Friday 31 January 2020

दिनविशेष

(१ फेब्रुवारी)
१९१२ : संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार राजा बढे यांचा जन्म.
१९१७ : चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचा जन्म.
१९२९ : ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक जयंत साळगावकर यांचा जन्म.
१९४२ : नॉर्वेमध्ये क्विस्लिंग याने र्जमनांच्या हातचे बाहुले असणारे सरकार स्थापन केले.
 १९६0 : अभिनेता जॅकी र्शॉफ यांचा जन्म.
१९६४ : 'युनिट ट्रस्ट'ची स्थापना.
१९७१ : क्रिकेटपटू अजय जडेजा यांचा जन्म.
१९८६ : सुप्रसिद्ध अभिनेता बापूराव माने यांचे निधन.
२00३ : अंतराळवीर कल्पना चावलाचा मृत्यू.
२0१३ महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्यात बदल करून तो सक्षम करण्याच्या वटहुकमाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

राजा बढे

राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. राजा बढे यांचा जन्म नागपुरात, प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. १९३५मध्ये त्यांनी पंजाबची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. सुरुवातीला राजा बढे यांनी दैनिक सकाळच्या संपादकीय विभागात नोकरी केली. नंतर ते वर्षभर नागपूरच्या दैनिक महाराष्ट्रमध्ये सहसंपादक आणि त्याच वेळी वागीश्‍वरी मासिकाच्या संपादक मंडळात होते आणि पुढे सावधान साप्ताहिकात लागले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर निर्माता म्हणून काम करीत होते.

Thursday 30 January 2020

'म्हैसूर पाक'चा इतिहास

म्हैसूरमधील गजबजलेल्या सयाजी राव रस्यावरील या मिठाईच्या दुकानाकडे कोणाचे आवर्जून लक्ष जाईलच असे नाही, पण गुरु स्वीट मार्ट नामक या दुकानामागे अतिशय रोचक इतिहास आहे. फारतर तीनचार गिर्‍हाईकांना उभे राहण्यासाठी जेमतेम जागा असणार्‍या या वीतभर दुकानातच मैसूरपाक बनविण्याची कल्पना सुमारे शंभर वर्षांपूर्वी अस्तित्वात आली, आणि या पदाथार्चा जन्म झाला.
मैसूरचे महाराज कृष्णराजा वोडेयार (१८८४-१९४0) हे मोठे खवय्ये होते. निरनिराळ्या उत्तमोत्तम पदार्थांचा आस्वाद घेण्याची आवड त्यांना होती. त्यामुळे त्यांच्या अंबा विलास या महाली भला मोठा मुदपाकखाना ( स्वयंपाकघर ) असे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या:विद्या बाळ

नारी समता मंच, मिळून सार्‍या जणी, अक्षरस्पर्श ग्रंथालय, साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ, पुरुष उवाच अभ्यासवर्ग, पुरुष संवाद केंद्र सारख्या पुण्यात स्थापन झालेल्या संस्था तसेच केंद्रे ज्यांच्या मार्गदर्शनात झाल्या ते व्यक्तिमत्त्व म्हणजे विद्या बाळ होय. यासह त्यांना आगरकर पत्रकारिता पुरस्कार, कै. कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार, कै. शंकरराव किलरेस्कर पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे देण्यात येणारा सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव पुरस्कार, स्त्री-समस्यांविषयक कार्य व पत्रकारिता याबद्दल फाय फाऊंडेशनचा पुरस्कारही मिळालेला आहे.

आपल्या सामान्य ज्ञानात भर

वाढवा सामान्य ज्ञान
१) भारतातील सर्वात मोठं वस्तुसंग्रहालय कोणतं?
२) ग्रीसची राजधानी कोणती?
३) व्हेनेझुएलातील मारकैबो सरोवराचं क्षेत्रफळ किती?
४) छपाई खळ्यांचा शोध कोणी लावला?
५) क्षयरोगाच्या जंतूवर महत्त्वपूर्ण संशोधन कोणी केले?
उत्तर : १) इंडियन म्युझियम २) अथेन्स ३) १३,३३0 चौ.कि.मी.  ४) मर्गेनिथेलर ५) रॉबर्ट कॉक

दिनविशेष

(३१ जानेवारी)
१९२६ : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे निधन.
१९३१ : गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म.
१९६९: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचे निधन.
१९७५ : चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका प्रीती झिंटा यांचा जन्म.
१९८६: संगीतकार विश्‍वनाथ मोरे यांचे निधन.
२000: नाटककार वसंत कानेटकर यांचे निधन.
२00४: गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचे निधन.
२0१२ : अनुदानाचे पैसे रोख स्वरूपात लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याची अभनव योजना देशातील २0 जिल्हय़ांमध्ये सुरू होणार.
२0१३ : घरकुल घोटाळ्यातील संशयित आमदार गुलाबराव देवकर यांना अटक.
२0१५ : सरकारी नोकर्‍यांमध्ये श्रेणी तीन आणि चारच्या पदांसाठी मुलाखती घेण्याचा प्रघात बंद करण्याची पंतप्रधानांची घोषणा.

