काळजात घुसली' या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या 'लेकुरे उदंड झाली' या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारे होते. अभिषेकींनी जसे स्वत: संगीत दिले तसे ते दुसर्‍यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणी साठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. तर वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गीतही त्यांनी म्हटले. आकाशवाणी वर असतांना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं. १९९५ सालच्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. ७ नोव्हेंबर १९९८ साली त्यांचे निधन झाले.

वासुदेव बळवंत फडके


वासुदेव बळवंत फडके हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचा एक आद्य प्रवर्तक. फडक्यांचे मूळ घराणे कोकणातील केळशी (रत्नागिरी जिल्हा) येथील. वासुदेवांचे आजोबा अनंतराव कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. दोन-तीन दिवस किल्ला तटवून अगतिक झाल्यावरच त्यांनी किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन केला. किल्ल्याजवळ असलेल्या पूर्वीच्या कुलाबा जिल्हय़ातील शिरढोण (रायगड) गावी पुढे फडके कुटुंबाचे वास्तव्य झाले. बळवंतरावांचा मुलगा वासुदेव. त्याचा जन्म शिरढोण येथेच ४ नोव्हेंबर १८४५  रोजी झाला.  झाला. सातव्या वर्षापासून त्याच्या शिक्षणास सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले. १८५५-६0 या पाच वर्षांत माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी झाले. घरगुती अडचणींमुळे म्हणा किंवा शिक्षणाची आवड बेताची असल्यामुळे म्हणा; पण वासुदेवाने इंग्रजी पाचवीनंतर शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली. पहिली नोकरी जीआयपी रेल्वेत केली. वरिष्ठांपुढे उगाच विनम्र होण्याचा गुण अंगी नसल्यामुळे त्यांची रेल्वेमधली नोकरी सुटली व नंतरची ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही फार दिवस टिकली नाही. शेवटी १८६३ मध्ये वासुदेव बळवंत लष्कराच्या हिशेबी खात्यात आले. त्यात ते २१ फेब्रुवारी १८७९ पर्यंत म्हणजे बंडाचा बावटा उभारीपर्यंत राहिले. मुंबईहून त्यांची बदली १८६५ साली पुणे येथे झाली आणि पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली. कचेरीतील वातावरण यांत्रिक आणि वासुदेव बळवंताची वृत्ती तर अत्यंत संवेदनशील आणि बेगुमान. वेळेवर रजा मंजूर न झाल्यामुळे आजारी आईची भेट झाली नाही, तेव्हा वासुदेव बळवंतांनी वरिष्ठांपर्यंत आपली तक्रार नोंदविली. त्यांच्या आयुष्याला क्रांतिकारक वळण लावणारी ही एक महत्त्वाची घटना होय. पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना १८७१ मध्ये झाली व तिच्यामार्फत महादेव गोविंद रानड्यांची स्वदेशी चळवळीवर दोन व्याख्याने झाली. ही व्याख्याने आणि देशी वर्तमानपत्रांचा प्रचार यांनी फडक्यांच्या क्रांतिकारक वृत्तीला खतपाणी पुरविले. ते पुण्यात देशभक्तिपर व्याख्याने देऊ लागले. १८७६-७८ या दरम्यान महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यातच प्लेग-पटकींसारख्या साथीच्या रोगांची भर पडली. गोरगरिबांचे पाण्याचे आणि खाण्याचे फार हाल झाले. शेतकर्‍यांची गुरेढोरे मेली आणि सर्वत्र मोठा हाहाकार उडाला. वासुदेव बळवंतांनी पुणे, नगर, नासिक या टापूत पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली. या दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे, त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला. एकाच वेळी सर्व ठिकाणी उठाव व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे साथीदार त्यांना मिळाले नाहीत. शिवाय पांढरपेशा सुशिक्षित वर्गात त्यांना पाठिंबा मिळेना; तेव्हा मागासवर्गातील रामोशी, धनगर अशांकडे ते वळले आणि स्वत:च्या नेतृत्वाखाली त्यांनी ही मोहीम हाती घेतली. पुण्याजवळील लोणीकंद येथे बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. सरकारी खजिने, सावकार, बनिये यांच्यावर धाडी घालण्याच्या योजना आखण्यात आल्या. शासनाची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वे, तुरुंग, तार आणि टपाल कचेर्‍या उद्ध्वस्त करण्याचे ठरले. २२ फेब्रुवारी १८७९ रोजी संध्याकाळी रामोशांच्या मोठय़ा जमावाला जेवण घालण्यात येऊन कोणास चांदीचे कडे, तर कोणास शेलापागोटे, कोणाच्या हातावर पाच-दहा रुपये ठेवण्यात आले आणि जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड उभारल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील पाच आठवडे या बंडखोरांनी धामारी, दावडी, वाल्हे, हर्णे, सोनापूर, चांदखेड आदी सहय़ाद्रीच्या कुशीतील गावे लुटली. सावकार लुटून पैसा उभारावयाचा आणि नव्या टोळ्या उभारून सरकारला 'त्राही भगवन' करून सोडावयाचे, असा वासुदेव बळवंतांचा विचार होता. त्यांचे निधन १७ फेब्रुवारी १८८३ झाला.