Saturday 2 November 2019

वासुदेव बळवंत फडके


 (४ नोव्हेंबर १८४५ ते १७ फेब्रुवारी १८८३). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचा एक आद्य प्रवर्तक. फडक्यांचे मूळ घराणे कोकणातील केळशी (रत्नागिरी जिल्हा) येथील. वासुदेवांचे आजोबा अनंतराव कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. दोन-तीन दिवस किल्ला तटवून अगतिक झाल्यावरच त्यांनी किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन केला. किल्ल्याजवळ असलेल्या पूर्वीच्या कुलाबा जिल्हय़ातील शिरढोण (रायगड) गावी पुढे फडके कुटुंबाचे वास्तव्य झाले. बळवंतरावांचा मुलगा वासदेव. त्याचा जन्म शिरढोण येथेच झाला. सातव्या वर्षापासून त्याच्या शिक्षणास सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले. १८५५-६0 या पाच वर्षांत माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी झाले. घरगुती अडचणींमुळे म्हणा किंवा शिक्षणाची आवड बेताची असल्यामुळे म्हणा; पण वासुदेवाने इंग्रजी पाचवीनंतर शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली.

चित्तरंजन दास


 (५ नोव्हेंबर १८७0 ते १६ जून १९२५). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदेपंडित व प्रभावी वक्ते. देशबंधू या उपाधीनेच ते ओळखले जातात. त्यांचा जन्म कोलकाता येथील उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. दासांचे मूळ घराणे विक्रमपूर परगण्यातील. वडील भुवनमोहन कोलकात्यात वकिली करीत. ते ब्राह्मो समाजाचे होते. चित्तरंजनाचे शिक्षण कोलकात्यात झाले. बी. ए. झाल्यावर १८९0 मध्ये ते आयसीएस परीक्षेकरिता इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या निवडणूक प्रचार सभांतून भाषणे दिली. याच वेळी मॅक्लिन नावाच्या एका इंग्रजाने हिंदी जनतेविषयी अनुदार उद्गार काढले. तेव्हा हिंदी लोकांची सभा घेऊन चित्तरंजनांनी मॅक्लिनचा निषेध केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी चळवळ करून त्याचे संसदेतील सभासदत्व रद्द करविले.

धोंडो केशव कर्वे

 (१८ एप्रिल १८५८ - ९ नोव्हेंबर १९६२). आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत. त्यांचा जन्म कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात झाला. शालेय शिक्षण मुरूड व रत्नागिरी येथे. १८९१ मध्ये मुंबई येथून ते बी. ए. झाले. त्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी फग्यरुसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्यानंतरच त्यांच्या समाजकार्यास चालना मिळाली. पहिली पत्नी वारल्यानंतर (१८९१) त्यांनी पंडिता रमाबाईंच्या 'शारदा सदन' या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. महर्षी अण्णासाहेब कर्वे आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली.

Tuesday 29 October 2019

डॉ.होमी भाभा

भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होमी भाभा यांना भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते मानले जाते. भाभा यांचा जन्म मुंबईत ३0 ऑक्टोबर १00९ रोजी सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम व्यक्ती होते. त्यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनिअर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते.

Monday 28 October 2019

अवकाशातील दुसरी सृष्टी ... केपलर -22 बी

अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी 'हॅबिटेबल झोन' मध्ये (निवास करण्यायोग्य क्षेत्र) पृथ्वीसारख्या दुसर्‍या ग्रहाच्या अस्तित्वाची पुष्टी केली आहे.  या नवीन ग्रहाचे नाव 'कॅपलर 22-बी' आहे.  बीबीसीच्या म्हणण्यानुसार, नवीन ग्रह पृथ्वीपासून 600 प्रकाशवर्ष दूर असून आकारात 2.4 पट मोठा आहे.  या ग्रहाचे तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.  खगोलशास्त्रज्ञांनी पुष्टी दिल्यानुसार हा पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह आहे.  तथापि, कॅप्लर 22-बी वर पर्वत, वायू आणि यासारखे उपलब्धीबाबत काही सांगण्यात आले नाही. 