गायिका-अभिनेत्री सुरैय्या

पाकिस्तान लाहोर इथे जन्मलेल्या सुरैय्याने शास्त्रीय संगिताचे धडे घेतले नव्हते तरीही तिच्या कारकीर्दीत तिने गायलेल्या अनेक गाण्यांनी खळबळ माजवली होती. लहानपणी शाळेच्या सुट्टीत सुरैय्या अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात भाग घेत असे. अशाच एका सुट्टीत ती आपले मामा (एम. हुजूर) यांच्याबरोबर सुभाष स्टुडिओमध्ये शुटिंग पहायला गेली होती. एम. हुजूर हे चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्याचे काम करत असत. तेव्हा सुभाष स्टुडिओमध्ये 'ताजमहल'चे शुटींग सुरू असताना एका बाल कलाकाराची आवश्यकता होती. दिग्दर्शक नानुभाई वकिल यांनी सुरैय्याचं नाव सुचवलं आणि ते पात्रं तिथे रंगून शॉट ओके सुद्धा झाला. गायिका म्हणून वर येण्यासाठी सुरैय्याला संगितकार नौशाद यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.

Wednesday 29 January 2020

दिनविशेष

(३०जानेवारी)
१९११ : वि.दा.सावरकर यांना पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.
१९२९ : हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म.
१९४८ : विमानाचा शोध लावणारे राईट ऑर्व्हल यांचे निधन.
१९४८ : महात्मा गांधी यांची हत्या.
२0१३ : भारतीय वंशाच्या महिला कृष्णा अरोरा यांना सामाजिक कार्याबद्दल ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.३ २0१४ : केंद्र सरकारने वर्षाला नऊऐवजी बारा अनुदानित स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय जाहीर केला.

रमेश देव

रमेश देव यांचे आडनाव खरे तर ठाकूर देव आहे. त्यांचे बालपण कोल्हापुरात गेले. राजर्षी शाहू महाराजांमुळे त्यांचे आडनाव देव झाले. देव यांचे वडील त्या काळातील प्रसिद्घ फौजदारी वकील. महाराजांनी दिलेल्या स्कॉलरशिपवरच ते वकील झाले. एकदा एका कामात त्यांनी महाराजांना मदत केली तेव्हा महाराज म्हणाले, ठाकूर तुम्ही देवासारखे भेटलात. तुम्ही आता ठाकूर नाही-देवच! आणि तेव्हापासून या परिवाराचे देव हेच आडनाव झाले. पु.ल.देशपांडे यांनी एका चित्रपटातील भूमिका नाकारली म्हणून देव यांना चित्रपटात संधी मिळाली. रमेश देव यांनी आजवर पाचशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट केले.

Tuesday 28 January 2020

दिनविशेष

(२९ जानेवारी)
१२७४: संत निवृत्तीनाथ यांचा जन्म.
१९२२ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचा जन्म.
१५९७: मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचे निधन.
१९७0 : ऑलिम्पिक पदकविजेते नेमबाज राजवर्धनसिंग राठोड यांचा जन्म.
१९७९ : भारताच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना जोडणारी दिल्ली ते मद्रास ही तामिळनाडू एक्स्प्रेस सुरू झाली.
२0१३ : आर्थिक चणचणीमुळे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्वच मंत्रालयांच्या निधीला कात्री लावण्यास सुरुवात केली.
२0१४ : पूर्ण वाढ झालेल्या पेशींपासून भ्रूणपेशी तयार करण्यासाठीची नवी आणि सोपी पद्धत शास्त्रज्ञांनी विकसित केली.