Wednesday 23 October 2019

व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण

आर. के. लक्ष्मण हे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. लेखक आर. के. नारायण यांचे लहान भाऊ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार. रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९२४ या दिवशी म्हैसूर येथे झाला. वडील म्हैसूर येथील शाळेत मुख्याध्यापक होते. वडिलांच्या शाळेसाठी नियतकालिके त्यांच्या घरी येत असत. हार्पर्स, पंच, ऑन पेपर, बॉइज, अँटलांटिक, अमेरिकन मक्र्युरी, द मेरी मॅगझिन, स्ट्रॅण्ड मॅगझिन अशी मासिके त्यांना तिथे पाहायला-वाचायला मिळत असत. लक्ष्मण यांना त्यांतील विविध विषयांवरील चित्रे पाहण्यात रस होता. तशी चित्रे आपणही काढून पाहावी असे त्यांना वाटू लागल्याने लक्ष्मण चित्रे काढू लागले. अगदी सुरुवातीच्या काळात लक्ष्मण यांची चित्रे स्थानिक वर्तमानपत्रातून छापून येऊ लागली. मुंबईमधील जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् येथे शिकण्यासाठी लक्ष्मण यांनी अर्ज केला होता, पण तेथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

Wednesday 9 October 2019

वाढवा सामान्य ज्ञान

उत्तर : १) आदिस अबाबा २) प्रजासत्ताक शासन पद्धती 
३) ३३ ४) पेकिंग ५) व्यापारी पिके१) इथोपियाची राजधानी कोणती?
२) अंगोला या देशात कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे?
३) राजस्थानमध्ये किती जिल्हे आहेत?
४) बीजिंगचे पूर्वीचे नाव काय?
५) औद्योगिक व्यवसायाला उपयुक्त असणार्‍या पिकांना काय म्हणतात?

Friday 27 September 2019

28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन

रस्त्यावर फिरणारे मोकाट कुत्रे खूप मोठी समस्या बनली आहे. कुत्र्याच्या चावण्यामुळे होणारा 'रॅबीज जितका जीवघेणा असतो, त्यापेक्षाही जीवघेणे असते ते रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने वाहन घसरून होणारा अपघात. यात अनेकांनी आपला अमूल्य जीव गमाविला आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे मनपाचे काम आहे. तो सामान्यांच्या कक्षेबाहेरचा विषय आहे. पण, रॅबीजपासून बचाव हा नक्कीच आपल्या हातात आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर


लता मंगेशकर यांनी केवळ भारतीय पार्श्‍वगायन क्षेत्रातच आपली मोहोर उमटवली नाही तर चाहत्यांच्या हृदयावरदेखील त्यांनी अधिराज्य केलं आहे. लतादीदींना गाण्याचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला. मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणजे मराठी नाट्य-संगीतातील मोठं नाव. लतादीदी सांगतात, घरात संगीताचंच वातावरण असायचं. आई गायची नाही. पण तिला गाणं समजायचं. वडील तर सकाळी साडेपाच वाजल्यापासूनच तानपुरा घेऊन बसायचे. एकदा एका शिष्याला ते गाणं शिकवत होते.

Wednesday 25 September 2019

फ्रान्सिस दिब्रिटो


मराठी साहित्याचा उत्सव असलेल्या उस्मानाबादच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. निमंत्रक संस्था असल्याने मराठवाडा साहित्य परिषदेने एकाही साहित्यिकाचे नाव सुचवले नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीबाबत पार पडलेल्या भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थांसह संलग्नित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. घटक संस्थांनी वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती.