रज्जू भैय्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक राजेंद्र सिंह ऊर्फ रज्जू भैया १९९४ ते २000 पर्यंत या पदावर होते. खर्‍या अर्थाने ते संघाचे महाराष्ट्राबाहेरचे पहिले सरसंघचालक होते. त्यांचे शिक्षण अलाहाबाद विद्यापीठात झाले आणि नंतर याच विद्यापीठात ते प्राध्यापक तसेच भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख राहिले. त्यांना घरचे लोक रज्जू असे हाक मारत असत. नंतर हेच त्याचे प्रेमाचे नाव सार्वत्रिक झाले. सरसंघचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ भाजपा आणि आरएसएस दोन्हींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. अगदी अटलबिहारी वाजपेयी असो किंवा अडवाणीजी किंवा विहिंपचे अशोकजी सिंघल, सारेच त्यांचा अत्यंत आदर करीत असत.

Monday 27 January 2020

दिनविशेष

(२८ जानेवारी)
१८६५ : स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म.
१९३0 : मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. जसराज यांचा जन्म.
१९३७ : चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर यांचा जन्म.
१९३९ : सुप्रसिद्ध आयरिश कवी डब्ल्यू. बी. यीट्स यांचे निधन.
१९८४ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी यांचे निधन.
२00४ : डेव्हिड केली मृत्यूप्रकरणी विपरीत बातम्या दिल्याप्रकरणी बीबीसीचे महासंचालक ग्रेग डाइक यांचा राजीनामा.
२00७ : संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचे निधन.
२0१३ : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातात सिनेकलाकार भालचंद्र कदम, हृदयनाथ राणे जखमी.
२0१४ : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री कुमारी शैलजा यांनी पदाचा राजीनामा दिला.

सुमन कल्याणपूर

सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ, शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो. त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली तितक्या त्या प्रसिद्धीपासून कायम अलिप्त राहिल्या. सुमन कल्याणपूर या मूळच्या बंगालच्या. बांगलादेशाची राजधानी ढाका येथे २८ जानेवारी १९३७ मध्ये त्यांचा जन्म झाला. सुमन हेमाडे हे त्यांचे माहेरचे नाव. रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्वत्र परिचित झाल्या. १९४३ साली त्यांनी मुंबईत येऊन संगीताचे रितसर प्रशिक्षण घेतले. शास्त्रीय संगीताचा त्यांनी कसून अभ्यास केला.

Sunday 26 January 2020

पन्हाळा गड

पन्हाळा हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे. सध्या पन्हाळा हे एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. भारत सरकारने या किल्ल्याला २ जानेवारी, इ. स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १000 फूट उंचीवर आहे.

Saturday 25 January 2020

सामान्य ज्ञान वाढवा

वाढवा सामान्य ज्ञान
१) जगातील पहिली भुयारी रेल्वे कोठे सुरू झाली?
२) बर्म्युडा ट्रँगल हे भौगोलिक ठिकाण कोठे आहे?
३) पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पदार्थांचा अभ्यास करणारी शाखा कोणती?
४) कोणती रेल्वे जगातील सर्वाधिक लांबीची रेल्वे समजली जाते?
५) राजस्थानमध्ये भारतीय हवाईदलाचा तळ कोठे आहे?
उत्तर : १) लंडन २) उत्तर अटलांटिक महासागर ३) जिऑलॉजी  ४) ट्रान्स सैबेरियन ५) जोधपूर

प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के.लक्ष्मण

आर. के. लक्ष्मण हे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. लेखक आर. के. नारायण यांचे लहान भाऊ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार. रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ या दिवशी म्हैसूर येथे झाला. वडील म्हैसूर येथील शाळेत मुख्याध्यापक होते. वडिलांच्या शाळेसाठी नियतकालिके त्यांच्या घरी येत असत. हार्पर्स, पंच, ऑन पेपर, बॉइज, अँटलांटिक, अमेरिकन मक्र्युरी, द मेरी मॅगझिन, स्ट्रॅण्ड मॅगझिन अशी मासिके त्यांना तिथे पाहायला-वाचायला मिळत असत. लक्ष्मण यांना त्यांतील विविध विषयांवरील चित्रे पाहण्यात रस होता. तशी चित्रे आपणही काढून पाहावी असे त्यांना वाटू लागल्याने लक्ष्मण चित्रे काढू लागले.

दिनविशेष

(26 जानेवारी)
२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन, जागतिक सूर्यनमस्कार दिन
१९६८ : लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचे निधन.
२00२ : सितारादेवी या जगप्रसिद्ध नर्तिकेने 'पद्माभूषण' हा मानाचा पुरस्कार नाकारला.
२0१३ : मोठय़ा प्रमाणावर डिझेल खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने अवलंबिलेल्या दुहेरी दर प्रणालीवर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी जोरदार हल्लाबोल केला.
२0१४ : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन निघालेली मरीन अँक्वा ही बोट अंदमान निकोबार बेटाजवळ बुडाली. २१ प्रवाशांचा मृत्यू.
२0१५ : व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचे निधन.फोकस

Friday 24 January 2020

दिनविशेष

१८६२ : सेवा सदनच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांचा जन्म.
१९५४ : साम्यवादी चळवळीचे थोर नेते मानवेंद्रनाथ रॉय यांचे निधन.
१९५८ : पार्श्‍वगायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म.
२00१ : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांना भारतर% प्रदान.
 २00१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांचे निधन.
२00२ : एअरमार्शल अर्जुनसिंग भारतीय हवाईदलाचे पहिले 'मार्शल ऑफ द एअर फोर्स' बनले.
२0१४ : प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि योगविद्येचा प्रचार-प्रसार करणारे बी.के.एस.अय्यंगार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर.

रमाबाई रानडे

रमाबाई रानडे या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. रमाबाई रानडे म्हणजे पूर्वार्शमीच्या यमुनाबाई कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी सातारा जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला.

Thursday 23 January 2020

जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र: वाराणशी

भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र, भारतातील बारा ज्योतिर्लिगांपैकी एक व त्याच नावाच्या जिल्ह्याचे आणि विभागाचे मुख्यालय. प्राचीन बौद्ध, जैन व हिंदू साहित्यात त्याची काशी वाराणसी, बनारस, अविमुक्त, आनंदवन, महाश्मशान, व्याप्ती अशी नामांतरे आढळतात. शिवाय काशेयपूर, अमरावती, केतुमती, पुष्पवती, रंगनगर, तीर्थराजी इत्यादी नावांचाही उल्लेख आढळतो. बनारस हे नाव अनेक वर्षे वापरात होते, परंतु २४ मे १९५६पासून शासनाने वाराणसी या नावाचा अधिकृतपणे वापर सुरू केला.

बाल शौर्य पुरस्कार प्राप्त: आकाश खिल्लारे

बालपणीचे वय हे खेळण्या बागळण्याचे वय असते. या वयात आपण कोणाची कुठल्याही प्रकारची मदत करण्याचा साधा विचारही बहुतेकांच्या मनात येत नाही. मात्र, बालपणापासूनच स्वत:चा विचार न करता आपल्या अवतीभवती वावरणार्‍या समाजाचा विचार करणारेही याच जगात वावरत तेही कोवळ्या मनाचे याचा बर्‍याचदा अनुभव येतो. मग, स्वत:च्या जिवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखून इतरांच्या मदतीला धावणार्‍यांचा तितक्याच उंचीचा पुरस्कार देऊन सन्मान व्हावा या हेतूने २ ऑक्टोबर १९५७ पासून राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची प्रथा रूढ झाली आहे.

दिनविशेष

(२४जानेवारी)
१९२४ : मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर यांचा जन्म. 
 १९४३ : हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक सुभाष घई यांचा जन्म.
 १९५0 : 'जन-गण-मन' या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता.
 १९६६ : भीषण विमान दुर्घटनेत अणुशास्त्रज्ञ होमी भाभा यांचे निधन.
 २0११: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचे निधन. 
 २0१३ : दहशतवादी हेडलीला ३५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा.
२0१४ : खलिस्तानवादी दहशतवादी देविंदरपालसिंग भुल्लर याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय फेरविचार करणार असल्याची माहिती.

सुभाष घई

सुभाष घई हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक आहेत. त्यांनी इ.स. १९८२ साली मुक्ता आर्टस् नावाची चित्रपटनिर्मिती कंपनी स्थापिली. त्यांनी निर्मिलेल्या चित्रपटांतील कर्ज, हीरो, मेरी जंग, राम लखन, सौदागर, खलनायक, परदेस व ताल हे चित्रपट लोकप्रिय ठरले. सौदागर ह्या चित्रपटासाठी त्यांना १९९२ सालचा सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपटातील अनेक गोष्टींतील एक म्हणजे, 'आदमी सोचता कुछ और है और होता कुछ और है.' अर्थात ते घडतानाच एखाद्या व्यक्तिमधील गुणवत्ता कुठे कधी कशी उपयुक्त ठरेल हे काहीच सांगता येत नाही हेदेखील तेवढेच खरे,

Wednesday 22 January 2020

राम गणेश गडकरी

राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५0 कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

दिनविशेष

(२३ जानेवारी)
१६६४ : शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन.
१८९७ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म.
१९१९ : कवी, नाटककार आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे निधन.
१९२६ : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म
१९३२ : प्रभातच्या 'अयोध्येचा राजा'ची हिंदी आवृत्ती 'अयोध्या का राजा' मुंबईमध्ये प्रदर्शित.
१९८९ : स्पॅनिश चित्रकार साल्वाडोर दाली यांचे निधन.
२00२ : वॉल स्ट्रीट र्जनलचा पत्रकार डॅनियल पर्ल याचे कराचीतून अपहरण.