Friday 13 September 2019

ताजे अपडेट्स


असोशिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन (AWEB) च्या 2019-20 या कालवधीसाठी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? - सुनील आरोरा (मुख्य निवडूक आयुक्त, भारत)
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली?- यु.पी.एस. मदान
चांद्रयान-2 मोहिमेचा एकूण खर्च किती आहे?-978 कोटी रुपये
सध्या इस्त्रोचे अध्यक्ष कोण आहेत?-कैलाश वादीवू सिवन
पाकिस्तान क्रिकेट संघ्याच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली?- मिसबाह उल हक
ग्लोबल टायगर फोरम या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?- नवी दिल्ली
चौथ्या दक्षिण आशियाई स्पीकर समीटचे आयोजन नुकतेच कोणत्या शहरात झाले?- माले (मालदीव)

Sunday 1 September 2019

हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

गीत आणि साहित्य मनोरंजनातून जीवन जगण्याची शिकवण देतात. गीत हे साहित्यातून विकसित होत असल्याने गीतांचा साहित्यरूपी अभ्यास व्हावा, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. गीतांचा साहित्यरूपी अभ्यास होऊन तरुणांमध्ये साहित्य गोडी निर्माण होईल, यातून देशाला भावी साहित्यिक लाभतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईच्या चर्चगेट येथील जयहिंद महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषा व साहित्याच्या? विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. या पुरस्कार वितरण कार्यक्रमास हिंदी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. शीतलाप्रसाद दुबे, फिल्मसिटीचे उपाध्यक्ष, अमरजित मिर्श तसेच विविध क्षेत्रातील साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

पाच वर्षात 1लाख 67 हजार शेत तळ्यांची निर्मिती

मागेल त्याला शेततळे' या योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षात राज्यातील १ लाख ६७ हजार ३११ शेततळ्यांची निर्मिती होऊन ३९ लाख ४५0 एकर क्षेत्रासाठी संरक्षित सिंचन व्यवस्था झाली आहे. ही योजना रोजगार हमी विभागामार्फत राबविली जाते.

साधना

साधना शिवदासानी नय्यर तथा साधना या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नाव व रूपावरून त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते. त्यांचा जन्म आताच्या पाकिस्तानातील कराची शहरात झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. साधना शिवदासानी यांचे पुढील शिक्षण मुंबईतच झाले. चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात त्या शिकल्या. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यशस्वी अभिनेत्री बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. वडिलांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत घेतली.

मनोज नरवणे लष्कर उपप्रमुखपदी




लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. मनोज नरवणे हे आता लेफ्टनंट जनरल डी अंबू यांची जागा घेणार आहेत. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हे ३१ डिसेंबर रोजी नवृत्त होत आहेत. त्यानंतर नरवणे हे लष्करप्रमुखपदाच्या शर्यतीतसुद्धा दिसतील.

भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.
सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ ३0 ऑगस्ट २0१९ रोजी संपला. त्यांनी ३0 ऑगस्ट २0१४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांचा ५ वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्यपालपदी कोण येणार याविषयी चर्चा सुरू झाली होती. यात माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची राज्यपालपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात होते. पण, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगर सिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आशा भोसले

आशा भोसले (जन्म ८ सप्टेंबर १९३३) या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्‍वगायन केले आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही. आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. लता, हृदयनाथ आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला.

Sunday 18 August 2019

संस्कृत रेडिओ


संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ, खांडबहाले.कॉम निर्मित जगातील सर्वप्रथम संस्कृत-इंटेरनेट-रेड.िओ जागतिक-संस्कृत-दिनी ऑनलाईन प्रसारित करण्यात आला.
र्शवण हे भाषा शिकण्याचे प्रथम आणि अत्यंत प्रभावी माध्यम आहे. कोणतीही भाषा सतत कानावर पडल्याने त्या भाषेचे शब्द, उच्चार, उच्चारणपद्धति, व्याकरण याचे नकळत आकलन होते आणि हळुहळू ती भाषा आपसुकच ओठावर येते. मग याला संस्कृत भाषा कशी अपवाद असेल? संस्कृत अर्थात देववाणी शिकण्याची इच्छा अनेकांना असते परंतु सोयीनुसार व पूर्णवेळ संस्कृत र्शवण करता येऊ शकेल असे इंटरनेट जगतात एकही व्यासपीठ उपलब्ध नाही असे लक्षात आल्यावर नाशिकस्थित खांडबहाले डॉट कॉम या भारतीय भाषा व तंत्रज्ञान-विकास संस्थेने संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ, २४ तास व सातही दिवस (२४बाय ७) अव्याहतपणे सुरू राहिल असा संस्कृत-इंटेरनेट-रेड.िओ जागतिक-संस्कृत-दिनाच्या औचित्याने संस्कृतप्रेमींसाठी ऑनलाईन प्रसारित केला.

भारताकडे अमेरिकेचे रोखे

भारताकडे या वर्षीच्या जूनअखेर अमेरिकन सरकारचे रोखे (सिक्युरिटीज) सहा अब्ज डॉलर्सने वाढून ते १६२.७ अब्ज डॉलर्स झाले आहेत. किमान एका वर्षात भारताने ही सर्वात मोठी पातळी गाठली आहे. अमेरिकेच्या कोषागार विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार जून, २०१९ अखेर हे रोखे (१.१२२ ट्रिलियन डॉलर्स) जास्त जपानकडे तर १.११२ ट्रिलियन डॉलर्सचे रोखे चीनकडे आहेत. ज्या प्रमुख देशांनी अमेरिकन सरकारचे हे रोखे बाळगले आहेत, त्यात भारताचा क्रमांक १३वा (१६२.७ ट्रिलियन डॉलर्स) आहे. गेल्या मे महिन्यात हे रोखे १५६.९ अब्ज डॉलर्स तर एप्रिल महिन्यात १५५.३ अब्ज डॉलर्सचे होते. जून महिन्यात भारताकडे असलेले हे रोखे एका वर्षातील सर्वात जास्त होते. जून, २०१८मध्ये ते १४७.३ अब्ज डॉलर्स होते.
जागतिक अर्थव्यवस्था व्यापार युद्ध, काही आश्वासक बाजारपेठांच्या घसरणींसह सध्या अनेक अडचणींना तोंड देत आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताने लक्षणीय म्हणता येईल अशी रोख्यांत वाढ केली आहे.

Monday 12 August 2019

राज्यात दोन लाखांवर नागरिक बेपत्ता

दिवसेंदिवस अपहरण, बेपत्ता आदी घटना कानावर पडतात. देशातील अनेक लहान बालके, मुली, महिला, पुरुष आदींच्या हरविलेल्यांची संख्या दिवसागणिक वृद्धांगत आहे. राज्यातही हा आकडा मोठा आहे. देश, राज्यपातळीवर अनेक मागण्यांसाठी आंदोलने केली जाते. परंतु, बेपत्ता झाल्यांचा तुर्तास तरी विचार होताना दिसत नाही. पोलिस प्रशासनाकडून याबाबतचा तपास सुरू असेलही परंतु, किती बेपत्ता सापडलेत असाही प्रश्न आहे. राज्यात गेल्या दोन दशकात दोन लाखावर नागरिक बेपत्ता आहेत. ही बाब चिंताजनक आहे.

Saturday 10 August 2019

भारतीय अर्थव्यवस्था पिछाडीवर


अर्थव्यवस्थेच्या जागतिक क्रमवारीत अमेरिकेची अर्थव्यवस्था 20.49 ट्रिलियन डॉलर्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर 13.61 डॉलर्ससह चीनची अर्थव्यवस्था दुसऱ्या क्रमांकावर आहे. 4.97 ट्रिलियन डॉलर्स आकारमान असलेली जपानची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर जर्मनी 3.99 ट्रिलियन डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत ब्रिटन आणि फ्रान्सने भारताला सातव्या क्रमांकावर ढकलले. 2018 मध्ये ब्रिटनची अर्थव्यवस्था 2.64 ट्रिलियन डॉलर्सवरून 2.84 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली तर फ्रान्सची अर्थव्यवस्था 2.59 ट्रिलियन डॉलर्सवरून 2.78 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे.