सामान्य ज्ञान वाढवा


१) '१२८३' हे पुस्तक कोणत्या फुटबॉलपटूचे चरित्र आहे?
२) नागालँडची राजधानी कोणती?
३) साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा 'मीरा पुरस्कार' कोणत्या राज्याचा आहे?
४) अहमदाबाद येथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कधी साजरा झाला?
५) रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे उद्भवणारा रोग आहे?
उत्तर- १)पेले २) कोहिमा ३) राजस्थान ४) २0१२ ५) अ जीवनसत्त्व
उत्तर : १) ब्राझील २) कृष्णा ३) दिशादर्शनासाठी
४) १९८६ ५) गुजरात

सुनंदा पटनाईक

संगीतातील एक अभ्यासू विदुषी सुनंदा पटनाईक यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी आकाशवाणीवरून आपले गायन सादर करणार्‍या सुनंदाबाईंनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण कुंदला आदिनारायण यांच्याकडून आणि नंतर ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे घेतले. पुण्यात त्यांचे संगीत अध्ययन सुरू असतानाच त्यांनी संगीत विषयात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना संगीत शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही मिळाली.

सोन्यापेक्षा महाग धातू पॅलेडीयम

जगाच्या बाजारात सध्या सोन्याच्या किमती वाढत असल्या तरी सोन्यापेक्षाही अधिक वेगाने एका धातूच्या किमती बाजारात वाढत चालल्या असून या धातूचे नाव आहे पॅलेडीयम. गेल्या दोन आठवड्यात या धातूंच्या किमती २५ टक्क्यांनी वाढल्या असून गेल्या एक वर्षात त्या दुप्पट झाल्या आहेत.

नॉलेज पार्क

प्रश्न-उत्तर 
1)2018 च्या आशियाई स्पर्धा या देशात झाल्या ....
क.भारत ख.इराण ग.चीन घ.इंडोनेशिया
2)2018 च्या आशियाई स्पर्धेत भारताने इतकी सुवर्णपदके  जिंकली....
क.18 ख.15 ग.19 घ.24
3) आशियाई स्पर्धेत भारत या खेळात नेहमी सुवर्ण पदक जिंकत आला आहे,पण या खेपेला सुवर्णपदक जिंकू शकला नाही....
क) धावणे ख.टेनिस ग.कबड्डी घ. हॉकी 
4) आशियाई स्पर्धेत या वर्षी या खेळाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आणि भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेत पदकदेखील मिळवले....

वाढवा सामान्यज्ञान



वाढवा सामान्यज्ञान
१)' हिमालयन ब्लंडर' या पुस्तकाचे लेखक कोण?
२) क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं?
३) चारमनार हे सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे?
४) सूर्याभोवती फिरण्याच्या पृथ्वीच्या गतीला काय म्हणतात?
५) भूकंप-लहरींची म्हणजेच भूकंपाची निर्मिती होते त्या भूभागाला काय म्हणतात?
उत्तर : १) ब्रिगेडयर जे. पी. दळवी २) गोवा ३) हैद्राबाद ४) सूर्यपरिभ्रमण गती ५) भूकंप केंद्र

वासुदेवाची स्वारी


'सकाळच्या पारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारीअसे म्हणत दान मागणार्‍या वासुदेवाची परंपरा आजच्या गतिमान युगात लुप्त झाली आहे. जत तालुक्यात वासुदेवाचे एकही कुटूंब नाही.  सुगीच्या दिवसांत मात्र काही वासुदेव फिरताना दिसतात. नंदीबैलगारुडीदरवेशी यांच्याप्रमाणेच वासुदेवसुद्धा लहान मुलांना पाहायला मिळत नाहीत.जत तालुक्यात  वासुदेवाची परंपरा  टिकवून ठेवण्यासारखे एक गाव अथवा एक कुटूंबसुद्धा नाही. आजच्या पिढीला वासुदेव ठाऊक नाही. यल्लमा यात्रा किंवा सुगीच्या दिवसांत काही वासुदेव दान मागत तालुक्यात काही ठिकानी फिरताना दिसतात. सध्या मात्र कुठेच हा वासुदेव पाहायला मिळत नाही.   