भारतात सर्पदंशाने होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

जगभरात दरवर्षी 5.4 दशलक्ष सर्पदंशाच्या घटना घडत असून त्यातील सुमारे 2.8 दशलक्ष सर्पदंशाच्या एकट्या भारतात घडत असून त्यामुळे भारताचा उल्लेख सर्पदंशाची राजधानी असा केला जात आहे. भारतीय संस्कृतीने जरी सापांना देवता रूपात पूजलेले असले तरी सापांसंदर्भात मोठय़ा प्रमाणात असलेले अज्ञान आणि प्रचलित अंधश्रद्धा यामुळे सर्पदंशाने होणाऱ्या  मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. आज सापांचा नैसर्गिक अधिवास आणि त्यांच्या अन्नाच्या घटकांबाबत संकटांची व्याप्ती वाढलेली असल्याने, सापांनी आपला मोर्चा लोकवस्तीच्या त्याचप्रमाणे शेती, बागायतींच्या आसपास वळविलेला आहे आणि त्यामुळेच सर्पदंशाची प्रकरणे वाढून त्यात मृत्यूमुखी पडणाऱयांचे प्रमाण वाढत चालले आहे ही चिंतेची बाब आहे. पावसाळी मोसमात बहुतांश साप आपल्या भक्ष्याच्या, पाण्याच्या किंवा जोडीदाराच्या शोधार्थ बाहेर पडतात. सापांना कमी अन्न लागत असले तरी पाणी मात्र भरपूर लागते.

Saturday 29 June 2019

सुविचार संग्रह

1)जगात दुःख आणि दुःख देणारी माणसे पुष्कळ आहेत,म्हणून तुम्ही हसा आणि दुसऱ्यांना हसवा.-चार्ली चॅप्लिन
2) सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल, पण तुमचे यशदेखील कायमचेच झोपेल.-कर्मवीर भाऊराव पाटील
3) ज्यांनी कधी चुका केल्या नसतील त्यांनी कधी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाच नसेल.-अल्बर्ट आईसटाईन
4)नेहमी सर्वांच्या सद्गुणांना पाहाल तर सर्वगुणसंपन्न बनाल.-पं. श्रीराम शर्मा
5)समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यांनीच व्यक्तिविकास होतो.-डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Thursday 16 May 2019

छान छान सुविचार

1.संवादाने बहुतांश समस्या नाहीशा होतात.वाद करू नका,चर्चा करा.
2.जो खूपच सुरक्षित आहे,तो नेहमीच असुरक्षित असतो.
3.आपलं सत्त्व सिद्ध करण्यासाठी सोन्याला अग्निदिव्य करावं लागतं आणि हिऱ्याला घाव सोसावे लागतात.

Friday 26 April 2019

डेंगूने तीन वर्षांत 164 जण दगावले

राज्यभरात डेंग्यू, हिवताप, चिकुनगुनियासह इतर कीटकजन्य आजारांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षांमध्ये डेंग्यूमुळे राज्यभरात १६४ रुग्णांचा, तर हिवतापाने ५९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे.

Monday 18 February 2019

सुविचार संग्रह


1) सुखी आयुष्य जगायचे असेल तर आपल्या गरजा मर्यादित ठेवाव्या लागतील.
2)इतरांचा द्वेष करणे म्हणजे दुःखाला निमंत्रण देणे होय.
3) प्रत्येक पदार्थाची चव अवश्य बघावी;पण खाताना मात्र काय पचेल याचा विचार करावा.
4) देव आहे आणि तो आपल्याला मदतही करतो;आपले सगळेच काम तो करत नाही.
5) मराठी आमुची मायबोली तिचिये साऊली आम्ही असू।
6) बलवान माणसाला नशीब साथ देते.

Monday 4 February 2019

बाबामहाराज सातारकर

नीळकंठ ज्ञानेश्‍वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३६ रोजी सातार्‍याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपयर्ंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढय़ांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. प्रवचनकार दादा महाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली.

तोंडाचा आणि स्तनाचा कँसर

पुरुषांमध्ये मौखिक आणि फुप्फुसांच्या कर्करोगामुळे आणि स्त्रियांमध्ये गर्भाशय आणि स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. भारतात कर्करोगामुळे जितके लोक मृत्यूमुखी पडतात त्यापैकी ५0 टक्के मृत्यू वरील कारणांमुळे होत आहे.

Friday 1 February 2019

कल्पना चावला

अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या. भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले.

राज्यात १७ शहरांत तीव्र वायू प्रदूषण

राज्यातील १७ शहरांची हवा प्रदूषित झाली आहे. यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मुंबई, पुणे, तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर आणि जालना या तीन शहरांचा समावेश आहे. जालना आणि उल्हासनगर ही दोन शहरे राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रदूषित हवा असलेल्या देशातील शहरांच्या यादीत झाशी, जयपूर, खुर्जा, दिल्ली, नोएडा, बरेली आणि प्रयागराज यासह ३२ शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

भारतातीलनैसर्गिक आश्चर्ये

जगातील मानवनिर्मित आणि नैसर्गिक आश्‍चर्यांबद्दल आपण नेहमीच ऐकत आलो आहोत, पण भारतामध्ये ही काही राज्यांमध्ये अशी ठिकाणे आहेत, जिथे तरंगत्या सरोवरापासून ते 'डबल डेकर' पुलापर्यंत अनेक निसर्गाने घडविलेले चमत्कार आपण पाहू शकतो. या ठिकाणांना निसर्गाचा वरदहस्त लाभलेला असून, या ठिकाणी असलेली ही नैसर्गिक आश्‍चर्ये खरोखरच मन मोहवून घेणारी आहेत. ही नैसर्गिक आश्‍चर्ये भारतामध्ये कुठे आहेत हे जाणून घेऊ या.

Wednesday 9 January 2019

भारतात २४ तासांत २६ विद्यार्थी करतात आत्महत्या

भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे समोर आले आहे. भारतात २४ तासांत २६ विद्याथ्र्यी आत्महत्या करतात. गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्याचे या माहितीमधून स्पष्ट होते.

Sunday 6 January 2019

'भाईजान' सलमान खान


सलमानचे संपूर्ण नाव अब्दुल रशिद सलीम सलमान खान आहे. २७ डिसेंबर १९६५ रोजी मध्यप्रदेशातील इंदोर येथे त्याचा जन्म झाला. वडील सलीम खान यांनी अनेक चित्रपटात संवाद लेखक म्हणून आपली कारकिर्द गाजविली होती. त्यांनी व जावेद अख्तर यांनी मिळून लिहिलेल्या 'शोले' या चित्रपटातील संवादाला आजही तोड नाही. सलमानच्या आईचे माहेरचे नाव सुशिला चरक. त्या हिंदू असून लग्नानंतर त्यांनी आपले नाव बदलवून सलमा ठेवले. भावांमध्ये सलमान सर्वात मोठा. त्यानंतर अरबाज, सोहेल, बहीण अल्विरा व दत्तक पुत्री अर्पिता. अरबाजचा मलाईका अरोरा- खान सोबत विवाह झाला तर अल्विराने अभिनेता-दिग्दर्शक अतून अग्रिहोत्री सोबत विवाह केला. अर्पिताही नुकताच विवाह झाला असून सलमान मात्र अद्यापही विवाहाच्या प्रतीक्षेत आहे.

वाढवा सामान्यज्ञान


१) 'महिष्मती'च्या लेखिका कोण?
२) व्हिटॅमीन डी या महत्त्वपूर्ण घटकाचा शोध कोणी लावला?
३) आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक नियमन करणार्‍या संस्थेचं मुख्य कार्यालय कोठे आहे?
४) आशिया पॅसिफिक आर्थिक सामाजिक कमिशन या संघटनेचं पूर्वीचं नाव काय?
५) ओस्टयाग ही आदिवासी जमात कोणतं काम करते
उत्तर : १) नयनतारा देसाई २) एफ.जी. हाफकीन
३) माँट्रियल ४) इकाफे ५) फासेपारध्याचे
१)     १५ कि.मी. ते ५0 कि.मी. लांबीच्या नदीला कोणत्या प्रकारची नदी म्हणतात?
२) फिलिपीन्सचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा होतो?
३) आयर्लंडची राजधानी कोणती?
४) राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे?
५) चपराला अभयारण्य कोठे आहे?
 उत्तर : १) आखूड नदी २) ४ जुलै ३) डब्लिन ४) भोगावती
५) गडचिरोली