Tuesday 21 January 2020

प्रा. सुरजित हन्स

सुरजित हन्स यांना अनुवादक लेखक म्हणून पंजाब मध्ये ओळखले जाते. त्यांनी  सुमारे ४00 वर्षांपूर्वी झालेले  इंग्रजी साहित्यातील मोठे नाव असलेले विल्यम शेक्सपिअर यांच्या सर्वच पुस्तकांचा पंजाबी भाषेत अनुवाद केले.  नाटककार म्हणून ते बहुतेकांना परिचीत आहेत. बी. ए. इंग्रजीत करीत असताना सुरजित हन्स हे शेक्सपीअर यांच्या साहित्यकृतीच्या प्रेमात पडले. मॅकबेथ, हॅम्लेट, किंग लिअर, अँज यू लाइक इट, हेन्री तिसरा या शेक्सपीअर यांनी लिहिलेल्या नाटकांत हन्स यांनी कलाकार म्हणून काम केले.

दिनविशेष

   (२२ जानेवारी)
१६८२: सर्मथ रामदास स्वामी यांचे निधन.
१८९६ : कवी सूर्यकांत त्रिपाठी उर्फ निराला यांचा जन्म.
१९२0 : संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.
१९३४ : हिंदी चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक विजय आनंद यांचा जन्म.
१९७२: राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन.
२00४ : 'आकाश' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
२0१३ : शिक्षक भरतीप्रकरणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचा मुलगा अजय यांना दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा.
२0१४ : केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवला गेला.

सूर्यकांत त्रिपाठी 'निराला'

सूर्यकांत त्रिपाठी 'निराला' यांचा जन्म बंगालमधील महिषादल रियासत (जिल्हा मिदनापूर) येथे झाला. वसंत पंचमीला त्यांच्या जन्मदिवस साजरा करण्याची परंपरा १९३0 पासून सुरू झाली. त्यांचे वडील पं. रामसहाय तिवारी उन्नावचे राहणारे होते. ते मिदनापूर येथे शिपाई म्हणुन काम करीत होते. निराला यांचे शिक्षण हायस्कूलपर्यंत झाले. नंतर त्यांनी हिंदी, संस्कृत आणि बंगाली या भाषांचा अभ्यास केला.

Monday 20 January 2020

भाजपाचे आतापर्यंतचे राष्ट्रीय अध्यक्ष

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे.पी.नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चणाक्ष, व्यूहरचनाकार अशी त्यांची ओळख आहे. पाटणा आणि हिमाचल प्रदेश येथून त्यांचे शिक्षण झाले आहे. 2 डिसेंबर1960 मध्ये जन्मलेल्या नड्डा यांनी यापूर्वी मंत्री पद भूषविले आहे. भाजपच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयात त्यांचे योगदान राहिले आहे. नड्डा यांनी एल एल बी संपादन केली आहे. विद्यार्थी दशेतच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द सुरुवात केली.

गीता बाली

गीता बाली तथा हरिकीर्तन कौर या १९५0 आणि १९६0च्या दशकांतील हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांचे कुटुंब सध्याच्या पाकिस्तानमधील सरगोधा शहरातून मुंबईस स्थलांतरित झाल्यावर त्यांनी चित्रपटांत कामे करण्यास सुरुवात केली. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी द कॉबलर या चित्रपटात पहिली भूमिका केली तर १९४६मध्ये बदनामी या चित्रपटात मुख्य भूमिका केली. १९५५मध्ये गीता बाली यांनी शम्मी कपूर यांच्याशी लग्न केले.

दिनविशेष

(२१ जानेवारी)
१८९४: कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचा जन्म.
१९२४: माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते प्रा. मधु दंडवते यांचा जन्म.
१९४५: क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे टोकियो जपान येथे निधन.
१९५४ : पहिली अणू पाणबुडी 'नॉटलास'चा जलप्रवेश.
१९५४ : हॉलिवूड निर्माता सेसल बी. दमल यांचे निधन.
१९६५: अभिनेत्री हरिकीर्तन कौर ऊर्फ गीता बाली यांचे निधन.
२0१३ : केंद्र सरकारने सोने आणि प्लॅॅटिनमवरील आयात कर चार टक्क्यांवरून सहा टक्के केला.
२0१४ : मुझफ्फर दंगलीवेळी सामूहिक बलात्कार प्रकरणी २२ दंगलखोरांवरोधात स्थानिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला.

तरुणांमध्ये पक्षाघातात वाढतोय

भारतातील तरुणांमध्ये सध्या पक्षाघात हा आजार वाढत आहे. लठ्ठपणा, मधुमेह, अतिरिक्त मद्यपान, धूम्रपान ही त्याची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय ताणतणावाची जीवनशैलीही पक्षाघातासाठी कारणीभूत ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात पक्षाघात होणार्‍यांपैकी २0 टक्के रुग्ण चाळिशीखालील वयाचे आहेत. हा आजार झालेल्या रुग्णांपैकी ३0 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो, तर ३0 टक्के नागरिकांना अपंगत्व येते. मानवी शरीरात एकाच वेळी एक किंवा अनेक स्नायू कार्य करत नसतील तर अशा स्थितीला पक्षाघात म्हणतात.

हिंदी साहित्यातील सेक्सपियऱ: रांगेय राघव


रांगेय राघव हिंदी साहित्यातील विलक्षण कादंबरीकार,कथाकार, निबंधकार, टीकाकार, नाटककार, कवी आणि इतिहास होते. त्यांना हिंदी साहित्यातील सेक्सपिअर म्हटले जाते. ते मुळता: तामिळभाषी होते. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1923 रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला होता. राघव यांचे मूळ नाव तिरुमलै नंबाकम वीर राघव आचार्य होते. त्यांना नंतर रांगेय राघव या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांचे शिक्षण आग्रा येथे झाले. 1944 मध्ये सेंट जोन्स कॉलेजमधून पदवीत्तेर शिक्षण घेतले. नंतर 1948 मध्ये त्यांनी आग्रा विद्यापीठातून गुरु गोरखनाथ यांच्यावर पीएचडी केली. वयाच्या तेराव्या वर्षांपासून रांगेय राघव यांनी लिहायला सुरुवात केली होती. त्यांच्या लिखाणाची सुरुवात कवितेने झाली. रांगेय राघव यांची पहिली रचना 1946 मध्ये घरौंदा शिर्षकाने प्रकाशित झाली. ही विद्यापीठ जीवनावर लिहिलेली पहिली कादंबरी होती. घरौंदा या कादंबरीने ते प्रगतिशील कथाकार रुपाने चर्चेत आले. 1942 मध्ये दुष्काळग्रस्त बंगालचा प्रवास करून आल्यानंतर त्यांनी तुफानोंका बीच रिपोर्ताज लिहिला. त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली. साहित्याव्यतिरिक्त त्यांना चित्रकला, संगीत आणि पुरातत्त्व क्षेत्रातही रुची होती.

Sunday 19 January 2020

वाढवा सामान्य ज्ञान

वाढवा सामान्य ज्ञान
१) सुवेझ कालव्यावरील इजिप्तच्या किनारपट्टीवरील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बंदर कोणते?
२) लँड ऑफ रायझिंग सन ही ओळख कोणत्या देशाची?
३) युनोची घटना कुठल्या संमेलनात मंजूर झाली?
४) कोणार्कमधील प्रसिद्ध स्थळ कोणते?
५) 'ए डस्टंड मिरर' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण?
उत्तर : १) अलेक्झांड्रिया २) जपान ३) सॅनफ्रान्सिका
४) सूर्यमंदर ५) बाबरा टुखमन

दिनविशेष

(२० जानेवारी)
१९५७ : पंडित नेहरू यांनी तारापूर अणुशक्त केंद्राचे उद््घाटन केले.
१९७२ : अरुणाचल प्रदेश आणि मेघालय यांना घटक राज्याचा दर्जा दिला.
१९८८ : स्वातंत्र्यसैनिक आणि पश्तून नेते खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९0)
१९९३ : अभिनेत्री आँड्रे हेपबर्न यांचं निधन.
१९९९ : गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
२0१४ : आसामी कवी रवींद्र सरकार यांना २0१३ चा 'साहत्य अकादमी' पुरस्कार जाहीर.
२0१५ : युरोपीय महासंघाकडून हापूसवरील बंदी उठवण्याचा निर्णय

खान अब्दुल गफारखान

(१८९0 - १९८८) सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वतंत्र्याचा लढय़ामध्ये भाग घेतला होता. भारतर% पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये खुदाई खिदमतगार नावाची संघटना उभारली होती. ही संघटना सुर्ख पोश या नावाने देखील ओळखली जात होती.अब्दुल गफ्फार खान एक राजनैतिक आणि आध्यात्मिक नेता होते, त्यांना महात्मा गांधी सारखे अहिंसा आंदोलन साठी ओळखले जात होते.

Saturday 18 January 2020

मंगळ ग्रहाविषयी जाणून घ्या

मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असेसुद्धा म्हटले जाते. तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे.
हा एक खडकाळ ग्रह असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दर्‍या, वाळवंट व ध्रुवीय बर्फ यांचा बनला आहे. सूर्यमालेतील सर्वांत उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरीस मंगळावरच आहे. तसेच जून २00८ मध्ये नेचर मासिकात प्रकाशित झालेल्या तीन लेखांनुसार मंगळावर एक प्रचंड मोठे विवर असल्याचा पुरावा मिळाला आहे.

हिंदुस्थानी संगीत गायक:मास्टर कृष्णराव

कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्टर कृष्णराव (जानेवारी २0, १८९८ - ऑक्टोबर २0, १९७४) हे हिंदुस्तानी संगीत पद्धतीतील गायक व मराठी संगीत नाटकांमधील गायक-अभिनेते होते. गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे ते शिष्य होते. मास्तर कृष्णरावांचा जन्म पुणे जिल्ह्यात आळंदी येथे आजोळी झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण होते. कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत बाल गायक नटाचे काम सुरू केले.

दिनविशेष

(१९ जानेवारी)
१७३६ : वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म.
१८८६ : हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म.
१८९२ : विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म.
१८९८ : मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर यांचा जन्म.
१९0६ : चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा जन्म.
१९७0 : ऑलिम्पिक पदकविजेते नेमबाज राजवर्धनसिंग राठोड यांचा जन्म.
१९७९ : भारताच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना जोडणारी दिल्ली ते मद्रास ही तामिळनाडू एक्स्प्रेस सुरू झाली.
२0१३ : आर्थिक चणचणीमुळे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्वच मंत्रालयांच्या निधीला कात्री लावण्यास सुरुवात केली.
२0१४ : शास्त्रज्ञांनी पूर्ण वाढ झालेल्या पेशींपासून भ्रूणपेशी तयार करण्यासाठीची नवी आणि सोपी पद्धत विकसित केली.

मास्टर विनायक

मास्टर विनायक यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर कर्नाटकी. ख्यातनाम मराठी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता. जन्म आणि शिक्षण कोल्हापूर येथे. पिंडाचे कलावंत असूनही विनायकरावांना कोल्हापूरच्या विद्यापीठात परिस्थितीमुळे काही काळ शिक्षकाची नोकरी करावी लागली. ते चित्रपटसृष्टीकडे वळले ते प्रथम अयोध्येचा राजा (१९३२) ह्या हिंदी-मराठी प्रभातच्या चित्रपटात नारदाच्या भूमिकेकडे. विनायकरावांनी प्रभात फिल्म कंपनीच्या पाच चित्रपटांत भूमिका केल्या त्यानंतर प्रभात कंपनीचे पुण्यात स्थलांतर झाले; त्यामुळे विनायकरावांनी कोल्हापूर सिनेटोनमध्ये प्रवेश केला.

महादेव गोविंद रानडे

महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली. लहानपणी माधवराव अबोल आणि काहीसे संथ होते. मात्र त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती.

दिनविशेष

(18 जानेवारी)
१८४२: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म.
१९४७: भारतीय अभिनेता आणि गायक के. एल. सैगल उर्फ कुंदनलाल सैगल यांचे निधन.
१९६७ : क्रांतिकारक, कृषीतज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.
१९९६: अभिनेते आणि राजकीय नेते एन. टी. रामाराव यांचे निधन.
२00३: हिंदी साहित्यिक आणि कवी हरिवंशराय बच्चन यांचे निधन.
२0१३ : वाहतुकीला अडथळा आणणारा कोणताही पुतळा उभारण्याची अथवा बांधकामाची परवानगी न देण्याचे केंद्राचे राज्य सरकारांना निर्देश.
२0१४ : ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांची 'द वर्ल्ड पोस्ट' या ऑनलाइन संकेतस्थळाच्या संपादकीय मंडळावर नियुक्त.
२0१५ : अन्नसुरक्षा अभियानात सरसकट सर्व कुटुंबांचा समावेश करण्याचा आघाडी सरकारचा निर्णय भाजप सरकारने रद्द केला.